• Pune, Maharashtra
कथा
न्यू इयर पार्टी नाईट भाग ३ New Year Party Night

न्यू इयर पार्टी नाईट भाग ३ New Year Party Night

Spread the love

चेहऱ्यावर पश्चातापाचा भाव आणत श्रेयाने आपले गुडघ्यांत लपवलेले तोंड बाहेर काढले. एक दीर्घ श्वास घेतला आणि दोन्ही हातांनी आपल्या केसांमधून हात फिरवला. अजूनही तिच्या खोलीत ती एकटीच होती. ना तिथे स्वप्नील आला होता ना तिची मुलगी. New Year Party Night

माझ्या येणाऱ्या कथा कवितांचे अपडेट्स आपोआप मिळवण्यासाठी माझ्या वेबसाईटवर आल्यावर जे पॉप अप नोटिफिकेशन येते त्याला allow करा म्हणजे मी काही पोस्ट केल्यास आपल्याला त्याचे नोटिफिकेशन येईल. माहितीसाठी खाली फोटो देत आहे.

lekhani sangram
lekhani sangram

तिची नजर मग बेड शेजारी असलेल्या एका छोटेखानी स्टूलवर पडली. तिथे लहानशा टेबल लॅम्पशेजारी table lamp एक छानशी फोटो फ्रेम photo frame होती. तिची, स्वप्नीलची आणि. . . आणि तिच्या मुलीची! ती पाहून मग तिच्या आसवांच्या आटलेल्या झऱ्याला पुन्हा पाझर फुटला. रात्री तिच्यात आणि विशालच्यात जे काही घडले ते सारं अनावधानाने घडले होते. मात्र ते घडले तर होतेच आणि याची सल तिच्या मनाला बोचत होती. काहीकेल्या रात्रीचा तो प्रसंग तिच्या नयनपटलांवरून जातच नव्हता. New Year Party Night

पाच वर्षांपूर्वी विशाल मला अचानक न सांगता निघून गेल्यावर मी कित्ती कित्ती चिडले होते त्याच्यावर. पुन्हा चुकून तो आयुष्यात परत आला तर त्याची सावली मीच काय तर माझ्या होणाऱ्या बाळावर देखील न पाडण्याची शपथ घेणारी मी आज अशी अचानक कशी काय विरघळले? आणि ही. . . ही बाब जर स्वप्नीलला कळाली तर? श्रेयाच्या मनातील प्रश्नांचे वादळ काही केल्या शमता शमेना! डोहाच्या भोवऱ्यात अडकल्यासारखी तिची अवस्था झाली होती. तो कधीही तिला डुंबवू शकत होता.  

काहीतरी अचानक आठवावे अगदी तस्सेच मग ती बसल्या जागी बेडवर काहीतरी शोधू लागली. अधाश्यागत ती आपले हात तिच्या बेडवर इतरत्र फिरवत होती. पण शोधत काय होती ती?

तिचे मन मग पुन्हा तिला काल रात्रीच्या विशालकडे घेऊन गेले. तिला आठवले, काल रात्री त्याने तिला खाली सोडून जाताना एक ब्रेसलेट platinum bracelets तिच्या हाती थोपवले होते. तिला जसे हे आठवले तसे तिचे हात बेडवर अजून जोरात फिरू लागले आणि ते ब्रेसलेट शोधू लागले. स्वप्नील कधीही येऊ शकतो या विचाराने ती अवस्थ झाली होती आणि त्याच्या येण्याअगोदर तिला ते ब्रेसलेट शोधून सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवायचे होते. अगदी त्याला न कळता.

“हॅपी न्यू ईयर मॉमी.” तोच दरवाजा उघडून तिची मुलगी निर्वि तिथे येऊन म्हणाली आणि बघता बघता धावत येऊन ती तिच्या मिठीत विसावली पण.  स्वप्नीलतसाच दरवाजात उभा होता. चेहऱ्यावर स्मित घेऊन. happy new year

“हॅपी. . . हॅपी न्यू ईयर.” ती काहीशी दचकलेल्या स्वरात म्हणाली आणि हाती आलेलं ते ब्रेसलेट तिने मग सावकाश आपल्या उशीखाली सारून दिले.  

दरवाजात उभा असलेला स्वप्नील मग त्यांच्याकडे चालत आला. तिच्या शेजारी येऊन तो बेडवर बसला आणि त्याने श्रेयाच्या कपाळाचे हलकेच चुंबन घेतले. त्याच्या त्या चुंबनाने ती काहीशी शहरले खरी; पण अचानक तिला तो कालचा प्रसंग आठवला आणि ती हिरमुसली. तीने स्वप्नीलपासून आपली नजर चोरली. निर्वि अजून तिच्या मिठीतच होती.

“हॅपी न्यू ईयर, डियर.” असे म्हणत मग स्वप्नीलने त्या दोघांभोवती आपले बाहु लपेटले.

श्रेया मग उसने स्मित आणत त्याला हॅपी न्यू ईयर म्हणाली आणि भोवती लपेटलेल्या त्याच्या बाहुंकडे पाहत कशाततरी हरवून गेली. तिला पुन्हा आठवले रात्रीचे ते बाहु, विशालचे. तिला आठवली मग त्याची ती उबदार मिठी आणि त्या उबेने वितळलेली ती! अगदी कण नी कण!

“रात्री खूपच वेळ झाला का?” काही क्षणाच्या शांततेनंतर स्वप्नीलने तिला विचारले; पण चांगलीच तंद्री लागल्याने कदाचित त्याचे शब्द तिच्या कानवरून गेले असावेत. ती काहीच बोलली नाही. पापणी न पाडता ती तशीच त्याच्या मिठीत होती. विशालला आठवत.

“श्रेया, मी काहीतरी विचारतोय तुला.”

“अं, काय? काय म्हणालास?” तिने आपली तंद्री भंग करत त्याला विचारले.

“अगं रात्री खूप वेळ झाला ना तुला? कधी आलीस तू?” 

“अं, मी ते. . पहाटे. पहाटे आले बहुतेक.” ती काहीशी घाबरूनच म्हणाली.

“बहुतेक?” कपाळावर आट्या पाडत त्याने विचारले.

“हो. कितीतरी कॉल्स केले होते मी तुला. पण तू. .”

“ते अगं, मी माझा मोबाइल कारमध्येच विसरून आलो होतो ना. सो. .पण तुझी कार?”

“डॅडी. मॉमी. मला भूक लागलीय ना. तुम्ही नंतल बोला ना.” निर्वि तेवढ्याच निर्विकार चेहऱ्याने दोघांकडे पाहत म्हणाली आणि स्वप्नीलचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला.

“हो बेटा. मी, मी लग्गेच बनवते आपल्यासाठी खायला हं.” श्रेया तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.  

“त्याची काही गरज नाही मॉमी.” ती पटकन म्हणाली.

“का बरं?”

“डॅडींनी लेडी केलंय बंच.” 

“बंच नाही गं बेटा, ब्रंच म्हणायचं त्याला.” स्वप्नील तिला म्हणाला.

“हां, ब्लंच लेडी केलंय.” ती असं म्हणताच श्रीशा काही वेळासाठी हसली खरी; पण रात्री जे काही घडलं होतं ते आज ना उद्या स्वप्नीलला सांगावं तर लागणार होतं या विचाराने मात्र मग ती एकदम गंभीर झाली.

शिवाय तिची कार अजूनही टेमघरच्या तळाशी समाधीस्त होती आणि सोबतच तिचा मोबाइल देखील याची त्याला कुठे कल्पना होती? त्याला आपण नेमकं काय सांगावं याचाच मग ती विचार करू लागली.

“किती वाजलेत?” तिने विचारांत हरवूनच स्वप्नीलला विचारले.

“बघ ना मोबाईलमध्ये, म्हणजे कळेल केव्हाची झोपली होतीस ते.” तो तिला टोमणा मारण्याच्या हेतूने म्हणाला.

“अॅक्चुअली, आय लॉस्ट माय. .” ती पुढे काही बोलणार तोच स्वप्नील बोलला, “हरवून दिलास ना रात्रीच्या पार्टीत?” त्यावर ती काहीच बोलली नाही. मग तोच म्हणाला, “बरं ते जाऊ दे आता, इट्स ए फर्स्ट ऑफ जॅन अँड मला हा दिवस वाया नाही घालवायचा. सो डायनिंग टेबल आपली केव्हाची वाट पाहतोय. लवकर फ्रेश हो आणि खाली ये. नंतर आपण मस्तपैकी फिरायला जाऊ बाहेर.”

तिने यावर मग होकारार्थी मान हलवली नुसती.

“आम्ही वाट पाहतोय खाली.” असे म्हणत तो निर्विला घेऊन बेडरूमच्या बाहेर पडला. मग तिने मघाशी उशीखाली सारलेले ते ब्रेसलेट हळूच बाहेर काढले आणि ते आपल्या डोळ्यांसमोर धरून ती ते न्याहाळू लागली. प्लॅटिनम मध्ये घडवलेलं असं आकर्षक ब्रेसलेट होतं ते. मधोमध पाचूचा खडा बसवण्यासाठी जागाही होती त्यावर; पण . . . पण पाचूचा तो खडा? तो कुठे गायब होता? बेडवर तर नसेल ना पडला? म्हणून ती पुन्हा बेडवर शोधाशोध करू लागली. तिला पुन्हा आठवले, त्याने तिला ते ब्रेसलेट दिले तेव्हा तो नव्हताच त्यात!

अमावस्येच्या त्या अंधाऱ्या राती जरी आकाशात चंद्र नसला तरी श्रेया मात्र इथे जमिनीवर एका चंद्रावरच जणू स्वार झाली होती. विशालचे शीतल, शुभ्र तेजच जणू ती आपल्यात सामावून घेत होती. त्यांना ना आभाळातील त्या चांदण्यांची गरज होती ना त्या लबाड चंद्रछायेची. प्राणयाग्निने तप्त अशी ती उभय शरीरे जणू स्वत:च प्रकाशमान झाली होती आणि त्यांच्या त्या प्रकाशाने मग ती किनारी रुतलेली होडी देखील प्रकाशमान भासत होती.

लाटांच्या त्या होडीशी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनासरशी श्रेयाच्या तोंडून पडणारे तृप्ततेचे मादक हुंकार त्या शहारे आणणाऱ्या वातावरणात मुग्धता दाटवत होते. श्रेयाला आपल्याला कुणीतरी हाक देतंय याची आता हळुहळू जाणीव होत होती. क्षणाक्षणाला ती हाक आता अधिकच स्पष्ट जाणवत होती तिला. ती मात्र डायनिंग टेबलावर dining table बसून आपल्या प्लेटमध्ये चमचा फिरवीत होती नुसती.

“श्रेया? श्रे. . .या?” तिच्या समोर बसलेला स्वप्नील तिला हाक देत होता. खाता खाता ती मात्र परत आपल्या विश्वात, कालच्या रात्रीत हरवून गेली होती आणि अचानक स्वप्नीलच्या त्या हाकेने ती भानावर आली. आपल्या नवऱ्यासमोर बसून आपण आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकरासोबतच्या ex boyfriend रात्रीच्या त्या मिलनाच्या प्रसंगात हरवून गेल्याने तिला खूप अपराधीपणाचे वाटले. तिने हातातील चमचे तसेच आपल्या प्लेटमध्ये ठेवले आणि एक दीर्घ श्वास घेतला.

“तू ठीक आहे ना?” स्वप्नीलने तिला विचारले. त्यावर ती मात्र खाली त्या प्लेटकडे नजर लावून बसली होती.

“मॉमी, डॅडी ईज आसकिंग यू समथिंग.” निर्वि तिला हाताने हलवत म्हणाली.

“अं? व्हॉट?” तिने गडबडल्यासारखे विचारले.

“अगं तुला बरं नाहीये का वाटत?” स्वप्नीलने खूप शांतपणे तिला विचारले.

“नो नो. आय. . आय एम ऑलराइट.” असे म्हणत ती खुर्चीतून उठली. I am alright

“अगं, काहीच तर खाल्लं नाहीये तू.”

“बस्स मला. पोट भरलंय माझं.”

“काय मॉमी, डॅडीने एवलं प्लेमाने बनवलं आणि तू काहीच खाल्लं नाही. हाऊ सॅड.” निर्वि बोलतेय तोच ती तिथून निघून वरती गेली सुद्धा. स्वप्नीलला तिच्या अशा वागण्याचे कारण समजेना. तोही शून्यात नजर लावून ती असं का वागतेय याचाच विचार करत असावा बहुतेक.

[पुढे सुरू राहील. . .]

कथेचा आधीचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

न्यू इयर पार्टी नाईट भाग २ New Year Party Night

न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night

लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

मॅरेज मटेरियल Marriage Material

मी मॅरेज मटेरियल mi marriage material

ती आणि ती A lady and a prostitute

न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night

न्यू इयर पार्टी नाईट भाग २ New Year Party Night


Spread the love

2 thoughts on “न्यू इयर पार्टी नाईट भाग ३ New Year Party Night

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *