
न्यू इयर पार्टी नाईट भाग २ New Year Party Night
न्यू इयर पार्टी नाईट भाग २ New Year Party Night, suspense story , Marathi suspense story
न्यू ईयर पार्टी new year party , दारू, मधूनच कुणी एक पुरुष श्रेयाच्या ओठांवरती आपले ओठ टेकवतो. मग चीयर्स, डिजे, म्युजिक, डान्स, आता श्रेयाचे ओठ त्याच्या ओठांत गुंतलेले. मग पुन्हा कार, नशा, पाठलाग, तो तीव्र उजेड, भीती, तो पुरुष आता श्रेयावरती स्वार, दोघेही विवस्त्र! एकमेकांत गुंतलेले!
समोरून मोठा ऊजेड पाडीत एक गाडी सरर्रकन, श्रेया कारसोबत धरणात, पाण्याचा जोराचा आवाज आणि श्रेया एक मोठा श्वास घेत बेडवरून जागी झाली. मोठ मोठे उसासे टाकू लागली. विस्कटलेले केस आणि अंगावर रात्रीच्या पार्टीतील night party तो ड्रेस अशा अवस्थेत ती बेडवरच आपला मोबाइल शोधू लागली; पण तो काही तिला मिळाला नाही. कसा मिळेल? तो तर कारसोबत टेमघर धरणात बुडाला होता रात्री!

आपल्या विस्कटलेल्या केसांत आपल्या दोन्ही हातांची बोटे घालून तिने आपले केस घट्ट पकडले आणि डोळे घट्ट मिटून आपले तोंड तसेच गुडघ्यांत घालून ती मुसमुसु लागली. ती घाबरली होती, हादरली होती, सोबतच पश्चाताप देखील करत होती. रात्रीच्या त्या प्रसंगाने तिला पुरते हलवूनच टाकले होते.
कोण होता तो? विशालच होता ना? आणि तो अचानक कुठून आणि कसा आला तिथे? तो नसता तर आज मी इथे नसते नक्कीच! बुडून मेले असते केव्हाची! पण तो होता म्हणूनच तो नाजुक प्रसंगही घडला आमच्यात! असे एक ना धड, सतराशे साठ विचार तिच्या मन:चक्षूवरती अक्षरशा: पिंगा घालत होते. मात्र श्रेया बिचारी बसली होती तसेच गुडघ्यांत तोंड लपवून, आसवे गाळीत.
पण मग, ती पाठलाग करणारी कार? त्या कारमध्ये कोण होतं? विशाल? नाही नाही. त्यानं तर वाचवलं मला. अगदी घरापर्यंत सोडून गेला तो, तो कशाला करेल असलं काही? की ती कार, विशाल सगळे माझे भासच होते? असले ना ना प्रश्न तिच्या मनात धिंगाणा घालत होते.
पण होता कुठे तो इतकी वर्षे? मला असं अचानक सोडून कुठे गेला होता? आणि. . . आणि आज पाच वर्षांनी तो. . तो का परत आला असावा? आता स्वप्नीलसोबत खुश(?) आहे मी. मग आत्ताच का?
“आत्ताच का विशाल? का?” ती गुडघ्यांत तोंड घालूनच स्वत:शी बोलली आणि कालच्या घटनेमध्ये हरवून गेली.
टेमघर धरणाच्या त्या एका वळणावर कानाचे पडदे फाटतील असा हॉर्न वाजवत जोरात आलेल्या त्या वाहनाला चुकविण्याच्या नादात श्रेयाने आपल्या कारचे स्टीअरिंग जोरात वळवले आणि तिचा कारवरील ताबा सुटला. त्याच क्षणी धरणाचा संरक्षक कठडा तोडून तिची कार थेट खाली पाण्यात कोसळली.
अंधाऱ्या अशा त्या मध्य रात्री मग चांगलाच मोठा आवाज झाला. धरणाच्या काठी असलेल्या एका झाडावरचे सफेद बगळे त्या आवाजासरशी आपले पंख फडफडवित क्रू. . क्रू आवाज करत उडाले. श्रेया आपल्या कारसहित पाण्यात बुडत होती.
आतून ती जिवाच्या आकांताने आपले दोन्ही हात काचेवर मारत होती, कारचा दरवाजा उघडण्याचा आतोनात प्रयत्न करत होती; पण काही झाले तरी तिचे प्रयत्न तोकडेच पडत होते. तळाशी जाताना तिच्या कारच्या समोरील लाइट्सचा वाकडा तिकडा होणारा उजेड आणि त्या उजेडात धरणाचा दिसणारा तो तळ जणू तिला आपली घटका भरत आल्याची जाणीव करून देत होते. कारने केव्हाचा तळ गाठला होता!
कारच्या आतमध्ये पाणी भरल्यामुळे आता तिला श्वास घेणेही मुश्कील झाले होते. तिची फुफ्फुसे पाण्याने गच्च भरली होती, हालचाल मंदावली होती आणि ती आपले शेवटचे काही प्रयत्न म्हणून काचेवर हात मारत होती. a drowning woman, a drowning car, a drowning lady
तिची हृदयगती आता अगदीच मंदावली होती. कसलीच हालचाल न करता ती आपले डोळे उघडे ठेवून स्टीअरिंगच्या मागे तशीच पडून होती. काही अखेरची स्पंदने आणि तिला जलसमाधी मिळणार होती. समोर टेमघर धरणाचा तळ कारच्या उजेडात तिला दिसत होता आणि तळाशी असलेले दगड-धोंडे, लाकडांचे अवशेष, गाळ सगळं काही तिला आता अस्पष्ट दिसत होतं.
आयुष्याच्या अखेरीस तिला आता तिची ती चार वर्षांची गोड मुलगी, तिचं हसणं, खेळणं-बागडणं दिसत होतं. नुकतंच नवीन वर्ष सुरू झालं होतं आणि या नवीन वर्षात आता तिला तिच्या मुलीला भेटताही येणार नव्हतं. ना नवऱ्याला पाहता येणार होतं. स्वप्नीलचा चेहरा देखील काही काळ तिच्या डोळ्यांपुढे तराळला. पण तिची मुलगी, तिचा चेहरा मात्र सतत तिच्या डोळ्यांपुढे येत होता.
आणि अचानक डोळ्यांसमोर आला आणखी एक चेहरा. म्हणतात ना आयुष्याच्या कठीण समयी आपल्या डोळ्यासमोर तेच चेहरे येतात जे आपल्याला प्राणाहूनही प्रिय असतात. विशालचा होता तो चेहरा. एकेकाळचा तिचा प्राणप्रिया!
सताड उघड्या डोळ्यांनी, पापण्यांची किंचितदेखील हालचाल न करता ती समोर पाहतच होती. अजूनही तिच्या त्या शरीरात काही प्राण शेष राहिलेले होते. डोळ्यांना दिसत होते, तिची चिमुरडी आणि ती, दोघी एका बागेत बागडत होत्या, बागेतील सुंदर, मोहक फुले त्या दोघी तोडीत होत्या, झोक्यावर बसून उंचच उंच झोके धेत होत्या. मधूनच कुठूनतरी मग विशालही डोळ्यांसमोर येत होता.
तिला दिसलं, तिच्या कारच्या पडलेल्या त्या उजेडातून कुणीतरी पोहत, अगदी सावकाश तिच्याकडे आलं. जवळ येऊन कारच्या पुढच्या काचेतून तिला अगदी निरखून पाहू लागलं. माझा विशाल, विशाल आला होता. तिचं मन तिला बोलू लागलं.
समोरून, बाजूने, मिळेल तिथून विशाल काचेवर जोरजोरात प्रहार करत होता. तिला बाहेर काढण्यासाठी धडपडत होता. काही प्रयत्नाअंती त्याने कारचा दरवाजा उघडला आणि श्रेयाला अलगद दोन्ही हातांमध्ये उचलून घेऊन तो वरती येऊ लागला.
श्रेयाच्या हृदयाची स्पंदने आता अजूनच मंद झाली होती. त्याच्या दोन्ही बाहूंत विसावलेली ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती नुसती. तीही न पापणी पाडता! इतक्या थंड पाण्यात असूनदेखील श्रेयाला त्याचे शरीर भलतेच ऊबदार जाणवत होते. असे वाटत होते की याच्या शरीराची ती ऊब कायम तिच्या सोबत राहावी. पाच वर्षांनी तो तिला भेटत होता, तेही तिचा जीव वाचवण्याच्या प्रसंगी! कसला हा नियतीचा खेळ म्हणायचा. श्रेया हाच विचार करत होती कदाचित.

पाण्यातून वरती तो तिला धरणाच्या काठाशी घेऊन आला. सगळा चिखलगाळ होता काठी. तिथेच चिखलात रुतलेल्या एका होडीत त्याने तिला अलगद ठेवले आणि तिचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी त्याने तिच्या ड्रेसची चैन सैल केली.
ती तर पुरती अर्धबेशुद्धावस्थेत गेली होती. नाका-तोंडात पाणी भरलेलं होतं. विशाल तिच्या छातीवर दाब देऊन, तोंडात श्वास भरून तिला गदागदा हलवून जागं करण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी छातीवर एका जोरच्या दाबासरशी श्रेयाच्या तोंडातून पाण्याची पिचकारी बाहेर पडली आणि ती ठसके देत व खोकत मोठाले श्वास घेऊ लागली. हृदयाची धडधड आता पूर्ववत होत होती. साक्षात मृत्यूच्या दाढेतून परत आली होती ती!
तिला श्वास घेणं जिकिरीचं होतंय हे पाहून विशाल तिच्या तोंडात श्वास भरू लागला. ती पुरती शुद्धीवर नव्हती अजून; पण समोर विशालच होता याची तिला पुरेपूर कल्पना होती. पापण्यांची सावकाश उघडझाप करत ती त्याला न्याहाळत होती.
त्याचं तिच्या ओठांवरती ओठ टेकवून तिला श्वास देणं तिला जणू पाच वर्षांपूर्वीची ती असल्याची जाणीव करुन देत होतं. त्याच्या बाहुंत ती विसावली होती, पुरती ओलीचिंब होऊन. मात्र त्याच्या बाहुंत तिला एक विलक्षण ऊब जाणवत होती जी की तिला स्वप्नीलच्या बाहुंत कधीच जाणवली नव्हती.
हळुहळु ती आता सुस्थितीत परतत होती. अजूनही तो तिला आपल्या तोंडावाटे प्राणवायुचा एकेक श्वास देत होता. आपण स्वप्नील सोडून एका गैरमर्दाच्या बाहुंत विसावलो आहोत याची अचानक तिला आठवण होताच हिसक्यासरशी तिने विशालला मागे ढकलून दिले आणि ती आपलं ओलं अंग व ड्रेस सांभाळत मागे होडीला टेकून बसली. अपराधीपणाच्या भावनेने ती आणखी खजील झाली होती म्हणूनच कदाचीत ती गुडघ्यात तोंड घालून आसवे गाळीत होती, कुढकुढत होती!
तिला असं या अवस्थेत पाहून मागे फेकला गेलेला विशाल मग सावकाश गुढघ्यावर चालत येत तिच्याजवळ आला आणि तिचे तोंड आपल्या ओंजळीत पकडून तो तिला पाहू लागला. तिच्या डोळ्यांत अश्रूंचा सागर जमा झाला होता. तिने त्याला तसेच भरलेल्या डोळ्यांनी पाहिले आणि तिने जोराची त्याच्या कानशिलात लगावली.
“हाऊ डेअर यू टू टच मी?” ती त्याची कॉलर पकडत त्याला म्हणाली.
“अगं पण. . .” तो काही बोलणार तोच ती पुढे बोलू लागली. कदाचित तिची पार्टीतील नशा अजून पुरती उतरली नव्हती.
“यू ब्लडी मीन मॅन. तू का सोडून गेलास मला? तुला माहीत होतं ना मी आई होणार होते म्हणून? का गेलास मला एकटीला टाकून.” त्याचा कॉलर पकडून त्याच्या छातीशी मारत होती. त्याला बिलगून ती रडत होती. आपल्या मनातली भडास ती त्याच्यावर काढत होती.
“तुला आमची काहीच काळजी वाटली नाही का रे? असा कसा रे तू?” ती रडतच होती.
“एवढं समज की माझी खूप मोठी मजबूरी होती आणि आहे. बाकी मी सांगेल तुला.” तो तिला समजवत होता. त्याने तिला आपल्या छातीची अगदी घट्ट कवटाळले होते. त्याच्या अंगाची ती ऊब तिला अजूनच विलक्षण भासत होती. ती रडता रडता आता हळुहळू शांत होत होती. का कुणास ठाऊक त्याच्या अंगाच्या त्या ऊबेने म्हणा किंवा नशेमुळे म्हणा ती त्याला इतरत्र कुरवाळू लागली.
कदाचित जुन्या नात्याच्या मधली ती ऊब अजूनही शिल्लक तर नसेल? ती डोळे बंद करून त्याचे अंग नी अंग स्पर्शु लागली. हळुहळू आवेग वाढला तशी मग ती त्याच्या छातीला, खांद्याला, मानेला, गळ्याला आपल्या ओठांनी स्पर्शु लागली. त्याच्या शरीराचा तो मोहक सुगंध तिला अजूनच जास्त लुभावत होता. पुरुषाच्या अंगाचा असा गंध ती पहिल्यांदाच अनुभवत होती. त्यात त्याची ती ऊब तिला अजूनच त्याच्यात गुंतवत होती.
त्याच्या विविधांगाची चुंबने घेता घेता तिचे ओठ कधी त्याच्या ओठांत गुंतले तिला कळलेसुद्धा नाही. आवेगपूर्ण लयीमध्ये ती त्याच्या ओठांचे रसग्रहण करू लागली. असे शेकडो मदिरांचे तलाव तोकडे पडतील इतकी नशा तिला त्याच्या ओठप्राशनांतून तिला मिळत होती.
श्वासांत श्वास आणि ओठांत ओठ गुंतले असताना दोघांच्या शरीरांवरील तो एक एक ओला कपडा त्या होडीच्या काठी फेकला जात होता आणि कडाक्याच्या थंडीच्या त्या जानेवारी महिन्याच्या प्रारंभीच ती दोन तप्त शरीरे एकमेकांना आवेगपूर्ण चुंबित त्या होडीत एकमेकांच्यात पुरती गुंतली होती.
अमावस्येच्या त्या काळ्याकुट्ट राती श्रेया कधी चांदण्या आकाशाकडे पाठ करीत प्रेमाचे हिंदोळे देत होती तर कधी त्याच चांदण्या आकाशाकडे तोंड करून डोळ्यांच्या कडांतून आनंदाश्रू गाळीत त्याच्या प्रेमाचे ते ऊबदार हिंदोळे ती सोशीत होती.
खाली त्या होडीला मात्र धरणाच्या त्या सौम्य लाटा सावकाश धक्के देत होत्या. जणू तेही प्रणयाधीनच झाले होते!
[कथा पुढे सुरू राहील. . ]
माझ्या येणाऱ्या कथा कवितांचे अपडेट्स आपोआप मिळवण्यासाठी माझ्या वेबसाईटवर आल्यावर जे पॉप अप नोटिफिकेशन येते त्याला allow करा म्हणजे मी काही पोस्ट केल्यास आपल्याला त्याचे नोटिफिकेशन येईल. माहितीसाठी खाली फोटो देत आहे.

कथेचा आधीचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night
लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
मॅरेज मटेरियल Marriage Material
मी मॅरेज मटेरियल mi marriage material
ती आणि ती A lady and a prostitute
आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.
व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १
[…] न्यू इयर पार्टी नाईट भाग २ New Year Party Night […]
[…] न्यू इयर पार्टी नाईट भाग २ New Year Party Night […]
Kuth hoti niyati aamchya veles??
पाण्यात?
Aamchyavr anyay zalay
अध्यक्ष महोदय,
Barobar ahe , etka niyticha khel nahi julun yet…😟😟
हो.
aaplya vishalchya nashibat nhi he; nashibat ky tr swapnatahi honar nahi asa
होईल होईल