
टिक टॉक टिक टॉक टिक
टिक. . टॉक. . टिक. . टॉक. . टिक. . टॉक. . टिक. भिंतीवरील घड्याळाच्या काट्यांचा आवाज स्पष्टपणे मला ऐकु येत होता. रात्रीचे तीन वाजून गेले होते आणि भिंतीवर एक पाल आपल्या भक्ष्यावर दबा धरून होती; पण त्या भक्ष्याला बिचाऱ्याला त्याची जरासुद्धा कल्पना नव्हती. बाहेर कुत्र्यांचे आरडणे ते काय नेहमीचेच होते; पण आजचं त्यांचं आरडणं मला काहीसं कुत्सितच वाटत होतं! जणू ते काय माझ्यावरच हसत होते.
माझ्या एका हातात एक धारदार सुरा आणि दुसऱ्या हातात माझा आयफोन घेऊन मी बिछान्यावर तशीच पडले होते केव्हाची. गरा गरा फिरण्याऱ्या त्या पंख्याकडे पाहत. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी किंचितही पापणी न हलवता एकटक त्याच्याकडे पाहत.

घ्यावी एक दोरी आणि लटकावे हातपाय झाडीत त्या पंख्याला की फिरवावा तो चाकू आपल्या मनगटावरून नी काढावा त्या चिळ्ळ पिचकारीसरशी बाहेर थेंब अन् थेंब तो रक्ताचा? लालभडक नी गरमागरम!
दुविधेचे काहूर जणू असे काही मनामध्ये माजले होते की अकल्पित रातीनंतरची ती प्रसन्न सकाळ पुन्हा उजाडेल की नाही याची थोडी शंकाच वाटत होती. मृत्यूच्या बाता करणे, त्याच्या वच्यता करणे जितके सोप्पे तितके त्यास कवटाळणे अवघड. हो, हातात फास किंवा सुरा असतानादेखील!
अकरा वाजता तो कॉल आला नसता तर आता ही क्रितिका आपल्या बॉयफ्रेंड सोबत रोजच्या गप्पा मारून शांतपणे झोपली नसती का? आणि आता बसलेय आपल्याच दुष्कर्माचे पाठ इतरांना पढवत. हतबल आणि हताश होऊन! तसेही सिद्धांतचे ५० कॉल्स येऊन गेले असतील आत्तापर्यंत!
अब्रू न लुटताच नग्न देहाची ती लफ्तरे अंतर्जालावरती जर लटकत असतील आणि त्याची थोडीसुद्धा पुसटशी कल्पना नसलेली मी, मी हे काय करून बसलेय याचाच विचार करीत पडून होते.
“काय? पुसटशीही कल्पना नव्हती? यू ब्लडी होर क्रिती! आणि काय गं तर म्हणे अब्रू न लुटताच? चालली असती तुला अब्रू लुटलेली? तुझ्या मुलायम देहाचे तोडलेले लचके आणि यौवनाची झालेली ती विटंबना, चालली असती? केली असतीस सहन? की खेळत बसली असतीस हातात नुसता सुरा घेऊन आपल्याच विचारांशी? की लढली असतीस बाहेरील त्या आसुरांशी? सांग. यू *किंग होर.!”
आत्तापर्यंत मी स्वतःलाच शिव्यांची अगदी लाखोली वाहिली होती. अवघड जाग्याचं दुखणं ना कुणाला सांगता येत होतं ना कुणाला दाखवता येत होतं.
“सिद्धांतला बोलू?”
“नको नको.”
“पण तो बॉयफ्रेंड आहे माझा.”
“असला तरी हे ऐकून तो तुझा एक्स् होईल हे नक्की!”
“नाही मला त्याला नाही गमवायचं आहे.”
“मग हे कांड करण्याआधी सुचायला हवं होतं तुला.”
मी पुनःपुन्हा स्वतःशीच बोलत होते. आई-वडिलांना तरी मी कोणत्या तोंडाने बोलणार होते.?
अकरा वाजता मला माझ्या जीवलग मैत्रिणीचा कॉल आला होता. म्हणाली माझे व्हिडिओज पॉर्न साईटवरती झालकताहेत. क्षणभर विश्वासच बसला नाही. वाटलं कुणीतरी मॉर्फ केले असतील; पण नंतर आठवले मला मधल्या काळातील मीच केलेली कांड!
कांड नाही म्हणू तर काय म्हणू? माझ्यासारखी मुलगी असं काही करू शकेल याची माझ्या परिचयातील कुणालाच खात्री वाटणार नाही; पण नेमकं साध्य काय करायचं होतं मला? सौंदर्य? ते तर कुटून भरलं होतं माझ्यात. मग? ग्लॅमर, ग्लॅमर नव्हतं माझ्याकडे. हो; पण तू तर काय हिरोईन पण नव्हतीस!

आजकालच्या टिकटॉक आणि इन्स्टाच्या जमान्यात कुणाला बनायचंय हिरोईन? मलाही नव्हतं बनायचं; पण त्यांच्यापेक्षा कमीही नव्हतं बनायचं.
“बनलीस?” मी परत स्वतःशी पुटपुटत होते.
आसवांनी ओथंबून वाहणाऱ्या डोळ्यांच्या पापण्या एकदाच्या मी घट्ट मिटल्या आणि सुरू झाला माझ्या नयनपटलांवर मागील वर्षभराचा माझा डार्क सिनेमा! काळ्या कृत्यांचा, काहीशा अश्लीलतेचा!
माझे फ्रेंड सर्कल मला टिकटॉक क्वीन म्हणायचे. टिकटॉकचं एक चॅलेंजही मी कधी मिस केलं नव्हतं. सकाळ, दुपार, संध्याकाळ सतत व्हिडिओ टाकत राहायचे. एकदोन व्हिडिओ व्हायरल झाले आणि माझे फॉलोवर्स झपाट्याने वाढू लागले. सगळं काही सुरळीत सुरू होतं. व्हिडिओ बनत होते, शेअर केले जात होते, व्हायरलही होत होते, फॉलोवर्स मिळत होते आणि पैसा, अपेक्षेपेक्षा जास्तच मिळत होता. एखाद्या बॉलीवूडच्या हिरॉईनप्रमाणे मला स्वतःला वाटत होतं किंबहुना माझे फॉलोवर्सही मला तशी वागणूक देत होते.
मग तो दिवस उजाडला व टिकटॉक बॅन झालं आणि पाच लाखांची फॉलोवर्स असलेली मी अचानक शून्यात गेली. नैराश्येने वेढले. वास्तविक पाहता सगळ्या भौतिक गोष्टी जिथल्या तिथे होत्या. धक्का लागला होता तो माझ्या इंटेरनेटवरील अस्तित्वाला, माझ्या आभासी ओळखीला!
परत सुरूवात करायला माझ्याकडे इन्स्टावर तितके फॉलोवर्स नव्हते; पण मी तिथेही अजमावून पाहिले, हार नाही मानली. आणि खूप मेहनत करूनही म्हणावे तितके फॉलोवर्स काही मिळाले नाहीत. कदाचित माझ्या खऱ्या अस्तित्वाला असा धक्का लागला असता तर मी इतकं क्वचितच मनाला लावून घेतलं असतं जितकं मी माझ्या आभासी अस्तित्वाला धक्का लागल्यावर लावून घेतलं होतं.
आणि एक दिवशी मला आला एक मेल. बाहेरील देशातून! भारतात राहून टिकटॉकसाठी व्हिडिओ पाठवून त्यातून कमाईची ऑफर होती त्यात. काहीतरी फसवणुकीचा मेल असेल म्हणून मी काही दिवस त्याकडे निव्वळ दुर्लक्ष केले होते; पण त्यांच्या सततच्या तशा मेल्सनी मला एक दिवशी त्यांनी आपल्या जाळ्यात ओढलेच. शिवाय मलाही होता हव्यास ग्लॅमरचा!
ते मला परदेशातून व्हिडिओसाठी थिम्स द्यायचे आणि मी त्यांना व्हिडिओ बनवून पाठवायचे व त्याबदल्यात ते मला आता पूर्वीपेक्षा जास्त मोबदला द्यायचे. काही दिवस असे चालल्यानंतर एके दिवशी त्यांनी मला काही अंतर्वस्त्रे पाठवली आणि ती घालून मला व्हिडिओज बनवून पाठवण्यास सांगितले. मला जरी हा प्रकार तेव्हा काहीसं वेगळा वाटला असला तरीही आपले व्हिडिओज आपल्या इथे पाहिले जात नसल्याने मीही तयार झाले. शिवाय त्यांनीही एका अंतर्वस्त्रांच्या ब्रंडिंगसाठी हे असल्याचे नमूद केले होते.

त्यामुळे त्यानंतर मला तसे व्हिडिओज त्यांना पाठवणे काही अवघड गेले नाही न मी कसला त्यावर आक्षेप घेतला. बाहेर हे सगळं स्वीकारलं जात असल्यामुळे मीही मग अर्धनग्न व्हिडिओंना हळू हळू कंम्फरटेबल झाले होते; पण या सर्व गोष्टी मी माझ्या बॉयफ्रेंड आणि घरच्यांच्या न कळत करत होते. कदाचित मी याची कुणालातरी साधी कल्पना जरी दिली असती तरी आजची परिस्थिती बदलता आली असती!
पण एके दिवशी त्यांनी मला एका वेगळ्या अॅप आणि त्यावरच्या एका ब्रॅंडसाठी काही न्यूड व्हिडिओ पाठवण्याची मागणी केली; पण मीही तितकी काही दूधखुळी नव्हती. मीही मग नकार दिला आणि मग सुरू झाला त्यांचा तो प्रकार, ब्लॅकमेलिंगचा!
एकतर आधीच त्यांच्याकडे माझे अर्धनग्न व्हिडिओज होतेच आणि त्यांना पकडून ते मला सतत ब्लॅकमेल करत होते. माझे पैसेही बंद झाले. उलट माझ्याकडून त्यांच्या सतत पैशाच्या मागण्या सुरू झाल्या व मला जाणीव झाली की मी एका मोठ्या कांडात अडकलेय आणि माझ्यासारख्या अजून कितीतरी जणीही अडकल्या असतील. त्यांची आयुष्ये उद्ध्वस्त झाली असतील, त्या चार-चौघात तोंडही दाखवण्यास योग्य राहिल्या नसतील. कितीजणींनी तरी मग आपल्या जीवाचे बरेवाईटही करून घेतले असेल!
मी मिटलेले डोळे सावकाश उघडले. घड्याळात आता पहाटेचे पाच वाजणार होते. भिंतीवरील ती पाल आता तिथे नव्हती मात्र तिचे भक्ष्य तिथेच होते अजून!
“पण मी नाही माझ्या जीवाचं काही बरंवाईट करणार. आय विल फाईट बॅक. मी लढणारच!” मनातल्या मनात मी काहीही बडबडत होते. हातातला तो सुरा केव्हाच गळून पडला होता. इतक्यात माझा आयफोन व्हायब्रेट होऊ लागला. सिद्धांत होता कॉलवर.
“हॅलो.” तो पलीकडून म्हणताच मी म्हणाले, “आय गॉट मॉर्फ्ड, सिड.” आणि माझ्या मनाचा बांधच फुटला.
“ अगं, रडू नकोस. वी विल सॉर्ट दीज थिंग्ज आऊट. डोन्ट वरी. आणि त्यासाठीच मी रात्रभर कॉल करत होतो तुला.” तो मला धीर देत म्हणाला आणि मला जीवात जीव आल्यासारखे वाटले.
“सी यू सून.” म्हणून त्याने कॉल ठेवून दिला.
मी बिछान्यातून उठून बाहेर आले, तोंडावर गार पाणी मारले आणि समोरील आरशात पाहत म्हणाले, “आय विल पे फॉर माय सीन्स. मला माझ्या पापाचे प्रायश्चित्त घ्यायलाच हवं.”
पडदे बाजूला सारून मी गॅलरीत आले. पूर्वेला नव्या पहाटेची चाहूल लागलेली नजरेस पडत होती. पक्ष्यांची आपल्या घरट्यांत कुजबूज सुरू झाली होती.
हातातील फोनवर मी बाबांचा नंबर डायल केला आणि फोन कानाशी धरला.
“बाबा?”
माझ्याही आयुष्यात जे काही घडले होते ती एक काळी रात्र होती आणि समोर एक नवी पहाट माझी वाट पाहत होती. संघर्षाची, कसोटीची, कदाचित वेदनेची अन् अपमानाची; पण एका नव्या सुरवातीची, नव्या उमेदीची!
[समाप्त]
व्हायरस ही कथा मालिका वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
keywords: blog marathi
tiktok videos, tiktok, instagram reels, instagram, instagram posts, viral videos, viral tiktok videos, viral instagram videos, why tiktok is banned in india, how to grow instagram followers,
स पक बम न कम न ड सह लय जभ रतहन म न डअन यग कब तज कख बस रतत रप रस घ रक ल एब लय रह द
[…] टिक टॉक टिक टॉक टिक […]
[…] टिक टॉक टिक टॉक टिक […]