• Pune, Maharashtra

दीन दिन दिवाळी

दीन दिन दिवाळी..! भल्या मोठ्या घमेल्यात त्याने हिरव्या जरजरीत भाजीच्या leafy green vegetables पेंडया टाकल्या. पेंडया कसल्या त्या, हिरवीगार लुगडी लेऊन कुंभमेळयाच्या kumbhmela कुंडात डुबकी मारणाऱ्या भाविकच जणू त्या! अगदी खळखळ घुसळीत त्याने त्या चांगल्या धुवून काढल्या आणि सपासप झाडून मग त्याने त्यांचे पाणी पण नितळले. घमेल्याच्या तळाशी मात्र तो मातीचा गाळ आता त्या शुभ्र मुळांविना कसा एकटा एकटा वाटत […]

अजून दिवाळी आहे

अजून दिवाळी आहे. दिवस नुकताच डोक्यावर आला होता, त्यामुळे उन्हाचा चपकारा चांगलाच बसत होता. काळ्या पाषणाच्या खळग्यातून वाहणाऱ्या ओढ्याचा खळ खळ असा मधुर आवाज कानी येत होता. ओढ्याच्या मधोमध कुणी एक बाई लुगड्याचा काष्टा घालून गोचीडागत फुगलेल्या आपल्या काळ्याभोर म्हशीला न्हाऊ घालीत होती. त्यातच मधूनच म्हशीने आपली शेपटी उडवली की हवेत उडणारे पाण्याचे थेंब जणू मोत्यांगत चमकू लागायचे. ओढ्याच्या काठाला दगडे […]