• Pune, Maharashtra

New Posts

शाश्वत प्रेम.!

शाश्वत प्रेम  ते फूल किती सुंदर होतं..! हे त्या भुंग्याला देखील माहीत होतं. दिवसभर त्याच्याभोवती पिंगा घालून,   उद्या ते कोमेजणार हे त्यानंही जाणलं होतं. कळीचं फूल आणि त्या फुलावर प्रेम त्याने का उगाच केलं होतं? आपण शाश्वत नसलो तरी प्रेम शाश्वत असतं हे त्या फुलाला देखील मग उमगलं होतं.! -शिवसुत

पाऊले चालती ..!

              “आवं, बास की.”           “संगे,अजून थोडा वेळ. मग झालं.”           “आता माझ्याच्यानं न्हाय हुनार. लई तरास व्हायला लागलाय.”           “अगं एका पोराची आय हाय तू. असं काय नव्या नावरीगत करत्याय. थोडी कळ काढ की, मग थांबू.”           संगीच्या […]

तोही होई तेंडुलकर !

                                                         दिवस नुकताच मावळलेला होता. रानाच्या पाणंदीतून बायका गवताची ओझी आणि कडेवर तान्ही पोरं घेऊन बिगीबिगी चालत घराकडे निघाल्या होत्या. त्यांच्या पुढे चालणाऱ्या शेळ्यांना त्यांची कोकरे पिण्याचा प्रयत्न करत पुढे पुढे जात होती. […]

भीती नाही वाटली !

भीती नाही वाटली !एक जोराचा वाऱ्याचा झोत येऊन मला थडकला आणि  म्हणाला, ‘तुला भीती नाही वाटली?’ मी मग क्षणभर थबकलो, अडखळलो, धडपडलो मग सावरलो आणि म्हणालो- ‘नाही वाटली, भीती नाही वाटली. भीती वाटायला तू काय वादळ आहे?’ मग पुन्हा एकदा एक वादळ येऊन मला धडकले   आणि म्हणाले, ‘आता भीती नाही वाटली?’ मी मग क्षणभर लडबडलो,गडबडलो, हडबडलो मग सावरलो आणि म्हणालो- ‘नाही वाटली, भीती […]