• Pune, Maharashtra

मिशन सूर्यमाला – उड्डाणापूर्वी

मिशन सूर्यमाला – उड्डाणापूर्वी पृथ्वी. असा ग्रह ज्याची निर्मिती साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाली. कुणी याला ‘निलग्रह’ म्हणतो तर कुणी ‘जलग्रह’ म्हणतो. एका अंतराळ महास्फोटात जे लहान लहान तुकडे इतरत्र विखुरले गेले, त्या तुकड्यांपैकी एक तुकडा म्हणजे आपली पृथ्वी. असे अनेक तुकडे एकत्र येऊन आपली सूर्यमाला तयार झाली. सूर्य हा या तुकड्यांच्या केंद्रस्थानी राहिला व गुरुत्वीय बलामुळे इतर तुकडे त्याच्या भोवती […]

व्हायरस: प्रकरण १४. रहस्याची उकल करताना

रहस्याची उकल करताना Marathi Katha, Marathi story, marathi fiction, solving the mystry दरवाजा आता पूर्णपणे उघडल्यावर तिघेही आत जाण्यासाठी सज्ज होते. समोर पूर्णपणे अंधार होता. त्यांना काहीच कल्पना नव्हती की आत नेमकं त्यांच्यासाठी काय वाढून ठेवलंय. एखाद्या अंधाऱ्या निर्वात पोकळीत किंवा जसं काही एखाद्या कृष्णविवराच्या मुखाशी उभे असल्याची थोडीबहुत जाणीव त्यांना झालीही असेल! कित्येक वर्षे बंद त्या अकल्पित खोलीत काय असेल याची यत्किंचितही […]

 माती खाल्लेला माणूस: भाग १

 माती खाल्लेला माणूस! Marathi Katha, Marathi story, marathi fiction अगदी, दिवस सरू लागतानाच मी माझ्या त्या मोडकळीस आलेल्या स्प्लेंडरला splendor bike कुत्तुन किक मारली. कुत्तुन यासाठी, कारण त्याशिवाय ती चालूच होत नाही. आता आता तर ती पेट्रोलपण जास्तीचं पिऊ लागली होती. मला मग राहून राहून वाटायचं की हिला इलेक्ट्रिकच electric bike करून टाकावी म्हणजे झंझटच नाही, च्यायला. चांगला मेकओव्हर makeover होऊन […]

व्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण

सब-वे : एक वळण Marathi Katha, Marathi story, marathi fiction   धावत धावतच अश्वथ दगडूशेठ गणपती मंदिरासमोर आला व गुडघ्यावर हात टेकवून धापा टाकत आत गणपतीच्या मूर्तीकडे पाहू लागला. मूर्ती प्रसन्न आणि सोज्वळ वाटत होती. पण मंदिरासमोर कुणीच नव्हतं. मागून आर्या आणि सुब्बू दोघेपण धापा टाकतच तिथे आले. अश्वथला काय झालंय हे त्यांना कळायला काही मार्ग नव्हता. तो धावत आला आणि त्याच्या मागे ते धावत आले. का? कशासाठी? कुठे? […]

ध्रुवतारा: Marathi Kavita मराठी कविता

ध्रुवतारा आई म्हणाली बाबा बनले उत्तरेचा एक तारा ध्रुवतारा दिसतो का बघ त्याच्या शेजारी लुकलुकणारा मी म्हणालो ध्रुवतारा तर नावडता ना गं आई? बाबा तर प्रिय मजला तुजला का मग केली त्याने घाई? आई म्हणाली देवाचे घरी असते थोडी रीतच न्यारी जे की आवडे तुजला मजला देवलाही मग तेचि प्यारी मी म्हणालो लहान मुले तर असती देवासही प्यारी जाऊ का […]

व्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.!

श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.! Marathi Katha, Marathi story, marathi fiction पारदर्शक स्क्रीनवरती transparent screen एका न्यूज चॅनेलवर news channel कालच्या चोरीची बातमी सुरु होती. विशेष म्हणजे बातमी देणारी लेडीबॉट ladybot खूप नम्रतेने आणि अदबीने बातमी देत होती. कालभद्र त्या स्क्रीनकडे पाहत आपल्या काल-कॉर्पच्या ऑफिसमध्ये एकटाच बसला होता. म्हातारा तसा बिलकुलच चिंतेत वाटत नव्हता; पण कालच्या त्या चोरीने त्याला थोडंसं विचलित मात्र जरूर केलतं. […]

पावसात भिजलेली एक परीराणी

पावसात भिजलेली एक परीराणी पाऊस! धो धो बरसत होता आज तो. यावेळी वळीवानेही तसा दगाच दिला होता आणि आता मृग त्याची जणू कमतरताच भरून काढत होता. प्रियकर आपल्या प्रेयसीला खूप अवधीनंतर भेटल्यावर जसा तिच्यावर अगणित चुंबनांचा वर्षाव करून तिला सुखावून टाकतो तसा तो आज धरतीला सुखावत होता. कोथरूड डेपोच्या बाहेरचा तो बसस्टॉप (a bus stop) त्या भल्यामोठ्या पावसात जरा अस्पष्टच […]

पाडवा

पाडवा गावाच्या बाहेर, अगदी सुरवातीलाच त्या म्हातारीचं ते कुडाचं खोपटं होतं. छोट्याशा टेकडावर ते काळपट असं खोपटं जणू असं काही उभं होतं की गावात येण्याऱ्यांच्या स्वागतालाच ते उभा आहे असं काहीसं वाटत होतं. रखरखत्या त्या उन्हात थोडासा गारवा मिळावा म्हणून म्हातारीनंच काही वर्षांपूर्वी त्या टेकडाच्या खाली जिथून गावात रस्ता जात होता तिथं आणि खोपीच्या बगलेला अशा दोन नांदुरकीच्या फांद्या आणून पुरल्या होत्या. आज नाही […]

चिमणी गेली उडून

शहरे बदललीत. गावे तर कुठे पूर्वीची राहिलीत? तीही बदललीत. माणसे, रस्ते, झाडे, तीच आहेत; पण तीही वरचेवर बदलताहेत! बदल हा सृष्टीचा नियम आहे वगैरे ठीक आहे; पण इतका बदल? आता ह्या बदलाच्या नादानं प्रत्येकजण इतका बदललाय, की मला आता त्यांच्यात झालेल्या बदला बद्दल उगाच बडबड करायची देखील इच्छा नाही! इच्छा. इच्छा तेथे मार्ग! पण प्रत्येकाचा मार्ग हा फुलांनी सजलेला नसतो बरं […]

रुपेरी रिंगण, भाग ४

त्या रात्री त्याचं कशातही लक्ष लागलं नाही. आपण नायर मॅडमला असं बोलायला नको होतं हे राहून राहून त्याला वाटत होतं. पण का..? तो आज टेबल लॅम्प सुरू करून नुसता लॅपटॉपसमोर बसून राहिला होता. त्याच्याने धड एक शब्दही पुढे टाईप करणे झाले नाही. त्याच्या मनाचा वारू असा काही उधळला होता की तो कधी आरतीकडे धाव घ्यायचा तर कधी नायर मॅडमकडे. भूतकाळ […]

रुपेरी रिंगण, भाग ३

सकाळी पुन्हा नवा दिवस, तीच लोकल, तेच सहप्रवाशी, तेच ते, तेच ते. अमोल आपली लेक्चर्स संपवून पुन्हा कँटिनमध्ये लॅपटॉप उघडून लिहित बसला होता; पण म्हणावं तसे लिखाण होत नव्हते. न राहूनही त्याच्या डोळ्यासमोर रात्रीचे ते स्वप्न उभे राहत होते. समोरच्या चहाच्या रिकाम्या कपाला माशा लागल्या होत्या आणि त्याचा गोंss गोंss आवाज कानी पडत होता. तो लिहायचा, बॅकस्पेस दाबायचा. परत लिहायचा […]

रुपेरी रिंगण, भाग २

Ruperi ringan मघाशी ते दोघे बसलेल्या जागेकडे पाहत अमोल तिकडे धावत आला. कुठे बरं आरती गेली असेल, असा मनात विचार करून तो इतरत्र आपली नजर सैरभैर फिरवू लागला. अशी अचानक जागची उठून ती कुठे गायब झाली असेल? तेही आपल्याला कल्पना न देता. आता भेळ घेताना पाहिलं तर इथेच जागेवर बसली होती ती आणि इतक्यात अशी कुठे दिसेनाशी झाली, याचाच तो […]

रुपेरी रिंगण

Ruperi Ringan अनवाणी पायांवर सागराच्या हळुवार लाटांची आंदोलने घेत ती मावळतीच्या सूर्याकडे एकटक पाहत उभी होती. तिच्या डाव्या पायाचा अंगठा सतत रेतीत तोंड घालीत होता आणि वर काढीत होता. पायांतील पैंजणात लाटांचा बारीक फेस अडकून राहत होता तर लाटांसोबत आलेली ती पांढरी रेती लागून घोट्याभोवती अगदी पैंजणाच्या वरच काहीसं पैंजनागतच एक रिंगण देखील तयार झालं होतं एव्हाना! रुपेरी वाळूचं! त्यामुळे […]

व्हायरस: प्रकरण १०. शेवटी, श्रीमंतांच्या आशिर्वादावर जगणारे दगडच आपण..!!

१०. शेवटी, श्रीमंतांच्या आशिर्वादावर जगणारे दगडच आपण..!! We are all slaves           अथांग समुद्राच्या त्या खोल पाण्यात अश्वथ शांत, निद्रिस्त असा पडून होता. इतक्या खोलीवर सूर्याची किरणेदेखील व्यवस्थित पोहचत नव्हती. शरीराची कसलीच हालचाल न करता हळूहळू तो खाली खाली जात होता. समुद्राच्या तळातून मधूनच काही बुडबुडे वरती जाताना दिसत होते. कसले तरी मोडक्या घराचे अवशेष त्याच्या अवतीभोवती पाण्यात बुडताना दिसत होते. त्यांच्या आसपास […]

अजूनही कानात माझ्या deshbhakti geet

अजूनही कानात माझ्या… deshbhakti geet अजूनही कानात माझ्या गुंजताहेत वंदे मातरमचे नारे हसत हसत अन् चढत होते फासावरती सारे त्यागला होता संसार देशच होता प्राण त्यागले होते तारुण्य मिळविण्या स्वातंत्र्य अजूनही आठवताहेत मला ते रस्ते सांडले होते त्यांच्यावर रक्तच रक्त नुसते पडले होते देहही पडले होते इरादे मात्र आवाज होता कानी विसरू नका रे वादे अजूनही आठवताहेत मला ते डोळे ओकत […]

प्रेमवृक्ष prem vruksh

प्रेमवृक्ष हे सोनसुंदरी, मी प्रेमवृक्ष. मी प्रेमवृक्ष. . .मी प्रेमवृक्ष. जन्म माझा आगळा, दुनियेवेगळा दोन मनांच्या विरहातला एकाच्या दु:खातला अन् तयाच्याच वेदनेतला आठवते का बघ तुला याच ठायी मी बीज असता तू दिला होतास निरोप तयास अन् फिरवली होतीस  पाठ. तीव्र होता विरह वेदना रडला तो मग प्रियकर वेडा बरसल्या तव अश्रुधारा अवकाळी जणू पाऊस बरसावा अश्रुंनी मग त्या ओलावली […]

दुर्गे दुर्घट भारी: भाग.२

दुर्गे दुर्घट भारी रात्रीच्या त्या विचाराने तिची पार झोप खराब करून टाकली होती. सकाळी उठल्यावर तिचे डोके अगदी जड झाले होते. अजूनही तिच्या कानांत एकदम हळू आवाजात तिला ती वाक्ये ऐकु येतच असल्याचा सतत भास होत होता. ती मग मनाशीच बोलू लागली- ‘का सतावताहेत मला ही वाक्ये? त्यानंतर ही काही पहिली नवरात्र नाही माझी, मग आता याच वेळी असं का होतंय […]

दुर्गे दुर्घट भारी: भाग. १

दुर्गे दुर्घट भारी..  “समू?” आई समीक्षेला स्वयंपाक घरातूनच हाका मारीत होती, “अगं उठलीस का? पोरीच्या जातीने असे झोपून राहणे बरे दिसते का?” दहा वाजून गेले होते आणि समीक्षा अजूनही अंथरूणाशी खिळून पडली होती. त्यात आज रविवारचा दिवस असल्यामुळे तिला तर निमित्तच मिळालं होतं. ती काही बारा वाजायच्या आत उठणार नव्हती; पण तिला असं सुखाने झोपू देईल ती तिची आई कसली? कडक लक्ष्मीच […]