
८. स्लम टॉवर्स: भीक आणि भूक Slum Towers
८. स्लम टॉवर्स: भीक आणि भूक Slum Towers
हिंजवडीच्या hinjewadi IT park pune आलिशान अशा सॅफ्रॉन इंटरनॅशनल हॉटेलच्या five star hotels मागच्या वाटेने अश्वथ पाठीवरती भलीमोठी बॅग घेऊन मोटरसायकलचा आवाज करीत जोरात बाहेर पडला आणि सोळा पदरी रुंद अशा NH ४ ला लागला. national highway, Slum Towers
रात्रीचे सुमारे एक वाजले होते. त्याची गाडी चांदणी चौक सर्कलकडे सुसाट वेगाने निघाली होती. एकेकाळी खचाखच्च भरलेला NH ४ आता पूर्णपणे ओस पडला होता. त्यात मध्यरात्रीची वेळ. मग काळे कुत्रेही नव्हते हायवेवर. होता तो एकमेव अश्वथ आणि त्याची मोटारसायकल!
चांदणी चौक सर्कलपासून chandani chowk त्याची गाडी पुढे तशीच वारजेकडे निघाली. पुढे निघताच त्याला दूरवर अंधारात, समोर पसरलेल्या झाडीमधून काही उंच, पण जुनाट इमारती नजरेस पडत होत्या. तेच ते स्लम टॉवर्स slum towers. पुण्याचे स्लम टॉवर्स वारजेच्या टेकडीवर दाटीवाटीने सलग असे उभे होते ते. जणु ते काही एकमेकांच्या आधारानेच उभे आहेत असे भासत होते. तसाही गरिबाला गरिबाचाच आधार असतो म्हणा.! श्रीमंत तर ढगांच्या वर माना काढून उभे होते. त्यांना काय दिसणार ढगाखालचं..?

वारजे ब्रिजवर येताच त्याची गाडी अचानक कशात तरी अडकून घिरट्या घेतच हवेत उडाली. पण सेल्फ बॅलन्स्ड self balanced bike असल्यामुळं ती खाली आपटून लटपटत स्थिर उभी राहिली. अश्वथ मात्र गाडीवरून बाजूला फेकला गेला व ब्रिजच्या संरक्षक कठड्याला जाऊन आदळला. हेल्मेटमुळे डोकं वाचलं; पण नाकातून थोडं रक्त मात्र आलं. त्याच्या पाठीवरची ती बॅग ब्रिजच्या मधोमध पडली होती केव्हाची. आघात चांगलाच बसल्यामुळे त्याचे कान आता कुईईई वाजु लागले होते. जणू ते बधिरच झाले होते. त्याने हेल्मेटला हात लावला तसे ते समोरून उघडले. तो इकडे तिकडे पाहू लागला.
चार-पाच लुटारू हर्ले डेव्हिडसन harle-davidson सारख्या मोटारसायकलींवर तिथे येऊन त्याच्या बॅगभोवती गोळा झाले होतेआणि बॅग उघडून ते त्यात काहीतरी शोधत होते. बॅगमधील जेवणाचे बॉक्स विस्कटत ते अधाशागत बॅगेत पाहत होते. त्यांचा शोध सुरु असताना त्यांच्यापैकी एकजण अश्वथकडे चालत आला आणि त्याला म्हणाला, “डोस नाय काय तुझ्याकडं?” त्यावर अश्वथने नकारात्मक मान हलवली. मग चिडूनच त्याने अश्वथच्या थोबाडावर एक जोराचा ठोसा देऊन तो तिथून निघून परत आपल्या साथीदारांकडे गेला.
“चला रे. त्याच्याकडे नाही.” असे म्हणत तो त्यांच्याजवळ आला आणि त्या अस्ताव्यस्त पडलेल्या जेवणाच्या बॉक्सकडे पाहत म्हणाला, “उचला एकेक बॉक्स.”
त्यांनी ते जेवणाचे बॉक्स उचलले आणि हे ही नसे थोडके असे म्हणत ते खात खात तिथून निघून गेले.
“या पण वेळेस काही गंभीर दुखापत नाही. पाळत ठेवणारी यंत्रणा बंद केल्यामुळे धोका समजला नाही.” तारा म्हणाली. अश्वथचे कान आता वाजायचे बंद झाले होते. ब्रिजच्या कठड्याला पकडत तो उठला. बॅग पडलेल्या ठिकाणी आला आणि सही सलामत राहिलेले जेवणाचे बॉक्स तिच्यामध्ये भरू लागला. मोटारसायकल मागे येऊन उभीच होती.
बॉक्स भरून त्याने ती बॅग लागलीच पाठीवर अडकवली आणि वारजे ब्रिजवरून उजवीकडे वळून तो सरळ स्लम टॉवरला येऊन पोहचला. पथदिव्यांची दुरावस्था होतीच तिथे. बरेचशे बंदच होते; पण थोडेफार जे सुरु होते तेही डोळे मिचकावल्यासारखे बंद-चालू होत होते. त्यांच्यावरून टॉवर्सच्या लाईटचा अंदाज न लावलेलाच बरा. माणसे झोपी गेली असली तरी कुत्री मात्र जोरजोरात भुंकत होती. अश्वथ आत आला आणि त्यांना अजून चेव चढला.
एका टॉवरमध्ये शिरल्यावर त्याने बॅग एका खांद्यावर अडकवली, त्यातील जेवणाचे बॉक्स हातात घेत अंधाऱ्या त्या पोर्च मध्ये बसलेल्या भुकेलेल्या लोकांना देत पुढे जाऊ लागला. झोपी गेलेले जागे होत त्याच्या हातातून ते बॉक्स घेत त्याला दुवा देत होते. कुणी पटकन त्याच्या हातातून बॉक्स घेऊन अधाशागत ते उघडून अन्नाचे बकणेच्या बकणे तोंडात कोंबत होते. कुणी शेंबडं पोर नाकातून खाली लोंबणाऱ्या शेंबडासहित अन्न खात होतं तर खाताना कुणाच्या अगदी कोपरापर्यंत ओघळ लागले होते. कुणा एखाद्याला अन्न मिळालं नाही तर तो कुण्या दुसऱ्याचं हिसकावून खात होता.
बॉक्स वाटता वाटता अश्वथला कुणीतरी त्याच्यावर पाळत ठेऊन आहे असं वाटलं आणि त्याने एकदम मागे वळून पाहिलं. डोक्यावर हुडी ओढलेलं कुणीतरी अचानक डोकावणारं तोंड आत घेतलं. अश्वथने खांद्यावर अडकवलेली बॅग पुढे लोकांना सुपूर्द केली आणि तो मागे पाठलाग करण्यासाठी वळला. तशी ती व्यक्ती भराभर जिने चढून वर जाऊ लागली. तो आता तिच्या मागे निघाला. नीटसा उजेड नसल्यामुळं तो एका काळ्या प्रतिमेचाच पाठलाग करतोय असं वाटत होतं. पाठलाग करता करता तो त्या टॉवरच्या एकदम वरती, टेरेसवर येऊन पोहचला आणि इकडे तिकडे पाहू लागला.
मागून अचानक कुणीतरी स्टन गन stungun सुरु करून त्याच्या गळ्याजवळ धरली. तो एकदम स्तब्ध झाला.
“पार्टनर पण बनवायचं आहे आणि जीव पण घ्यायचा आहे.” अश्वथच्या या वाक्याने आर्या बेसावध झाली. तीच होती ती. तेवढ्यात त्याने तिचा हात पकडून तिच्या हातातील गन बाजूला घेत, तिला आपल्यापुढे घेतले व परत ती गन आर्याच्या गळ्याजवळ नेत तो म्हणाला, “तू माझा पाठलाग करतेयस तर? स्टॉकर हां?” how to get rid off stalker
“पाठलाग करायला तू मुलगी थोडी आहेस?” त्याच्या हातातून गन घेऊन त्याच्या गळ्याजवळ नेत ती म्हणाली. त्याने आपले दोन्ही हात हॅन्ड्सअप केल्यागत केले आणि गन हिसकावली.
“जमतंय की तुला.” ती म्हणाली.
“एक्स्पर्ट आहे मी यात. हां.. आता तेव्हा भरकटलो होतो थोडा.”
“थोडा? सपशेल मार खात होता माझा.”
“तू इथे कशी? लाईन तर नाहीस ना मारत माझ्यावर?” त्याने डोळे बारीक करत विचारले आणि विषयाला कलाटणी दिली.
“से वन मोअर टाईम अँड आय विल……” तिचे बोलणे मध्येच कटात तो म्हणाला, “हा आय नो आय नो, यू विल किस मी” तशी तिने गालावर लाली आणत त्याच्या गालावर टिचकी मारली आणि मागे फिरत म्हणाली, “मी माझ्या आईसोबत राहते इथे.” types of kisses
“या अडगळीत?” तो भुवया उंचावीत म्हणाला खरा पण ती त्याच्यावर करडा कटाक्ष टाकतेय हे पाहून तो म्हणाला, “ओह, आय सी. सच ए ब्युटीफुल प्लेस.” त्याने प्रतिसाद दिला तशा त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. खाली पाय सोडून दोघांच्या बराचवेळ अशा काही गप्पा सुरु होत्या की जणू आता त्यांना एकमेकांत रस वाटू लागला होता. places near pune
“माझी उपासमार होऊ नये म्हणून आई खूप काम करायची. इथून कोथरूडला नर्स म्हणून एका दवाखान्यात जायची; पण अचानक डॉक्टरने तिला येऊ नको म्हणून सांगितले आणि सगळं ठप्प झालं. MV-४८ व्हायरसचा डोस घेणं पण तिला कठीण जात होतं. मग मला तिची जबाबदारी घ्यावी लागली.” ती सांगतच होती आणि तो ऐकतच होता, “मी पंधरा वर्षांची असेन तेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं. माझ्या आईला जेवण देताना. लोकांच्या गर्दीत. बाकी लोकांपेक्षा तेव्हा तू मला खूप वेगळा वाटला.” तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.
“कधीपासून आहात इथे?” त्याने विचारले.
“लहानपणापासून.” तिने उत्तर दिले.
“आईच्या?” त्याने गम्मत करत विचारले.
“माझ्या रे, पागल.” असे म्हणत ती त्याच्याकडे पाहत राहिली. तोही तिलाच पाहत होता. मग तिने त्याच्याजवळ जात हात पुढे नेला. त्यानेही आपले तोंड पुढे केले. तिने हळूच तिचा हात त्याच्या गालावरती ठेवला आणि नाकातून आलेले रक्त हाताच्या अंगठ्याने पुसू लागली. सुकून गेल्यामुळे ते नीट पुसले गेले नाही.
“ओह …. आय एम सॉरी!” चुंबनाच्या इराद्याने पुढे केलेले तोंड हळूच मागे घेत तो म्हणाला. ती आता मात्र खळखळून हसली. तिने एक क्षण त्याच्याकडे पाहिले व हळूच आपले डोके त्याच्या खांद्यावर टेकवले आणि परत त्यांच्या गप्पा सुरू झाल्या.
सूर्याची पहिली किरणे तोंडावर पडताच अश्वथने आपल्या खांद्यावरचे आर्याचे डोके हळूच बाजूला टेकवले आणि तिच्या अंगावर टाकलेले आपले जॅकेट तसेच ठेवून तो तिथून निघून गेला. जरावेळाने आर्याला जाग आली. झोपेतून उठूनही तिचा चेहरा तजेल वाटत होता. अंगावर टाकलेले अश्वथचे जॅकेट उराशी कवटाळून तिने एक चिरंतर स्मितहास्य केले.
सकाळची वेळ असल्यामुळे लोकांची लगभग सुरु होती. चौकाचौकात होलोग्राम डिस्प्लेवर विविध जाहिराती सुरु होत्या. शिवाय कुणी आपल्या होलोग्राम वरती घडामोडी पाहण्यात व्यस्त होतं. मधूनच मेट्रो स्टेशन metro station वर पी.ए ची सूचना कानी येत होती. सगळं कसं नित्यक्रमाने सुरू होतं. pune metro
इतक्यात पुणे युनिव्हर्सिटी चौकात pune university होलोग्राम डिस्प्लेवर hologram display एक महत्वाची घोषणा झाली, आजपासून MV-४८ च्या डोसची किंमत एक लाख क्रिप्टोवरून सव्वा लाख क्रिप्टो करण्यात आली आहे. crypto, cryptocurrancy
एकाचवेळी ती घोषणा सगळीकडे प्रसारित केली गेली होती. गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत सर्व स्तरांतून कालभद्रवर नाराजीचा एकच सूर उमटला. जे लोक जिथं आहेत तिथून त्यांनी त्याला शिव्याशाप दिला तर काहींनी आता आपलं कसं होणार याचा विचार करत डोक्याला हात लावून जाग्यावरच बैठक मारली.
इकडे काल-कॉर्पच्या प्रयोगशाळेतून माणसांच्या तसेच प्राण्यांच्या ओरडण्याचे भयंकर आवाज येत होते. एका काचेच्या खोलीत एक मोठी वस्तू होती अगदी दगडासारखीच वाटणारी. दुसऱ्या काही खोल्यांमध्ये प्रयोगासाठी माणसे व स्त्रिया नग्नावस्थेत अधांतरी लटकवलेली होती. त्यांचीच कमी म्हणून की काय पक्षी, प्राणी सुद्धा होते. नक्कीच काहीतरी अमानवी, अनैसर्गिक असे प्रयोग सुरू होते तिथे. inhuman experiments, unnatural experiments
नुकताच एका माणसावर अयशश्वी प्रयोग झाला होता आणि त्यात त्याने आपला जीव गमावला होता. प्रयोगात सततच्या येणाऱ्या अपयशाने कालभद्र मात्र कमालीचा अवस्थ आणि निराश झाला होता, संतापला होता. त्यामुळे त्या भरात कालभद्रने एका वैज्ञानिकाची हत्याच केली आणि एका वरिष्ठ वैज्ञानिकाला त्याने विचारले, “हजार प्रयत्नांनंतर एडिसनला पण यश मिळालं होतं. माझे तर दहा हजार झालेत. मी कुठं चुकतोय?”
“सर, तुम्ही तर देव आहात. तुम्ही कधी चुकणारच नाही.” तो म्हणाला.
कालभद्र त्याच्या कानाजवळ जात म्हणाला, “मी फक्त देवच नाही ….. दानव पण मीच आहे.” आणि खूप किळसवाणं हसला. i am a devil, i am a god.
माझ्या येणाऱ्या कथा कवितांचे अपडेट्स आपोआप मिळवण्यासाठी माझ्या वेबसाईटवर आल्यावर जे पॉप अप नोटिफिकेशन येते त्याला allow करा म्हणजे मी काही पोस्ट केल्यास आपल्याला त्याचे नोटिफिकेशन येईल. माहितीसाठी खाली फोटो देत आहे.

व्हायरस कथेचा आधीचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.
व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १
लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
मॅरेज मटेरियल Marriage Material
मी मॅरेज मटेरियल mi marriage material
ती आणि ती A lady and a prostitute
न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night
न्यू इयर पार्टी नाईट भाग २ New Year Party Night