• Pune, Maharashtra
कथा
वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग ३

वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग ३

Spread the love

अमेरिकेला America जायच्या आदल्या रात्री ते वॉशिंग्टनशी Washington हितगुज करीत बसले होते. पहाटे निघणार होते ते. a flight to usa, a flight to washington आपला वॉशिंग्टन एक प्राणी असल्याचे त्यांना आज खरे दुःख वाटत होते. इतक्या वर्षांच्या त्याच्या सहवासाला उद्यापासून ते मुकणार होते.

कदाचित वॉशिंग्टनची अवस्थाही तशीच असावी. बोलता येत नसले म्हणून काय झाले? भावना त्यालाही होत्याच की. आपला मालक उद्या आपल्याला सोडून निघून जाणार हे त्यानं का उगीच जाणले होते? तेही कायमचे.

काही का असेना, आयुष्यात ताटातुट ही काही काळासाठी असेल तर पुन्हा त्या व्यक्तीला भेटायचे आहे याची खात्री कुठेतरी असते मनामध्ये; पण जर का ती ताटातुट कायमचीच असेल तर? तर मात्र-

Washington America
Washington America

आणि वॉशिंग्टनला ते कळून चुकले होते. बिचारा आपल्या पुढच्या पायांवर मस्तक टेकवून मोहनरावांचे बोलणे ऐकीत बसला होता. अश्रू गाळीत. विव्हळीत!

आपल्या वृद्धत्वाला साजेशा अशा कापऱ्या आवाजात ते बोलले, “वॉशिंग्टन?” अगदी घशापर्यंत आलेला हुंदका त्यांनी कसाबसा सावरला; पण नाही सावरता आले त्यांना डोळ्यांत टचकन उभे राहिलेले ते अश्रू नी त्याच्या त्या धारा त्यांच्या सुरकुतलेल्या गालांवरून अडखळत खाली निघालेल्या. नाही सावरता आल्या त्यांना.

“मला. ह्या म्हाताऱ्याला. ह्या दुष्ट म्हाताऱ्याला विसरणार तर नाहीस ना रे लेका? स्वार्थी झालाय रे हा म्हातारा. पुत्रप्रेमासाठी. नातवंडांसाठी. स्वार्थी झालाय अगदी! शेवटी मनुष्यच की रे. जरा कुठे जुन्या नात्यांना ओलावा मिळाला की मुळ्या पसरवल्याच.”

“पुत्रप्रेम.”बोलता बोलता ते हसले. आपल्या डोळ्यांवर असलेला जाड भिंगांचा तो चष्मा त्यांनी लटलटणाऱ्या हातांनी खाली उतरवला आणि अंगतील सदऱ्याने तो सावकाश पुसून घेतला व तो पुन्हा डोळ्यांवर चढवत ते बोलू लागले, “पुत्रप्रेम.. पुत्रप्रेम? पंधरा वर्षे झाली की रे. हं पंधराच झाली. पंधराच. एकदा पण नाही फिरकला रे तो. एकदा पण नाही. आई गेल्याचं कळल्यावर तरी? तरीपण नाही रे. तुला का सांगतो आहे मी? तुला तर माहितच आहे.”

“तुझी व्यवस्था केलीय बरं का रे. सखाराम आणि मीराबाई सांभाळतील तुला. सगळी मोहमाया आहे रे नुसती. बघ ना मला. खांद्यावर जायच्या वयात मी अमेरिकेला चाललोय. पडलोच की मोहाला बळी, नाही का? सुप्त, कुठेतरी तो एक झरा असतोच की. खळखळ नाही; पण अगदी शांत वाहणारा. आपुलकीचा, प्रेमाचा. नात्यांचा, बंधांचा. खासकरून रक्ताच्या!”

वॉशिंग्टनला बिचाऱ्याला त्या बुजुर्गाचे ते तत्वज्ञान कितपत कळत होते ते तो जाणो आणि देव जाणो. ऐकत मात्र होता तो. काही तासांचाच तर सहवास शिल्लक होता त्याचा आपल्या धन्यासोबतचा.

“वरून मग तिरस्काराचे, रूसव्या-फुगव्यांचे, हेव्या-दाव्यांचे कितीही निसरडे शेवाळ साचले असले तरी आतला तो झरा वेळप्रसंगी तृष्णा भागवतोच की!”

कुत्र्यांना जर हुंदके देऊन रडता येत असतं तर त्या रात्री वॉशिंग्टन देखील हुंदके देऊन नक्कीच रडला असता. दुःख त्यालाही होतंच की. आजपर्यंत मुलाप्रमाणे माया करणारा हा माणूस जेव्हा आपल्या पोटच्या मुलाकडून बोलावणे आले तेव्हा सगळे हेवे-दावे बाजूला ठेवून निघालाय अमेरिकेला. धिक्कार असो तुम्हां मनुष्यांचा असा तो बोलला देखील असता. पण शेवटी काय, पाळीवच तो. मालक ऊठ म्हटला की उठायचे, बस म्हटला की बसायचे. कधी लाडात शेपटी हलवायचे तर कधी कधी भुंकायचे देखील. आणि हाड म्हटले की हाडायचे!

आपल्या खुर्चीतून सावकाश उठत मोहनराव खाली वॉशिंग्टन शेजारी बसले. लटलटणाऱ्या हाताने ते त्याला कुरवाळू लागले. वॉशिंग्टन लगेच विव्हळू लागला. मघाचपासून जणू तो याचीच वाट पाहत होता तर. आपसूकच त्याची शेपटी हळू लागली. तो उभा राहिला. लहान लेकरू बापाला अचानक जसं बिलगतं तस्साच तो त्यांना बिलगला. बिलगला? अगदी मिठीत शिरला. घट्ट मिठीत!

आपल्या वृद्ध बाहुंत जेवढे बळ असेल तेवढे सारे बळ एकवटून त्यांनी वॉशिंग्टनला अगदी कडकडूनच मिठी मारली. त्या मिठीसरशी तो सारा काळ त्यांच्या बंद डोळ्यांसामोरून पळता झाला. तो दुडूदुडू धावणारा गोंडस असा वॉशिंग्टन. त्याच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंतचा वॉशिंग्टन. त्यांच्या सुख-दु:खातला त्यांचा वॉशिंग्टन!

तिकडे जाऊन क्षितिला आपल्या बाहुंत घट्ट पकडून ठेवायचे असा निश्चय मनाशी केलेल्या मोहनरावांना आत्ता वॉशिंग्टनला काही आपल्या बाहुपाशातून दूर करता करवेना.

लळा. एकदा कुणाचा हा लळा लागला की समजा मनात त्याच्या प्रेमाचा मळा फुललाच! आणि लागलेला लळा अचानक तुटलाच तर. . तर मात्र तो मळा उद्ध्वस्त झालाच म्हणून समजा. अगदी विरहाच्या ज्वाळा फेकीत!

विरहाच्या त्या तप्त ज्वाळा आता त्या दोघांनाही सोसणाऱ्या नव्हत्या मुळी.

“बघता बघता आपला वॉशिंग्टन किती मोठा झाला ना हो?” मेसेस मोहनरावांचे ते शब्द त्यांना आठवले. manes for pet god, manes for puppies,

“कुत्रा कुणाचा आहे तो?” मोहनराव छाती फुगवत म्हणाले खरे; पण सौभाग्यवतीच्या पुढच्याच वाक्याने त्यांना पुरते निराशच केले.

“लोक साधारणपणे मुलगा कुणाचा आहे असं म्हणतात. आणि बघा ना आपल्याला काय म्हणायची वेळ आलीय.” डोळ्यांत आसवे आणीत त्या बोलून गेल्या. मोहनरावांना देखील मनातून वाईट वाटले; पण त्यांनी ते आपल्या चेहऱ्यावर बिलकुलच आणले नाही. ते लगेचच म्हणाले, “हा कोण आहे मग? हा आपला मुलगा नाही?”

“आहे ना अहो; पण-”

“पण काय आता?”

“शेवटी ते एक भावनिकच नातं झालं की हो. प्राण्याशी असलेलं.”

“म्हणून काय झालं? शेवटी आधाराला जे कामी येतं तेच नातं जवळचं झालं ना?” मोहनराव म्हणाले.

“हो; पण.”

“पण बिन काही नाही. मुलगा आला का आपला? नाही ना? साधं बोलावणं तरी आलं? नाही ना?” 

“येईल हो.”

“कधी? आम्ही मसनात-”

“काहीतरीच काय बोलायचं?” असे म्हणत त्या मुसमुसू लागल्या. मोहनरावांना आपण असे बोलायला नको होते याची जाणीव झाली तसे त्यांनी त्यांना आपल्या मिठीत घेतले. समजावत.

“तो येईल तेव्हा येईल. तोपर्यंत आपला वॉशिंग्टन आहे की.” ते  त्यांचे अश्रू पुसत म्हणाले. मिसेस मोहनरावांनी रडू आवरत होकारार्थी मान हलवली. वॉशिंग्टन कधी येऊन त्यांना बिलगला त्यांना कळले देखील नाही.

“एक सांगू?” मोहनराव म्हणाले. सौभाग्यवतींनी संमतीदर्शक मान हलवली. तसे ते म्हणाले, “फुलात फूल धोत्र्याचे. . . फुलात फूल धोत्र्याचे आणि जगात प्रेम कुत्र्याचे!”

“तुमचं आपलं काहीतरीच असतं हं. एवढा पण लळा बरा नव्हे. उद्या कधी त्याने तिकडे बोलावून घेतले तर मात्र अवघड होऊन बसेल, मी सांगते तुम्हाला.”

पत्नीच्या त्या वाक्यांनी ते भानावर आले. वॉशिंग्टनची मिठी सोडवत ते जागचे उठले आणि काही न  बोलता आत निघून गेले. वॉशिंग्टन त्यांच्या मागे मागे चालू लागला. आपल्या खोलीत जाताच त्यांनी दरवाजा लावून घेतला. वॉशिंग्टन मात्र बाहेर विव्हळत राहिला बिचारा काही काळ. आता मोहनराव बाहेर पडतील ते सकाळीच. फ्लाईटसाठी. सोडून जाणार मग आपल्याला. कायमचे. अगदी कायमचेच! जणू मनात हाच विचार करीत असल्यागत.

आज तो तिथे त्यांच्या दारातच झोपी गेला. जाग आली ती पहाटे, मोहनराव निघण्याच्या वेळेला. ते आत्ता निघतील मग निघतील करीत तो तिथेच येरझाऱ्या घालीत राहिला.

अखेर खोलीचा दरवाजा उघडला गेला. मोहनराव सावकाश काठीच्या आधाराने बाहेर पडले.

“चल. . . वॉशिंग्टन.” ते एवढेच म्हणाले आणि पायऱ्या उतरू लागले.

वॉशिंग्टनला काहीच समजेना. त्याने आत खोलीत डोकावून पाहिले. त्यांचा कॉम्प्युटर सुरू होता.  

‘प्रिय. . . सुमित.’ मघाशी, पहाटे पहाटे ते आपल्या कॉम्प्युटरसमोर बसले होते. अंधारातच. थरथरत्या हातांनी त्यांनी मेल टाईप करायला सुरवात केली होती; पण मुलाचे नाव लिहून ते काही क्षण तसेच बसून राहिले. पुढे काय लिहावे काही सुचेना त्यांना आता. बोट बॅकस्पेस वर ठेवून त्यांनी आपल्या मुलाच्या नावाची एकेक अक्षरे पुसून टाकली.

‘प्रिय चिरंजीवास.’ ते आपला चष्मा सांभाळीत, पाठीला बाक आणीत मग सावकाश टाईप करू लागले.

‘नाही जमायचं यायला. का? याचं उत्तर मी देऊ इच्छित नाही.

तू बोलावलंस याचं समाधान आहे. पाच वर्षे आधी तरी बोलवायचंस. तुझी आई नी मी पळत आलो असतो की. बिचारी आस लावून बसलेली. गेली ती. तू आला नाहीस तरीही. कामे असतील ना.

म्हातारा खोड झालोय रे आता. काहीकाळ तुझ्या बोलावण्याने ओलावा निर्माण झाला खरा; पण नकोय रे आता. नकोय तो ओलावा. आता नकोय पुन्हा ती पालवी. तो मोहाचा पर्णसांभार. खरंच नकोय काही.

शिवाय इथे माझ्या जगण्याचा एक आधारही आहे. वॉशिंग्टन. तुला खूप आधी बोललो होतो बघ. क्षितिच्या जन्मावेळी आणलं होतं त्याला. लळा लागलाय त्याचा. त्याला सोडवेना मला. तुझ्यानंतर तोच मुलगा झाला आमचा.

तुझे तिकिटाचे पैसे वाया जातील. हवे तर पाठवून देईन.

टाईप करतानाही त्रास होतो हल्ली. वय ना रे. त्यामुळे थांबतो.’ असे लिहून त्यांनी ‘तुझा बाबा’ असा शेवट करून दिला.

पुन्हा ते पुसून टाकून ते पुढे लिहू लागले- ‘सुरवातीला तुझं नाव नाही लिहिलं. मुद्दामूनच नाही लिहिलं. कारण हे तुझ्या एकट्यासाठी नसून अशा तमाम चिरंजीवांस आहे जे परदेशात गेल्यावर आपले आई-बाबा, आपला देश, आपली माती विसरले. राग मानून घेऊ नकोस. थांबतो आता. तुझा बाबा!’ त्यांनी शेवट करून दिला आणि सेंड बटन दाबून दिले.  

वॉशिंग्टन पायऱ्या उतरून हातात काठी घेऊन जाणाऱ्या मोहनरावांच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत उभा राहिला काही क्षण आणि लगेचच धावत जाऊन तो आता त्यांच्यासोबत चालू लागला.

साधारण चारेक दिवसांनी मोहनरावांना त्यांच्या चिरंजीवाचा मेल आला. म्हणाला होता- ‘माझ्या चुकीचा मला पश्चाताप होत आहे बाबा; पण तुम्ही याल याची खात्री होती. असो,  जसे तुम्हाला योग्य वाटेल तसे.

आणि हो, पुढच्या महिन्यात क्षितिच्या वाढदिवसाला गिफ्ट पाठवण्याची तसदी नका घेऊ. आम्ही आता वॉशिंग्टन सोडत आहे. लवकरच दुसरीकडे शिफ्ट होणारेय. कळवेन नंतर.  काळजी घ्या!’

मोहनरावांना यापेक्षा अजून काही जास्तीचं अपेक्षितही नसावं. पण त्यांना थोडं या गोष्टीचं वाईट वाटलं की आता इथून पुढे त्यांना क्षितिला गिफ्ट पाठवता येणार नव्हते अजिबात. best birthday gifts for girl, best birthday gift for children, best birthday gift for girlfriend

“चला, चंद्रकोर तर तयार झालीच आहे एकदाची, आता आमवस्येची ती काळी रात्र दूर नाही. गडद अंध:काराची!” ते स्वतःशीच पुटपुटले.  

एके दिवशी मॉर्निंग वॉकहून परत आल्यावर मोहनराव घरात शिरले; पण अचानक त्यांना आपण दुसऱ्याच घरात शिरल्याची जाणीव झाली. वॉशिंग्टन तर घराजवळ आल्यापासूनच भुंकत सुद्धा होता. benefits of morning walk,

washington and america

 “शांत हो बाळा, वॉशिंग्टन. आता म्हतारपणात याचीही सवय करून घ्यावी लागणार तर.” कापऱ्या आवाजात असे म्हणत ते जाण्यासाठी मागे वळले.

मनातून खूप वेदना झाली होती त्यांना. आज पहिल्यांदा ते आपल्या घराची वाट चुकले होते. त्यांना मात्र कळून चुकले होते की आता आपल्याला एक दुसरीच एक वाट खुणावतेय; पण कसली?

पायऱ्या उतरून खाली जाणार तोच मागून एक गोड आवाज कानी आला त्यांच्या.

“अॅजोब्बॅ?” 

हातात काठी घेतलेले, खांद्यातून जरासे वाकलेले आणि काहीसे लटपटणारे मोहनराव मग सावकाश मागे वळले. एका हाताने चष्मा ठीक करीत ते पाहू लागले. अचानक हातातील ती काठी गळूनच पडली. मागे वॉशिंग्टन जोरजोरात भुंकत होता. त्याचाही आवाज त्यांना नीटसा ऐकु येईना.

घाऱ्या डोळ्यांची, गुलाबी कांतीची नी सोनेरी केसांची चिमुकली होती ती. क्षिति होती ती. त्यांची क्षिति!

धडपडतच ते पायऱ्या चढले. मागोमाग वॉशिंग्टन सुद्धा! आणि जाऊन त्यांनी तिला लागलीच आपल्या मिठीत घेतले. क्षणभर त्यांनाही विश्वासच बसला नाही; पण मिठीतल्या त्या उबेने त्यांना खात्री करून दिली. वॉशिंग्टन अजूनही त्यांना चाटीत होता.  

समोर दरवाज्यात त्यांची गोरी सूनबाई आणि चिरंजीव एकमेकांना बिलगून उभे होते. मोहनरावांनी त्यांच्याकडे पाहताच ते एका सुरातच त्यांना म्हणाले, “म्हटलो होतो ना आम्ही पत्ता बदलतोय म्हणून.”

[समाप्त]

कथेचे आधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग १

वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग २

माझ्या अजून काही कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

गंडी अण्णा:भाग १

बॅरिस्टर

माझी व्हायरस ही कथा पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १


Spread the love

2 thoughts on “वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग ३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *