• Pune, Maharashtra

व्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट

एम आय डुईंग ग्रेट? Am I doing great? नवी दिल्ली. New Delhi संसद भवनात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची एक बैठक सुरु होती. विविध खात्यातील मंत्री  आणि त्यांचे सचिव पण त्या बैठकीस उपस्थित होते. ते आपापल्या खात्यातील केलेल्या कामांची माहिती पंतप्रधानांना देत होते; शिवाय काही समस्या असतील तर त्याही ते मांडत होते. पंतप्रधान शांतपणे त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेत होते आणि आपल्या सचिवाला त्या क्रिस्टल […]

रेडकू

रेडकू redku ही एक marathi story मराठी स्टोरी, marathi story writing मराठी कथा आहे. अशी marathi story ज्यात एक लहान मुलाचं आणि रेडकाचं नातं सुरू होतं, वाचा redku रेडकू. “मेली ती.” एवढंच म्हणून तिनं फोन ठिवून दिला अन् आपल्या लुगड्याचा पदर तिच्या वल्ल्या पापण्यांना लावला.   मायचं ते परंपरागत लुगडं हुतं. तिच्या आज्जंसासूकडून तिच्या सासूकडं अन् तिच्या सासूकडून आता तिच्याकडं आलेलं. एकमेव आसं. म्हणून […]

बच्चू, माझं वजन वाढलंय का रे?

बच्चू, माझं वजन वाढलंय का रे? किचनमधून चमचमीत पदार्थांचा वास माझ्या नाकातून फुफ्फुसात न जाता आता थेट पोटात निघाला होता. रापचिक अशी भूक लागली होती आणि आता जर पुढ्यात काही आले नसते तरी त्या नुसत्या वासावर माझी भूक भागली असती! ह्या झाल्या म्हणायच्या गोष्टी; पण प्रत्यक्षात काही पोटात गेल्याशिवाय भूक ही भागणार कशी?  आणि असे तळलेले, भाजलेले पदार्थ, त्यात त्यांचा […]

तिची वटपौर्णिमा

सकाळी सकाळी उठून ती अंगावर साडी चढवत होती. आपल्या सावळ्या बोटांनी तिने सावकाश साडीच्या निऱ्या पाडून त्या तिने बेंबीच्या अगदी चार बोटे खाली खोवून दिल्या. बेंबी, तेवढी आकर्षक नव्हती तिची. ना कांती उजळ होती तिची. सावळीच होती ती; पण त्या सावळ्या कातडीआड, आत अगदी हाडांच्या त्या मजबूत पिंजऱ्यात असलेलं तिचं ते हृदय, तेच मयूरला अगदी आकर्षक आणि नितांत सुंदर वाटलं […]

अजून दिवाळी आहे

अजून दिवाळी आहे. Diwali 2022 दिवस नुकताच डोक्यावर आला होता, त्यामुळे उन्हाचा चपकारा चांगलाच बसत होता. काळ्या पाषणाच्या खळग्यातून वाहणाऱ्या ओढ्याचा खळ खळ असा मधुर आवाज कानी येत होता. ओढ्याच्या मधोमध कुणी एक बाई लुगड्याचा काष्टा घालून गोचीडागत फुगलेल्या आपल्या काळ्याभोर म्हशीला न्हाऊ घालीत होती. त्यातच मधूनच म्हशीने आपली शेपटी उडवली की हवेत उडणारे पाण्याचे थेंब जणू मोत्यांगत चमकू लागायचे. ओढ्याच्या […]