• Pune, Maharashtra
कविता
माझ्या प्रीत सजनी mazya preet sajni

माझ्या प्रीत सजनी mazya preet sajni

Spread the love

माझ्या प्रीत सजनी mazya preet sajni

आठवतंय का बघ तुला

माझ्या प्रीत सजनी

जोडी सफेद हंसाची

याच तळ्याठायी देखणी


देखणी तव तूही तितकीच

तितकीच सुंदर मोहिनी

हळुच हनुवटीला हात जाता

तू लाजून ओढलीस ओढणी


आठवतंय का बघ तुला

असंख्य अशा त्या चांदराती

अगणित प्रतिबिंबे चंद्राची

आपण होती पाहिली


याच तळ्याकाठी मग

कमळ फुलांच्या साक्षी

घेऊनी हात हाती

प्रेमगीते जी गायली


मधुर सुरांच्या कोकीळेने

तव साद होती घातली

ऐकण्या मग नर-नारीला

तळ्याकाठी वनचरे दाटली

mazya prit sajni marathi poem
mazya preet sajni marathi poem

विसरेन कशी मी प्रियतमा

ती भेट होती आगळी

उभयतांच्या प्रेमाला

फुटली होती पालवी


अशाच एका सांजवेळी

रातराणी होती फुलली

स्वप्ने तव मिलनाची

आपण होती पाहिली


मिनमिनत्या त्या काजव्यांच्या

सौम्य शितल प्रकाशात

तारुण्य होते दाटलेले

डोळ्यांत तुझीया साचलेले


हळुच तुझीया आडोशाला

उभी मग मी ठाकले

कमरेभोवती हात घेऊनी

बेभान तव मी नाचले


जन्मो जन्मीची इच्छा

फळास आज पावली

तू माझा सारथी

अन् मी तुझी सावली

-शिवसुत.

माझ्या प्रीत सजनी mazya preet sajni- खुप दिवसानंतर पुन्हा त्याच ठिकाणी भेट झालेले एक प्रेमी युगूल आपल्या जुन्या आठवणींत रमून गेलेले आहे आणि या कवितेच्या माध्यमातून ते त्यांच्या भावना कशाप्रकारे एकमेकांना सांगतात हे मी सांगण्याचा एक प्रयत्न केलं आहे.


Spread the love

4 thoughts on “माझ्या प्रीत सजनी mazya preet sajni

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *