• Pune, Maharashtra
कथा
वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग १

वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग १

Spread the love

Washington and America वॉशिंग्टन आणि अमेरिका

मोहनराव आज भलतेच खुश होते. अगदी सकाळी सकाळी मेल आला होता त्यांना. मुलाचा. ऊसातून. आपला वाला ऊस नव्हे. यूएसए यूएसए. USA यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका! तिथून. United States Of America

म्हणाला होता- बाबा, परत एकदा आजोबा होणार आहात तुम्ही. यावेळी नातू होणार आहे तुम्हाला. म्हटलं बोलावून घ्यावं. मधल्या काळात नाही जमलं काही. फ्लाईटचे तिकीटही Flight Tickets for US पाठवत आहे. याल ना? कायमचं? क्षितिला पण तिच्या आजोबांना प्रत्यक्ष पाहायचंय.

washington and america
washington and america

एका जीर्ण झालेल्या वृक्षाला खालून त्याचीच नातवंडे साद घालीत होती. वाटलं होतं ही पानगळ शेवटचीच; पण एक बहर तरी अजून घ्यावा म्हणतोय जणू तो वृक्ष. पूर्वीसारखी पालवी फुटणार नाही कदाचित, कदाचित नाही बहरणार तो हरित पर्णसांभार डोळ्यांत भरण्याजोगा; पण नातवंडांच्या ओढीने चारदोन हिरवी पाने जरी फुटली तरी या वृद्ध वृक्षास का नको आहेत?

हातातील काठीचा आधार घेत आपले थरथरते शरीर सावरत ते खुशीतच सारखे आपले आतबाहेर करीत होते. कधी त्या भिंतीवर टांगलेल्या आपल्या मृत पत्नीच्या तस्वीरीला येताजाता बोलत होते तर कधी ते वॉशिंग्टनशी Washington DC संवाद साधत होते.

वॉशिंग्टन, त्यांचा कुत्रा! हे बोलायचे आणि तो भुंकायचा! Pet dogs

दहा वर्षांपूर्वी क्षिती जन्मली तेव्हा आणला होता त्यांनी आणि मिसेस मोहनराव यांनी त्याला घरी. आपली छोटी नात भारतात आल्यावर तिच्यासोबत खेळण्यासाठी. पुढच्या महिन्यात ती आता दहा वर्षांची होणार होती. लहानच होती अजून ती; मात्र वॉशिंग्टन? तो आता सिनिअर सिटीझन Senior citizen, laws for american senior citizen झाला होता अगदी! मागील दहा वर्षांत तो  मोहनराव यांचा जणू मुलगाच झाला होता म्हटलं तर काही वावगं ठरायचं नाही. मिसेस मोहनरावांना तर आता पाच वर्षे झाली जाऊन. मुलगा अमेरिकेला. तेव्हा आता वॉशिंग्टनच काय तो त्यांचा आधार होता. कुत्रा असला तरी तो त्यांना उपरा बिलकुलच नव्हता!

“आजोबा, एका जागी बसून घ्या. सकाळपासून खूप येरझाऱ्या मारल्यात तुम्ही. अजून अमेरिका दूर आहे. नाहीतर आधीच ढगात जाल.” घरकामात गुंतलेली मीराबाई म्हणाली.

“मग माझी सगळी इस्टेट तुम्ही दोघं नवरा बायको बळकवाल आणि मग मी भूत होऊन इथं भटकत राहीन आणि तुम्हाला त्रास देईन.” मोहनराव कापऱ्या आवाजात म्हणाले.

“मला वाटलं तुम्ही अमेरिकेला जाऊन तुमच्या सुनेला आणि मुलाला त्रास द्याल.” मीराबाईचा नवरा सखाराम म्हणाला. तोही घरकामात व्यस्त होता.

“असं कसं, त्यांचा तर पहिला समाचार घेईन मी.” मोहनराव आवेगाने म्हणाले.

“पण भूतांना असा इंटरनॅशनल प्रवास करता येतो?” सखारामने विचारले. International travelling

“तसंही भुते दिसतात कुठे? जातील गुपचूप एखाद्या विमानात बसून.” मीराबाई म्हणाली.

“हे तर मग उत्तमच झालं. माझे तिकिटाचे पैसे तर वाचतील.” मोहनराव हसतच म्हणाले. flight to washington dc america, flight to america.

दुपारपर्यंत त्यांनी तो मेल किमान दहादा तरी उघडला असेल नी नजरेखालून घातला असेल. आपल्या जाड भिंगांच्या चष्म्याच्या दांडीला पकडून त्यांनी तो पुनःपुन्हा वाचला होता.

वॉशिंग्टनला त्यांच्या खुशीचे कारण समजायला तसा फारसा वेळ लागला नाही. तो अगदी लहानपणापासून त्यांना त्या मोठ्या डोक्याच्या कॉम्प्युटरसमोर बसलेले पाहत आला होता आणि कित्येकदा निराशेने त्याच्यासमोरून उठताना देखील. भलेही वॉशिंग्टन अमेरिकेत washington dc america, असले तरी या वॉशिंग्टनला काय कळणार अमेरिका, ती आहे काय आणि असते कुठे? त्याला बस्स एवढेच कळत होते की ते नावराबायको आपल्या मुलाची वाट पाहताहेत जो की बरीच वर्षे त्यांच्याकडे परतलाच नाही!

“अहो, ऐकलंत का? आज्जी होणारेय तुम्ही. तुमच्या लाडक्या चिरंजीवांचा मेल आलाय. सकाळी सकाळीच.”संध्याकाळी मिसेस मोहनरावांच्या त्या तस्वीरीसमोर दिवा लावताना ते बोलत होते आणि आत्तापर्यंत तीच वाक्ये किमान शंभरेक वेळा तरी ते त्या तस्वीरीसमोर जाऊन बोलले होते खरे.

“काय? एकशे एक वेळा बोललोय? अहो आता वय झालं की हो माझं; पण तुम्ही अजूनही तश्श्याच दिसता अगदी बरं का! चावटपणा काय यात? म्हातारा झालो म्हणून काय झालं, मनाने मी अजूनही तरुणच आहे बरं. चांगला पंचाहत्तर वर्षांचा तरुण आहे मी.” मोहनराव बोलतच होते. वॉशिंग्टन शेजारीच बसला होता त्यांच्या. शेपटी हलवीत. indians in america, indians in us

“म्हटलं, जाऊ का मग चिरंजीवांकडे?” त्यांनी विचारले आणि ते शांत झाले. काही वेळ ते काहीच बोलले नाहीत. मग तेच ती शांतता भंग करीत म्हणाले, “बरं, नको म्हणता. अजूनही राग गेला नाही वाटतं तुमचा. आमचा राग? हो तर आम्ही पण रागावलो आहेच की; पण म्हटलं असं किती दिवस आपले उरलेत आणि राग धरून ते काही वाढणार आहेत थोडीच? आणि तसंही अमेरिकेला जाऊनच राग काढावा म्हणत होतो मी.” 

त्यांचं असं बोलणं ऐकून वॉशिंग्टन washington , us capital, capital of united states त्यांना भुंकू लागला. त्याला नसेल त्यांना जाऊ द्यायचं.

“बघा वॉशिंग्टन देखील भुंकू लागला आता. मला वाटतं मी जायला हवं. आता तुम्हीच सांगा त्यात आपल्या नातवंडांचा काय दोष? आणि विशेष म्हणजे त्यांनी मला कायमचं बोलावलं आहे तिकडे.” मोहनराव वॉशिंग्टनच्या डोक्याला आपल्या वृद्धापकाळानुरूप थरथरत्या हाताने कुरवाळीत बोलले मात्र त्यांच्या त्या बोलण्याने तो तर अधिकच भुंकू लागला.  

दुसऱ्याच दिवशी अगदी सकाळी सकाळी फ्रेश होऊन पूर्वी कधी अमेरिकेला जायचं म्हणून घेतलेला तो ट्रॅकसूट त्यांनी एका कपाटातून सावकाश बाहेर काढला तेवढ्यात सोबत व्यवस्थित घडी घालून ठेवलेला मिसेस मोहनरावांचा तो स्वेटर खाली पडला. त्यांनी स्वतः विणलेला. काठीचा आधार घेत, काहीसे कुंथत-कन्हतच ते खाली वाकले आणि त्यांनी तो उचलून आपल्या हातात घेतला. आपला सुरकुतलेला हात अगदी हळुवारपणे ते त्यावरून मग फिरवू लागले.

“कशी वागतात ना ही हल्लीची मुले? म्हणे अजून मीच व्यवस्थित सेटल नाही तर तुमचं येणं थोडं लांबणीवर टाका. म्हणजे तुम्ही अमेरिकेत राहून पण सेटल नाही तर मग कुठे सेटल होणार आहात? याला ना आपल्याला तिकडे बोलवायचंच नाही. मी सांगते तुम्हाला, हा कीनई पडला असेल कुण्या गोऱ्या पोरीच्या प्रेमात आणि ते लिव इन चं सध्या फोफावत आहे ना तसा तो तिथे लिव इन मध्ये live in couple goals, couple goals in live in राहत असेल. मग कशाला आपल्याला तिकडे बोलावेल तो.” मिसेस मोहनराव तडातड बोलत होत्या. how to settle in america, how to settle in us, us visa, how to apply for us visa,

“अगं, पाहिलं तू शांत हो पाहू. थोडी उसंत घे. उगाच काहीही विचार नकोस आणू असे मनात. तो तुझा बीपीचा घोडा सुसाट सुटला असेल बघ. त्याला थोडं काबूत ठेव. त्याला खरंच काहीतरी अडचण असेल गं.” मोहनराव बायकोला शांत करीत म्हणाले.

“आता तुम्ही पण त्याचीच कड ओढणार असाल तर काही न बोललेलंच बरं. पुरुषांची जातच मेली वाईट.”

“आता आहे का, एकाच्या चुकीसाठी अख्खी पुरुषांची जातच तू धारेवर धरली तर.”

“नाहीतर काय मग. एवढ्या मेहनतीने मी दोन स्वेटर विणले होते. मला आणि त्याला. आणि आता म्हणतो कसा मी सेटल नाही अजून. नंतर या. अडलंय माझं घोडं.”

“घोड्यावरून आठवलं, बीपी आला का बरं खाली?” how to control blood pressure

“तुम्ही विषयांतर कराल तर पहा.”

“नाही नाही मी कशाला करतोय विषयांतर? हं तर कुठे होतो आपण? स्वेटरवर. हा स्वेटरवर. तर मिसेस मोहनराव, तुम्ही तर माझ्यासाठी स्वेटर विणला देखील नाही. एवढा अन्याय असतो का कधी पुरुषांच्या जातीवर?” men will be men

“मग ठेवा त्याच्या वाटणीचा तुम्हालाच.” त्या म्हणाल्या.

मोहनरावांची दोन आसवे नकळत त्यांच्या डोळ्यांतून खाली त्या स्वेटरवर पडली आणि अचानक ते जुन्या आठवणींतून बाहेर पडले. वॉशिंग्टन त्यांना बिलगून बिचारा शेपटी हलवत तोंडातल्या तोंडात आवाज करीत राहिला.

[कथा पुढे सुरू राहील]

कथेचा पुढचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग

वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग ३

लेखणी संग्रामच्या अजून कथा वाचण्यासाठी खालील लिंकला अवश्य भेट द्या.

कळी खुलू दे

भाऊबीज भाग १

 टिक टॉक टिक टॉक टिक

बॅरिस्टर

व्हायरस ही आपली कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १


Spread the love

5 thoughts on “वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *