• Pune, Maharashtra

रुपेरी रिंगण, भाग ३

सकाळी पुन्हा नवा दिवस, तीच लोकल, तेच सहप्रवाशी, तेच ते, तेच ते. अमोल आपली लेक्चर्स संपवून पुन्हा कँटिनमध्ये लॅपटॉप उघडून लिहित बसला होता; पण म्हणावं तसे लिखाण होत नव्हते. न राहूनही त्याच्या डोळ्यासमोर रात्रीचे ते स्वप्न उभे राहत होते. समोरच्या चहाच्या रिकाम्या कपाला माशा लागल्या होत्या आणि त्याचा गोंss गोंss आवाज कानी पडत होता. तो लिहायचा, बॅकस्पेस दाबायचा. परत लिहायचा […]