• Pune, Maharashtra

व्हायरस: प्रकरण २.अ वीक ऑफ फ्रीडम,भाग २

स्वातंत्र्यदिनाची ती सकाळ फारशी काही प्रसन्न वाटत नव्हती. पहाटेपर्यंत धो-धो पडणाऱ्या त्या मुसळधार पावसाने लवासा परिसराला अक्षरशः झोडपूनच काढले होते. पावसाच्या त्या जोरदार तडाख्याने मार खाल्लेली लवासाची ती हिरवी चादर पांघरलेली डोंगराई जणू स्तब्धच झाली होती. ना प्राण्यांचा आवाज ना पक्ष्यांचा किलबिलाट. सर्व काही जणू अगदी निपचित पडल्यासारखे! शांत आणि निद्रिस्त! पण हे काही फार काळ टिकलं नाही. याही वातावरणात […]