• Pune, Maharashtra

New Posts

पाऊले चालती ..!

              “आवं, बास की.”           “संगे,अजून थोडा वेळ. मग झालं.”           “आता माझ्याच्यानं न्हाय हुनार. लई तरास व्हायला लागलाय.”           “अगं एका पोराची आय हाय तू. असं काय नव्या नावरीगत करत्याय. थोडी कळ काढ की, मग थांबू.”           संगीच्या […]

तोही होई तेंडुलकर !

                                                         दिवस नुकताच मावळलेला होता. रानाच्या पाणंदीतून बायका गवताची ओझी आणि कडेवर तान्ही पोरं घेऊन बिगीबिगी चालत घराकडे निघाल्या होत्या. त्यांच्या पुढे चालणाऱ्या शेळ्यांना त्यांची कोकरे पिण्याचा प्रयत्न करत पुढे पुढे जात होती. […]

भीती नाही वाटली !

भीती नाही वाटली !एक जोराचा वाऱ्याचा झोत येऊन मला थडकला आणि  म्हणाला, ‘तुला भीती नाही वाटली?’ मी मग क्षणभर थबकलो, अडखळलो, धडपडलो मग सावरलो आणि म्हणालो- ‘नाही वाटली, भीती नाही वाटली. भीती वाटायला तू काय वादळ आहे?’ मग पुन्हा एकदा एक वादळ येऊन मला धडकले   आणि म्हणाले, ‘आता भीती नाही वाटली?’ मी मग क्षणभर लडबडलो,गडबडलो, हडबडलो मग सावरलो आणि म्हणालो- ‘नाही वाटली, भीती […]

ऊठ शिवबा

ऊठ शिवबा ऊठ शिवबा “शिवबा, ऊठ शिवबा कृष्णामाई बघ भेटी आली.” माणगंगा माय माझी आज मजला हाक देई. “उठू कसा माये? तुझ्याच कुशीत आता पहुडलो आहे, चिरकाल निद्रा घेतो आहे, ऊन वारा सोसतो आहे पावसाचे थेंब झेलतो आहे. धन्य होती ती माय विठाई जिच्या उदरी जन्मासी आलो अन राख होउनी आज तुझ्या कुशीत बागडलो. जरी जाहलो राख आज तरी राखेतूनही […]