कविता

सखे शेवटची भेट!

विनवण्या करू किती
एक ना अनेक
हाक माझी जाऊदे
तुझ्या काळजात थेट
सोडवू कसा मी
भला पडलाहे पेच
चांदण्या अशा त्या राती
सखे शेवटची भेट!
लाखो प्रश्न डोक्यामंदी
उत्तरं त्यांची देच
अबोल प्रीत अशी कशी ही
का तुटलाहे पिरतीचा देठ
चालतो आहे वाट
परत नको आहे ठेच
भरकटलेली नौका
किनाऱ्याला तू नेच
हात माझ्या हातामंदी
एकदा तू देच
पावलागणिक सोबतीची
शपथ तू आता घेच!
-शिवसुत.
आपली प्रेयसी सोडून चालली असता तिचा प्रियकर तिला तिच्या नसण्याने झालेली त्याची अवस्था सांगण्याचा आर्त प्रयत्न करीत आहे. एकूणच काय तर तीने त्याला सोडून जाऊ नये, तीने आपल्या सोबतच राहावे अशी त्याची मनोमन इच्छा आहे. म्हणूनच तो तिला
Tags :
[…] कधीतरी तो भेटेल किनारा […]
[…] वेळ गप्प राहून तो बोलू लागला, “दिपू, आय एम सॉरी यार. याला मीच जबाबदार आहे. सगळं […]
[…] सखे शेवटची भेट! […]
छान कविता…….. ती त्याच्या सोबतच रहावी……
आभार आपले
Nice…👍