बॅरिस्टर
हाताच्या दोन बोटांच्या मधून पचाकदिशी तोंडातील तंबाखूची गढूळ पिचकारी मारून, थोडासा भीतीने कावराबावरा होऊनच सर्जेराव आटपाडी पोलीस स्टेशनात घुसला. पायांत पन्हे तुटलेली चामड्याची काळी चप्पल, गुडघ्यापर्यंत लोंबणारे मळकट धोतर, तेवढीच मळकट असलेली बंडी आणि त्या बंडीपेक्षाही मळकट होता तो पोटावर असेलेला बंडीचाच खिसा! पान, कात, तंबाखु, चुना अशा त्याच्या निरनिराळ्या सवयींमुळे बंडीचा तो खिसा […]
Recent Comments