• Pune, Maharashtra
कथा
रुपेरी रिंगण, भाग ३

रुपेरी रिंगण, भाग ३

Spread the love

सकाळी पुन्हा नवा दिवस, तीच लोकल, तेच सहप्रवाशी, तेच ते, तेच ते.

अमोल आपली लेक्चर्स संपवून पुन्हा कँटिनमध्ये लॅपटॉप उघडून लिहित बसला होता; पण म्हणावं तसे लिखाण होत नव्हते. न राहूनही त्याच्या डोळ्यासमोर रात्रीचे ते स्वप्न उभे राहत होते. समोरच्या चहाच्या रिकाम्या कपाला माशा लागल्या होत्या आणि त्याचा गोंss गोंss आवाज कानी पडत होता. तो लिहायचा, बॅकस्पेस दाबायचा. परत लिहायचा आणि परत बॅकस्पेस दाबायचा; पण काही केल्या त्याचं मन त्या, काल रात्रीच्या स्वप्नातच अडकून राहिलं होतं.

ruperi ringan
ruoeri ringan

म्हटलं जातं की माणसाला दोन माने असतात. खरंच असावं बहुतेक. निदान अमोलला तरी तसंच वाटत होतं. एक मन त्याचं अजूनही आरतीत गुंतून बसलं होतं तर हे दुसरं मन मात्र पहिल्या मनाच्या अपूर्ण मनोकामना या ना त्या मार्गाने पुऱ्या करू पाहत होतं. आता अमोलचीच भांबेरी उडालेली की, यातलं खरं मन ते मग कोणतं? जे आता आपल्यासोबत आहे ते? की जे-

काहीच कळायला मार्ग नव्हता. शेवटी त्याने डोक्याला हात लावत आपले केस आवळले आणि एक सुस्कारा टाकत काहीसा निर्धार करून तो लिहू लागला.

का कुणास ठाऊक पण आज त्याच्या नशिबी काही लिहिणं नव्हतंच. त्याने लॅपटॉपच्या कीबोर्डवर बोटे आपटली नसतील तोच नायर मॅडम त्याला आत कँटिनमध्ये येताना दिसली. एकटीच. तिच्यासोबत बाकीचा स्टाफ त्याला दिसला नाही. तो नव्हताच मुळी. आपल्याला काय त्याचे म्हणून मग तो खाली लिहू लागला. पण तरीही त्याला नायर मॅडमकडे पुन्हा एकवार पाहण्याचा मोह काही आवरता आवरला नाही आणि त्याने तिच्यावर कटाक्ष टाकलाच!

आणि काय योगायोग! तिनेही नेमका त्याच वेळी त्याच्यावर कटाक्ष टाकला आणि त्याच्या डोळ्यापुढे अचानक तिची ती कालची छबी उभारली, ती समुद्राकाठची. त्याला धस्स झाल्यासारखं झालं. तो चाचपडला; पण लगेच सावरला. मग दोघांनी एकमेकांना स्मित केले आणि तो लिहू लागला.

जाण्याने तुझ्या गेला तो पावसाळा, गेला मग हिवाळा

राहिला फक्त उन्हाळा अन् कधीकधी तो हिवसाळा

 ‘अहम् अहम’ कुणीतरी अगदी सावकाश आपला घसा साफ केल्याचा आवाज कानी पडला; पण लिहिण्यात गुंतला असल्या कारणाने त्याने तिकडे बिलकुलच लक्ष दिले नाही. नाही म्हणायला एका गर्द सुगंधित लेडीज परफ्यूमचा वास त्याला नाकात जाणवला होता खरा; पण-

नायर मॅडम त्याच्या पुढ्यात खुर्ची ओढून बसली होती. सोबत येताना त्याच्यासाठीही एक चहाचा कप घेऊन आली होती ती. मात्र चहा न पीताच ती त्याला न्याहाळत बसली होती आणि तो? तो बोटांमागून बोटे कीबोर्डवर आपटीत होता. काहीतरी भन्नाट असं त्याला सुचू पाहत होतं आणि तो ते उतरवू पाहत होता.

इतक्यात लॅपटॉपच्या एका कोपऱ्यातून त्याची नजर बाजूला वळली आणि जे काही सुचत होतं ते अचानक आल्या पावली परत मनाच्या खोल विवरात नाहीसं झालं.

“अ.. अरे, न्.. नायर मॅम. त्.. तुम्ही? तुम्ही केव्हा आलात? आय मीन कधीच्या बसून आहात? आय मीन आय एम सॉरी म्.. माझं लक्ष नाही गेलं तुमच्यावर. आय एम रियली सॉरी.” तो भांबावून गेल्यासारखं बोलला. त्याचं बोलणं आणि उडालेली भांबेरी पाहून तिला देखील हसू आलं. तिने मग हसतच त्याच्यासाठी आणलेला चहाचा कप हळूच त्याच्या पुढे सारला आणि म्हणाली, “चील सर, डोन्ट बी सॉरी. रादर आय एम सॉरी. तुम्ही एवढं मग्न होऊन लिहित होतात आणि पहा ना माझ्यामुळे-” तिने एका हाताची मूठ दुसऱ्या हातात घेत काहीशा संकोचानेच म्हटले.

“तुम्ही घ्या ना चहा.” ती पुढे म्हणाली. ‘ओह, थॅंक्स.’ म्हणत त्याने चहाचा कप तोंडाला लावला. दुरून कुठूनतरी कुणाला पाहणं, त्याच्याशी नजरानजर करणं, त्यानं पाहताच मग लागलीच नजर चोरणं अवघड नसतंच मुळी. अवघड हे असतं की ती व्यक्ती आपल्या अशी पुढ्यात बसल्यावर तिच्याशी नजर मिळवणं! खासकरून ते जेव्हा तो आणि ती असतात!

ते त्यालाही अवघड जात होतं. तो तसाच मग तिच्या नजरेस नजर न देता चहा पीत राहिला आणि ती? ती त्याला पाहत.

“तुमची मॅम वाचली.” नायर मॅडम म्हणाली. कशाततरी हरवून गेल्यागत तो तिच्या डाव्या दंडावरील नजुकशा अशा बाजूबंदाकडे पाहत होता. ती मग आपला घसा साफ करत काहीशा मोठ्या आवाजात त्याला पुन्हा म्हणाली, “मॅम वाचली मी तुमची.”

“मॅम? सॉरी? काय म्हणालात मॅम?” तो कोड्यात पडल्यागत म्हणाला.

मॅरेज मटेरियल.” ती म्हणाली. “मी वाचली म्हणाले.”

“ओह, आय एम सो सॉरी. मॅरेज मटेरियल.. मॅम. आय गॉट इट.” त्याने मग हसतच आपले ओठ चावले.

“भारी लिहिलीय.”

“आवडली तुम्हाला?”

“हो. आणि असं अहो जावो नका करत जाऊ मला.”

“मग?”

“कॉल मी पायल.”

“ओके नायर.. सॉरी पायल मॅम.”

“ओन्ली पायल.”

“ओके पायल.” तो म्हणाला; पण का कुणास ठाऊक त्याला थोडे संकोचल्यागत झालं तिचं असं वागणं पाहून.

“बाय दी वे, तुम्हाला..” तो पुन्हा अहो जावो करू लागला तशा तिने आपल्या भुवया उंचावल्या. मग तो बोलू लागला. “तुला कसं? म्हणजे लेखणी संग्राम वगैरे..?”

“जगताप सर म्हणाले होते.”

“ओह. आय शुड गेस.” तो मन हलवत म्हणाला.

“सॉरी? व्हाय शुड यू?” तिने उत्सुकतेपोटी विचारले.

“ही टोल्ड मी अबाऊट..” हिला कसं बोलायचं म्हणून त्याने आपले शब्द मागे घेतले; पण असं अर्धवट वाक्य सोडल्यावर कुणालाही कुतूहल अथवा उत्सुकता ही लागायचीच. तिने विचारले, “अबाऊट व्हॉट?”

तो मात्र कसे बोलावे म्हणून गप्प राहिला. चहा एव्हाना संपला होता आणि त्याची नजर वारंवार तिच्या बाजूबंदावर खिळली जात होती. मधूनच तो तिच्या कानांतल्या त्या डुलणाऱ्या  मोठ्या गोल रिंगा देखील पाहत होता आणि त्यातूनही हळूच तिचे डोळे, तेही तो चोरून का होईना पण पाहत होता.

तिने मग डोळ्यांनीच इशारा करत विचारल्यावर तो लोणावळा असं बोलून गेला आणि तिच्या कपाळावर एक भलेमोठे प्रश्नचिन्ह उमटले. ती म्हणाली, “लोणावळा? त्याचं काय?”

वन नाईट स्टँड.” त्याच्या तोंडून शब्द असे काही बाहेर पडले की त्याचे त्यालाच समजले नाही.

“वन नाईट स्टँड? आणि कुणाचं?’ ती काहीशी अचंबितच होऊन म्हणाली. तेव्हा तोच काहीशा संकोचाने बोलू लागला, “ते.. तू .. आणि .. जगताप सर.. लोणावळा.. वन .. नाईट .. स्टँड.”

“हाऊ रीडिक्यूलस. असले विचार करता तुम्ही पुरुष आमच्याबद्दल? शीss.” ती ताडकन जागची उठून म्हणाली. नकळत तिच्या डोळ्यांत आसवे दाटली.

“मला वाटलं जगताप सरांचे आणि तुझे लफ्.. सॉरी अफेअर. ” तो पुढे काही बोलायच्या आधी एक थाडकण आवाज त्याच्या कानी झाला आणि सोबतच कानाच्या खाली एक तीव्र वेदनाही! होय, तिनेच मग रागाच्या भरात त्याच्या श्रीमुखात लगावलेली होती.

हाताच्या बोटाने त्याला तंबी देत ती भरलेल्या डोळ्यांनी आणि लालबुंद चेहऱ्याने त्याला घुरत राहिली आणि ‘शीss’ म्हणून ती तिथून आपली पाऊले आपटीत निघून देखील गेली.

अमोल मात्र दुखरा गाल कुरवाळत तसाच उभा होता. का कुणास ठाऊक, मनात एकसारख्या गुदगुल्या मात्र होत होत्या. तोच ती परत आली. थोड्याशा जास्तच रागात आणि धपाधप पाऊले आपटत येऊन ती त्याच्या पुढ्यात उभी राहिली. त्यानेही आपल्या गालावरचा हात तसाच ठेवला. कोण जाणे अजून एखादी श्रीमुखात बसायची!

तिने त्याच्या नजरेस नजर मिळवली. त्यानेही मिळवली; पण जास्त काळ धाडस झाले नाही. त्याने मग खाली मान घातली. तिने शेजारच्या टेबलावरचा त्याचा मोबाईल हिसक्यासरशी उचलला आणि त्याच्या हातात थोपवला. त्याला तिच्या या वागण्याचे काहीच गमक उमगले नाही.

“पासवर्ड.” तिने खमक्या आवाजात म्हटले तसे त्याने पासवर्ड टाकून आपला मोबाईल अनलॉक केला. तिने लागलीच तो त्याच्या हातातून हिसकावला आणि पटापट स्क्रीनवर बोटे टॅप करून तो पुन्हा त्याच्या हातात सोपवला. त्यानं पाहिलं. कुणाचातरी नंबर होता. फोननंबर.

“माझाच आहे.” ती बोलली. काहीसे गोंधळल्यासारखे भाव त्याच्या चेहऱ्यावर जमा झाले होते. तो काय बोलणार होता?

“वन नाईट स्टँड हा? धाडस असेल तर कर कॉल.” ती म्हणाली आणि काहीची भावनिक झाली. डोळे पाणावले. तो आता अधिकच खजील झाला होता. ती परत त्याला म्हणाली, “तुम्हीही माझ्या बाबतीत असा विचार करत असाल असं मुळीच वाटलं नव्हतं मला. इथे आल्यावर पहिल्या नजरेत आवडला होता तुम्ही मला; पण.. पण एका घटस्फोटीतेला असं काही करावं तर मग आहेतच लोक नवनवी लेबले लावायला. माणूस म्हटलं तर मग भावना आल्या आणि भावना आल्या की गरजा. शारीरिक गरजा. नाहीत हो कशाही भागवता येत. अवहेलना, हेटाळणी करतात ना लोक. अव्हेलेबलच समजतात जणू.”

 आता मात्र तिला कुठेतरी आत खोलवर काटा रुतल्याचे त्याला जाणवले मात्र बोलायला त्याच्याकडे काही शब्द नव्हतेच. त्याला तर हे आत्ताच कळले होते की तीचा घटस्फोटदेखील झाला आहे म्हणजे तिचं आधीच लग्न देखील झालेलं होतं!

“तुम्ही देखील तसाच विचार केलात. असो, सगळे पुरुष सारखेच शेवटी.” असे म्हणत तिने आपले डोळे पुसले. पुढे म्हणाली, “तुमच्या या गळ्यातील ओढणीबद्दल लोक भलतेसलते बोलत असतात; पण तरीही मी तुमच्याबद्दलची भावना ढळू दिली नाही. मला माझ्या मनातलं तुम्हाला बोलायचं होतं; पण असं नव्हतं.” तिने पुन्हा आपले डोळे पुसले आणि ती तिथून चालती झाली.

पाठमोऱ्या नायर मॅडमला जाताना तो पाहतच उभा राहिला तिथे. आपल्याही न कळत आपल्यावर देखील कुणी असं निखळ, अबोल प्रेम करू शकतं याचं त्याला अप्रूप वाटत होतं. तिलाही कुणावर तरी प्रेम करण्याचं स्वातंत्र्य होतंच की.

लोक एकमेकांवरचं प्रेम बोलून व्यक्त होतात; पण बोलून व्यक्त न होताही खूप जण असेच एकमेकांवर प्रेम करत असतील सुद्धा. काहींना ते बोलता येत नसेल तर काहींना ते तसंच अव्यक्त ठेवावे वाटत असेल. पण प्रेम हे शेवटी प्रेमच असतं. व्यक्त, अव्यक्त, बोलकं, चोरटं, लाजरं- बुजरं, खट्याळ आणि चाटाळ देखील!

[पुढे सुरू राहील. ]

कथेचा आधीचा भाग वाचण्यासाठी खाली लिंकला भेट दया.

रुपेरी रिंगण, भाग २

आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

माय व्हॅलेंटाईन

मॅरेज मटेरियल Marriage Material

मी मॅरेज मटेरियल mi marriage material

ती आणि ती A lady and a prostitute

न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night

न्यू इयर पार्टी नाईट भाग ५

न्यू इयर पार्टी नाईट भाग ६

one night stand, i am sorry, love story, best laptop under 50k, best laptop configuration, lectures, writers, writing community, financial freedom, google my business, google business, google business account, my business

chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, horror story in marathi, pratilipi marathi love story, marathi bodh katha, moral stories in marathi, marathi novels, small story in marathi with moral

 marathi sahitya, marathi stories, marathi pranay katha, marathi goshta, chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, साहित्य, मराठी साहित्य, मराठी कथा, story in marathi, marathi kadambari,

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *