• Pune, Maharashtra

 माती खाल्लेला माणूस: भाग १

 माती खाल्लेला माणूस! Marathi Katha, Marathi story, marathi fiction अगदी, दिवस सरू लागतानाच मी माझ्या त्या मोडकळीस आलेल्या स्प्लेंडरला splendor bike कुत्तुन किक मारली. कुत्तुन यासाठी, कारण त्याशिवाय ती चालूच होत नाही. आता आता तर ती पेट्रोलपण जास्तीचं पिऊ लागली होती. मला मग राहून राहून वाटायचं की हिला इलेक्ट्रिकच electric bike करून टाकावी म्हणजे झंझटच नाही, च्यायला. चांगला मेकओव्हर makeover होऊन […]

व्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण

सब-वे : एक वळण Marathi Katha, Marathi story, marathi fiction   धावत धावतच अश्वथ दगडूशेठ गणपती मंदिरासमोर आला व गुडघ्यावर हात टेकवून धापा टाकत आत गणपतीच्या मूर्तीकडे पाहू लागला. मूर्ती प्रसन्न आणि सोज्वळ वाटत होती. पण मंदिरासमोर कुणीच नव्हतं. मागून आर्या आणि सुब्बू दोघेपण धापा टाकतच तिथे आले. अश्वथला काय झालंय हे त्यांना कळायला काही मार्ग नव्हता. तो धावत आला आणि त्याच्या मागे ते धावत आले. का? कशासाठी? कुठे? […]

ध्रुवतारा: Marathi Kavita मराठी कविता

ध्रुवतारा आई म्हणाली बाबा बनले उत्तरेचा एक तारा ध्रुवतारा दिसतो का बघ त्याच्या शेजारी लुकलुकणारा मी म्हणालो ध्रुवतारा तर नावडता ना गं आई? बाबा तर प्रिय मजला तुजला का मग केली त्याने घाई? आई म्हणाली देवाचे घरी असते थोडी रीतच न्यारी जे की आवडे तुजला मजला देवलाही मग तेचि प्यारी मी म्हणालो लहान मुले तर असती देवासही प्यारी जाऊ का […]

व्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट

एम आय डुईंग ग्रेट? Am I doing great? नवी दिल्ली. New Delhi संसद भवनात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची एक बैठक सुरु होती. विविध खात्यातील मंत्री  आणि त्यांचे सचिव पण त्या बैठकीस उपस्थित होते. ते आपापल्या खात्यातील केलेल्या कामांची माहिती पंतप्रधानांना देत होते; शिवाय काही समस्या असतील तर त्याही ते मांडत होते. पंतप्रधान शांतपणे त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेत होते आणि आपल्या सचिवाला त्या क्रिस्टल […]

जीणे कुणास नको असते?

रुक्ष जीणे जाहले जरी जीणे कुणास नको असते? असते हवे फक्त सुख दु:ख कुणास नको असते! हवे असते माझे मलाच तुझे देखील मलाच हवे! देण्यावाचून धर्म बुडतो द्यायला माझे खिसे रिकामे!! – शिवसुत. Who else wishes to die? Although life seems to be hard Who else wishes to die? Everybody desires relief Nobody wishes for grief! Things are mine, only […]

पावसात भिजलेली एक परीराणी

पावसात भिजलेली एक परीराणी पाऊस! धो धो बरसत होता आज तो. यावेळी वळीवानेही तसा दगाच दिला होता आणि आता मृग त्याची जणू कमतरताच भरून काढत होता. प्रियकर आपल्या प्रेयसीला खूप अवधीनंतर भेटल्यावर जसा तिच्यावर अगणित चुंबनांचा वर्षाव करून तिला सुखावून टाकतो तसा तो आज धरतीला सुखावत होता. कोथरूड डेपोच्या बाहेरचा तो बसस्टॉप (a bus stop) त्या भल्यामोठ्या पावसात जरा अस्पष्टच […]

डू यू लव मी ?

do you love me ? बागेतील त्या अरुंद पायवाटेने चालताना तिच्या उघड्या दंडांचा होणारा तो मुलायम स्पर्श मला अगदी स्पष्टच जाणवत होता. तिने स्लीवलेस टॉप sleeveless) तोही गडद जांभळ्या रंगाचा आणि खाली काहीशी टाईट जीन्स (skinny jeans) घातली होती, जिच्यातून तिचे कर्व्हस् (body curves) अगदी स्पष्ट नाही म्हटले तरी त्यातल्या त्यात दिसत मात्र होतेच! तशी ती बुटकीच होती; पण माझीही […]

पाडवा

पाडवा गावाच्या बाहेर, अगदी सुरवातीलाच त्या म्हातारीचं ते कुडाचं खोपटं होतं. छोट्याशा टेकडावर ते काळपट असं खोपटं जणू असं काही उभं होतं की गावात येण्याऱ्यांच्या स्वागतालाच ते उभा आहे असं काहीसं वाटत होतं. रखरखत्या त्या उन्हात थोडासा गारवा मिळावा म्हणून म्हातारीनंच काही वर्षांपूर्वी त्या टेकडाच्या खाली जिथून गावात रस्ता जात होता तिथं आणि खोपीच्या बगलेला अशा दोन नांदुरकीच्या फांद्या आणून पुरल्या होत्या. आज नाही […]

रुपेरी रिंगण, भाग ४

त्या रात्री त्याचं कशातही लक्ष लागलं नाही. आपण नायर मॅडमला असं बोलायला नको होतं हे राहून राहून त्याला वाटत होतं. पण का..? तो आज टेबल लॅम्प सुरू करून नुसता लॅपटॉपसमोर बसून राहिला होता. त्याच्याने धड एक शब्दही पुढे टाईप करणे झाले नाही. त्याच्या मनाचा वारू असा काही उधळला होता की तो कधी आरतीकडे धाव घ्यायचा तर कधी नायर मॅडमकडे. भूतकाळ […]

रुपेरी रिंगण, भाग २

Ruperi ringan मघाशी ते दोघे बसलेल्या जागेकडे पाहत अमोल तिकडे धावत आला. कुठे बरं आरती गेली असेल, असा मनात विचार करून तो इतरत्र आपली नजर सैरभैर फिरवू लागला. अशी अचानक जागची उठून ती कुठे गायब झाली असेल? तेही आपल्याला कल्पना न देता. आता भेळ घेताना पाहिलं तर इथेच जागेवर बसली होती ती आणि इतक्यात अशी कुठे दिसेनाशी झाली, याचाच तो […]

रुपेरी रिंगण

Ruperi Ringan अनवाणी पायांवर सागराच्या हळुवार लाटांची आंदोलने घेत ती मावळतीच्या सूर्याकडे एकटक पाहत उभी होती. तिच्या डाव्या पायाचा अंगठा सतत रेतीत तोंड घालीत होता आणि वर काढीत होता. पायांतील पैंजणात लाटांचा बारीक फेस अडकून राहत होता तर लाटांसोबत आलेली ती पांढरी रेती लागून घोट्याभोवती अगदी पैंजणाच्या वरच काहीसं पैंजनागतच एक रिंगण देखील तयार झालं होतं एव्हाना! रुपेरी वाळूचं! त्यामुळे […]

माय व्हॅलेंटाईन

माय व्हॅलेंटाईन My Valentine दुर्गाला नेहमीचीच गर्दी असते म्हणून मी कायम हर्षला बसतो. आजही हर्षला बसलो होतो. एकटाच. ह्या दारूने ‘बसणे’ हा शब्द इतका बाटवून ठेवला आहे की जिथे जिथे मग बसण्याची गोष्ट येते तिथे तिथे लोकांचे दारूवरून गैरसमज हे होतातच! आता बसणे या शब्दाची काही मक्तेदारी वगैरे दारूने घेतली आहे अशातला भाग मला तरी तूर्तास वाटत नाही. जेवायला बसणे, गाडीवर बसणे, […]

न्यू इयर पार्टी नाईट भाग ६

New Year Party Night part 6 Final episode, The final truth नाक आणि डोळे पुसून ती कारमधून बाहेर पडली. तरातरा चालत ती पोलीस स्टेशनच्या समोर आली. काही सांगायला आत जाणारच तोच तिला स्वप्नील एका कोपऱ्यात हवालदार मानेशी काहीतरी बोलताना उभा दिसला. त्याच्यावर नजर जाताच तिची पायऱ्या चढणारी ती पाऊले तिथेच थबकली आणि ती मग काहीशा दबक्या पावलांनी त्याच्याकडे चालत आली. […]

न्यू इयर पार्टी नाईट भाग ५

न्यू इयर पार्टी नाईट भाग ५ new year party night “इन्स्पेक्टर साहेब, मला श्रेयाशी थोडं बोलायचं आहे. प्लीज थोडा वेळ देता?” निर्विला वरती ठेवून स्वप्नील धावतच खाली आला आणि गाडीत बसलेल्या इन्स्पेक्टर कदमांना म्हणाला. “वेळ बीळ काही मिळणार नाही. आधीच उशीर होतोय आम्हाला. तुम्हाला जे काही विचारायचे आहे, बोलायचे आहे, ते, तिकडे, स्टेशनला येऊन. आता घाई आहे आम्हाला.” असे म्हणत त्याने हातानेच […]

अजूनही कानात माझ्या deshbhakti geet

अजूनही कानात माझ्या… deshbhakti geet अजूनही कानात माझ्या गुंजताहेत वंदे मातरमचे नारे हसत हसत अन् चढत होते फासावरती सारे त्यागला होता संसार देशच होता प्राण त्यागले होते तारुण्य मिळविण्या स्वातंत्र्य अजूनही आठवताहेत मला ते रस्ते सांडले होते त्यांच्यावर रक्तच रक्त नुसते पडले होते देहही पडले होते इरादे मात्र आवाज होता कानी विसरू नका रे वादे अजूनही आठवताहेत मला ते डोळे ओकत […]

व्हायरस: प्रकरण ९ . तू तुझ्या पापांची किंमत मोजशील 

९ . तू तुझ्या पापांची किंमत मोजशील you will pay for your sins माझ्या येणाऱ्या कथा कवितांचे अपडेट्स आपोआप मिळवण्यासाठी माझ्या वेबसाईटवर आल्यावर जे पॉप अप नोटिफिकेशन येते त्याला allow करा म्हणजे मी काही पोस्ट केल्यास आपल्याला त्याचे नोटिफिकेशन येईल. माहितीसाठी खाली फोटो देत आहे. रात्र झाली होती. अश्वथ नुकताच घरासमोर येऊन पोहचला होता. त्याच्या घराच्या एका खोलीतून एक मंद असा प्रकाश बाहेर पडताना दिसत होता. शिवाय त्याच्या म्यूजिक प्लेयरवर कौशिकी […]

न्यू इयर पार्टी नाईट भाग ४ New Year Party Night

रात्री पार्टीत तिचं कुणाशी वाजलं तर नसेल? बायका बायकांची भांडणे तर झाली नसतील? की बॉसशी खटके उडाले असतील? की ती पहाटे परतली होती तर आणखी. .काही..? असे हरतऱ्हेचे प्रश्न त्याला सतावत होते.New Year Party Night तो तसाच आपल्या विचारांत हरवून गेला असता श्रेया तयार होऊन खाली आली आणि त्याला तिने विचारले, “कारची चावी कुठे आहे तुझ्या?” New Year Party Night […]

न्यू इयर पार्टी नाईट भाग ३ New Year Party Night

चेहऱ्यावर पश्चातापाचा भाव आणत श्रेयाने आपले गुडघ्यांत लपवलेले तोंड बाहेर काढले. एक दीर्घ श्वास घेतला आणि दोन्ही हातांनी आपल्या केसांमधून हात फिरवला. अजूनही तिच्या खोलीत ती एकटीच होती. ना तिथे स्वप्नील आला होता ना तिची मुलगी. New Year Party Night माझ्या येणाऱ्या कथा कवितांचे अपडेट्स आपोआप मिळवण्यासाठी माझ्या वेबसाईटवर आल्यावर जे पॉप अप नोटिफिकेशन येते त्याला allow करा म्हणजे मी […]

न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night

ए न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night “श्रेया, अगं अजून किती उशीर करणार आहेस तू?” स्वप्नील पलीकडून काहीसा रागावूनच बोलला. लवासा जवळील एका रिसॉर्टला resorts near lavasa ती थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी New Year Party Night तिथे आली होती. तिच्या कंपनीने तिथे एक भव्य पार्टी आयोजित केलेली होती. मागे डिजेवर dj nights मोठ्या आवाजात पार्टी सॉंग्स bollywood arty songs सुरू होते […]

वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग ३

अमेरिकेला America जायच्या आदल्या रात्री ते वॉशिंग्टनशी Washington हितगुज करीत बसले होते. पहाटे निघणार होते ते. a flight to usa, a flight to washington आपला वॉशिंग्टन एक प्राणी असल्याचे त्यांना आज खरे दुःख वाटत होते. इतक्या वर्षांच्या त्याच्या सहवासाला उद्यापासून ते मुकणार होते. कदाचित वॉशिंग्टनची अवस्थाही तशीच असावी. बोलता येत नसले म्हणून काय झाले? भावना त्यालाही होत्याच की. आपला मालक उद्या […]

वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग २

जुन्या आठवणी बाजूला ठेवत मोहनरावांनी अंगात तो ट्रॅकसूट चढवला आणि वॉशिंग्टनला washington dc सोबतीला घेऊन मग ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले काठी घेऊन. हिवाळा तोंडावर असतानाची सकाळची ती नाजुक थंडी कुडकुडायला जरी लावत नसली तरी जाणवत मात्र होती काहीशी. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या उंच झाडींनी धुक्याची पातळ शाल पांघरल्यासारखे चित्र जणू उभे राहिले होते. वाढत्या वयानुसार स्थूल झालेली शरीरे घेऊन मंडळी आपली […]

वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग १

Washington and America वॉशिंग्टन आणि अमेरिका मोहनराव आज भलतेच खुश होते. अगदी सकाळी सकाळी मेल आला होता त्यांना. मुलाचा. ऊसातून. आपला वाला ऊस नव्हे. यूएसए यूएसए. USA यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका! तिथून. United States Of America म्हणाला होता- बाबा, परत एकदा आजोबा होणार आहात तुम्ही. यावेळी नातू होणार आहे तुम्हाला. म्हटलं बोलावून घ्यावं. मधल्या काळात नाही जमलं काही. फ्लाईटचे तिकीटही […]

भाऊबीज भाग २

भाऊबीज bhaubeej/ bhaidooj काही वेळाने तो उडालेला धुरळा जागी बसला. मग पुन्हा एक एसटी st bus strike आली. पुन्हा धुरळा उडाला. एक एसटी निघून गेली. अजून धुरळा उडाला. धुरळा उडायचा. धुरळा dhurla marathi movie बसायचा. कित्येक प्रवासी आले, निघून गेले. आप्पा मात्र खांद्यावर ती पिशवी टाकून स्तब्ध उभे होते तिथे. आटपाडीच्या आगारात atpadi bus stand जणू त्यांचा पुतळाच statue of […]

भाऊबीज भाग १

भाऊबीज “काय आप्पा, अहो बहिणीचं राहिलं; पण निदान दाजीची पत-प्रतिष्ठा, इज्जत-खानदान बघून तरी आपल्या बहिणीला भाऊबीज द्यायची. का तसली बी रीत न्हाय तुमच्याकडं?” नुकतेच जिल्हा दूध संघाचे चेअरमन झालेले रावसाहेब आप्पाला म्हणाले. त्यांचे ते बोलणे ऐकून आप्पा पाटावरच एखादा पितळेचा पुतळा बसावा तसे स्तब्ध झाले नुसते. स्तब्ध कसले जागचे गोठूनच गेले म्हणा ना! पण पोरीच्या माहेरच्यांनी तिच्या सासरी जाऊन किमान जिभेवरती […]

अजून दिवाळी आहे

अजून दिवाळी आहे. Diwali 2022 दिवस नुकताच डोक्यावर आला होता, त्यामुळे उन्हाचा चपकारा चांगलाच बसत होता. काळ्या पाषणाच्या खळग्यातून वाहणाऱ्या ओढ्याचा खळ खळ असा मधुर आवाज कानी येत होता. ओढ्याच्या मधोमध कुणी एक बाई लुगड्याचा काष्टा घालून गोचीडागत फुगलेल्या आपल्या काळ्याभोर म्हशीला न्हाऊ घालीत होती. त्यातच मधूनच म्हशीने आपली शेपटी उडवली की हवेत उडणारे पाण्याचे थेंब जणू मोत्यांगत चमकू लागायचे. ओढ्याच्या […]

व्हायरस: प्रकरण ४: MV- ४८

प्रकरण ४.MV- ४८. सन २०८४. पुणे ! दुपारची  वेळ टळून गेली होती. पाषाणची ती टेकडी सूर्याची प्रखर किरणे सोशीत पडली होती. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे टेकडीवरील ती झाडी म्हणजे वाळलेले जंगलच वाटत होते जणू. टेकडीवरून उत्तरेस पाहिल्यास दूरदूर पर्यंत समोर दिसत होती ती बाणेर-बालेवाडी- वाकडची कॉँक्रीटची 2 bhk flat in wakad, 3 bhk in baner, vtp sierra baner, भग्न जंगले. हिरवट, काळपट, […]

दुर्गे दुर्घट भारी: भाग. १

दुर्गे दुर्घट भारी..  “समू?” आई समीक्षेला स्वयंपाक घरातूनच हाका मारीत होती, “अगं उठलीस का? पोरीच्या जातीने असे झोपून राहणे बरे दिसते का?” दहा वाजून गेले होते आणि समीक्षा अजूनही अंथरूणाशी खिळून पडली होती. त्यात आज रविवारचा दिवस असल्यामुळे तिला तर निमित्तच मिळालं होतं. ती काही बारा वाजायच्या आत उठणार नव्हती; पण तिला असं सुखाने झोपू देईल ती तिची आई कसली? कडक लक्ष्मीच […]

सखे शेवटची भेट!

विनवण्या करू कितीएक ना अनेकहाक माझी जाऊदेतुझ्या काळजात थेट सोडवू कसा मीभला पडलाहे पेचचांदण्या अशा त्या रातीसखे शेवटची भेट! लाखो प्रश्न डोक्यामंदीउत्तरं त्यांची देचअबोल प्रीत अशी कशी हीका तुटलाहे पिरतीचा देठ चालतो आहे वाटपरत नको आहे ठेचभरकटलेली नौकाकिनाऱ्याला तू नेच हात माझ्या हातामंदीएकदा तू देचपावलागणिक सोबतीचीशपथ तू आता घेच! -शिवसुत. आपली प्रेयसी सोडून चालली असता तिचा प्रियकर तिला तिच्या नसण्याने […]

माझ्या प्रीत सजनी mazya preet sajni

माझ्या प्रीत सजनी mazya preet sajni आठवतंय का बघ तुला माझ्या प्रीत सजनी जोडी सफेद हंसाची याच तळ्याठायी देखणी देखणी तव तूही तितकीच तितकीच सुंदर मोहिनी हळुच हनुवटीला हात जाता तू लाजून ओढलीस ओढणी आठवतंय का बघ तुला असंख्य अशा त्या चांदराती अगणित प्रतिबिंबे चंद्राची आपण होती पाहिली याच तळ्याकाठी मग कमळ फुलांच्या साक्षी घेऊनी हात हाती प्रेमगीते जी गायली […]

छाटले जरी पंख माझे

  छाटले जरी पंख माझे उडणार मी जरूर आहे उत्तुंग भरारी घेण्याची जिद्द माझ्या रक्तात का उगाच आहे?   जाहले गलीतगात्र, मूर्च्छितमात्र छिन्न विछिन्न तन परि राखेतूनही पेटून उठणारा धगधगता निखारा का मी उगाच आहे?   सापडे ना वाट जरी गडद अशा या तिमिर राती किर्रर्र काळोख सुरंगी अंती पेटलेली मशाल का मी उगाच आहे?   ठाकले कित्येक जरी मेरू […]

नारायण. . . नारायण

नारायण. . . नारायण            आज इंद्राचा दरबार खचाखच भरलेला होता. देवाधिदेव इंद्र आपले दोन्ही बाहू आपल्या सुवर्ण सिंहासनावर विसावून क्रोधीत नजरेने एकटक समोर पाहत बसले होते. त्यांचा सुवर्ण मुकुट आज जरी झळाळत असला तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज मात्र गायब होते. त्यांच्या सिंहासनाच्या एका बाजूला नाथ तर दुसऱ्या बाजूला उद्धव आपापली आसने ग्रहण करून बसले होते व त्यांना लागूनच दोन्ही […]

मग पावसात थोडं रडून तर बघ भै..!

पावसाचं पाणी अन पाण्याचा पाऊस मोक्कार भिजायची मला लै हौस!           अशाच एका पावसात           फुलली होती जाई           वीज चमकता नभि           बनली माझी सई! सरीवर सर येते-जाते निघून आठवण येत राहते उगाच तिची मागून!           डोळ्यांतलं पाणी   […]

स्वर्गाची शिडी!

          मध्यरात्र उलटून खूप वेळ झाला होता. किशनला आता एक पाऊलही पुढे टाकणे कठीणझाले होते. खांद्यावर दीड वर्षाची मुलगी, सोबत चार वर्षाचं पोरगं आणि डोक्यावर छोटंसं गाठोडं घेऊन त्याच्याइतक्याच जड पायांनी रेल्वेच्या पटरीवरून चालणारी त्याची बायको, यांना घेऊन तो दिवस मावळायला जालन्याहून औरंगाबादेच्या दिशेने निघाला होता.                        […]

यशोदा: भाग-१

यशोदा भाग १            अंधाऱ्या राती नाजुक पण कोरीव अशी चंद्रकोर आणि त्याभोवती चांदण्यांनी धरलेला फेर पाहून कुणाला त्यात सामील व्हायची इच्छा झाली नाही तर नवलच! त्यात भर म्हणून असलेली रातकिड्यांची किर्रर्र व मधूनच वाऱ्याच्या मंद झुळुकांमुळे सळ्ळ होणारा पिंपळाच्या पानांचा आवाज जणू संगीताचा भासच करवत होते.          मधूनच पिकलेले जांभळ खाली पडून टप्प असा […]