
प्रेमवृक्ष prem vruksh
प्रेमवृक्ष

हे सोनसुंदरी, मी प्रेमवृक्ष.
मी प्रेमवृक्ष. . .मी प्रेमवृक्ष.
जन्म माझा आगळा, दुनियेवेगळा
दोन मनांच्या विरहातला
एकाच्या दु:खातला
अन् तयाच्याच वेदनेतला
आठवते का बघ तुला
याच ठायी मी बीज असता
तू दिला होतास निरोप तयास
अन् फिरवली होतीस पाठ.
तीव्र होता विरह वेदना
रडला तो मग प्रियकर वेडा
बरसल्या तव अश्रुधारा
अवकाळी जणू पाऊस बरसावा
अश्रुंनी मग त्या ओलावली माती
मातीचा त्या मग चिखल जाहला
होते तयात बीज एक वेडे
तयास तव मग अंकुर फुटले
अंकुराचे त्या रोपटे जाहले
अन् रोपट्याचा त्या मग वृक्ष
मीच तो प्रेमवृक्ष वेडे
मीच तो प्रेमवृक्ष
आज इथे मुळया रोवूनी
निश्चल, नितांत स्थितप्रज्ञ,
घट्ट असा मी उभा आहे
तुझ्या अन् त्याच्या मिलनाची
वाट मी बघतो आहे
प्रेमवृक्ष. . . मी प्रेमवृक्ष!
– शिवसुत
माझ्या येणाऱ्या कथा कवितांचे अपडेट्स आपोआप मिळवण्यासाठी माझ्या वेबसाईटवर आल्यावर जे पॉप अप नोटिफिकेशन येते त्याला allow करा म्हणजे मी काही पोस्ट केल्यास आपल्याला त्याचे नोटिफिकेशन येईल. माहितीसाठी खाली फोटो देत आहे.

खूप आधी प्रेमी युगुल एका ठिकाणी भेटून एकमेकांपासून वेगळं झालं होतं तेव्हा त्याच्या समांतर जे काही घडलं ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आज त्यापैकी ती तिथे आली असता आता तिथे असलेला एक मोठा वृक्ष तिला काहीतरी सांगतो आहे.
She and her lover separated long ago. today, when she visits the place where they got seperated, a large tree is there waiting for their reunion.
The tree urges her to get a patch up with him and..
visrun geli ti aata sansarachya nadat,
adkuni rahila matr to MPSCchya jalyat
Mast kavichi kalpnasakti aparmpar…🙏🏻
Creative!!!