• Pune, Maharashtra
व्हायरस
व्हायरस: प्रकरण ७. दी कालभद्र the rogue man

व्हायरस: प्रकरण ७. दी कालभद्र the rogue man

Spread the love

७. दी कालभद्र !! The Kaalbhadra- the rogue man

पुण्यात जरी लख्ख ऊन असले तरी इकडे हिंजवडीत मात्र काळेकुट्ट ढग दाटून विजांच्या कडकडाटांसहित पाऊस सुरू होता. वातावरणाचा हा लहरीपणा आता काही नवा नव्हता. काचेच्या  गगनचुंबी इमारतींना काळे ढग थटल्यासारखे वाटत होते. चार-दोन इमारती तर ढगांच्याही वर माना काढून उभ्या होत्या. डोकं न भिजवता शॉवर खाली अंघोळ सुरु असल्यागत अगदी!! properties in pune, properties near Hinjewadi

सूर्रर्रर्र…. आवाज करत, पावसाच्या धारा कापत फेसबुकचा खूप अद्ययावत ह्युड्रोन Hu-drone (माणसे नेऊ शकणारा ड्रोन) drone technologies उडत आला आणि काल कॉर्प‘ नावाच्या इमारतीवर अगदी अलगद विराजमान झाला तशी त्याच्या खालून एक शिडी बाहेर आली.

the kaalbhadra, images are for illustration purpose only
the kaalbhadra, images are for illustration purpose only

पायांत  महागडे असे बाटाचे बूट bata india shoes, bata shoes, हातात काळे मोजे आणि त्यावर टायटनचे मौल्यवान पण अद्ययावत घड्याळ titan watches, अंगावर रिलायन्सचा कोट reliance india limited, डोळ्यांवरती टायटनचाच महागडा गॉगल, अशा क्रिप्टोमिलियन्स पेहरावाचा पंच्याहत्तरीतला मनुष्य आपल्या टकलावर काळी हॅट घालीत, तोंडातून सिगार सारख्या भल्या मोठ्या घोडा बिडीचा धूर काढीत, शिडीवरून खाली उतरला. तोच पावसापासून त्याचे संरक्षण करण्याकरता त्याच्या डोक्यावर आपोआप एक पारदर्शक शिल्ड तयार झाले. cryptocurrency in India

खाली उतरताच त्याच्याभोवती सुरक्षारक्षकांचे  जाळे तयार झाले. काल-कॉर्पच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याचे स्वागत केले आणि तो तिथून खाली निघाला.

एका आलिशान हॉलमध्ये काल-कॉर्पच्या संचालक मंडळाची बैठक सुरु होती. हे संचालक मंडळी म्हणजे सगळे अगदी त्या वृद्धाच्या मर्जीतले होते. तो म्हणेल तीच पूर्व दिशा होती.  

त्या हॉलमध्ये आता चिडीचूप शांतता होती. तो वृद्ध मनुष्य बैठकीच्या अध्यक्षस्थानी होता. समोरील हॉलोग्राम डिस्प्लेवरती hologram display त्याचे काहीतरी सुरु होते आणि सगळे संचालक मंडळ उशिरापासून त्याच्याकडे नुसते पाहत होते.

“गुप्ता, काल-कॉर्पचे वार्षिक निकाल बरे नाहीत.” बऱ्याच वेळाने तो वृद्ध मनुष्य म्हणाला.

“सर, गेल्या वर्षीपेक्षा फक्त एक मिलियन क्रिप्टोनीं कमी आहेत अर्निंग्स.” गुप्ता म्हणाले.

“ब्लडी…… वन……  मिलियन ……क्रिप्टोज.” हात टेबलावर आपटत तो जागेवरून उठला आणि त्याच्याकडे जात त्याने विचारले,  “MV-४८ च्या डोसची किंमत किती आहे?”

“लगभग एक लाख क्रिप्टो.” त्याने जागेवरून उठत उत्तर दिले.

“हं……… एक लाख क्रिप्टो.” त्याने गुप्ताला प्रतिसाद दिला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून तो त्याला तिथून बाजूला घेऊन आला.

“म्हणजे दहा डोस कमी सर. फक्त दहा डोसची विक्री कमी झाली.” तो म्हणाला. सर्व संचालक मंडळ त्यांना पाहत होते.

काच उघडून तो गुप्ताला समोरच्या इमारतींकडे बोट दाखवत म्हणाला, “ती अल्फा फ्युचर टेक्नॉलॉजिस पाहतो आहेस? ती डायमंड पावर, गॅलेक्सी मोटो आणि ती. . . ती प्रोटोडॉन?” गुप्ताने थोडे भीतच होकारार्थी मान हलवली.

“आपल्या काल-कॉर्प पेक्षा त्या इमारती उंच आहेत. MV-४८चा डोस फक्त आणि फक्त आपणच तयार करतो. जगातल्या प्रत्येक २५ वर्षावरील व्यक्तीला तो घ्यावाच लागतो. तरीही आपण कुठेतरी मागे आहे. मला माझं काल-कॉर्प सर्वांपेक्षा उंच हवं आहे.” तो म्हणाला. omicron variant

“होय सर.” गुप्ताने प्रतिसाद दिला.

“गुप्ता, ३३ वर्षे लागली मला ही उंची गाठायला.” असं म्हणत तो थांबला, अचानक चेहऱ्यावरचे भाव बदलत परत गुप्ताला त्याने विचारले, “आपण किती उंचावर उभे आहोत याची कल्पना आहे तूला?”

“नाही सर.” गुप्ता खिडकीतून खाली वाकून पाहत म्हणाला. गुप्ताला त्याचे बोलणे कळाले नसल्यागत भाव त्याने त्याच्या चेहऱ्यावर दाखवले.

“मग जा, जाता जाता मोज.” असे म्हणून त्याने गुप्ताला धक्का दिला तसा गुप्ता ओरडत खिडकीतून खाली पडला.

तो आता त्याच्या जागेवर येऊन बसला व आय.व्ही.आर करवी कुणालातरी कॉल जोडला आणि म्हणाला, “हेल्थ मिनिस्ट्री मुबारक, शहा.” एवढं बोलून त्याने कॉल बंद केला. बैठकीतले सर्वजण घाबरून एकमेकांच्याकडे पाहत होते. हॉलमध्ये भयाण सन्नाटा पसरला होता.

“आज माझ्या हातात अनेक देशांची सरकारे आहेत. त्यांच्या अर्थव्यवस्था माझ्या एका चुटकीसरशी ढासळू शकतात. मनात आणलं तर मी मोठी च्या मोठी शहरे काही काळातच नष्ट आणि भ्रष्ट  करू शकतो. आणि. . . आणि तो. . . तो मूर्ख गुप्ता मला. . मला सांगतो……? त्याची हिंमत. . हिंमतच कशी झाली? आफ्टरऑल, आय एम, आय एम दी. . . ब्लडी. . . पावरफुल. . . कालभद्र. . . दी. . . कालभद्र..!! भरड्या आणि तितक्याच भसाड्या आवाजात तो ओरडला आणि सर्वांकडे पाहत, बिडीचा धूर काढत त्याने भगवद्गीतेचा श्लोक म्हणाला, न मां  दुष्कृतिनो मूढा: प्रपद्यन्ते नराधमाः। माययापहृतज्ञाना असुरं भावमाश्रिताः . . . मिटिंग ओव्हर.!”

इकडे पुण्यातल्या स्लम टॉवर्स मधील लोकांची खुप दयनीय अवस्था होती. एकतर MV-४८ने ग्रासलेले होते. त्यातच उपासमारीचे भयान संकट आ वासून पुढे उभे होते. कमावलेले सगळे क्रिप्टोज डोससाठी जात होते. चोऱ्या, लूटमार, हत्या हे उपायही निष्फळ वाटत होते.

सामान्य लोकांचेपण हाल स्लम टॉवर्समधील लोकांपेक्षा फारसे वेगळे नव्हते. आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असूनही काही फारसा फायदा घेता येत नव्हता त्यांना. जगावं की मरावं हा गंभीर प्रश्न समोर होता, कारण बाकीचे आजारही त्यात भर म्हणून होतेच. जगता जगता मरत होते की मरता मरता जगत होते हेच समजत नव्हतं त्यांना. त्यांच्यापेक्षा तर प्राणिमात्रे सुखी होती खऱ्याअर्थाने.

सरकार कालभद्रच्या हातातील कठपुतळी बनले होते. तो म्हणेल ती पूर्व दिशा. तो म्हणेल तो कायदा आणि तो म्हणेल तोच न्याय. स्वतःला जगातील ताकतवान माणूस म्हणवून घेण्यासाठी अख्खी दुनिया त्याने वेठीस धरली होती. कलमवाली बाई क्रांती आणायला म्हणून गेली ती काही आलीच नाही. मग क्रांती येणार कुठून आणि आणणार कोण?

“धोका. . . धोका. . . धोका. अश्व्या राव, वाहिनीनं धोका दिला. गंडिवलं  तुला.” सुब्बू ते उपकरण हातात पकडून म्हणाला. दोघेही बाणेर हिल्सला अश्वथच्या घरी होते.

अश्वथचे त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते. तो निवांत बिछान्यावर पडून होलोग्रामवर झेड ब्रिजवरचे त्याचे आणि आर्याचे चुंबनदृश्य परत परत पाहत होता. अगदी हरवून जाऊन.

“अश्व्या?” त्याने जोरात हाक दिली.

“काय रे? का परेशान झालाय उगीच? शांत रहा ना थोडावेळ.” अश्वथ म्हणाला.

“मी शांत राहू? तुला तर काय पडलेलंच नाही. कालपासून सतत तो होलोग्रामच पाहत बसलाय.” तो म्हणाला. त्यावर अश्वथ काहीच बोलला नाही.

“अश्व्या, राव यामध्ये एक क्रिप्टो पण नाही ठेवला तिने. सुफडासाफ. सगळी मेहनत मुठेत गेली रे.” सुब्बू हताशपणे म्हणाला.

“क्रिप्टो तिच्याकडे असले काय आणि माझ्याकडे असले काय. काय फरक पडतो?” तो मजेतच म्हणाला.

“तू बस तसाच स्वप्ने रंगवत. मी जातो.” असे म्हणत तो तिथून जाऊ लागला. जाता जाता तो म्हणू लागला, “Ca. . . O लावला रे तिने तुला Ca. . . O लावला.” 

“काय लावला म्हणाला? Ca. . . O?” अश्वथने त्याच्याकडे पाहत विचारले.

हातातील ते उपकरण त्याच्याकडे फेकले व बाहेर जात म्हणाला, “चुना लावला रे चुना.” ते उपकरण

अश्वथला लागून भिंतीवर आदळले आणि बिछान्याखाली जाऊन बसले.                         

माझ्या येणाऱ्या कथा कवितांचे अपडेट्स आपोआप मिळवण्यासाठी माझ्या वेबसाईटवर आल्यावर जे पॉप अप नोटिफिकेशन येते त्याला allow करा म्हणजे मी काही पोस्ट केल्यास आपल्याला त्याचे नोटिफिकेशन येईल. माहितीसाठी खाली फोटो देत आहे.

lekhani sangram
lekhani sangram

व्हायरस कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या. आवडल्यास आपल्या प्रियजनांमध्ये शेअर करायला विसरू नका.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

लेखणीसंग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला अवश्य भेट द्या.

भाऊबीज भाग १

वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग १

मॅरेज मटेरियल Marriage Material

                                                                                                           


Spread the love

1 thought on “व्हायरस: प्रकरण ७. दी कालभद्र the rogue man

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *