• Pune, Maharashtra
व्हायरस
व्हायरस: प्रकरण १०. शेवटी, श्रीमंतांच्या आशिर्वादावर जगणारे दगडच आपण..!!

व्हायरस: प्रकरण १०. शेवटी, श्रीमंतांच्या आशिर्वादावर जगणारे दगडच आपण..!!

Spread the love

१०शेवटीश्रीमंतांच्या आशिर्वादावर जगणारे दगडच आपण..!! We are all slaves

          अथांग समुद्राच्या त्या खोल पाण्यात अश्वथ शांत, निद्रिस्त असा पडून होता. इतक्या खोलीवर सूर्याची किरणेदेखील व्यवस्थित पोहचत नव्हती. शरीराची कसलीच हालचाल न करता हळूहळू तो खाली खाली जात होता.

समुद्राच्या तळातून मधूनच काही बुडबुडे वरती जाताना दिसत होते. कसले तरी मोडक्या घराचे अवशेष त्याच्या अवतीभोवती पाण्यात बुडताना दिसत होते. त्यांच्या आसपास आपला जीव गुदमरत असल्याची जाणीव होताच त्याने पाण्यातच तोंड उघडत श्वास घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या नाका-तोंडात पाणी शिरले. खोल पाण्यातून हवेचे बुडबुडे वरती गेले. आपण बुडत असल्याची कल्पना आल्यामुळे आता तो वरती जाण्यासाठी धडपड करू लागला; पण कोणत्या दिशेने जावे हेच त्याला समजेना.

तो श्वास कोंडून कुठे प्रकाश दिसतो का ते पाहू लागला. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते. श्वास कोंडला होता. अखेर कुठूनतरी त्याला प्रकाश नजरेस पडला आणि त्याने सर्व ताकतीनिशी तिकडे कूच केली. जसजसा तो वरती जात होता तसतसा प्रकाश वाढत होता, त्याची तीव्रता वाढत होती.

          प्रकाश चांगलाच गडद होऊन आता आकाश दिसू लागले तेव्हा त्याची खात्री झाली की आपण समुद्राच्या पृष्ठभागापासून अगदी जवळच आहे. त्याच्या हृदयाची धडधड आता अधिकच तीव्र झाली होती. श्वास अक्षरशः गुदमरला असल्यामुळे त्याने पृष्ठभागावर जाऊन श्वास घेऊ या इराद्याने एक जोरात मुसंडी मारली आणि तो कशाला तरी थटून तिथेच अडकून राहिला.

त्याला काही केल्या बाहेर पडता येईना. डोळ्यांना तर आकाश दिसत होते, समुद्राचा पृष्ठभाग दिसत होता; पण त्याला डोके काही वर काढता येईना. जणू कुणी पारदर्शक काचच आडवी लावली होती. त्याचा जीव अगदी दमधीर झाला होता. बाहेर पाडण्यासाठी त्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते; पण यश काही येत नव्हते.

we are all slaves
we are all slaves, pictures are for illustration purpose only

         आता त्याच्या नाका-तोंडात पाणी शिरले होते. त्याची हालचाल मंदावली होती आणि सोबतच हृदयाचे ठोके पण मंद होत चालले होते. समुद्र पृष्ठभागापासून दीड-दोन इंचाच्या अंतरावर ऊर्ध्वगामी होऊन तो शेवटच्या घटका मोजत होता. डोळ्याच्या पापण्या बंद होणार तोच समोरून त्या काचेसारख्या वाटणाऱ्या पृष्ठभागावर त्या दिवशी हॉटेलच्या काचेवर ज्या व्यक्तीने हात मारला होता तोच व्यक्ती तसाच हात मारत अगदी  तसाच ओरडला, “मरणार. सगळे मरणार.”

          छातीतला आता उरलासुरला श्वास सोडत अश्वथ वेगानेच मागे गेला व त्याच्या बिछान्यापलीकडे जाऊन पडला आणि जोरजोरात धापा टाकू लागला. शेजारी बिछान्यावर झोपलेला गामा जागा झाला. बिछान्याच्या कडेला येऊन तो फक्त मुंडके बाहेर काढून कान टवकारत आणि भुवया उंचावत त्याच्याकडे पाहू लागला.

          काही क्षण तसाच पडून राहिल्यावर त्याने आपली नजर बाजूला वळवली. त्याने फेकून दिलेल्या त्या क्रिप्टोरूपी उपकरणाचे तीन तुकडे होऊन ते विखुरलेल्या अवस्थेत तिथेच पडले होते, ते त्याला दिसले. ते तुकडे त्याने उचलले आणि उठून ते तुकडे जोडण्याचा प्रयत्न करत तो टेबलाकडे आला व कानात बोट घालून ताराला होलोग्राम कॉम्पुटर सुरु करायला सांगून तो खुर्चीत बसला. अलग झालेले ते तुकडे टेबलावर ठेवून तो जोडू लागला. कॉम्पुटर सुरु झाला होता.

           तुकडे जोडत असताना त्याच्याकडून त्या उपकरणाची काही बटने दाबली जात होती. तेव्हा अचानक एक बटन दाबले जाऊन एक  CSB (Confined Serial Bus-USB पिन सारखी पण मर्यादित access असणारी) कनेक्टर पिन बाहेर आली. अश्वथला काहीच समजेना. त्याने ती पिन आपल्या कॉम्प्युटरला जोडण्याचा प्रयत्न केला; पण  USB पोर्टला ती जोडली जाईना. त्याने तो तुकडा बाजूला ठेवून दिला आणि मोर्चा दुसऱ्या तुकड्याकडे वळवला. त्याचीही काही बटणे त्याने दाबून पाहिली; पण कोणतीच पिन बाहेर आली नाही. त्याची निराशा झाली.

          “ब्लडी क्रॅप.” असे म्हणत त्याने तो तुकडाही बाजूला ठेऊन देऊन दिला आणि ताराला रेकॉर्डिंग सुरु करण्याची आज्ञा दिली.

“व्हिडिओ लॉग नंबर १४३. मे  १४ ,२०८४ आणि मी अश्वथ.” तो असे म्हणताच गामा  तिथे येऊन अश्वथच्या  खुर्चीला पुढचे दोन पाय लावून उभा राहिला आणि बारीक आवाज करत आपणही आहोत याची त्याला जाणीव करून दिली. video log ,vlog,

“आणि हा गामा.” असं म्हणत त्याने लॉग सुरु केला.

“नुकतंच कालभद्र ने MV-४८ च्या डोसची किंमत वाढवली. अख्ख्या जगातून त्याला विरोध होतोय. इथे सामान्य माणसाला जगणं मुश्किल होऊन बसलंय. त्यात वाढलेल्या डोसच्या किंमतीमुळे त्यांची अजूनच फरफट होणार. जगण्यासाठी फार संघर्ष करतायत ही लोकं. असं वाटतंय की लोकांना स्वप्नेच नाहीत. स्वप्ने पाहून तर काय होणार? रोजचा दिवस पुढे ढकलायचा आणि ढकलत राहायचा. रोज रात्री उद्याचा दिवस कसा असेल याचीच चिंता करणे आणि पाहायचे झाले तर फक्त उद्याच्या दिवसाचेच स्वप्न पाहायचे. असं वाटतंय लोकं जगणंच विसरली आहेत.” तो उद्विग्न होऊन बोलत होता.

          “लोकांना वाटतंय की कुणीतरी मसीहा येऊन त्यांना यातून बाहेर काढेल. खरंतर मलाही असं वाटतंय; पण.. पण – ” बोलता बोलता तो थांबला आणि  काहीतरी विचार करू लागला.

          “तुम्हाला माहितेय? मला एक सुंदर मुलगी भेटलीय. आर्या. आर्या नाव आहे तिचं. स्लम टॉवरला राहते ती. आमची पहिली भेट काही खास नव्हती. पहिल्यांदा मी तिला पाहिलं आणि पाहतच राहिलो. तिच्या अदांनी मला घायाळच करून टाकलं होतं.” त्याने तिचा मार खाल्लेला त्याला आठवले आणि त्याने स्मित हास्य केले.

            “पण होय, मला तिचा प्रामाणिकपणा आवडला. ती जबाबदार आहे आणि तितकीच कणखर पण! अर्थातच मला ती फार आवडली. विशेष म्हणजे मी तिला आवडलो. असं  वाटतंय की या रुक्ष अशा जगण्याला काहीतरी अर्थ येऊ पाहतोय. आता कुणासाठी तरी जगावंसं वाटतंय. कुणासोबत तरी वेळ घालवावा वाटतोय.” तो बोलतच होता.

“अँ…….न्ड. अँ…….न्ड आय हॅव माय फर्स्ट किस अल्सो.” तो थोडा वेळ घेऊन लाजूनच म्हणाला. my first kiss

          तो आपलं बोलणं पुढे सुरु ठेवणार तितक्यात बीप्… बीप्… असा आवाज येऊ लागला. त्याने पाहिले की मघाशी त्याने बटणे दाबून ठेवलेला तो दुसरा तुकडा वाजत होता. त्यावर आता लाल आणि हिरव्या रंगाच्या लाईटपण लागल्या होत्या.

तो तुकडा हातात घेत तो खुर्चीवरून उठला आणि बाजूला आला. गामाने लगेच त्याची जागा घेतली आणि पुढे स्क्रीनकडे जीभ बाहेर काढत पाहत राहिला. आता मात्र गामाचा व्हिडिओ लॉग सुरु होता!

          आपल्या तळहातावर तो तुकडा ठेऊन अश्वथने हात अगदी डोळ्यासमोर धरला आणि तो त्याच्याकडे पाहू लागला. अजून तो तुकडा आवाज करतच होता. तो का वाजतो आहे हे अश्वथला काही समजत नव्हते. अश्वथ फक्त त्याच्याकडे कुतुहलाने पाहत होता.

थोड्यावेळाने तो तुकडा वाजायचा बंद झाला. मग त्याने तो तुकडा शेजारी ठेवून दिला आणि त्याने आपला मोर्चा लॉगकडे वळवला. तो काही बोलणार तोच त्या तुकड्यातून एक आवाज आला, “शेवटी, श्रीमंतांच्या आशिर्वादावर जगणारे दगडच आपण….. हा … हा… हा…..!”

“बॅटरी एक्सझोस्टिंग…..प्लिज रिचार्ज दी बॅटरी. बॅटरी एक्सझोस्टिंग…..प्लिज रिचार्ज दी बॅटरी.” मुलीच्या आवाजात अशी सूचना त्यातून आली. अश्वथ मग ती बॅटरी कुठून चार्ज करायची ते पाहू लागला; पण परत आवाज आला, “स्विचिंग ऑफ दी डिव्हाईस.” आणि बंद झाला.

अश्वथ आता त्याच्या खुर्चीच्या मागे आला. गामा खुर्चीत बसून समोर होलोग्रामकडे पाहत होता. दोघेही आता होलोग्रामवर दिसत होते. अश्वथने मग आपले दोन्ही हात खुर्चीवर टेकवले आणि म्हणाला, “आत्तासाठी एवढंच.” व एक दीर्घ श्वास घेऊन पुन्हा म्हणाला, “शेवटी, श्रीमंतांच्या आशिर्वादावर जगणारे दगडच आपण…!!”

          आणि अश्वथने व्हिडिओ लॉग बंद केला व ताराला तो लॉग बरोबर शंभर वर्षांनी रिलीज करण्याची आज्ञा दिली.

मराठी कथा, story in marathi, marathi kadambari,

व्हायरस कथेचा आधीचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

व्हायरस: प्रकरण ९ . तू तुझ्या पापांची किंमत मोजशील 

आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

माय व्हॅलेंटाईन

मॅरेज मटेरियल Marriage Material

मी मॅरेज मटेरियल mi marriage material

ती आणि ती A lady and a prostitute

न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night

न्यू इयर पार्टी नाईट भाग ५

न्यू इयर पार्टी नाईट भाग ६


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.