• Pune, Maharashtra

पाडवा

पाडवा गावाच्या बाहेर, अगदी सुरवातीलाच त्या म्हातारीचं ते कुडाचं खोपटं होतं. छोट्याशा टेकडावर ते काळपट असं खोपटं जणू असं काही उभं होतं की गावात येण्याऱ्यांच्या स्वागतालाच ते उभा आहे असं काहीसं वाटत होतं. रखरखत्या त्या उन्हात थोडासा गारवा मिळावा म्हणून म्हातारीनंच काही वर्षांपूर्वी त्या टेकडाच्या खाली जिथून गावात रस्ता जात होता तिथं आणि खोपीच्या बगलेला अशा दोन नांदुरकीच्या फांद्या आणून पुरल्या होत्या. आज नाही […]

चिमणी गेली उडून

शहरे बदललीत. गावे तर कुठे पूर्वीची राहिलीत? तीही बदललीत. माणसे, रस्ते, झाडे, तीच आहेत; पण तीही वरचेवर बदलताहेत! बदल हा सृष्टीचा नियम आहे वगैरे ठीक आहे; पण इतका बदल? आता ह्या बदलाच्या नादानं प्रत्येकजण इतका बदललाय, की मला आता त्यांच्यात झालेल्या बदला बद्दल उगाच बडबड करायची देखील इच्छा नाही! इच्छा. इच्छा तेथे मार्ग! पण प्रत्येकाचा मार्ग हा फुलांनी सजलेला नसतो बरं […]

रुपेरी रिंगण, भाग ४

त्या रात्री त्याचं कशातही लक्ष लागलं नाही. आपण नायर मॅडमला असं बोलायला नको होतं हे राहून राहून त्याला वाटत होतं. पण का..? तो आज टेबल लॅम्प सुरू करून नुसता लॅपटॉपसमोर बसून राहिला होता. त्याच्याने धड एक शब्दही पुढे टाईप करणे झाले नाही. त्याच्या मनाचा वारू असा काही उधळला होता की तो कधी आरतीकडे धाव घ्यायचा तर कधी नायर मॅडमकडे. भूतकाळ […]

रुपेरी रिंगण, भाग ३

सकाळी पुन्हा नवा दिवस, तीच लोकल, तेच सहप्रवाशी, तेच ते, तेच ते. अमोल आपली लेक्चर्स संपवून पुन्हा कँटिनमध्ये लॅपटॉप उघडून लिहित बसला होता; पण म्हणावं तसे लिखाण होत नव्हते. न राहूनही त्याच्या डोळ्यासमोर रात्रीचे ते स्वप्न उभे राहत होते. समोरच्या चहाच्या रिकाम्या कपाला माशा लागल्या होत्या आणि त्याचा गोंss गोंss आवाज कानी पडत होता. तो लिहायचा, बॅकस्पेस दाबायचा. परत लिहायचा […]

रुपेरी रिंगण, भाग २

Ruperi ringan मघाशी ते दोघे बसलेल्या जागेकडे पाहत अमोल तिकडे धावत आला. कुठे बरं आरती गेली असेल, असा मनात विचार करून तो इतरत्र आपली नजर सैरभैर फिरवू लागला. अशी अचानक जागची उठून ती कुठे गायब झाली असेल? तेही आपल्याला कल्पना न देता. आता भेळ घेताना पाहिलं तर इथेच जागेवर बसली होती ती आणि इतक्यात अशी कुठे दिसेनाशी झाली, याचाच तो […]

रुपेरी रिंगण

Ruperi Ringan अनवाणी पायांवर सागराच्या हळुवार लाटांची आंदोलने घेत ती मावळतीच्या सूर्याकडे एकटक पाहत उभी होती. तिच्या डाव्या पायाचा अंगठा सतत रेतीत तोंड घालीत होता आणि वर काढीत होता. पायांतील पैंजणात लाटांचा बारीक फेस अडकून राहत होता तर लाटांसोबत आलेली ती पांढरी रेती लागून घोट्याभोवती अगदी पैंजणाच्या वरच काहीसं पैंजनागतच एक रिंगण देखील तयार झालं होतं एव्हाना! रुपेरी वाळूचं! त्यामुळे […]

व्हायरस: प्रकरण १०. शेवटी, श्रीमंतांच्या आशिर्वादावर जगणारे दगडच आपण..!!

१०. शेवटी, श्रीमंतांच्या आशिर्वादावर जगणारे दगडच आपण..!! We are all slaves           अथांग समुद्राच्या त्या खोल पाण्यात अश्वथ शांत, निद्रिस्त असा पडून होता. इतक्या खोलीवर सूर्याची किरणेदेखील व्यवस्थित पोहचत नव्हती. शरीराची कसलीच हालचाल न करता हळूहळू तो खाली खाली जात होता. समुद्राच्या तळातून मधूनच काही बुडबुडे वरती जाताना दिसत होते. कसले तरी मोडक्या घराचे अवशेष त्याच्या अवतीभोवती पाण्यात बुडताना दिसत होते. त्यांच्या आसपास […]

अजूनही कानात माझ्या deshbhakti geet

अजूनही कानात माझ्या… deshbhakti geet अजूनही कानात माझ्या गुंजताहेत वंदे मातरमचे नारे हसत हसत अन् चढत होते फासावरती सारे त्यागला होता संसार देशच होता प्राण त्यागले होते तारुण्य मिळविण्या स्वातंत्र्य अजूनही आठवताहेत मला ते रस्ते सांडले होते त्यांच्यावर रक्तच रक्त नुसते पडले होते देहही पडले होते इरादे मात्र आवाज होता कानी विसरू नका रे वादे अजूनही आठवताहेत मला ते डोळे ओकत […]

प्रेमवृक्ष prem vruksh

प्रेमवृक्ष हे सोनसुंदरी, मी प्रेमवृक्ष. मी प्रेमवृक्ष. . .मी प्रेमवृक्ष. जन्म माझा आगळा, दुनियेवेगळा दोन मनांच्या विरहातला एकाच्या दु:खातला अन् तयाच्याच वेदनेतला आठवते का बघ तुला याच ठायी मी बीज असता तू दिला होतास निरोप तयास अन् फिरवली होतीस  पाठ. तीव्र होता विरह वेदना रडला तो मग प्रियकर वेडा बरसल्या तव अश्रुधारा अवकाळी जणू पाऊस बरसावा अश्रुंनी मग त्या ओलावली […]