• Pune, Maharashtra
कथा
न्यू इयर पार्टी नाईट भाग ४ New Year Party Night

न्यू इयर पार्टी नाईट भाग ४ New Year Party Night

Spread the love

रात्री पार्टीत तिचं कुणाशी वाजलं तर नसेल? बायका बायकांची भांडणे तर झाली नसतील? की बॉसशी खटके उडाले असतील? की ती पहाटे परतली होती तर आणखी. .काही..? असे हरतऱ्हेचे प्रश्न त्याला सतावत होते.New Year Party Night

तो तसाच आपल्या विचारांत हरवून गेला असता श्रेया तयार होऊन खाली आली आणि त्याला तिने विचारले, “कारची चावी कुठे आहे तुझ्या?” New Year Party Night

New Year Party Night, Images are illustration purpose only
New Year Party Night, Images are illustration purpose only

“आणि तुझी कार कुठेय?” त्याने तिला विचारले पण तिचा भावशून्य चेहरा पाहून तो म्हणाला, “दिव्या घेऊन गेली वाटतं. जा वरती आहे माझ्या ड्रॅावरमध्ये.” best cars in 2022, cars to buy in 2022, upcoming cars in 2022

माझ्या येणाऱ्या कथा कवितांचे अपडेट्स आपोआप मिळवण्यासाठी माझ्या वेबसाईटवर आल्यावर जे पॉप अप नोटिफिकेशन येते त्याला allow करा म्हणजे मी काही पोस्ट केल्यास आपल्याला त्याचे नोटिफिकेशन येईल. माहितीसाठी खाली फोटो देत आहे.

lekhani sangram
lekhani sangram

ती लगेचच मागे वळाली तशी झरझर पाऊले टाकीत पायऱ्या चढून गेली पण व पुन्हा तशीच पाऊले टाकीत ती पायऱ्या उतरली आणि बाहेर पडू लागली.

“अगं आपल्याला बाहेर जायचं आहे ध्यानात असू दे. बाय दि कुठे चाललीयेस?” तो पुढे काही बोलणार तोच ती बाहेर देखील पडली होती.

“सावकाश जा आणि. . . . लवकर. . . . ये.” तो त्या उघड्या दरवाजाकडे पाहत म्हणाला. त्याचे ते शब्द ऐकायला ती तिथे होतीच कुठे!

श्रेयाची कार एका शांत आणि वर्दळ नसलेल्या गल्लीत शिरली. एका छोटेखानी बंगल्याजवळ येताच ती सावकाश झाली. जुन्या धाटणीचा होता तो बंगला अगदी. थोडा खुजाच होता. तिने त्या बंगल्याच्या गेटसमोर कार उभी केली आणि ती त्या बंगल्याच्या पाटीकडे पाहत सावकाश कारमधून खाली उतरली. Banglow plots in Pune,

संगमरवरात marble घडवलेल्या त्या पाटीवर काहीसा पुसटसाच मजकूर दिसत होता- विशाल सदन! नावाव्यतिरिक्त त्यात विशाल असे काही नव्हतेच मुळी!

गेट उघडून ती आतमध्ये आली. छान झाडे लावलेली होती आतमध्ये. काहींना तर फळे आणि फुले देखील भरपूर लगडलेली होती. एका झाडाच्या आळ्यात बसून एक वयस्क काकू त्यातील गवत काढत असलेली तिला नजरेस पडली. ती सावकाशच पाऊले टाकत पुढे निघाली होती. आता तिला नजरेस पडले ते पोर्चमध्ये एका लाकडी झोपाळ्यावर बसलेले एक वयस्क काका. शिळा झालेला पेपर वाचताना.

ती जवळ येताच त्यांची नजर श्रेयावर पडली आणि ते मग लगेचच झोपाळ्यातून उठले आणि डोळ्यांवरचा चष्मा सावरत तिला एकटक पाहू लागले. एव्हाना काकूंना देखील तिच्या येण्याची चाहूल लागली होती. तीही आपलं काम बाजूला सारून तिच्याकडे चालत आली. नजरांना नजरा फक्त मिळत होत्या. बोलत मात्र कुणीच काहीच नव्हते. श्रेयाच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते तर काकू देखील ओल्या डोळ्यांनी तिला पाहत होती. भावनेच्या भरात तिने श्रेयाच्या जवळ येऊन त्या मातकट हातानेच तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला.

“आता कशाला परत आलाय  तो. त्याला येऊ दे तर इकडे. गोळ्याच घालतो की नाही बघ.” ते काका तावातावाने म्हणत होते. आतमध्ये जाऊन ते आता एकमेकांशी गप्पागोष्टी करत बसले होते. एकमेकांच्या हातात चहाने भरलेले कप होते.

“तुम्ही गप्प बसा हो. असं कुणी बोलतं का?” काकू त्यांना गप्प करत म्हणाली.

“उगीच मेजर नाही राहिलो काही मी.” ते बोलले आणि गप्प झाले. काही क्षण मग त्यांच्यात शांतता पसरली.

“मला वाटलं तो इथे आला असेल म्हणून मी. . .” श्रेयाच मग शांतता तोडीत म्हणाली आणि गप्प झाली.

“श्रेया, अगं कोणत्या तोंडाने येईल गं तो? तुला अशा अवस्थेत टाकून तो निघून गेला आणि तू आहेस की तुला अजून त्याचाच पुळका येतोय?”

“तसं नाही काकू. . . पण. . .” तिला पुढे काहीच बोलवेना.

“निर्वि कशी आहे गं?” विषय बदलत काकू म्हणाली, “येताना घेऊन यायचं ना. तेवढंच बरं वाटलं असतं.”

“पुढच्या वेळेस. . आणते.” ती म्हणाली.

 विशालच्या आई-बाबांचा निरोप घेऊन श्रेया आता परतीच्या वाटेला लागली. कार चालवताना तिच्या डोळ्यांसमोर रात्रीचा त्यांच्या दोघांतला तो प्रसंगच सतत उभा राहत होता. अचानक आज पाच वर्षांनी तो का परत आला होता याचाही ती विचार करत होती. तिला न राहून मनात शंका येत होती की तो निर्विसाठी तर आला नसेल परत? नाहीतर तो का येईल परत? तसंही निर्विचा बायोलॉजिकल बाप देखील तोच होता तर तिला तीही शक्यता नाकारता येत नव्हती.

आणि समजा उद्या तो थेट घरीच आला आणि त्याने रात्रीची सारी हकीकत जर स्वप्नीलला सांगितली तर? तर मात्र आपलं काही खरं नाही या अपराधीपणाच्या भावनेने तिचे मन अस्वस्थ झाले होते. तिच्यासारख्या एका विवाहितेने आपल्या जुन्या नात्यात इतकं गुरफटून जाऊन त्यात वाहत जाणं तिला देखील आवडलेलं नव्हतंच मुळी; पण कालचा प्रसंगच मुळात पूर्णपणे नाट्यमय घडला होता आणि तिला देखील काही काळासाठी आपण कोण आहोत, कुठे आहोत किंवा कुणाच्या बाहुपाशात आहोत याची तमा उरली नव्हती. कदाचित रात्रीच्या पार्टीतील त्या दारुने असेल किंवा हृदयाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात अजून विशालसाठी शिल्लक राहिलेल्या तिच्या प्रेमामुळे असेल; पण चूक तर घडलीच होती तिच्याकडून.

कारच्या एसीत सुद्धा तिला आता दरदरून घाम फुटला होता. आयुष्याने आपल्याला आणखी अनपेक्षित धक्के द्यावेत त्याआधी तीने ही सारी हकीकत जाऊन स्वप्नीलला सांगायची असं मनाशी ठरवलं आणि गाडी खाली पार्क करून ती वरती चालत आली. काहीशा दबक्याच पावलांनी.

स्वप्नील हॉलमध्येच निर्विसोबत खेळत होता. ती आत येताच निर्विची नजर तिच्यावर पडली आणि ती धावतच तिच्याकडे म्हणत धावली, “मॉमी आली. . मॉमी आली. आता आपण बाहेल फिलायला जायचं.”

तिने तिला आपल्या कमरेशी पकडले आणि चेहऱ्यावर उसने हसू आणत ती तिच्या डोक्यावरून हात दिरवू लागली. तिला आलेली पाहून स्वप्नील तिला म्हणाला, “अगं कुठे गेली होतीस अशी न सांगता आणि सगळं ठीक तर आहे ना? एनिथिंग सीरियस?”

श्रेया मनाशी पक्का निर्धार करून आत आली होती; पण काहीही झालं तरी अशा गोष्टी नवऱ्याला बोलणं आणि तेही नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी? त्यासाठी तर मग खूपच मोठं काळीज लागतं.

“स्वप्नीssssल?” ती गंभीर मुद्रा करत आणि खाली नजर करत त्याला म्हणाली.

“हां श्रेया? काय झालंय? तुला काही सांगायचं आहे का? बोल ना. मला तुझं असं गप्प राहणं खूपच अस्वस्थ करतंय गं. बोल काहीतरी.” तो तिला काळजीच्या सुरात म्हणाला.

तिच्या गळ्याशी सारे शब्द आता जणू एकवटले होते मात्र बाहेर पडण्यास तयार नव्हते. तिला पश्चातापही होत होताच त्यात. पण देवावर हवाला ठेवून तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती बोलू लागली, “कक्. . .कक्. . . काल रात्री पार्टी. . .”

ती आपलं बोलणं पूर्ण करतेय इतक्यात त्यांच्या दारावरची बेल ठणाणली. स्वप्नीलने जाऊन दरवाजा उघडला आणि समोर पाहतो तर त्याचे डोळेच विस्फारले अगदी. समोर खाकी वर्दीत दोन पोलीस आणि सोबत एक लेडी कॉन्स्टेबल उभे होते.

“श्रेया दंडवते इथेच राहतात का?” अगदी ठसठशीत आवाजात इन्स्पेक्टरने विचारले.  

“आपण?” स्वप्नीलने प्रश्न केला.

“खाकी वर्दीत आलोय. तेव्हा तर समजून जायचं? पीएमसी वाले समजलात की काय? मी इन्स्पेक्टर कदम, बाय दि वे.” इन्स्पेक्टर म्हणाला, “श्रेया दंडवते?” मग त्याने आपल्या मुळ प्रश्नाला हात घातला.  

“ह्. . हो; पण आधी. . . आधी तुम्ही आत तर या.” असे चाचरत म्हणत त्याने त्यांना आत घेतले. आत आल्याबरोबर इन्स्पेक्टरने श्रेयाला समोरच पाहिले आणि लागलीच विचारले, “तर तुम्हीच श्रेया दंडवते?”

आता श्रेया देखील पुरती घाबरली होती. तिला मघाशी कसेबसे फुटणारे शब्द देखील आता तोंडून फुटेनासे झाले होते. तिने घाबरलेल्या नजरेनेच त्यांना होकार दिला.  

“श्रेया मॅडम, तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल.” इन्स्पेक्टर कदम म्हणाला.

“इन्स्पेक्टर साहेब, मला कळेल का काय झालंय ते? तिला का म्हणून घेऊन जात आहात आपण?” स्वप्नीलला काहीच माहिती नसल्याने त्याने त्यांना विचारले.

“कळेलच तुम्हाला. आधी आम्हाला आमचे काम करू द्या.” असे म्हणत इन्स्पेक्टर कदमांनी त्याच्याकडे पाहिले  आणि नंतर सोबत आणलेल्या लेडी कॉन्स्टेबलला डोळ्याने खुणावत श्रेयाला आपल्या सोबत घेण्यास सांगितले.

“चला मॅडम.” ती लेडी कॉन्स्टेबल तिला म्हणाली आणि श्रेया त्यांच्यासोबत चालू लागली.

“डॅडी पोलीस काका मॉमीला घेऊन कुते दात आहेत?” निर्विने विचारले.

त्याला आता तिला काय उत्तर द्यावे काहीच सुचले नाही तो मात्र त्यांच्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे पाहत नी निर्विला कडेवर घेऊन तो नुसता उभा होता. आतून मात्र भलताच घाबरला होता तो!

[पुढे सुरू राहील. . .]

कथेचा आधीचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

न्यू इयर पार्टी नाईट भाग ३ New Year Party Night

न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night

लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

मॅरेज मटेरियल Marriage Material

मी मॅरेज मटेरियल mi marriage material

ती आणि ती A lady and a prostitute


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *