• Pune, Maharashtra
कथा
न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night

न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night

Spread the love

ए न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night

“श्रेया, अगं अजून किती उशीर करणार आहेस तू?” स्वप्नील पलीकडून काहीसा रागावूनच बोलला.

लवासा जवळील एका रिसॉर्टला resorts near lavasa ती थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी New Year Party Night तिथे आली होती. तिच्या कंपनीने तिथे एक भव्य पार्टी आयोजित केलेली होती. मागे डिजेवर dj nights मोठ्या आवाजात पार्टी सॉंग्स bollywood arty songs सुरू होते आणि श्रेया व तिचे ऑफिस कलीग्स office colleagues त्या गाण्यांवरती अगदी धुंद होऊन नाचत होते.

New Year Party Night, Images are illustration purpose only
New Year Party Night, Images are illustration purpose only

मध्येच तिला तिच्या नवऱ्याचा कॉल आला होता म्हणून ती गर्दीतून वाट काढत बोलण्यासाठी बाजूला निघाली, हातात वाईनचा best wine in India भरलेला ग्लास घेऊन.

“हॅलो, स्वप्नील? थोडं जोरात बोल. मला ऐकू येत नाहीये अरे.” ती नशा चढलेल्या आवाजात त्याला बोलली. मागून डिजेचा आवाज येतच होता अजून.  

तो पलीकडून जोराने तिला बोलण्याचा प्रयत्न करत होता, “अगं बारा वाजून गेलेत केव्हाचे. तू कधी निघणार आहेस?”

“बस्स आणखी थोडा वेळ. मग मी निघेन स्वप्नील.” ती जोरजोराने त्याला म्हणाली.

“लवकर निघ यार. मला काळजी वाटतेय तुझी. एकतर तो रस्ता खूप निर्जन आहे.” तो मग काळजीच्या सुरात तिला म्हणाला.

“आता बाबा वाला मोड नको अॅक्टिवेट mode activation करू प्लीज. मी निघते लगेच. डोन्ट वरी.” ती काहीशा नाखुशीतच म्हणाली आणि तिने कॉल ठेवून दिला.

हातातील वाईनच्या ग्लासचे चुसके घेत ती मग नाचत नाचत गर्दीत सामील झाली आणि पुन्हा पार्टीची मौज लुटू लागली.

रात्रीच्या एक वाजण्याच्या सुमारास तिने मग आपल्या सहकाऱ्यांचा निरोप घेतला आणि सर्वांना टाटा बाय बाय करून ती आपली कार घेऊन पुण्याच्या दिशेने निघाली. पार्टीला येताना तिच्यासोबत तिची ऑफिस मैत्रीण दिव्या देखील आली होती; पण ती आता थेट पार्टी संपवूनच बाकींच्या सोबत येणार होती. त्यामुळे श्रेया एकटीच परतीच्या वाटेला लागली होती.

“मूर्खच आहे जरा दिव्या. आज तिच्यामुळे मला एकटीला परत जावं लागतंय. तिला तर मी नंतर बघूनच घेते.” श्रेया कार चालवताना स्वत:शीच बडबडत होती. कदाचित पार्टीतील दारू बोलत असावी.  

लवासाचा तो निर्जन, वेडावकडा रस्ता आणि त्यावर श्रेयाची ती कार आपला प्रकाश टाकत भरधाव पुण्याच्या दिशेने निघाली होती. मद्याचे चांगलेच पेग रिचवले असल्या कारणाने तिचे डोळे अगदी जड झाल्यासारखे वाटत होते. pune to lavasa dostance

हात स्टीअरिंगवर असताना तिने आपल्या पर्स मधून आपला मोबाइल बाहेर काढला आणि स्वप्नीलला कॉल लावला; पण त्याचा मोबाइल नॉट रिचेबल येत होता. तिने मग आपला मोबाइल तसाच कारच्या डॅश बोर्डवर ठेवून दिला आणि त्याच हाताने आपल्या कारच्या म्युझिक प्लेयरचा music player आवाज वाढवून दिला. इतक्यात तिची नजर कारच्या रियर व्यू मिररवर rear wview mirror पडली. एक गाडी तीव्र उजेड पाडीत तिच्या कारच्या मागे धावत होती.

