• Pune, Maharashtra

मिशन सूर्यमाला – उड्डाणापूर्वी

मिशन सूर्यमाला – उड्डाणापूर्वी पृथ्वी. असा ग्रह ज्याची निर्मिती साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाली. कुणी याला ‘निलग्रह’ म्हणतो तर कुणी ‘जलग्रह’ म्हणतो. एका अंतराळ महास्फोटात जे लहान लहान तुकडे इतरत्र विखुरले गेले, त्या तुकड्यांपैकी एक तुकडा म्हणजे आपली पृथ्वी. असे अनेक तुकडे एकत्र येऊन आपली सूर्यमाला तयार झाली. सूर्य हा या तुकड्यांच्या केंद्रस्थानी राहिला व गुरुत्वीय बलामुळे इतर तुकडे त्याच्या भोवती […]

व्हायरस: प्रकरण १४. रहस्याची उकल करताना

रहस्याची उकल करताना Marathi Katha, Marathi story, marathi fiction, solving the mystry दरवाजा आता पूर्णपणे उघडल्यावर तिघेही आत जाण्यासाठी सज्ज होते. समोर पूर्णपणे अंधार होता. त्यांना काहीच कल्पना नव्हती की आत नेमकं त्यांच्यासाठी काय वाढून ठेवलंय. एखाद्या अंधाऱ्या निर्वात पोकळीत किंवा जसं काही एखाद्या कृष्णविवराच्या मुखाशी उभे असल्याची थोडीबहुत जाणीव त्यांना झालीही असेल! कित्येक वर्षे बंद त्या अकल्पित खोलीत काय असेल याची यत्किंचितही […]

माय व्हॅलेंटाईन

माय व्हॅलेंटाईन My Valentine दुर्गाला नेहमीचीच गर्दी असते म्हणून मी कायम हर्षला बसतो. आजही हर्षला बसलो होतो. एकटाच. ह्या दारूने ‘बसणे’ हा शब्द इतका बाटवून ठेवला आहे की जिथे जिथे मग बसण्याची गोष्ट येते तिथे तिथे लोकांचे दारूवरून गैरसमज हे होतातच! आता बसणे या शब्दाची काही मक्तेदारी वगैरे दारूने घेतली आहे अशातला भाग मला तरी तूर्तास वाटत नाही. जेवायला बसणे, गाडीवर बसणे, […]

न्यू इयर पार्टी नाईट भाग ६

New Year Party Night part 6 Final episode, The final truth नाक आणि डोळे पुसून ती कारमधून बाहेर पडली. तरातरा चालत ती पोलीस स्टेशनच्या समोर आली. काही सांगायला आत जाणारच तोच तिला स्वप्नील एका कोपऱ्यात हवालदार मानेशी काहीतरी बोलताना उभा दिसला. त्याच्यावर नजर जाताच तिची पायऱ्या चढणारी ती पाऊले तिथेच थबकली आणि ती मग काहीशा दबक्या पावलांनी त्याच्याकडे चालत आली. […]

प्रेमवृक्ष prem vruksh

प्रेमवृक्ष हे सोनसुंदरी, मी प्रेमवृक्ष. मी प्रेमवृक्ष. . .मी प्रेमवृक्ष. जन्म माझा आगळा, दुनियेवेगळा दोन मनांच्या विरहातला एकाच्या दु:खातला अन् तयाच्याच वेदनेतला आठवते का बघ तुला याच ठायी मी बीज असता तू दिला होतास निरोप तयास अन् फिरवली होतीस  पाठ. तीव्र होता विरह वेदना रडला तो मग प्रियकर वेडा बरसल्या तव अश्रुधारा अवकाळी जणू पाऊस बरसावा अश्रुंनी मग त्या ओलावली […]

ती आणि ती A lady and a prostitute

ती आणि ती A lady and a prostitute स्वारगेटजवळील कॅफे आयडियल मध्ये ती तिची वाट पाहत बसली होती. संध्याकाळचे चार वाजत आले होते. ती सतत आपल्या हातातील मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होती. वेळ पाहत असेल बहुतेक. cafe near swargate, A lady and a prostitute नवरा ऑफिसातून घरी यायच्या आधी तिला मोगराला भेटून जायचं होतं. पहिल्यांदाच भेटणार होती ती तिला. तसंही अशा […]

कळी खुलू दे

कळी खुलू दे..! सकाळची प्रार्थना उरकून पोरं-पोरी रांगेत एकापाठोपाठ एक अशी आपापल्या वर्गात जाऊन बसली. जाता जाता एकमेकांच्या खोडी केल्या नाहीत तर ती मुलं कसली? कुणी समोरच्याच्या डोक्यावरची टोपी उडवून लावली, कुणी समोरच्याच्या पायात पाय अडकवून त्याला पाडण्याचाही प्रयत्न केला. तर कुणी जास्तच टवाळखोर पोराने एकाची करडोद्याच्या आधाराला कशीबशी टिकून असलेली खाकी चड्डी ओढली देखील. Indian rural schools “ओ सर, […]

व्हायरस: प्रकरण २.अ वीक ऑफ फ्रीडम,भाग १

सकाळची कोवळी किरणे तिच्या रेशमी केसांवरती पडली होती आणि त्या किरणांत न्हाऊन निघालेले तिचे ते सुंदर रूप तो एका अंगावर होऊन न्याहळत होता. झोपेतून उठतानाही एखादी स्त्री जर सुंदर दिसत असेल तर समजून जा की तिच्या सौंदर्याचं काही मोजमापच नाही! “खरंच!” तो हसत पुटपुटला. “अं..?” तिने जागे होत त्याला प्रतिसाद दिला आणि डोळे उघडून आपले बाहु पसरून आळस देण्याचा प्रयत्न […]

नारायण. . . नारायण

नारायण. . . नारायण            आज इंद्राचा दरबार खचाखच भरलेला होता. देवाधिदेव इंद्र आपले दोन्ही बाहू आपल्या सुवर्ण सिंहासनावर विसावून क्रोधीत नजरेने एकटक समोर पाहत बसले होते. त्यांचा सुवर्ण मुकुट आज जरी झळाळत असला तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज मात्र गायब होते. त्यांच्या सिंहासनाच्या एका बाजूला नाथ तर दुसऱ्या बाजूला उद्धव आपापली आसने ग्रहण करून बसले होते व त्यांना लागूनच दोन्ही […]

गंडी अण्णा:भाग १

        दिवस अगदी डोक्यावर आला होता. ऊन नुसतं रखरखत होतं. पावसाळा अगदी तोंडावर होता; पण आभाळात मात्र ढगांचा मागमूसही नव्हता. आभाळाएवढ्या उंचीच्या, शे-दीडशे वर्षांच्या जुनाट चिंचेच्या झाडांमधून वाहणारा वारा रों रों आवाज करत होता. अशाच एका भल्या मोठ्या चिंचेच्या झाडाला लागून असलेल्या विहिरीच्या मोटारीचा बुंSSग असा आवाज कानी पडत होता आणि विहिरीवरच असलेल्या चंबूरमधून पडणाऱ्या पाण्याचाही मंजुळ आवाज सतत […]

स्वर्गाची शिडी!

          मध्यरात्र उलटून खूप वेळ झाला होता. किशनला आता एक पाऊलही पुढे टाकणे कठीणझाले होते. खांद्यावर दीड वर्षाची मुलगी, सोबत चार वर्षाचं पोरगं आणि डोक्यावर छोटंसं गाठोडं घेऊन त्याच्याइतक्याच जड पायांनी रेल्वेच्या पटरीवरून चालणारी त्याची बायको, यांना घेऊन तो दिवस मावळायला जालन्याहून औरंगाबादेच्या दिशेने निघाला होता.                        […]

यशोदा: भाग-१

यशोदा भाग १            अंधाऱ्या राती नाजुक पण कोरीव अशी चंद्रकोर आणि त्याभोवती चांदण्यांनी धरलेला फेर पाहून कुणाला त्यात सामील व्हायची इच्छा झाली नाही तर नवलच! त्यात भर म्हणून असलेली रातकिड्यांची किर्रर्र व मधूनच वाऱ्याच्या मंद झुळुकांमुळे सळ्ळ होणारा पिंपळाच्या पानांचा आवाज जणू संगीताचा भासच करवत होते.          मधूनच पिकलेले जांभळ खाली पडून टप्प असा […]