• Pune, Maharashtra

रुपेरी रिंगण

Ruperi Ringan अनवाणी पायांवर सागराच्या हळुवार लाटांची आंदोलने घेत ती मावळतीच्या सूर्याकडे एकटक पाहत उभी होती. तिच्या डाव्या पायाचा अंगठा सतत रेतीत तोंड घालीत होता आणि वर काढीत होता. पायांतील पैंजणात लाटांचा बारीक फेस अडकून राहत होता तर लाटांसोबत आलेली ती पांढरी रेती लागून घोट्याभोवती अगदी पैंजणाच्या वरच काहीसं पैंजनागतच एक रिंगण देखील तयार झालं होतं एव्हाना! रुपेरी वाळूचं! त्यामुळे […]

शाश्वत प्रेम.!

शाश्वत प्रेम  ते फूल किती सुंदर होतं..! हे त्या भुंग्याला देखील माहीत होतं. दिवसभर त्याच्याभोवती पिंगा घालून,   उद्या ते कोमेजणार हे त्यानंही जाणलं होतं. कळीचं फूल आणि त्या फुलावर प्रेम त्याने का उगाच केलं होतं? आपण शाश्वत नसलो तरी प्रेम शाश्वत असतं हे त्या फुलाला देखील मग उमगलं होतं.! -शिवसुत