• Pune, Maharashtra
कथा
न्यू इयर पार्टी नाईट भाग ६

न्यू इयर पार्टी नाईट भाग ६

Spread the love

New Year Party Night part 6 Final episode, The final truth

नाक आणि डोळे पुसून ती कारमधून बाहेर पडली. तरातरा चालत ती पोलीस स्टेशनच्या समोर आली. काही सांगायला आत जाणारच तोच तिला स्वप्नील एका कोपऱ्यात हवालदार मानेशी काहीतरी बोलताना उभा दिसला.

new year party night, pictures are for illustration purpose only
new year party night, pictures are for illustration purpose only

त्याच्यावर नजर जाताच तिची पायऱ्या चढणारी ती पाऊले तिथेच थबकली आणि ती मग काहीशा दबक्या पावलांनी त्याच्याकडे चालत आली. बोलता बोलता स्वप्नीलची नजर देखील आता तिच्यावर पडली. तो लगेचच तिला म्हणाला, “अरे, तू इथे आहेस होय? हवालदार साहेब तर म्हणाले की तू निघून गेलीस म्हणून. हो की नाही साहेब?”

“हो निघालेच होते; प्.. पण..त्.. तू केव्हा आलास?” तिने त्यालाच प्रतिप्रश्न केला.

“हे काय आत्ताच आलो. मग बाहेरच हवालदारसाहेब गाठ पडले.” तो मानेंकडे पाहत म्हणाला. मानेंनी त्यावर नुसतेच स्मित केले आणि तिथून निघण्याच्या उद्देशाने ते म्हणाले, “चालू द्या तुमचं. मी येतो.”

“अरे तू कशाला आलास? मी आले असते ना आणि निर्विला..” हवालदार माने तिथून निघून जाताच स्वप्नीलला ती म्हणाली.

“निर्विचं नको टेंशन घेऊ. कामवाली आहे घरी. ती पाहते म्हणाली.” तो म्हणाला आणि एकक्षण थांबून तो तिला पुन्हा बोलू लागला, “अॅक्सिडेंट? श्रेया, रियली? आणि मला काहीच बोलली नाहीस तू. एक शब्दही नाही. का?”

“अ.. अरे, म्.. मी बोलणारच होते; पण..”

“पण काय श्रेया? काही झालं असतं म्हणजे?”

“नाही झालं आहे ना काही? उगीच काळजी असल्याचा आव नकोस आणू प्लीज.” ती थोडा मोठा आवाज करीत म्हणाली. तिच्या त्या बोलण्याने मात्र काहीतरी बोलण्यासाठी आणलेले शब्द स्वप्नीलने मग तोंडातच ठेवून दिले.

आपला पारा असा चढायला नको होता याची जाणीव श्रेयाला होताच ती म्हणाली, “ओके, आय एम सॉरी.”

“इट्स ओके. बट कसा काय झाला अॅक्सिडेंट? खूप प्यायली होतीस का?”

“अंम्.. आय डोन्ट नो अॅक्चुअली. बट टेमघरच्या..” 

“टेमघरच्या काय?”

“काही नाही. त्याच्या आसपास झाला अॅक्सिडेंट.”

“हुह्.. तुला ना, लेट नाईट पार्ट्या बॅन केल्या पाहिजेत. काहीतरी उद्योग वाढवत असता तुम्ही बायका. ते जाऊ दे आता. मला सांग इन्स्पेक्टर काय म्हणाले?

“तूच विचार ना आत जाऊन.” ती तडक म्हणाली.

“हाहा, नको. तसं मेजर काही नाहीये ना. आणि म्हणतात ना शहाण्यांनी पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढू नये म्हणून.” तो म्हणाला.

“कोर्टाच्या.” ती म्हणाली.

“अं?”

“शहाण्यांनी कोर्टाच्या पायऱ्या चढू नये- असं असतं ते.” ती म्हणाली.

स्वप्नीलच्या कारमधून घरी परतताना तिने आपले सीट थोडे खाली केले आणि त्यावर लेटत ती त्याला म्हणाली, “मला खूप कंटाळा आला आहे. पोहचेपर्यंत मी एक डुलकी काढते.”

स्वप्नीलने तिच्याकडे पाहत फक्त आपली मान हलवली आणि तो गाडी चालवू लागला.

श्रेयाच्या मनात आता कालच्या रात्रीच्या त्या प्रसंगाचे काहीच गिल्ट राहिलं नव्हतं एव्हाना. मात्र एक जबरदस्त धक्का म्हणा किंवा आणखी काही, ते मात्र होतं तिच्या मनात. भलेही तिने ते स्वप्नीलच्या पुढ्यात आपल्या चेहऱ्यावर आणले नव्हते; पण मनाच्या एका कोनाड्यात ते तस्सच होतं. झाकून ठेवल्यागत!

“श्रेया बेटा, अगं दरवाजा उघड. असं वेड्यागत स्वत:ला  कोंडून नकोस घेऊ बाळा. तुझा नाही तर निदान पोटातील बाळाचा तर विचार कर.” श्रेयाचे आई-बाबा तिच्या बेडरूमच्या दरवाज्यावर जोरजोरात हात मारत होते, सोबतच तिला आवाज देखील देत होते; पण तिने आतून दाराला लॅच लावून घेतला होता. आतून ती काहीच प्रतिसाद देत नव्हती त्यांना.

तिने आपल्या जीवाचं काही बरंवाईट नको करायला म्हणून शेवटी तिच्या बाबांनी शेजारील इमारतीत राहणाऱ्या स्वप्नीलला कॉल करून बोलवून घेतले. तोही तिथे येऊन तिला दरवाजा उघडण्याची विनंती करत होता; पण काहीकेल्या ती तो उघडायला तयारच नव्हती.

“तुम्ही लोक मिळून मला का त्रास देताय? मला कुणाशीही काहीएक बोलायचं नाहीये. रादर मला कुणीच नको आहे माझ्या आयुष्यात. जा सगळे. विशाल मला सोडून निघून गेला, आता तुम्ही देखील मला जा सोडून. नकोय कुणी माझ्या आयुष्यात. तुम्ही नको ना हे बाळ देखील नको. मला माझं आयुष्य देखील नको.” ती जोरजोरात रडत आतून बोलत होती. तिने दरवाजा उघडावा म्हणून बाहेरून देखील प्रयत्न सुरू होते; पण आतून श्रेयाच्या रडण्याचा वा बोलण्याचा आवाज जसा बंद झाला तशी तिच्या आई-बाबांची धाकधूक वाढली.

स्वप्नील मग दाराला जोरदार घुशांड्या देत दार उघडण्याचा प्रयत्न करू लागला. चांगल्या पंधरा-सोळा दिल्या असतील तेव्हा कुठे जाऊन ते दार उघडले गेले. दार उघडते न उघडते तोच सर्वजण आत पळाले. पाहतात तर श्रेया गळ्याभोवती ओढणी लावून पंख्याशी ती बांधण्याच्या तयारीत होती.

तिला त्या अवस्थेत पाहून तिच्या आईचे डोळेच जणू पांढरे पडले. ती तिच्या बाबांच्या आधारे आपला तोल सावरत काशीबशी तिथे उभी राहिली. स्वप्नीलने मात्र प्रसंगावधान दाखवून तिला तसं काही करण्यापासून परावृत्त केले आणि तिला खाली घेतले तशी ती तिच्या आईला घट्ट बिलगली आणि ढसाढसा रडली.

“तुमची काही हरकत नसेल तर मी काही बोलू का? म्हणजे मी कॉलेजपासून श्रेयाला ओळखतोय म्हणून..” स्वप्नील बोलत होता; पण त्याच्या बोलण्यात काहीसा संकोच देखील जाणवत होता.

श्रेया आता नॉर्मल झाली होती. तिच्या घरातील वातावरण देखील काहीसे निवळल्यागत झाले होते. त्यात तिच्या बाबांनी तिच्या पोटात वाढत असलेल्या तिच्या आणि विशालच्या त्या इवल्याशा नाजूक जीवाबद्दलची त्यांना वाटणारी काळजी तिथे बसल्यावर न कळत बोलून दाखल्यावर तो बोलत होता.

“श्रेयाची अशी अवस्था पाहता, मी, म्हणजे तुमच्या सर्वांची परवानगी असेल तर आणि तरच.” तो बोलला.

“अरे असे कोड्यात बोलू नको रे स्वप्नील. स्पष्ट बोल ना.” श्रेयाचे बाबा म्हणाले. श्रेया बिचारी मान खाली घालून जणू शून्यातच नजर लावून बसली होती.

“मी श्रेयाला स्वीकारायला तयार आहे. मी करेन लग्न.” तो धडक बोलला.

गाडी एका स्पीडब्रेकरवर आदळताच श्रेयाची ती डुलकी तुटली आणि ती जागी झाली. तिने शेजारी पाहिलं. स्वप्नील ड्रायविंग करत होता.

दुसऱ्या दिवशी दुपारी ऑफिसच्या मीटिंगमध्ये असताना ती पुन्हा आपल्या विचारांत हरवून गेली होती. समोरील प्रेझेंटेशनकडे तिचं बिलकुलच लक्ष नव्हतं. एकटक अशी ती त्या स्क्रीनकडे मात्र पाहत होती. न राहूनही विशालचं आज जगात नसणं तिला खूपच खटकत होतं.

आजपर्यंत तिची खात्री होती की जगाच्या पाठीवर तो कुठेतरी असेल. कुठेतरी दूर का असेना; पण असेल. पण काल, काल तिच्या त्या सर्व समजुतींना अचानक तडाच गेला होता.

चालू मिटिंगमधून दिव्याचा तिला भानावर आणतानाचा मोठा आवाज तिच्या थेट कानांत शिरला आणि ती तिच्या मुद्रेतून बाहेर आली. समोरील लॅपटॉप झपकन बंद केला आणि सर्वांना ‘एक्सक्यूज मी’ म्हणत ती मीटिंगरूम मधून बाहेर पडली.

तिच्या अशा वागण्याची कुणालाच काही कल्पना नव्हती. सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे काहीशा गोंधळलेल्या नजरेने पाहत होते. तोच ती परत आत आली आणि बॉसला म्हणाली, “आय नीड अ ब्रेक.” i need a break, i need a mental break

“येस, ऑफ कोर्स. जॉइन अस आफ्टर अ व्हाइल.” बॉस म्हणाला.

“अ हॉलिडे ब्रेक.” ती म्हणाली आणि बॉस तिला पाहतच राहिला. त्याचा होकार किंवा नकार न ऐकताच मग ती तिथून सरळ घरी निघाली.  a holiday break, need a mental break

 घरी येऊन तिने आपली बॅग भरली आणि स्वप्नीलला एक मेल केला. लिहिलं होतं- मला थोडा चेंज हवाय सो मी साताऱ्याला जात आहे. फार्म हाऊसवर. तीन एक दिवसांत परतेल. निर्विला विशालच्या आई-बाबांकडे सोडून जात आहे. जाता जाता मात्र ती ते खडा हरवलेलं विशालचं ब्रेसलेट न्यायला विसरली नाही. आणि स्वप्नीलच्या ड्रॉवरमधून देखील तिने काहीतरी आपल्या पर्समध्ये टाकले व तिने घर सोडले. बाहेर भाड्याची गाडी वाटच पाहत उभी होती.

सूर्य आता साताऱ्याच्या त्या पर्वतरांगेत लपाछपी खेळत असताना श्रेया फार्महाऊसवर पोहचली. उरमोडीच्या बॅकवॉटरला विशालचं एक टुमदार असं फार्महाऊस होतं. त्याची कल्पना फक्त तिला, विशालला आणि स्वप्नीलला होती. आठवड्यातून एकदा शेजारील गावातील एक बाई येऊन ते ती साफ ठेवायची.  

तिला सोडून ती कार परतीच्या वाटेला लागली. श्रेया दार उघडून आत आली तसा धरणाच्या पाण्यावरून वाहणारा थंडगार वारा आत शिरला आणि खिडक्यांच्या त्या झिरझिरीत पडद्यांशी खेळू लागला. तिच्या अंगाशी त्याने केलेल्या सलगिने तिचे बारीक लव क्षणार्धात उभे राहिले.

बेडवर पडून ती आता त्या ठिकाणी तिने व विशालने काही खाजगी क्षण तिथे व्यतीत केले होते ते आठवू लागली. ते क्षण आठवता आठवता मग तिचा कधी डोळा लागला कळले देखील नाही. बघता बघता त्या सांजेचे काळोख झाले. काळेकुट्ट!

दूरवर त्या खेडेगावातील घरांतील दिव्यांचा मिणमिनता उजेड त्या फार्महाऊसपासून नजरेस पडत होता. धरणाच्या मंद पण सततच्या त्या लाटांचा मधुर ध्वनि कानी पडत होता. फार्महाऊसचा परिसरदेखील काहीशा मंद प्रकाशाने थोडा उजळल्यासारखा दिसत होता.

अशातच तिथे एक कार येऊन थांबली. कारमधून एक इसम खाली उतरला आणि हातात काळी ब्रीफकेस घेऊन पावलांचा आवाज न करता आत जाऊ लागला. इकडे आतमध्ये श्रेया अजूनही बेडवर झोपलेली होती, मात्र कुणाच्यातरी येण्याची चाहूल लागल्याने ती पटकन जागी झाली.

त्या इसमाची ती पाठमोरी आकृती एकदम सावकाशपणे आत शिरली आणि तिच्या बेडरूमच्या दारावर येऊन उभी राहिली. दोनएक क्षण मग विचार करून त्याने त्या बेडरूमचे दार ढकलेले आणि तो आत शिरला. समोर पाहतो तर बेड रिकामा होता. त्याने मान न हलवताच मग आपली बुब्बूळे डावीकडे आणि उजवीकडे फिरवली. कुणीच नव्हतं तिथे. मग मागूनच श्रेयाने त्याच्या पाठीला एक काठी लावली आणि म्हणाली, “मला माहीत होतं तू येशील म्हणून!”

ती असं म्हणताच स्वप्नील स्मित करत मागे वळला आणि म्हणाला, “आय थॅाट, तुला सोबत करावी म्हणून..”

“कॉल तरी करायचा मग.”

“का कुणी दुसरं येणार होतं?” तो मस्करी करत म्हणाला; पण तिने त्याच्यावर असा काही कटाक्ष टाकला की त्याचे हसू ओठांतच गायब झाले. तो पुढे म्हणाला, “अगं कॉल करणार होतो पण मोबाइल ऑफिसातून निघतानाच डेड झाला. आणि बाय दी वे तुझा मोबाइल तर हरवला होता ना परवा अॅक्सिडेंटमध्ये? कसा कॉल करणार होतो मी?”

“हं, तेही खरंच आहे म्हणा! पण या ब्रीफकेसमध्ये काय आहे?” तिने कुतुहलाने विचारले.

“गेस?”

“अहं.”

फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे.” तो तिच्या कानात पुटपुटला. त्याला बाजूला ढकलत ती तिथून निघून बाहेर गेली. fifty shades of gray

मध्यरात्रीच्या त्या हाडे गोठवणाऱ्या थंडीत बाहेर शेकोटीने चांगलाच पेट घेतला होता. शेजारीच धरणाच्या उताराला कार लावून दोघेही कारमध्ये निवांत वाईन पीत बसले होते. पीता पीता स्वप्नील सारखा सारखा तिच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करत होता.

“स्वप्नील मला तुला काही सांगायचे आहे.”

“बोल ना.”

“थर्टी फर्स्टला माझा अॅक्सिडेंट झाला ना तेव्हा.” 

“तेव्हा काय?”

“त्या रात्री मी सेक्स केला होता.”

“सेक्स? कुणासोबत?” तो असा काही बोलला जणू एका झटक्यात त्याची नाशाच उतरली असावी.

“वि.. विशाल सोबत.”

“काय? कसं शक्य आहे ते. तो तर.. तो तर भारतात नाहीये पण.” विशालचे नाव ऐकताच त्याची मग उरली सुरली नशा देखील उतरली.

तिने मग ते ब्रेसलेट त्याच्यासमोर धरले आणि विचारले, “हे ओळखतोस?”

“ना.. नाही. कुणाचे आहे ते?”

मग तिने एक खडा त्याच्या समोर धरला.

“व्हॉट ईज धिस?” त्याने विचारले.

“यू टेल मी.”

“आय डोन्ट नो.”

“काल तुझ्या कारची चावी घेताना सापडला. या ब्रेसलेटचाच तो मिसिंग खडा आणि हे ब्रेसलेट विशालचं आहे. मग हा खडा तुझ्याकडे कसा स्वप्नील? सांग. डिड यू किल हिम?” ती रडत त्याला विचारत होती. तो काहीच न बोलता तसाच बसून होता.

“यू किल्ड हिम स्वप्नील. यू आर अ ब्लडी मर्डरर.”

“येस आय मर्डर्ड हिम. मी खून केला त्याचा. तो माझ्या आणि तुझ्या वाटेतला अडथळा होता. म्हणून त्याला संपवला मी. तुला मिळवण्यासाठी मी कोणत्याही थराला जायला तयार होतो आणि म्हणून मारला मी त्याला. मीच मारला.” 

“खूप नीच मनुष्य निघालास तू स्वप्नील. मी प्रेग्नंट असताना माझ्याशी तू लग्नाला तयार झाला. केवढा रेस्पेक्ट वाटला होता मला तुझा; पण शीss. तू तर माझ्या विशालला माझ्यापासून कायमचं दूर केलं. माझं सोड रे तू तर त्याला त्याच्या मुलीपासून, निर्विपासून देखील दूर केलं. मी तुला कधीच माफ करणार नाही स्वप्नील. मी तुला कधीच माफ करणार नाही. यू विल पे फॉर युवर सीन.नाऊ फील दी पेन!” असे म्हणत तीने कारची चावी काढून घेतली आणि बाहेर पडत कारचा हँडब्रेक खाली टाकत तिने तिचा दरवाजा बंद करून दिला.

सगळं इतकं पटकन झालं की स्वप्नीलला काहीच करायला वेळ मिळाला नाही. धरणाच्या उताराला कार असल्यामुळे ती आता हळू हळू वेग पकडू लागली आणि थोड्याच वेळात ती धरणात कोसळली देखील.

तिला आता मागील साऱ्या गोष्टी आठवत होत्या. ऐन साखरपुढ्याच्या दिवशी विशालचा निरोप घेऊन आलेला स्वप्नील, मी श्रेयाशी लग्न करायला तयार आहे असं म्हणणारा स्वप्नील आणि.. आणि तो खडा, त्याच्या ड्रॉवरमधील चावी घेताना ओझरता दिसलेला विशालच्या ब्रेसलेटमधला तो खडा. आणि या सगळ्याचा कारस्थानी स्वप्नील. सारं काही तिला आता स्पष्ट झालं होतं.

[समाप्त]

कथेचा आधीचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

न्यू इयर पार्टी नाईट भाग ५

न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night

आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

मॅरेज मटेरियल Marriage Material

मी मॅरेज मटेरियल mi marriage material

ती आणि ती A lady and a prostitute


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *