• Pune, Maharashtra
व्हायरस
व्हायरस: प्रकरण ९ . तू तुझ्या पापांची किंमत मोजशील 

व्हायरस: प्रकरण ९ . तू तुझ्या पापांची किंमत मोजशील 

Spread the love

 . तू तुझ्या पापांची किंमत मोजशील you will pay for your sins

माझ्या येणाऱ्या कथा कवितांचे अपडेट्स आपोआप मिळवण्यासाठी माझ्या वेबसाईटवर आल्यावर जे पॉप अप नोटिफिकेशन येते त्याला allow करा म्हणजे मी काही पोस्ट केल्यास आपल्याला त्याचे नोटिफिकेशन येईल. माहितीसाठी खाली फोटो देत आहे.

lekhani sangram
lekhani sangram

रात्र झाली होती. अश्वथ नुकताच घरासमोर येऊन पोहचला होता. त्याच्या घराच्या एका खोलीतून एक मंद असा प्रकाश बाहेर पडताना दिसत होता. शिवाय त्याच्या म्यूजिक प्लेयरवर कौशिकी चक्रवर्तीच्या Kaushiki Chakraborty आवाजात जा जा रे अपने मंदिरवा ‘ ja ja re apne mandirwa चा राग भीमपलासी सुरु होता.

आपल्या खोलीत असलेला मंद  प्रकाश आणि सुरु असलेले गाणे पाहून अश्वथ काहीसा सावध होऊनच आपल्या घरात जाऊ लागला. बाहेर सुस्त होऊन पडलेला गामा त्याच्या येण्याने शेपटी हलवत उठला आणि त्याच्यासोबतच आत जाऊ लागला.

आत खोलीत जाऊन पाहतो तर त्याला त्याच्या बिछान्यावर सुब्बू नागडा होऊन उताणा पडला होता. आपल्या कमरेभोवती कसलेतरी एक उपकरण future devices लावून तो त्याच्या व्हर्च्युअल बेबसोबत virtual babe प्रणयक्रीडेमध्ये रंगलेला होता. तेही वुमन ऑन टॉप अवस्थेमध्ये! virtual sex

you will pay for your sins
you will pay for your sins

दोघेही प्रणयानुरूप आवाज काढत जणू प्रणयात पुरते बुडाले होते. सुब्बूवर स्वार ती जर होलोग्राम प्रतिमा hologram image नसती आणि तीमध्ये अधूनमधून येणारे ग्लीचेससुद्धा glitches नसते तर ती कुणालाही एक अप्सराच वाटली असती. व्हर्च्युअल बेब वाटलीच नसती ती. इतकी खरी भासत होती ती!

         सुखाच्या परमोच्च शिखरावर पोहचला असताना सुब्बूची नजर बाजूला झाली आणि अचानक अश्वथला तिथे पाहून तो तर मग गडबडून गेला. कमरेवरील उपकरणाचे बटन घाईघाईने दाबत तो बिछान्यापलीकडे पडला. अश्वथच्या मागोमाग आलेला गामा हे पाहून गांगारून गेला होता आणि ती नग्न व्हर्च्युअल बेब पाहून मग तोही भुंकू लागला.

“अं ……….. ही इज सो हॅण्डसम.” व्हर्चुअल बेब अश्वथला पाहून बोलू लागली. तिला बंद करण्याचे सुब्बूचे प्रयत्न चालूच होते; पण ऐन फजितीच्या वेळी अशा गोष्टी तात्काळ बंद झाल्या तर नशिबच!

“ओह….. कम ऑन बेबी….. कम ऑन….. हिट मी. हिट मी हार्ड.”  व्हर्चुअल बेब पुन्हा त्याला पाहून कण्हत होती तशातच अचानक सुब्बूने कमरेवरील उपकरणावर जोरात हात मारला आणि व्हर्चुअल बेबची ती होलोग्रॅम प्रतिमा नाहीशी झाली. तेव्हा कुठे सुब्बूच्या जीवात जीव आला.

त्याला आता खूप खजील झाल्यासारखे वाटत होते. त्याने बिछान्याआडून आपले कपडे ओढून घेतले आणि कसाबसा तो आपल्या अंगावर एकेक करून कपडे चढवू लागला.

“च्यायला सुब्या, मी इतके दिवस झाले विचार करतोय की गादीचा घाण वास का येतोय. साल्या इकडे येऊन सगळी घाण सांडतोय तू.” अश्वथ तोंड वाकडे करत त्याला म्हणाला.

“अश्व्या भावा तसं काही नाही रे. मी तर आज इथे पहिल्यांदाच..”

“एक शब्द नको बोलू पुढे. म्हणे पहिल्यांदाच.”

“आई शप्पथ अश्व्या. मी तर तुझ्याकडे आलेलो. तर तू नव्हतास. त्यात एकटा. म्हटलं थोडं मोकळं…”

“गप्प रे.” अश्वथ तोंड मुरडत म्हणाला. त्यावर मग सुब्बू हातात अन्डरवियर पकडून तसाच त्याला पाहत उभा राहिला. गामा लाळ गाळीत त्यालाच पाहत उभा होता अजून.

“आता काय मुहूर्त पाहतोय का?” अश्वथने तो तसाच मूर्तीसारखा उभा असल्याचे पाहून त्याला विचारले.

“अं? मुहूर्त? कसला?” चेहऱ्यावर गोंधळल्यासारखे भाव आणत त्याने विचारले.

“खाली घाल ना काहीतरी की कसला मुहूर्त..” अश्वथ पुढे काही म्हणायच्या आधी त्याने अन्डरवियर घातली देखील.

“बेडशीट धुवून द्यावं लागणार आहे तुला.” अश्वथ त्याच्याकडे पाहून म्हणाला. कपडे घालत तो आता बिछान्याआडून बाहेर आला.

सुब्बूने अश्वथकडे फेकलेले ते क्रिप्टोरुपीचे crypto उपकरणही अजून बिछान्याखाली तसेच पडून होते; पण विखुरलेल्या अवस्थेत.

बसल्या जागी अश्वथ जोरजोरात हसत होता. काही केल्या त्याचे हसू थांबतच नव्हते. समोर बसलेला सुब्बू अगदी खेदपूर्वक मान खाली खालून बसला होता.

“ओह बेबी. कम ऑन. हिट मी. बेबी……..” असं म्हणून तो परत हसत होता. मग सुब्बू अधिकच खजील झाला.

फर्ग्युसन रोड वरील एका हॉटेलमध्ये दोघेही रात्रीचे जेवण करत होते. जेवता जेवता तो सुब्बूची मज्जा घेत होता.

“अश्व्या, बस ना राव. थोडीतरी शिल्लक ठेव अरे.” सुब्बू म्हणाला. अश्वथ अजून हसतच होता. हसी मजाक करत त्यांचे जेवण सुरु होते. रात्रही बरीच झाल्यामुळे रस्त्यावरची वाहनांची वर्दळ कमी झाली होती. फुटपाथवरील लोकांची ये-जा पण कमी झाली होती. हॉटेलच्या काचेला लागूनच बसल्यामुळे त्यांना बाहेरचं सहज दिसत होतं .

“अश्व्या? ते उपकरण आहे ना रे व्यवस्थित?” त्याने विचारले.   

“कोणतं? अश्वथने विचारले आणि एकदम आठवल्यामुळे म्हणाला, “ते होय? असेल की.”

“असेल की काय? असायलाच पाहिजे. त्या म्हाताऱ्याचे कसले तरी शेअर्स आहेत त्यात. नाहीतर वहिनीने ते ही लांबवले असायचे.” सुब्बू म्हणाला.

“वाहिनी?” असे अश्वथ म्हणतो न म्हणतो तोच एका भिकाऱ्यासारख्या दिसणाऱ्या जटाधारी, वयस्कर परंतु दारू पिलेल्या माणसाने आपला हात काचेवर जोरात मारला आणि ओरडून म्हणाला, “मरणार. सगळे मरणार.” अचानक त्याचा हा प्रताप पाहून ते दोघेही एकदम दचकलेच.

“मर्डर केला त्याचा मर्डर. मी सांगतो तुम्हाला. डॉक्टर अभिनवचा मर्डर केला.” तो माणूस जोरात ओरडला; पण काच असल्यामुळे आवाज बारीक आला. दोघेही त्याच्याकडे पाहत होते. हॉटेलच्या सुरक्षारक्षकांनी त्याला तिथून बाजूला नेले; पण तो तसाच ओरडत राहिला, “सगळ्यांचा मर्डर होणार. एकदम खच्याक.”

मध्यरात्र उलटून गेली होती. कालभद्रला अजून झोप आली नव्हती. आपल्या हवेलीच्या मध्यवर्ती कक्षात, मंद अशा प्रकाशात तो आपोआप झुलणाऱ्या खुर्चीत बसला होता. अंगात नाईट गाऊन, हातांच्या बोटांत विझलेली सिगारच्या आकाराची घोडा बीडी, कपाळाला चष्मा आणि त्याने त्याची नजर आपल्या हवेलीच्या विशालकाय छताला भिडवलेली होती.

मागील तासाभरात त्याची पापणी एकदाही लवलेली नव्हती. छत जितके विशालकाय होते तितक्याच विशाल खांबांचा आधारही त्याला होता. छतावरून एखाद्याने पाहिलं असतं तर त्याला वाटलं असतं की ते खांब कालभद्रला त्याच्या अहंकारासहित कधीही चिरडून टाकतील. भल्यामोठ्या हवेलीमध्ये तो एकटाच राहत होता. सोबतीला त्याचे नोकर, काळजी घ्यायला डॉक्टर आदी होतेच; पण आपलं असं त्याचं कुणीही नव्हतं.

आता मान खाली करून तो खाली शून्यात नजर रोखून पाहू लागला. तो कसला तरी गहन विचार करत होता बहुतेक. पण नेमका कसला? जगात अजून किती अराजकता माजवायची याचा? आता आपण थांबले पाहिजे याचा? की आपण हरलो याचा?

“छे छे. मी कसं काय हरू शकतो? संपूर्ण मानवजात नष्ट करण्याची ताकत बाळगून असलेला मी, मला कोण हरवणार?” असं म्हणत तो लटपटत खुर्चीतून उठला आणि बाजूला असलेल्या  मोठ्या आरशासमोर उभा राहिला. हातातील बिडीचा चुरगळा करून त्याने ती खाली टाकून दिली. कपाळावरचा चष्मा डोळ्यांवर घेतला आणि स्वतःला तो आरशात पाहू लागला.

काही वेळानंतर त्याने आपल्या नाईट गाऊनच्या नाडीची गाठ सोडली आणि त्याने तो आपल्या जीर्ण झालेल्या खांद्यांवरून खाली सोडून दिला. वयोमानानुसार सुरकुतलेलं व रोगाने खंगलेलं आपलं नग्न शरीर तो वरून खालीपर्यंत पाहू लागला. तासभर तो तसाच उभा होता आरशासमोर. जणू आपलीच दोन रूपे तो पाहत होता. असं वाटत होतं जणू आरशातील कालभद्र बाहेरील कालभद्रलाही तितक्याच बारकाईने न्याहाळत होता. कदाचित तो त्याला सांगू पाहत होता की हे सगळं तो बदलू शकला असता.

the kaalbhadra, images are for illustration purpose only
the kaalbhadra, images are for illustration purpose only

“भावना अमर आहे, अहंकार अमर आहे, शरीर नश्वर आहे.” असं तो स्वतःशीच पुटपुटला आणि आरशासमोरून बाजूला जात नग्नावस्थेतच हवेलीच्या पायऱ्या चढू लागला. वाढलेले वय आणि  स्वतः MV-४८ चा शिकार असल्यामुळे तो कष्टाने पायऱ्या चढत होता.

पायऱ्या चढून वर आल्यावर तो आपल्या शयनकक्षात आला. आपल्या राजेशाही पलंगावर बसून त्याने शेजारील छोट्या लाकडी कपाटाचा ड्रॉवर उघडला. त्यातून एक लहान कुपी व इंजेक्शन बाहेर काढले आणि कुपी फोडून त्यातील औषध सुईने आत खेचून घेतले. औषध खेचून झाल्यावर रिकामी कुपी त्याने खाली फेकून दिली व सुई वरच्या दिशेने करत इंजेक्शन मागून दाबले तसे त्यातील हवेचे बुडबुडे पिचकारीसहित बाहेत पडले. मखमलीसारख्या मऊ अशा राजेशाही पलंगावर तो हळूच टेकला. त्याने आपले डोळे पाण्याने गच्च भरत सुई दंडात घुसवली आणि अख्खे इंजेक्शन आपल्या शिरेमध्ये रिकामे केले.

घुसलेली सुई बाहेर काढून ते इंजेक्शनही त्याने खाली फेकून दिले आणि तोंड उघडून पण आवाज न करता खांदे उडवत, हुंदके देत, रडत रडत तो पलंगावर आडवा झाला.

[पुढे सुरू राहील]

व्हायरस कथेचा आधीचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

८. स्लम टॉवर्स: भीक आणि भूक Slum Towers

आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

मॅरेज मटेरियल Marriage Material

मी मॅरेज मटेरियल mi marriage material

ती आणि ती A lady and a prostitute

न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night

 marathi sahitya, marathi stories, marathi pranay katha, marathi goshta, chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, साहित्य, मराठी साहित्य, मराठी कथा, story in marathi, marathi kadambari,

chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, horror story in marathi, pratilipi marathi love story, marathi bodh katha, moral stories in marathi, marathi novels, small story in marathi wit

best stories to read,best novels to read,best romance novels of all time,content writing,story writing, copy writing,storytelling,art of storytelling,h mora

l


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *