• Pune, Maharashtra
कथा
रुपेरी रिंगण, भाग २

रुपेरी रिंगण, भाग २

Spread the love

Ruperi ringan

मघाशी ते दोघे बसलेल्या जागेकडे पाहत अमोल तिकडे धावत आला. कुठे बरं आरती गेली असेल, असा मनात विचार करून तो इतरत्र आपली नजर सैरभैर फिरवू लागला. अशी अचानक जागची उठून ती कुठे गायब झाली असेल? तेही आपल्याला कल्पना न देता. आता भेळ घेताना पाहिलं तर इथेच जागेवर बसली होती ती आणि इतक्यात अशी कुठे दिसेनाशी झाली, याचाच तो विचार करत होता.

ruperi ringan
ruperi ringan

तेव्हा चार पाऊले सोडून त्याला तिची ती पांढऱ्या रंगाची ओढणी दिसली. बारीक लाटा तिला अगदी स्पर्शु पाहत होत्या. वाऱ्याची मंद लहर देखील तिला आपल्या तालावर नाचवत होती. त्याच वाऱ्याच्या एका लहरीसरशी ती ओढणी जागची थोडी उडून बाजूला झाली आणि त्याला त्या ओढणीखालचे तिचे सँडल दिसले.

त्याने पुन्हा एकदा आपली सैरभैर नजर त्या फिक्कट अंधारात इतरत्र फिरवली. ती कुठेच दिसली नाही. त्याने आरती आरती अशा हाका मारीत तिला बोलावण्याचा प्रयत्न केला; पण तोही व्यर्थ ठरला. तिथून येणा- जाणाऱ्याला त्याने अहो माझी आरती पाहिली का? तुम्हाला कुणाला ती दिसली का? असे केविलवाणे प्रश्न केले, तर उलट चौपाटीवरच्या लोकांनी त्याच्याकडेच वेडसर असल्यागत कटाक्ष टाकले. तो मात्र हताश नजरेने तिलाच शोधत राहिला.

शेवटी मग साश्रूनयनांनी तो तिथेच गुडघ्यावर बसला. तिचे सँडल्स आणि ती ओढणी त्याने हातात घेतली. काही क्षण तो त्यांना पाहत अश्रू गाळीत राहिला, तेव्हा त्याला आरतीची ती वाक्ये आठवली- पण मी तुला सांगून ठेवते आहे. आपण एकत्र आलो नाही तर मी जीव देईन. खरंच मी जीव देईन.  

समोरील त्या समुद्राकडे पाहत त्याने मग ते सँडल आणि ओढणी आपल्या हृदयाशी कवटाळली. आपली नजर जरा काही बाजूला हटली आणि ती आपल्याला सोडून कायमची त्या अथांग सागरात विलीन देखील झाली या भावनेने त्याच्या डोळ्यांतून दु:खाचा सागर ओथंबू लागला.

ओल्या डोळ्यांनी त्याने ती ओढणी आपल्या हृदयापासून बाजूला घेतली. तिच्या काठांच्या त्या झालरीचे ते धागे एकेक करून सैल झाले होते. काहीशी जीर्णच झाली होती ती. मध्येच कुठेतरी एखाददुसरे भोक देखील तिला पडले होते. आता तिचा तो पांढरा रंग पांढरा नव्हता राहिला. तो काहीसा दुधाळ बनला होता. मागील पाच वर्षे तो त्या ओढणीला आपल्या गळ्यात माफलरसारखी वागवत होता.  

त्याला ती टाकून द्यायची कधीच इच्छा झाली नव्हती ना पुढे कधी होईल. ती ओढणी आरतीने जाताना निशाणी म्हणून मागे ठेवली होती, त्या रुपेरी वाळूत, जी आज त्याच्या गळ्यात सतत असायची. रिंगण असल्यागत. रुपेरी रिंगण. जणू  तिने त्याला जखडूनच ठेवलं होतं.

“काय लेखक? काय लिहिताय सध्या?” ओस पडलेल्या कँटिनमध्ये अरविंद सर हातात दोन चहा घेऊन आले आणि अमोलसमोरच उभे राहत म्हणाले. त्यांना अचानक पुढे पाहून मग अमोल थोडा गांगारला व एकदम सावध होत त्याने काहीतरी टाईप करत असलेला आपला लॅपटॉप झपकन झाकला.

अरविंद सरांनी चहाचा एक कप मग अमोलच्या पुढ्यात ठेवून दिला आणि दूसरा आपल्या इथे ठेवत ते त्याच्याच समोर खुर्ची ओढून बसले. अमोलने समोरच्या चहाच्या कपाकडे एक नजर टाकली.

“अहो घ्या हो. तुमच्याच साठी घेऊन आलोय मी. तुम्ही कशाततरी हरवून गेला होतात, म्हटलं आपणच चहा न्यावा. तेवढीच ओळख वाढेल.” अरविंद सर म्हणाले.

त्यावर अमोल नुसता हसला आणि कसला तरी विचार करून मग त्याने विचारले, “तुम्हाला कसे कळले मी लिहितो ते? आय मीन, मी अजून कुणाला इथे त्याबद्दल काहीच बोललो नाही. मग कसं?” 

“अहो मी तुम्हाला खूप आधीपासून फॉलो करतोय. मी फेसबुकला एका ग्रुपला तुमच्या कथा वाचल्या आणि त्यानंतर मी आता तुमच्या लेखणी संग्राम डॉट कॉमचा नियमित वाचकदेखील आहे बरं.”

माझ्या येणाऱ्या कथा कवितांचे अपडेट्स आपोआप मिळवण्यासाठी माझ्या वेबसाईटवर आल्यावर जे पॉप अप नोटिफिकेशन येते त्याला allow करा म्हणजे मी काही पोस्ट केल्यास आपल्याला त्याचे नोटिफिकेशन येईल. माहितीसाठी खाली फोटो देत आहे.

lekhani sangram
lekhani sangram

“अरे व्वा, थॅंक्स.” अमोल म्हणाला.

“अं, सध्या काय लिहिता आहात? नाही म्हटलं बरेच दिवस काही नवीन वाचनात आलं नाही म्हणून..” त्यांनी विचारलं.

आपली नजर एका ठिकाणी लावून तो काही वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, “काही खास नाहीये. रुपेरी रिंगण लिहितोय सध्या.”

“ओह, छान छान. पण आहे काय त्यात?”

“ते वाचालच तुम्ही ब्लॉगवर.” तो हसत म्हणाला. मग दोघेही हसले. अमोलने समोरील चहाचा कप उचलला आणि अरविंद सरांना थॅंक्स म्हणत चहावर फुंकर मारत तो तोंडाला लावला. कॉलेजचे कॅम्पस तसे भरलेले नव्हते. चारदोन मुला- मुलींचे घोळके मात्र काहीतरी हास्य-विनोद, हुल्लडबाजी करताना दिसत होते. राहून राहून त्यांचा आवाज तो कानी पडत होता.

चहा पिण्यासाठी म्हणूण मग तिथे लेडी स्टाफचा, तीन-चार जणींचा एक घोळका कँटिनमध्ये चालत आला. चालत कसला बडबडतच आला म्हणा. माझे सँडल्स असले, तुझी साडी अशी, तिची सासू तशी, आमचे मिस्टर किनई, हल्ली तुला ब्लाऊज किती घट्ट होतो गं, आम्ही या सुट्टीत malaysia मलेशियाला जाणार, सध्या माझं किटो डायट keto diet सुरूये, मी नवीन हेयर कर करणारेय, हल्लीची मुलं स्टाफवर सुद्धा लाईन मारतात वगैरे वगैरे!

त्यांचा घोळका टेबलापासून जाता होताच काहींनी अमोलकडे पाहून खासकरून त्याच्या गळ्यातील ओढणीकडे पाहून हसूनच तोंडाला हात लावले तर एकीने कसल्या तरी संशयाने आपले नाक देखील मुरडले. अमोलला त्याचे काही विशेष वाईट वगैरे वाटले नाही. कारण त्याला कुणकुण लागली होती की आपल्या गळ्यातल्या ओढणीमुळे आपल्याला स्टाफ आणि आपले विद्यार्थी देखील गे समजत होते.

“ती नायर मॅडम पाहिली का सर?” अरविंद सरांनी थोड्या दबक्या आवाजात विचारले. खरंतर तो तिलाच पाहत होता.“अं? हं हं.” त्याने लगेचच प्रतिसाद दिला.  

“काय तुकडा फिगर आहे ना?” अमोलने दचकून मग त्यांच्याकडे पाहिले. “म्हणजे साडीतदेखील काय रापचिक दिसतेय ना फिगर? असं वाटतंय की..” ते म्हणाले.

“सर जरा जागेचं तरी भान..”अमोल त्यांचं बोलणं काटत म्हणाला. त्यावर आपल्या हातातील चहाचा कप ते टेबलावर ठेवत ते अमोलकडे झुकले आणि हळू आवाजात बोलू लागले, “या विकेंडला घेणारेय तिला आपण?”

“सॉरी? घेणारेय?”

“वन नाईट स्टँड सर. वन नाईट स्टँड. lonawala लोणावळा.” खूपच अतुर असल्यागत ते बोलून गेले.  

“पण सर तुम्ही तर मॅरीड आहात.” अमोल बोलला.

“म्हणून काय झालं? आणि ती कुठे मॅरीड आहे?”

“हे आपलं काहीच्या काही लॉजिक होतं हं.” अमोल म्हणाला आणि उरलेला चहा संपवायचा म्हणून त्याने कप तोंडाला लावला. अरविंद सर देखील मग चहाचे चुसके घेत कशाततरी हरवून गेले. कदाचित ते लोणावळ्याला गेले असतील! मनातल्या मनात!

अमोलने एक चहाचा फुरका ओढीत हळूच मग नायर मॅडमवर नजर टाकली. योगायोग असा की तिची देखील अगदी तशीच नजर त्याच्यावरही पडली. दोघांनी मग नजरा चुकवल्या. आणि त्याने लॅपटॉपला हात घातला.

“एक विचारू सर?” अरविंद सर काही वेळाने त्याला म्हणाले. तो आपला झाकलेला लॅपटॉप उघडण्याच्या तयारीत होता; पण थांबला. “हो.” तो म्हणाला.

“ठाण्याला कसं काय? नाही म्हणजे, मुंबई सेंट्रल सोडून डायरेक्ट ठाणे? का सोडलं ते कॉलेज?”

“जुन्या ठिकाणी खूप अडकून राहिल्यागत झालेलं. म्हटलं आता कूस बदलून पहावी. जुनी नाती असोत किंवा अजून काही, पाश घट्ट करतातच. थोडा चेंज हवा म्हणून ठाणे.”

“पण नव्या ठिकाणी येऊन आता महिन्याच्या वर होऊन गेला, तुम्ही अजून काही पाशमुक्त झाला नाही. निदान तसं दिसत तर नाही. ” अमोलच्या गळ्यातल्या त्या ओढणीकडे पाहत अरविंद सर म्हणाले. अमोलला ते समजायला जरासुद्धा वेळ लागला नाही; पण तो विचलित न होता त्यांनाच पाहत राहिला, चेहऱ्यावर हास्याची नाजुक छटा आणीत. आंतरिक वेदनेवर तुम्ही कितीही हास्याचे मलम लावा, शुभ्र पट्ट्या लपेटा, अखेरीस कुठून ना कुठून तरी त्यावर दु:खाचे लालभडक ठिपके उमटतीलच!

वेदोंको भी नहीं समझा, वेदोंको भी नहीं समझा, अंतपार इसका.

कानडा राजा पंढरी का, काss .. नडा राजा पंढरी का.

कुणीतरी त्या लोकलच्या डब्यात गात होतं. आवाज सुरेल होता. गातही छान होता; पण हिंदीत का गात होता? म्हणून अमोलची उत्सुकता ताणली गेली. एरव्ही रोज त्याला त्या डब्यातून मराठीत ते गायल्याचा आवाज यायचाच. नाही म्हणजे त्यानेही दोन- चारदा साथही दिलेलीच. लोकलच्या प्रवासात थोडा विरंगुळा म्हणूण हे नोकरदार वर्ग अशी काही भजने वगैरे गात असतात. कुणी तर मुद्दाम आपल्या बॅगेत टाळही ठेवतो. कुणी लोकलच्याच बाकडाचा पखवाज अन् तबला करतो; पण आज हा कुणी नवाच गायक पैदा झालाय म्हणून त्याने बसल्या जागी मागे वळून पाहिले.

एक तरुण गिटार काखेत पकडून गात होता आणि सभोवती जमलेले काहीजण आपल्या मोबाईलमध्ये त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते. अमोल जागचा उठून आपली बॅग काखेत घेत तिथे आला. रिकामी झालेली त्याची जागा लगेचच एकजणाने बळकावली.

तो तिथे येऊन मग त्याला ऐकत तसाच उभा राहिला. उदयोन्मुख गायक किंवा कुणी स्ट्रगलर असावा असा त्याने अंदाज बांधला. गाणं संपलं तोच परळ आलं. मग ऐकणारे बरेच खाली उतरले. नवीन आत चढले. तो गिटार बॅगेत भरू लागला. अमोलने विचारले, “गदिमांनी तर गाणं मराठीत लिहिलंय. मग हिंदीत का.. गात होतास?”

तो अमोलच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. मग अमोलनेच हात पुढे करत त्याला स्वत:ची ओळख करून दिली, “हाय मी अमोल. ठाण्याला लेक्चरर आहे.”

त्यानेही आपला हात पुढे करत आपलं नाव सांगितलं. अरबाज शेख. म्हणाला, “आणि मी स्ट्रगलर struggler आहे. म्हटलं असं काही करून कदाचित व्हायरल झालो तर कुणाची ना कुणाची तरी नजर आपल्यावर पडेल. आपली दखल घेतली जावी म्हणून हा सगळा प्रपंच.”

रात्री स्वप्नात त्याला खळखळणाऱ्या त्या लाटा, रोरावता तो समुद्र आणि त्याची मऊ रेती दिसत होती. सूर्याची प्रखर किरणे परावर्तीत होऊन ती वाळू एक पांढरी चमक उधळीत होती. पाहणाऱ्याचे जणू डोळेच दिपून जावेत.

त्या वाळूत घोट्याच्या भोवती वाळूचं तसंच रिंगण घेऊन, आपल्या टाचा रुतवून कुणीतरी उभा असलेलं त्याला दिसलं. एक स्त्री. पाठमोरी. आपले ओले केस पाठीवर रुळते सोडलेले. अंगात पिवळी धमक साडी. तीही भिजलेली आणि अंगाशी धट्ट चिकटलेली. त्यामुळे तिचे कमरेखालील गोलाकार अंग अधिकच प्रतीत झालेले. नकळत, झोपेतच मग त्याच्या हृदयाची धडधड वाढली. खालच्या भागात रक्त पळू लागले. श्वास फुलू लागले.

पाठमोरी उभी असल्यामुळे ती नेमकी कोण होती हे त्याला समजेना. तिच्या अंगावर पाण्याचे थेंब साचले होते, दव साचल्यागत. समुद्रातून आली होती का ती? मत्स्यकन्या? स्वप्नातच त्याचे विचारचक्र सुरू होते, तोच जोराचा वारा सुटला आणि.. आणि.. तिची.. तिची धडपड सुरू झाली. आपल्या साडीचा वाऱ्यावर उडू पाहणारा ओला पदर आपल्या छातीवर ठेवण्यासाठी; पण तो वारा जणू काही तिचा पदरच उडवायला आला असावा.

ruperi ringan
ruperi ringan

ती पदर छातीशी ठेवण्यासाठी धडपडत होती. वारा वाढतच होता. तिचे केस देखील आता त्यावर मुक्त लहरत होते. तिने आता आपले केस सांभाळावे की पदर? या द्वंद्वात ती एकदम वळली. एकदम अमोलच्या थ्री फोर्थला चांगलीच उभारी आली. श्वास अजूनच तीव्र. छाती चांगलीच वर खाली होत होती. भावनांचा तो साचलेला सागर आता कधीही तटाच्या बाहेर पडू शकत होता.

ती नायर मॅडम होती. त्याच्या स्वप्नातली; पण.. पण तिने आपल्या छातीवर काहीच घातले नव्हते. तशीच होती ती. आपल्या उडणाऱ्या पदराखाली तिला झकण्याचा तिचा प्रयत्न चालला होता. अचानक वळल्यावर त्याला तिच्या उभारलेल्या त्या यौवनाचे दर्शन घडले.

आता तिचीही नजर अमोलवर पडली आणि ती थबकली, बावरली, शहारली. पदराचा हात सुटला. पदर सैरभर उडत होता. झोपेतच न कळत त्याचा हात त्याच्या थ्री फोर्थमध्ये गेला. काही क्षणांत पायांचे स्नायू ताणले गेले आणि उचंबळू पाहणाऱ्या भावनांना एक वाट मिळाली. तो शांत झाला. श्वास आणि हृदय दोन्ही मंदावाले. काहीतरी घडल्याची जाणीव होताच मग त्याने सावकाश आपले डोळे उघडले आणि एका अंगावर होत काही क्षण तसाच पडून राहिला. ते स्वप्नच असल्याची त्याची खात्री झाली सोबतच त्याची निराशाही झाली.

त्याने मोबाईल पाहिला. त्यात पहाटेचे तीन वाजले होते. तो उठला आणि आपला लॅपटॉप उघडून पुढे लिहू लागला-

दूरवर भरकटलेली नाव किनारी आज लागली,

मूक तिच्या भावनांना तव वाट एक लाभली.

सकाळी पुन्हा नवा दिवस, तीच लोकल, तेच सहप्रवाशी, तेच ते, तेच ते.

[पुढे सुरू राहील.]

कथेचा आधीचा भाग खालील लिंकला वाचा

आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

माय व्हॅलेंटाईन

मॅरेज मटेरियल Marriage Material

मी मॅरेज मटेरियल mi marriage material

ती आणि ती A lady and a prostitute

न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night

न्यू इयर पार्टी नाईट भाग ५

न्यू इयर पार्टी नाईट भाग ६

chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, horror story in marathi, pratilipi marathi love story, marathi bodh katha, moral stories in marathi, marathi novels, small story in marathi with moral

 marathi sahitya, marathi stories, marathi pranay katha, marathi goshta, chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, साहित्य, मराठी साहित्य, मराठी कथा, story in marathi, marathi kadambari,

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *