• Pune, Maharashtra

रुपेरी रिंगण

Ruperi Ringan अनवाणी पायांवर सागराच्या हळुवार लाटांची आंदोलने घेत ती मावळतीच्या सूर्याकडे एकटक पाहत उभी होती. तिच्या डाव्या पायाचा अंगठा सतत रेतीत तोंड घालीत होता आणि वर काढीत होता. पायांतील पैंजणात लाटांचा बारीक फेस अडकून राहत होता तर लाटांसोबत आलेली ती पांढरी रेती लागून घोट्याभोवती अगदी पैंजणाच्या वरच काहीसं पैंजनागतच एक रिंगण देखील तयार झालं होतं एव्हाना! रुपेरी वाळूचं! त्यामुळे […]

माय व्हॅलेंटाईन

माय व्हॅलेंटाईन My Valentine दुर्गाला नेहमीचीच गर्दी असते म्हणून मी कायम हर्षला बसतो. आजही हर्षला बसलो होतो. एकटाच. ह्या दारूने ‘बसणे’ हा शब्द इतका बाटवून ठेवला आहे की जिथे जिथे मग बसण्याची गोष्ट येते तिथे तिथे लोकांचे दारूवरून गैरसमज हे होतातच! आता बसणे या शब्दाची काही मक्तेदारी वगैरे दारूने घेतली आहे अशातला भाग मला तरी तूर्तास वाटत नाही. जेवायला बसणे, गाडीवर बसणे, […]