• Pune, Maharashtra

गंडी अण्णा:भाग १

        दिवस अगदी डोक्यावर आला होता. ऊन नुसतं रखरखत होतं. पावसाळा अगदी तोंडावर होता; पण आभाळात मात्र ढगांचा मागमूसही नव्हता. आभाळाएवढ्या उंचीच्या, शे-दीडशे वर्षांच्या जुनाट चिंचेच्या झाडांमधून वाहणारा वारा रों रों आवाज करत होता. अशाच एका भल्या मोठ्या चिंचेच्या झाडाला लागून असलेल्या विहिरीच्या मोटारीचा बुंSSग असा आवाज कानी पडत होता आणि विहिरीवरच असलेल्या चंबूरमधून पडणाऱ्या पाण्याचाही मंजुळ आवाज सतत […]