तिने त्या गाडीला पुढे जाण्यासाठी आपली कार काहीशी सावकाश करत तिला थोडी जागा करून  दिली; पण ती गाडी काही पुढे गेलीच नाही. ती गाडी तिच्या कारच्या मागे तशीच राहिली. श्रेयाची कार बरीच पुढे आली होती आणि तरीही ती गाडी तिच्या मागेच होती. अगदी कुणीतरी तिचा पाठलाग करत असल्यागत!

ती सतत आपल्या रियर व्यू मिररमध्ये पाहत होती. एका तीव्र उजेडाशिवाय आणखी काहीच तिच्या नजरेस पडत नव्हते. नशेत असूनपण आता तिच्या मनाची धाकधूक वाढली होती खरी!

New Year Party Night, Images are illustration purpose only
New Year Party Night, Images are illustration purpose only

होय, एक कार तिचा पाठलागच करत होती. श्रेयाला देखील आता त्याची खात्री झाली होती. तिला काय करावे काहीच समजत नव्हते. त्यात भर म्हणून की काय तिने अगोदरच चांगले मद्याचे पेगवर पेग रिचवले होते. त्या कारणाने तिचा तिच्या कारवरील ताबा डळमळीत होताना दिसत होता. drink and drive

आपला कुणीतरी पाठलाग करतंय. तेही मध्यरात्रीच्या सुमारास! या विचाराने तिची चढलेली दारू हळुहळू उतरण्यास सुरवात झाली होती. स्टीअरिंगवरचे हात लटलटू लागले होते आणि तिला आता दरदरून घाम फुटला होता. भीती माणसाला दारुचीच काय पण कसलीही नशा उतरायला भाग पाडते! आणि एकटेपणाची भीती, तीही एका सुनसान वाटेला, दोन्ही बाजूंनी खचाखच झाडी. मग तिची तर काय अवस्था झाली असेल देवच जाणो!  

त्या सुनसान रस्त्याला तिची कार धावत होती. एक कार तिचा पाठलाग करत होती आणि श्रेयाला या परिस्थितीत कुणाला कसलीच मदत मागता येत नव्हती. पाठलाग करणाऱ्या त्या कार मध्ये कोण आहे याचाही तिला अंदाज बांधता येईना.

दोन क्षण तिने स्टीअरिंगवरील पकड घट्ट करत आपले डोळे मिटले आणि आपल्या मेंदूला ताण देत आपण काही कुणाला त्रास, आपलं कुणाशी भांडण, न कळत आपल्याकडून कुणी दुखावले गेले तर नाही ना याची खात्री करून घेतली. मागील काही दिवसांपासून आपल्यावर कुणी पाळत तर ठेवत नव्हतं ना हे ही तिने आठवून पाहिले; पण नाही. असं काहीच तर नव्हतं. मग कोण? कोण करत असेल तिचा पाठलाग? आणि का करत असेल?

तिला तर काहीच सुचत नव्हते. त्यात स्वप्नील देखील नॉट रिचेबल होता. तरीदेखील त्याला एकदा कॉल लावून पहावे म्हणून तिने मघाशी कारच्या डॅश बोर्डवर ठेवून दिलेला फोन हातात घेतला आणि पुन्हा एकदा स्वप्नीलला कॉल लावला. आताही तो नॉट रिचेबलच आला.  

“व्हॉट द फ. . . हेल.” म्हणत तिने आपला मोबाइल पुन्हा डॅश बोर्डवर आदळला तसा तो त्यावर आदळून खाली पडला.

पाठीमागून ती कार अजूनही तिचा पाठलाग करत होती. ती पुरती घाबरली होती. पाठलाग करणारं कोण होतं याचा तिला अजिबातच ठाव नव्हता. तिला मात्र आता आपला जीव वाचवायचा होता. मग त्या कारमध्ये कुणी का असेना. तिला लवकरात लवकर पुणे गाठायचे होते.

श्रेयाची कार आता टेमघर धरणाच्या जवळ आली तसा मागील कारने आता तिचा वेग वाढवला आणि ती श्रेयाच्या कारच्या अगदी जवळच आली. श्रेयाने देखील मग आपल्या कारचा वेग वाढवला. संकटाच्या या क्षणी तिला नेमकी कुणाकडे मदत मागायची याचा प्रश्न पडला होता. अचानक तिला पोलिसांना कॉल करायची आठवण झाली आणि ती आपला खाली पडलेला मोबाइल पाहू लागली. तिचा मोबाइल शेजारच्या सीटच्या अगदी पुढे पडला होता.

आपला एक हात कारच्या स्टीअरिंगवर ठेवून ती शेजारच्या सीटकडे काहीशी झुकत आपला मोबाइल उचलण्याचा प्रयत्न करू लागली; पण तिच्या प्रयत्नांत आणि मोबाइल मध्ये दोन बोटांचं अंतर राहतच होतं. ती तरीही आपला मोबाइल उचलण्याचा प्रयत्न करत राहिली. मोबाइल उचलण्यासाठी ती वाकली असल्याने तिची कार आता रस्त्याने हेलकावे खात धावत होती.

शेवटी प्रयत्नांची पराकाष्टा करून तिने आपला मोबाइल उचलालच आणि तिने आपल्या सीटवर नीट बसत त्याचे लॉक काढले व पोलिसांना कॉल करणारच इतक्यात तिची नजर आपल्या रियर व्यू मिररवर गेली. मघापासून पाठलाग करणाऱ्या त्या कारचा आता तो तीव्र उजेड नव्हता ना ती कार तिला त्या आरशात दिसत होती.

अचानक त्या मागच्या अंधारात ती कार आता कुठे गायब झाली होती कुणास ठाऊक! श्रेया तर बुचकुळ्यातच पडली होती. त्या कारने तिची अर्धी नशा तर आधीच उतरवली होती. एकदा पहावंच म्हणून मग तिने मागे वळून पाहिले तर खरंच मागे तिला कोणतीच कार अगर काहीच दिसले नाही. दिसला तो फक्त काळाकुट्ट अंध:कार!   

ती अजून मागेच पाहत होती इतक्यात समोरून तितकाच तीव्र प्रकाश पाडत एक गाडी कानाचे पडदे फुटावेत असा हॉर्न वाजवतच तिच्या कारच्या दिशेने खूप जोराने आली आणि अगदी कारला चाटूनच ती तिथून निघती देखील झाली. समोरून अचानक ती गाडी आल्यामुळे मागे वळून पाहणारी श्रेया एकदम गडबडली आणि त्या गाडीला चुकवण्याच्या हेतूने मग तिने आपल्या कारचे स्टीअरिंग जोरात फिरवले तसा तिचा तिच्या कारवरचा तिचा ताबा सुटला आणि सुसाट वेगात असलेली तिची ती कार टेमघर धरणाचा कठडा तोडून अगदी हवेतच झेपावली आणि श्रेयाला घेऊनच मग ती टेमघर धरणात कोसळली.

[पुढे सुरू राहील. . ]

माझ्या येणाऱ्या कथा कवितांचे अपडेट्स आपोआप मिळवण्यासाठी माझ्या वेबसाईटवर आल्यावर जे पॉप अप नोटिफिकेशन येते त्याला allow करा म्हणजे मी काही पोस्ट केल्यास आपल्याला त्याचे नोटिफिकेशन येईल. माहितीसाठी खाली फोटो देत आहे.

lekhani sangram
lekhani sangram

कथेचा पुढचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

न्यू इयर पार्टी नाईट भाग २ New Year Party Night

लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

मॅरेज मटेरियल Marriage Material

मी मॅरेज मटेरियल mi marriage material

ती आणि ती A lady and a prostitute

आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १


Spread the love

7 thoughts on “न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *