• Pune, Maharashtra
व्हायरस
व्हायरस: प्रकरण ४: MV- ४८

व्हायरस: प्रकरण ४: MV- ४८

Spread the love

प्रकरण ४.MV- ४८.

सन २०८४. पुणे !

दुपारची  वेळ टळून गेली होती. पाषाणची ती टेकडी सूर्याची प्रखर किरणे सोशीत पडली होती. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे टेकडीवरील ती झाडी म्हणजे वाळलेले जंगलच वाटत होते जणू.

टेकडीवरून उत्तरेस पाहिल्यास दूरदूर पर्यंत समोर दिसत होती ती बाणेर-बालेवाडी- वाकडची कॉँक्रीटची 2 bhk flat in wakad, 3 bhk in baner, vtp sierra baner, भग्न जंगले. हिरवट, काळपट, ध्वस्त नी उद्ध्वस्त! आणि तिथे राहणारेही अगदी थोडेच; पण तसेच, ध्वस्त नी उद्ध्वस्त!  

एके काळी कोटीच्या घरात मानववस्ती असलेलं पुणे आज किती उणे वाटत होतं! जेमतेम दहा लाख लोकवस्ती राहिली असेल अंदाजे आणि त्यातली लाखभर तर त्या वारज्याच्या स्लम टॉवरलाच खितपत नी कुढत पडली होती. जन्म आणि मृत्यूच्या विवंचनेत! मात्र टेकडीवरून पश्चिमेला नजर टाकली की दृश्य काहीसे उलट होते. हिंजवडीच्या एकापेक्षा एक अशा काचेच्या skyscrappers गगनचुंबी इमारती i trend hinjewadi जणू आभाळाला चुंबायची स्पर्धाच करीत होत्या. केवढा हा विरोधाभास म्हणायचा!

व्हायरस: प्रकरण ४: MV ४८
व्हायरस: प्रकरण ४: MV ४८, pictures are for illustration purpose only

पाषाणच्या त्या टेकडीवर एक वाट एका अडगळीवजा घराकडे जात होती, ज्याच्या आसपास काही गाड्यांचे भंगार समान तसेच काही लाकडी समान अस्ताव्यस्त पडलेले होते. घराबाहेर अडकवलेला एक विंड चाईम wind chimes वाऱ्याने मधुर आवाज करीत होता, तर कुठे एखादा फाटका कपडा खिडकीच्या तारेशी अडकून वाऱ्याच्या तालावर फडफड आवाज करीत त्याला साद देत होता. जवळच पानगळ झालेल्या झाडाच्या बोडक्या फांदीवर बसलेला कावळा तोंड वासून काव काव करीत होता.                 

साल भलेही २०८४ सुरू होतं; पण पुणेकरांची दुपारी एक ते चार वामकुक्षी घेण्याची सवय मात्र अजूनही अबाधित होती. कानाची कंपने होऊन कान फडफडू लागल्यावर अचानक अश्वथला जाग आली. त्याचा गामा नावाचा कुत्रा pet store near me आपल्या भुवया बारीक-मोठ्या करीत त्याच्या कानाकडे कुतूहलाने पाहत बिछान्यावर बसला होता. अश्वथच्या कानात असे काय आहे जे आपल्या कानात नाही, असा जणू त्याला प्रश्नच पडला होता!

कानावर सावकाश एक टपली मारून अश्वथने दुपारचा अलार्म बंद केला आणि बिछान्यावरून उतरताना कानातच बोट घालून ताराला सुब्बुशी कॉल जोडण्याची आज्ञा त्याने केली. तारा, तारा ही अश्वथचा आयव्हीआर- Interactive Voice response-IVR ivr, ivr true, ivr system होती, जी त्याच्या कानातील एका नॅनो उपकरणाद्वारे चालवली जात होती व त्याचा आविष्कारकर्ता खुद्द अश्वथच होता. आणि सुब्बु म्हणजेच सुबोध, हा त्याचा पार्टनर-इन -क्राईम तथा लंगोटी यार होता.

 नेहमीप्रमाणे आजही त्यांना ओस पडलेल्या, भकास व बकाल अशा पुण्याच्या सदाशिव पेठेत हात साफ करायचा होता. त्याशिवाय त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार होता? शिवाय  MV -४८ च्या लसीसाठी पण पैशाची जुळणी करायची होती.

होय, MV -४८. तोच तो व्हायरस!

गेली तेहत्तीस वर्षे झाली तो ह्या जगात ठाण मांडून बसला होता आणि आता तो कायमचाच सोबती झाला होता मानवाचा! माणसाने पण त्याला आपलंसं केलं होतं, नाईलाजास्तव! मागील तेहत्तीस वर्षांत ना कोणता डोस ना कोणती प्रभावी लस त्यावर उपलब्ध झाली होती. मानवाने आता चंद्रावर वस्ती वसवली होती खरी; पण आत शरीरात मात्र MV -४८ आता कायमचीच वस्ती करून राहिला होता जणू!

एकूणच काय, तर MV -४८ व्हायरसने माणसांचे जीणे बदलूनच टाकले होते. शहरेच्या शहरे ओस पडली होती. लोकसंख्या कमालीची घटली होती. श्रीमंत, निमश्रीमंत नी गर्भश्रीमंत लोक पुण्याच्या बाहेर हिंजवडी hinjewadi it park, it park hinjewadi येथे स्थलांतरित झाले होते आणि सामान्य जनता मात्र जिथल्या तिथे वास्तव्यास होती. 

MV -४८ ची लागण जगभरात जवळपास सर्वांना झाली होती आणि जन्माला येणारा प्रत्येकजण तो व्हायरस सोबत घेऊनच येत होता. यातून कुणाचीच सुटका झाली नव्हती. साधारणतः अशी परिस्थिती असल्यामुळे कुणासाठी कुठेच प्रवेश निषिद्ध मात्र नव्हता. मागे एकदा कोविड-१९ आला होता त्यासारखे लॉकडाऊन सुरवतीच्या काळात लोकांवर लादलेही मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. आता MV -४८ ला सोबत घेऊनच जगायचे म्हणून सर्वत्र मोकळीक करून दिली गेली होती. अगदी पूर्वीच्यागत! कदाचित त्यामुळेच आजही सदाशिव पेठेत काही अस्सल पुणेकर अहंकाराने का होईना तिथे एकलकोंडे जीणे जगत होते. मग जीव मुठीत घेऊन का होईना!

मानवाच्या भौतिक विकासास future tech, future technology अजिबात खीळ बसली नव्हती. तंत्रज्ञान आजही प्रगतच होते; पण त्याचा सर्वांत जास्त उपभोग तर श्रीमंत लोकच घेत होते. असे असूनही त्या व्हायरसवर काहीच ठोस लस तयार मात्र होत नव्हती. ‘कालकॉर्प’ द्वारे एकमेव बनवली जाणारी लसही तितकीशी प्रभावी नव्हती. लागण झालेल्यांचे साधारण आयुष्य ३० वर्षापर्यंत सुरळीत राहत होतं; पण तिशीनंतर मात्र त्यांना दर सहा महिन्याला एक लसीचा डोस vaccination near me, walk in vaccine near me, vaccination sites near me, घ्यावाच लागत असे जेणेकरून त्या  व्हायरसचा omicron variant, omicron symptoms मानवी शरीरावरचा प्रभाव कमी करण्यास मदत होत असे, अन्यथा तिथून पुढचे आयुष्य म्हणजे जास्तीत जास्त पाच ते दहा वर्षे. बस्स.!

म्हणतात ना आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू या दरम्यानचा माणसाचा संघर्ष असतो; पण जेव्हा आपल्याला कळते की आपलं आयुष्यच ठराविक काळाच्या पुढे जाणार नाही तर मात्र तो संघर्ष एक अक्राळविक्राळ रूप धारण करून वावरू लागतो आणि परिणामस्वरूप जग हेच मग एक कुरुक्षेत्र बनून जातं. यात चांगला कुणी नसतो आणि वाईटही कुणी नसतो. असतो तो फक्त आणि फक्त एक दानवी संघर्ष, स्वतःशी, इतरांशी, सृष्टीशी आणि त्या. . त्या व्हायरसशी!

“हे आश्व्या,बोल.” तारा ने सुब्बुशी कॉल जोडला आणि झपकन सुब्बुचा होलोग्राम गामाच्या समोर सुरु झाला तसा बेसावध गामा japanese dog names दचकून बेडवरुन खाली पडला आणि होलोग्रामकडे पाहून भुंकू लागला. सुब्बुला मज्जा वाटली व तो हसू लागला.

“सदाशिव पेठ.” अश्वथ गामाला शांत करत म्हणाला.

“हं ,त्याचं काय?” सुब्बुने विचारले.

“तू परत विसरलास यार. तुझ्याकडे ती व्हर्च्युअल बेब आल्यापासून..” अश्वथ पुढे काही बोलणार तोच सुब्बू त्याचे बोलणे थांबवत म्हणाला, “ओ. . . ओह, तू पोहोच. मी. . मी आलोच.” 

आणि असं म्हणून त्याने कॉल ठेऊन दिला. 

मुठा नदीच्या पुलावरून अश्वथ आपली इलेक्ट्रिक मोटारसायकल electric vehical, future bike घेऊन सदाशिव पेठेच्या दिशेने निघाला. नदीच्या निळ्याशार पाण्यावरून मधूनच डॉल्फिन उसळ्या मारताना दिसत होते. दिवस हळू हळू खाली झुकत होता. त्यात मे महिना असल्यामुळे बाहेर अजूनपण उन्हाचे चपकारे जाणवतच होते. त्यात उकाडाही असला होता की सांगता सोय नव्हती.

व्हायरस: प्रकरण ४: MV ४८
व्हायरस: प्रकरण ४: MV ४८, pictures are for illustration purpose only

हल्ली वातावरणही असं काही विचित्र होतं की अशा रख्ख उन्हातही हा हा म्हणता अचानक काळेशार ढग दाटून यायचे आणि रपारप पाऊस पडून पुन्हा कडाक्याचं ऊन पडायचं. त्यामुळे अश्वथ आकाशाकडे पाहत पुढे निघाला होता. भरीस भर म्हणून त्यात वरून घारी ,कावळे शिवाय गिधाडे पण हैवानागत घिरट्या घालत होतीच. व्हायरसमुळे मानवाचे तर आयुष्य विस्कळीत झाले होतेच मात्र त्यामुळे आता निसर्गही मानवावर अतिक्रमण करीत होता. मानवाने तर पण केलं होतं कधी काळी.! आपल्याच दुष्कर्माची फळे तर भोगत नव्हता ना मानव?

पूल ओलांडल्यावर समोर सदाशिव पेठेतल्या भल्या उंच; पण ओस पडलेल्या, काळवंडलेल्या  इमारती व त्यांवर वाढलेल्या वेली, गवतं, शेवाळे, पिंपळाची आणि वडाची बांडगुळं असा काहीसा समोरचा नजारा  दिसत होता. माणसांचा वावर खूपच कमी असल्यामुळे आता तिथे झाडीदेखील पुष्कळ वाढलेली होती. कोल्ह्या कुत्र्यांबरोबर लांडगे, बिबटेही अधूनमधून दर्शन देत. जी काही कुटुंबे तिथे भावनेच्या पोटी राहत होती, ती आपला जीव मुठीत घेऊन आपलं आयुष्य कंठीत होती.

सदाशिव पेठेत शिरल्यावर अश्वथची मोटारसायकल हळू झाली. तो इकडे तिकडे पाहत पुढे निघाला होता. खिडक्यांच्या फुटक्या काचा, शेवाळलेल्या इमारती, त्यांतून फडफड करीत उडणारे पारवे, कुठल्यातरी एखाद्या खिडकीतून डोकावून पाहणारे एखादे निरागस मूल किंवा MV -४८ च्या vaccination shot लसीचा डोस vaccine appointment near me, new corona variant, new variant, new covid variant, new covid variant in india चुकलेला एखादा खंगलेला व करुण नजरेने moderna side effects पाहणारा पुरुष हे सर्व त्याच्या नजरेस पडत होतं. त्यात आता आकाशात काळे ढग दाटून येऊन पावसाचे थेंब पडायलाही सुरवात झाली होती.

सदाशिव पेठ २०८४,व्हायरस: प्रकरण ४: MV ४८
सदाशिव पेठ २०८४,व्हायरस: प्रकरण ४: MV ४८, pictures are for illustration purpose only.

पडणाऱ्या पावसाचे थेंब झेलीत व आपल्या मोटारसायकलीच्या डॅशबोर्डवर सुरू असलेल्या एका छोट्या होलोग्राम डिस्प्लेकडे holographic display पाहत तो पुढे निघाला होता. त्यावर कोणत्यातरी एका इमारतीच्या तळघरातील चित्रण सुरु असल्याचे दिसत होते. कदाचित तो त्या इमारतीकडेच निघाला होता.

एका गल्लीत शिरल्यावर समोर चार-पाच टवाळखोरांचा घोळका आडव्या मोटारसायकली लावून उभा असलेला त्याला दिसला. तो त्यांच्या जवळ जाताच ते आता हातात लोखंडी गज आणि कसली हत्यारे नाचवित, एकमेकांकडे पाहत चेहऱ्यावर एक लालची हास्य करू लागले. अश्वथला हे समजायला वेळ लागला नाही की ते मावाली नुसते भुरटे चोर होते. मिळेल त्या गोष्टींवर आपला हात साफ करून आला दिवस काढीत होते.

मोटारसायकल थांबवून तो खाली उतरला. मोटारसायकल काही अंतर पुढे जाऊन एका बाजूला उभी राहिली आणि बंद झाली. सुब्बूचा अजून काही पत्ता नव्हता. त्याने ताराला सुब्बूशी कॉल जोडण्याची आज्ञा दिली.

“अश्वथ, सुब्बूशी कॉल जोडण्यात अपयश येत आहे.” तारा म्हणाली.

“हद्द झाली राव.” मग तो स्वतःशीच पुटपुटला.

“अय पोट्ट्या, तिथं काहून उभा राहिलायस? येई  ना हिकडं.” एक वयस्क चोर जो टोळीचा प्रमुख वाटत होता, हाताने इशारा करीत त्याला आपल्याकडे बोलवत म्हणाला.

कसलातरी विचार करीत अश्वथ इथेच उभा होता. वरून पावसाचे थेंब आता वाढू लागले होते आणि अंधारही दाटण्यास सुरवात झाली होती.

“काय पोट्टेहो, तुम्हाले म्हणलं व्हतं ना, आज शिकार चालत शिकाऱ्याकडे येईल म्हणून?” तो आपल्या सहकाऱ्यांना विचारीत म्हणाला. त्यावर सर्वांनी हसत होकारार्थी मान हलवली.

“पण तुमची शिकार अजून जगीच उभी है.” एकजण म्हणाला.

“अय भैताड, का बहिरा हून राहिला का बे तू?” प्रमुखाने विचारले.

“लुटणार कोण आहे? तू की मी?” अश्वथने विचारले.

“मी.” टोळीप्रमुख म्हणाला.

“मग ये, लूट.” अश्वथ म्हणाला.

तो असे म्हणताच त्याने आपले साथीदार त्याच्यावर धाडून दिले आणि भर पावसात त्यांच्यात चांगलीच धुमश्चक्री माजली.

सुरवातीला अश्वथ त्या सर्वांवर भारी पडला मात्र पावसाचा जोर जसजसा वाढू लागला तसा अश्वथचा जोर कमी पडू लागला. त्या पाच जणांपुढे त्याचा काही टिकाव लागला नाही.  शेवटी मग तो त्यांच्या लोखंडी गजात  आणि लाकडी काठ्यांत बंदिस्त झाला.

“का बे पोट्ट्या, कळाला का खानदेशी झटका khandeshi zatka? काहून थकवून राहिलास बे?” त्याच्याकडे पाहत तो प्रमुख म्हणाला आणि एकदा सर्वांवर नजर टाकून त्याने त्यांना विचारले . “पहिल्यांदा करून राहिला क बे?”

सर्वांनी लयीत नकारार्थी हलवली.

“मग तोंडाकडं काहून पाहून राहिला माझ्या, भैताडागत? काढून घ्या ह्या पोट्ट्याकडून काय सापडंल ते.” तो मग त्यांच्यावर ओरडला. ते लोक अश्वथला लुटणार तोच त्यांच्यावर दुरून कुणीतरी हल्ला केला आणि ते एकेक करून ते खाली कोसळू लागले. काहींनी तर तिथून पळ काढणेच मग पसंद केले.

अचानक असे काय झाले याचे अश्वथला देखील कोडे पडले. त्याला वाटले सुब्बू आला असावा, म्हणून त्याने, “सुब्बू मला वाटलेलंच तू असा अचानक टपकणार  म्हणून.” असे म्हणत मागे वळून पाहिले; पण कोसळणाऱ्या पावसात त्याला तिथे कुणीच दिसले नाही. त्याने आपली नजर कुतुहलाने इतरत्र भिरकावली खरी. पण पदरी निराशाच पडली.

कुणीतरी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करीत होतं. पण कोण? याचा विचार करीत काही वेळ तो तसाच पावसात उभा होता. अचानक त्याला धावणाऱ्या पावलांचा आवाज कानी आला आणि तो त्या आवाजाच्या दिशेने धावला. शेजारील इमारतीचा आडोसा घेत ती व्यक्ती अचानक नाहीशी झाली. त्यात अंधारलेले असल्यामुळे त्याला त्या व्यक्तीची छबी नीटशी दिसलीही नाही; पण तरीही तो त्याचा पाठलाग करीत होता.

व्हायरस: प्रकरण ४: MV ४८
व्हायरस: प्रकरण ४: MV ४८, pictures are for illustration purpose only.

मात्र ती व्यक्ती त्याला बरोबर हुलकावणी देऊन तिथून दिसेनाशी झाली होती. अश्वथ मात्र अंधारात तीर मारल्यागत इकडे तिकडे पाहत राहिला. तेवढ्यात एक तीव्र उजेड पाडीत व आवाज करीत एक मोटारसायकल बुंssगदिशी त्याच्यापासून निघून गेली. त्याने परत तिच्या मागे धावण्याचा प्रयत्न केला खरा; पण पावसाच्या धारा सर्रर्र कापीत अंधारात ती कुठल्या कुठे निघून गेली होती. अश्वथ मात्र तसाच उभा राहिला. मनात एक प्रश्न घेऊन!

कोण होती ती व्यक्ती?

व्हायरस या कथामालिकेचे आधीचे भाग पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग २

व्हायरस: प्रकरण २.अ वीक ऑफ फ्रीडम,भाग १


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *