• Pune, Maharashtra
कथा
वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग २

वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग २

Spread the love

जुन्या आठवणी बाजूला ठेवत मोहनरावांनी अंगात तो ट्रॅकसूट चढवला आणि वॉशिंग्टनला washington dc सोबतीला घेऊन मग ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले काठी घेऊन.

washington america
washington america

हिवाळा तोंडावर असतानाची सकाळची ती नाजुक थंडी कुडकुडायला जरी लावत नसली तरी जाणवत मात्र होती काहीशी. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या उंच झाडींनी धुक्याची पातळ शाल पांघरल्यासारखे चित्र जणू उभे राहिले होते. वाढत्या वयानुसार स्थूल झालेली शरीरे घेऊन मंडळी आपली चरबी वितळविण्याचा आटोकाट प्रयत्न करताना बाजूच्या बगीच्यात तसेच त्या रस्त्यावर नजरेस पडत होती.

काही वृद्ध असेही होते की जे आले होते मॉर्निंग वॉकला पण म्युनिसिपालिटीच्या त्या सिमेंटच्या बाकडावर टेकून मस्त तोंड आ करून अगदी घोरतच ताणून दिलेले. दुसऱ्याच बाकडावर दोन म्हातारे जेगिंग घालून समोरून धावत गेलेल्या एका तरुणीच्या पृष्ठभागाला न्याहाळत तोंडाचा आ करून आश्चर्य करीत बसले होते. तर त्याच तरुणीला पाहून काही चाळीशीतल्या बायका नाके मुरडताना देखील दिसत होत्या.

“काय मोहनराव, आज ट्रॅकसूटात?” एरव्ही सफेद कुर्ता आणि पायजम्यात दिसणाऱ्या मोहनरावांना पाहून थोड्याफार त्यांच्याच वयाच्या दामले काकांनी त्यांना आश्चर्याने विचारले.

“अमेरिकेला चाललोय.” मोहनराव उत्तरले.

“असंच?”

“असंच म्हणजे?”

“असंच म्हणजे, या ट्रॅकसूटात? चालत? कुत्र्याला घेऊन?” त्यांनी कुत्र्याला असे म्हणताच वॉशिंग्टन त्यांना जोरजोरात भुंकू लागला. त्याला त्यांनी कुत्रा म्हटलेलं आवडलं नसावं बहुतेक!

“कितीदा सांगायचं दामले, वॉशिंग्टन म्हणा, वॉशिंग्टन. एकवेळ मला मोहनराव नका म्हणू.” washington america, us capital, usa

“चुकलो वॉशिंग्टन साहेब.” म्हणत त्यांनी हसून आपले कान पकडले.

चालता चालता मग दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. नेहमीप्रमाणे. त्यात आणि दामले काका म्हटले की गप्पा अमेरिकेवर सुरू झाल्या की त्या जाऊन संपायच्या पार जपानवर. एवढा मोठ्ठा आवाका होता त्यांचा, अगदी त्यांच्या ढेरीगत!

“तरी मी विचार करीत होतो. काल तुम्ही दिसला नाही ना सकाळी. वाटलं तब्येत बरी नसेल म्हणून. पण मोहनराव, अमेरिका हं? छान छान. शेवटी एकदाचा योग आलाच म्हणायचा.   

“तर काय. सकाळी सकाळी मिळाला मेल. माझ्या आनंदाला तर पारावारच उरला नव्हता. अगदी आभाळ ठेंगणं झालं होतं.”

“मग बरं झालं तुम्ही काल बाहेर नाही पडला ते.”

“ते का?”

“आभाळाला थटला असता ना तुम्ही मोहनराव.”

“दामले, कुठून सुचतात हो तुम्हाला?”

पुलंची पारायणे केली आहेत मी. अगदी पहिल्या रांगेत बसून.” ढेरीवरून हात फिरवीत ते मोहनरावांना म्हणाले. pula deshpande

“हिने पण?” त्यांच्या ढेरीकडे बोट करीत मोहनरावांनी मिश्किलीने विचारले आणि दोघेही हसू लागले.

शेवटी एका रिकाम्या बाकडावर त्यांनी आपली बुडे टेकवली. वॉशिंग्टनही बसता झाला शेजारीच. लोकांची वर्दळही आता कमी होऊ लागली होती. सूर्य कासराभर वरती आला होता आता. त्याच्या त्या सोनेरी किरणांनी त्या दोघांचे पिकलेले केस अगदी सोनेरीच करून टाकले होते. आयुष्यभराच्या अनुभवाचे तर ते तेज नव्हते ना?

“आता कुठे हरवून गेलात मोहनराव?” वॉशिंग्टनकडे पाहत विचारांची तंद्री लागलेल्या मोहनरावांना पाहत दामले काकांनी विचारले.

“अं?” म्हणत ते आपल्या तंद्रीतून बाहेर आले आणि वॉशिंग्टनवर नजर रोखून ते बोलू लागले, “वॉशिंग्टनला कधी एकटा सोडलं नाही हो मी दामले. आता तर कायमचं जायचं आहे मला.” त्यांच्या त्या बोलण्याने वॉशिंग्टन भुवया हलवीत त्यांना पाहू लागला. निराश होऊन अगदी. विरहाची चाहूल लागल्यागतच जणू!

“मुलासाठी सोडावं लागेल आता.” दामले असे म्हणताच वॉशिंग्टन कन्हू लागला.

“वॉशिंग्टन तर काय वेगळा थोडी आहे. तो पण एका अर्थाने मुलगाच आहे माझा. इतक्या वर्षांचा आधार आहे तो माझा.” मोहनराव असे म्हणताच तो उठून त्यांच्या जवळ आला आणि आपली मान त्यांच्या मांडीवर ठेवून दिली त्याने. मोहनराव त्याला कुरवाळीत राहिले.

समोरून साधारण दहा वर्षांचा मुलगा जाताना दिसताच त्यांनी त्याला हाक दिली आणि ते काठीचा आधार घेत उठून त्याच्याजवळ गेले. वॉशिंग्टन आणि दामले काका तिथेच बसून राहिले.

“बाळ, वय काय रे तुझं?”

“नऊ वर्षे आजोबा.” तो मुलगा लगेच उत्तरला. चेहऱ्यावर एक स्मित ठेवत त्यांनी त्याला पाहिले आणि आपल्या हातातील काठी तशीच सोडून देऊन त्यांनी आपल्या कापऱ्या हातांनी त्याच्या काखेत हात घालून त्याला अलगद वर उचलून घेतले. अगदी वर. उंच.  वॉशिंग्टन आणि दामले काका काहीच न समजल्यासारखे त्यांना पाहत राहिले नुसते.

“माझी क्षितिपण आता दहा वर्षांची होईल. तिलाही मला सहज उचलून घेता येईल.” त्यांच्याकडे पाहत मोहनराव म्हणाले तसे वॉशिंग्टन त्यांना भुंकू लागला. त्यालाही त्यांना अमेरिकेला नव्हते जाऊ द्यायचे?

एका संध्याकाळी ते आपल्या मित्राशी फोनवर बोलत होते. भोसलेशी. बऱ्याच दिवसांतून. त्यामुळे बक्कळ विषयांवर चर्चा सुरू होत्या. आणि तसेही अशा वयात चर्चा करायला विषय तर कशाला हवेत त्यांना? कशावरही चर्चा होऊन जातात. अगदी अडल्ट डायपर पासून पार अडल्ट मूवी पर्यंत! वरून त्यात जर कुणी त्यांना अश्लील म्हातारे म्हटलं तर त्यांचं वाक्य ठरलेलंच- अभी हम जवाँ हैं!

“काय तिकीट पण आलंय?” पलिकडून भोसले आनंदाने ओरडले, “वा वा वा मोहना. अरे मनमोहना रे मोहना रे मोहना.” tickets to washington, ticket to america, flight to washington, flight to america

“गाणं गायला लागला तू तर.” मोहनराव बोलले.

“गाणं? अरे माझे गुडघे ठीक असते ना तर नाचलो देखील असतो मोहना. शम्मी कपूरगत.”

“पुरे हं भोसले. वहिनीचे काम वाढवशील.” मोहनराव हसून म्हणाले. वहिनीचा विषय निघाला आणि भोसले पलिकडून शांत झाले. काही क्षण मग कुणीच काही बोललं नाही.

“यार मोहना, आज वहिनी असत्या तर खूप आनंदी झाल्या असत्या रे.” भोसले पलिकडून ती शांतता तोडीत बोलले आणि इकडे मोहनरावांच्या डोळ्यांत अश्रू तराळले.

चिरंजीवाचा मेल आल्यापासून त्यांनाही न रहावून सारखे वाटत होते की सौभाग्यवती असायला हव्या होत्या या क्षणासाठी. आपल्या मुलाकडे अमेरिकेला जाण्यासाठी केवढा अट्टाहास करायच्या त्या. खूप इच्छा होती त्यांना त्याला भेटायची, गोऱ्या सुनेला पाहायची, नातीचे गोड गोड पापे घ्यायची. कित्ती कित्ती इच्छा होत्या त्यांच्या; पण नाही जमले त्यांना!

“मोहना? काय रे गप्प का झालास?”

थरथरत्या हाताने त्यांनी आपल्या डोळ्यांतील अश्रू पुसले आणि म्हणाले, “गप्प कुठे? नाही.”

“मग खुश वाटत नाहीस.”

पुढे काही बोलणार तोच ते थांबले. काहीतरी विचार करून मग म्हणाले, “कळत नाही खुश व्हावं की अजून काही. नाही कळत रे. नदी वाहत वाहत पार पुढे निघून आली रे. आता तर तो विशाल सागर सुद्धा दिसतो आहे समोर. भेट काही फारशी दूर नाही आता. प्रवाह मंदावत चाललाय रे अगदी! आयुष्य कसं शांत नी संथ वाटत आहे!विलिनिकरणाच्या उंबरठ्यावर असल्यागत जणू!”

समोरून त्याच वयाचे भोसले ध्यान देऊन ऐकत होते. हिरवी पाने वाऱ्यावर झुलू लागली की त्यांना मजा वाटते; पण! पण पिकलेली ती पिवळी पाने वाऱ्याच्या झुळुकेसरशी झुलू लागली की एकमेकांना जाणीव होते- जणू ही शेवटचीच झुळूक. आता कधीही गळून पडू! ही फांदी, हे झाड सोडवं लागणार कायमचं!

“माझ्या वॉशिंग्टनला सांभाळशील?” बोलता बोलता अचानक त्यांना वॉशिंग्टनची आठवण झाली आणि त्यांनी विचारले. ते असे म्हणताच पुढील पायांवर डोके टेकवून शांत पडलेला वॉशिंग्टन एकदम डोके वर उचलून पाहू लागला. मान हलवीत. कान टवकारीत.

“मी पडलो दम्याचा पेशंट, मोहना. कसे जमेल सांग मला?” भोसले पलिकडून म्हणाले.

“त्याला सोडवेना रे मला.” मोहनराव खूप जड मनाने म्हणाले.

[शेवटचा भाग बाकी…]

या कथेचा आधीचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकला नक्की भेट द्या.

वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग १

कथेचा पुढचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकला जा

वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग ३

माझ्या अजून काही कथा वाचायच्या असतील ते खाली लिंक देत आहे.

तोही होई तेंडुलकर !

पाऊले चालती ..!

पेसमेकर

यशोदा: भाग-१

स्वर्गाची शिडी!

आपली व्हायरस ही कथा मालिका इथून वाचा.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १


Spread the love

2 thoughts on “वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग २

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *