• Pune, Maharashtra

हे रंगबिरंगी फुला..!

    क्षणभंगुर आयुष्य जरी  माहितसे कुसुम तुला  आज फुलायचे  वाऱ्यावर डोलायचे  भ्रमराशी त्या   रों रों करत प्रेम गीत मग मस्त गायचे   गंध दरवळूनी  रंग उधळायचे  खूप जगुनि मग  उद्या मिटायचे  कसे जमते रे तुला  एक साधा  प्रश्न माझा  हे रंगबिरंगी फुला..!           -शिवसुत.