
माती खाल्लेला माणूस: भाग १
माती खाल्लेला माणूस! Marathi Katha, Marathi story, marathi fiction
अगदी, दिवस सरू लागतानाच मी माझ्या त्या मोडकळीस आलेल्या स्प्लेंडरला splendor bike कुत्तुन किक मारली. कुत्तुन यासाठी, कारण त्याशिवाय ती चालूच होत नाही.
आता आता तर ती पेट्रोलपण जास्तीचं पिऊ लागली होती. मला मग राहून राहून वाटायचं की हिला इलेक्ट्रिकच electric bike करून टाकावी म्हणजे झंझटच नाही, च्यायला. चांगला मेकओव्हर makeover होऊन जाईल तिचा. एकदा केला होता असा प्रयोग. नाही असं नाही! हायड्रोजन- ऑक्सीजन फ्यूयल सेलचा; पण फसला. जाउद्या! hydrogen oxygen fuel cell

आता तसं पाहायला गेलं तर बरेच प्रयोग अजून बाकी आहेत माझे. गाडीच्या बाबतीत बोलतोय फक्त मी. नाहीतर तसाही मी बदनामच आहे माझ्या गावात! प्रयोगासाठी!
हल्ली मूलद्रव्यांची संरचना structure of element आणि बाकी बऱ्याच बाबींत मी लक्ष घातलंय. नाही असं नाही! अणूची सर्व एनर्जी atomic energy त्याच्या केंद्रकात एकवटली असून त्याचे केंद्रक centre of an atom हे प्रोटॉन proton आणि न्यूट्रॉन्सनी neutron बनलेलं असतं आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन electron revolves around the centre of an atom आपापल्या कक्षेत पिंगा घालत असतात. वगैरे वगैरे! म्हणजे त्यात अजून लै डिटेल मध्ये नाही गेलो; पण…
हे असं काही गाडीच्या चाकाच्या बाबतीत करता आलं तर? नाही म्हणजे जसे इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती फिरतात तसे आपल्या गाडीचे चाक फिरवले तर? पण ही माझी एक भ्रामक कल्पना असावी बहुतेक! इंधनाचा प्रश्न पुढेमागे निघेल निकालात.
मागे एकदा तरुण भारत वाचताना एक बातमी वाचली होती. लिंबू अण्णाची! मी त्यांना त्याआधी कधी पाहिलं नव्हतं मुळात ना आमच्या आसपास कुणी लिंबू अण्णा आहेत याची मला कल्पना होती; पण जेव्हा मागच्या महिन्यात पुन्हा त्यांचीच बातमी एका वेगळ्या कारणाने वाचायला मिळाली आणि मग मी त्यांच्याशी जोडला गेलो.
कारखाना पाटी सोडली की खाली दोनेक किलोमीटर गेल्यावर कौठुळी गाव लागतं. गाव सोडलं की पुढे माणगंगेचं पात्र लागतं. मला तिथं जायचं होतं. लिंबू अण्णा तिथे राहत होते. नदीपात्र ओलांडलं की पलीकडे लोटेवाडीची स्मशानभूमी आहे आणि तिच्या वरच्या अंगालाच त्यांची झोपडी! एकटेच राहायचे त्यात ते!
नदीच्या अलिकडे असलेली कौठुळीची स्मशानभूमी पार करून मी नदीच्या पुलावर लागलो. खाली गुडघाभर पाण्याची धार वाहत होती आणि त्या धारेत मला लोटेवाडीच्या स्मशानभूमीत पेटलेल्या चितेची ज्वाळा हेलकावताना दिसली.
नुकतंच अंधारू लागल्यामुळे एखाद्याला ओळखायला अवघड गेलं असतं; पण लिंबू अण्णा त्या पेटत्या चितेचे सरपण सारत होते.
पाठीला चांगलाच पोक आलेला त्यांच्या, शरीरकाठीही दिसायला तशी नाजुकच. सुरकुतलेली काळी त्वचा, मानेपर्यंत लोंबणारे अस्ताव्यस्त असे पांढरे केस, डोळ्याच्या खोबणी झालेल्या आणि दालफाड पुरतं आत गेलेलं, ज्यावर कुठे कुठे पांढरे दाढीचे खुंट वाढलेले. कमरेला एक फाटकं धोतर ल्यायलेले लिंबू अण्णा कुणी एखाद्या अपरिचिताने पाहिले असते तर नुकतंच त्या चितेवरून उठलेलं भूतच वाटले असते ते!
मी स्मशानभूमीलगतच्या रस्त्याने गाडी त्यांच्या झोपडीकडे नेली. चढण चढून गाडी खोपेसमोर एका स्टँडवर उभी करून मी खाली उतरलो आणि मागे पाहतो तर लिंबू अण्णा मागेच उभे! चितेच्या आगीच्या धगेने डोक्यातून लागलेल्या घामाच्या धारा त्यांच्या तोंडावरून खाली गळ्याच्याही खाली वाहत्या झाल्या होत्या आणि मग त्या छातीवरील वेड्या-वाकड्या अशा पांढऱ्या केसांतून खाली झिरपत होत्या.
“जरा लवकरच आलास?” माझ्या नजरेस नजर भिडवत त्यांनी विचारलं आणि माझं उत्तर न ऐकताच ते झोपडीत शिरले.
“मला.. वाटलं.. उशीर..” माझं ऐकायला ते कुठे थांबले होते म्हणून मी पुढे काही बोललो नाही. माझी नजर मग झोपडीच्या दरात निवांत पडलेल्या त्यांच्या कुत्र्याकडे गेली. मला आलेलं पाहून त्याने आपली मान वर केली आणि मी आहे कळताच पुन्हा टाकून दिली!
झोपडीही काही तशी मोठी नव्हती त्यांची. एकट्या माणसाला अशी किती मोठी जागा लागणार आहे? आणि त्यात असा लिंबू अण्णासारखा एखादा असेल तर..
मी झोपडीच्या दारातून वाकूनच आत शिरलो. ते आत त्यांच्या काळ्या घोंगड्यावर बसून एका कापडी पिशवीतली पांढरी राख एका पुडीत बांधत होते. अंगारा होता तो!
लोक म्हणायचे, लिंबू अण्णा साधासुधा माणूस नाही. त्याला कसल्यातरी दैवी शक्ती ज्ञात प्राप्त आहेत. आपली चाळीस वर्षांपूर्वी आपली बायको मेल्यावर ते इथे मसनात आले ते माघारी गेलेच नाहीत. मग इथेच एक झोपडी करून राहिले. सुरवातीला तर ते असेच उघड्यावर राहत होते, लोक म्हणायचे.
लोकांना ते का कुणास ठाऊक वेडे वाटायचे, मला कधीच ते तसे वाटले नाहीत. निदान महिनाभराच्या ओळखीत तरी. कौठुळी आणि लोटेवाडी सोडून बाकीच्या गावातील लोक तर त्यांच्याबद्दल भलतेच बोलायचे. जसे की- त्यांना काळी जादू प्राप्त आहे, ते मढयाशी बोलतात, ते जो लोकांना अंगारा म्हणून देतात तो अंगारा दुसरं तिसरं काही नसून मढयाची राख असते. खरंतर तो अंगारा तर असतो की अजून काही. वगैरे वगैरे! त्यात आणखी भर म्हणजे ते जळक्या मढयाचे मांस खाणारे खवीस आहेत अशी काही लोकं दबक्या आवाजात चर्चाही करायची! नाही असं नाही! आणि म्हणूनच एवढ्या उत्सुकतेपोटी मी तेव्हा त्यांच्यापर्यंत आलो.
हा, आता त्यांच्या बाबतीत एक बाब खरी होती आणि ती म्हणजे की एखाद्याच्या तेराव्याला ठेवलेले ताट तेच खायचे. नाही म्हणजे मीच त्यांना प्रत्यक्षात पाहिलं होतं खाताना. तेही पहिल्यांदा त्यांच्याकडे आलेलो तेव्हाच! आणि मला, नाही म्हणता लोकांच्या तशा बोलण्याची खात्रीच झाली होती; पण नंतर नंतर तीही नाहीशी झाली. पण शेवटी मन म्हणजे सैतानाचं घर, मग राहून राहून शंका मात्र येत राहायच्या!
“काय होतंय म्हणाला?” लिंबू काकांनी माझ्याकडे उठून येत विचारलं.
“अलिकडं पोटात कळ येऊन भयानक वेदना होतायत. कालच बोललो की.” मी म्हणालो.
“हं.” दीर्घ श्वास सोडत त्यांनी ‘हं’ केलं आणि ते पाठमोरे झाले. पाठ खपल्या पडू लागलेल्या रानासारखी झाली होती त्यांची. राठ आणि निस्तेज!
कोपऱ्यात ठेवलेल्या एका काळ्या लोखंडी पेटीजवळ जाऊन ते उभे राहिले आणि काही क्षण त्यांनी तिला निरखून पाहिले, नंतर माझ्याकडे एक मोकळी नजर टाकून त्यांनी वाकून ती पेटी उघडली आणि त्यांनी त्यातून एक मळकटलेली तांबडी थैली काढली आणि काहीतरी स्वत:शीच पुटपुटत त्यांनी अगदी एकच चिमट त्यातून काढली.
ती तांबडी थैली त्या पेटीत परत ठेवून देऊन ते आजूबाजूला काहीतरी शोधत माझ्याकडे आले.
“कागदाचा तुकडा दिसतोय का बघ.” ते म्हणाले. मी आजूबाजूला एखादा कागदाचा तुकडा मिळतोय का ते पाहू लागलो. एका ठिकाणी तो मिळाल्यावर तो घेऊन मी मागे वळलो तर ठीक मागेच लिंबू अण्णा आपल्या डोळ्यांसमोर कागद धरून ती चिमटीतली माती त्यावर ओतत होते. मी काहीसा दचकलोच! नाही म्हणायला काहीतरी दैवी जादू तरी अवगत असल्याची शंका घ्यायला वाव होताच! नाही असं नाही!
“डाक्टर काय म्हणाला?” त्यांनी विचारलं.
“जगत नाय म्हणाले ती.” मी हताश स्वरात म्हणालो.
“हं.” ते मान हलवत एवढंच म्हणाले आणि गप्प झाले.
“जगंल का ती?” मी भाबड्या चेहऱ्याने विचारले.
“चांगलं बेंबीत बोट घालून लाव म्हणावं.” माझ्या प्रश्नाला उत्तर न देताच ते म्हणाले; पण मला ते किळसवाणं वाटलं. मी तशाच तोंडाने पुटपुटलो, “बेंबीतच?”
“होय. त्याशिवाय तो आजार बरा नाही होणार.” ते कागदाची पुडी बांधत म्हणाले. त्यांनी आजार बरा होणार म्हटल्यावर मला थोडं हायसं वाटलं.
“बरं.” म्हणून मी त्यांनी माझ्यासमोर धरलेली ती पुडी घेतली आणि वरच्या खिशात टाकली आणि ‘येतो’ म्हणून त्यांना निरोपाचा हात केला.
“खाऊन जा पोटाला.” ते म्हणाले.
“नकू लै वेळ झाला की आय वाट बघत बसंल. घरी जाऊनच खातो.” मी म्हणालो.
“शिजलंय. थांब आलो घेऊन.” असे म्हणत ते माझ्या प्रतिसादाची वाट न बघता ताडकन झोपडीच्या बाहेर पडले आणि दुसऱ्याच क्षणाला हातात काहीतरी घेऊन आले. बाहेर अंधार असल्यामुळे लांबून मला निटसं दिसलं नाही.
आगीवर खुसखुशीत भाजलेला मोठाला मांसाचा तुकडा त्यांनी आणून परातीत ठेवला. चांगला मोठा होता तो. हळद आणि तेल-मीठ लावलेला. आणि भाजक्या मांसाला वास देखील चांगलाच सुटला होता. एकवेळ खायची इच्छा झाली देखील; पण..
बाहेर, तिकडे बाहेर एक मढं जळत होतं आणि बाहेरूनच लिंबू अण्णांनी तो तुकडा आणला होता. मला एकवेळ खात्रीनं वाटलं की हा म्हातारा नक्कीच खवीस आहे. आणि ह्येच्या आयला ह्येच्या, आता मला पण तो खवीस बनवणार की काय. माझ्या चेहऱ्यावरचे तसे भाव नेमके टिपत ते मग मला म्हणाले, “बोकडाचं हाय.” त्यावर मी गप्पच राहिलो. मला काय माहीत ते कशाचं आहे? आणि म्हातारा म्हणतोय म्हणून मी का बरं विश्वास ठेवायचा? मी आपला माझ्याच विचारात होतो.
“मढयाचं नाय. लोटेवाडीस्न जत्रा करून जाताना एकजणानं दिलं. म्हटला अर्धं म्हसोबावर खाऊन अर्धं माघारी नेत होतो तर वाटेत मढं जळत होतं. असं नेऊ नये म्हणून त्यानं सगळं इथंच ठेवून दिलंय.”
तोवर त्यांचा कुत्रा वासाने आत आला. अण्णाने एक तुकडा त्याच्या पुढे ठेवला. कुत्रा त्यावर तुटून पडला. माझं काही मन झालं नाही खायचं. मी तिथून निघालो!
नंतरचे चारेक दिवस मला काही अण्णांकडे जाणं झालं नाही. त्यांनी दिलेल्या त्या वेगळ्या अंगाऱ्याने आईला मात्र चांगलाच फरक पडला. अंथरुणावर उलथी पालथी होणारी ती आता म्हशीचं शानघाण ते पार रानात खुरपायला जात होती.
लिंबू अण्णांच्या कानांवर ही गोष्ट घातली पाहिजे असा विचार त्या दिवसांत मनात खूपदा आला माझ्या. नाही असं नाही; पण माझ्या उद्योगांमुळे ते राहूनच गेलं.
तसंही लिंबू अण्णांच्यात काय होतं काय माहिती पण दिवसातून एकदा तरी त्या माणसाकडे जाऊन यावं असं वाटायचं. मी नसलो म्हणत तरी आई अधून मधून म्हणायची मला, त्या लिंब्या म्हाताऱ्याकडे जायला लागल्यापासून माझं वागणं बदलंय म्हणून! होय ती त्यांना लिंब्या म्हाताराच म्हणायची. त्यांच्या त्या अंगाऱ्याने ठणठणीत बरी होऊन देखील!
त्या दिवशी रविवारचा दिवस असल्यामुळे मलाही काही काम नव्हतं. रानातल्या कामांमुळे काल, शनिवारी मला बाजारला जायला जमलं नव्हतं म्हणून आईने भाजीला काही माळवं मिळतंय का बघ म्हणून आटपाडीला धाडलं.
स्प्लेंडर बाजार पटांगणात उभी करून मी हातात वायरची पिशवी घेऊन आत शिरलो. उन्हातून आल्यामुळे आत शिरताच त्या अजस्र चिंचांच्या गार सावलीत गेल्यावर मला एका दुसऱ्याच जगात आल्यासारखं वाटलं. एका विलक्षण अनुभूती टाईप! गारेगार!
पण क्षणातच का कुणास ठाऊक, मला असं जाणवलं की कुणीतरी मघाचपासून माझ्या पाळतीवर आहे. माळवं घेता घेता पुढं जात असता मी दोन-तीनदा मग सर्रकन मागे वळून देखील पाहिलं; पण कुणीच नव्हतं. हे आपलेच भास असावेत म्हणून मग मीही मनाला समजावले. तोच कुणाचा तरी हात माझ्या खांद्यावर पडला आणि मी दचकलोच!
“अरे, दचकायला काय झालं एवढं, संतोष?” पाटील डॉक्टर म्हणाले.
“त्..तुम्ही हाय व्हंय,डॉक्टर.” मी म्हणालो.
“हाहा.. मग तुला कोण वाटलं?” त्यांनी विचारलं.
“काय नाय, ते आपलं….पण तुम्ही आज कसं काय?” मला काय आणि कसं बोलावं सुचेना.
“का? डॉक्टर लोक काय मग गोळ्यांवर जगतात का काय?” त्यांनी हसतच मला प्रश्न केला.
“नाही म्हणजे बाजार काल झाला म्हणून..”
“काल सांगलीला गेलो होतो ना. म्हटलं आज करू बाजार. बरं ते जाऊ दे, आता भेटला आहेस तर चल घरी. जेवूनच जा. हे बघ मस्तपैकी मटन घेतलंय आज.” ते आपल्या हातातल्या कापडी पिशवीतील मटनाची पिशवी दाखवत म्हणाले.
“नाही, नको. मी पण जाताना मटन न्यायच्या विचारात होतो. लै दिवस झालं शिजवलं नाय. म्हटलं आय पण..” मी पुढे काही बोलणार तोच ते माझं बोलणं थांबवत म्हणाले, “अरे, बरं झालं आईचा विषय निघाला. कशी आहे तब्येत? नाही म्हणजे काही त्रास वगैरे नाही ना?”
“त्रास मागच्या आठवड्यात लैच झाला. रातच्याला पार उलथीपालथी होत हुती.”
“हं. असल्या केसेस मध्ये होतं असं.” ते मला समजावत माझ्या खांद्यावर हात दाबत म्हणाले.
“खरंच काय होणार नाय का? नाय म्हणजे तो अंगारा.. ” विचारताना माझ्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.
हातातील पिशवी सावरत ते माझ्या खांद्यावरचा हात तसाच ठेवत म्हणाले, “बघ संतोष, तिची ही लास्ट स्टेज आहे. मी तुला आधीच सांगितलंय यात काही होऊ शकत नाही.”
“पण तिला आता बरं वाटतंय. अंगारा लावल्यापासून ठणठणीतय ती.” मी थोडा आवेगानेच म्हणालो. आईचं काही होऊ शकत नाही याचा मला थोडा रागच आला होता.
“अरे पण या धूप-अंगारे, श्रद्धा- अंधश्रद्धा वेगळ्या गोष्टी आहेत रे. मेडिकल सायन्स medical science याहीपेक्षा प्रगत नी खूप पुढचं आहे. आणि तेच सत्य आहे.” ते मला समजावत म्हणाले व पुढे म्हणाले, “निदान तेवढं समजण्याइतपत ज्ञान तुला तर नक्कीच आहे.”
मग मी गप्प राहिलो. खाली मान करून मी माझ्या हातातील वायरच्या पिशवीतील ती हिरवी भाजी पाहत राहिलो.
मग मटन घ्यायला गेल्यावर बॅरीस्टरने वर लटकावलेल्या बोकडाच्या आडून अर्धा किलोची मटणाची काळी पिशवी हातानेच पुढे केली. ती घेऊन आपल्या बाजारच्या पिशवीत टाकताना मला कुणीतरी आपल्या पाळतीवर असल्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. मी झपकन वळून पाहिले तर तसं शंका घ्यावं असं कुणीच वाटलं नाही.
तरीही गाडीपर्यंत जाईपर्यंत नाही म्हटलं तरी मी दोनेकदा तरी मागे वळून पाहिलं होतं. नाही असं नाही. पिशवी गाडीच्या हॅंडलला अडकवून मी गाडीला चावी लावतो न लावतो तोच मागून खांद्यावर कुणाचा तरी हात माझ्या खांद्यावर विसवला. मजबूत वाटला तो हात. तर कुणीतरी पाळत ठेऊनच होतं माझ्यावर!
त्या दिवशी दुपारी मस्तपैकी झणझणीत माणदेशी मटन रस्सा खाऊन पार दिवस मावळेपर्यंत झोपून राहिलो. मग अचानक विजय सरांची आठवण झाली आणि मी पटापट तोंड धुवून, आवरून अंधार पडण्याच्या वेळेला घरातून बाहेर पडलो. आई मागे पीठ का काय आणायचं आहे असं ओरडून बोलल्याचं कानी आलं.नाही असं नाही. मी मात्र गडबडीत असल्यामुळे नुसता स्प्लेंडरवरून हात केला आणि तसाच निघून आलो.
विजय सर, हायस्कूलला असताना मला सायन्स science शिकवायचे. कदाचित त्यामुळेच मला असले काहीबाही प्रयोग करायची सवय लागली असावी; पण दुर्दैवाची बाब ही होती की माझ्या कोणत्याच प्रयोगाला अजून यश मात्र मिळाले नव्हते. ना मला कसला शोध लावता आला होता.
पण महामहीम थॉमस एडिसनचा Thomas Edison आदर्श ठेवलेला मी मात्र काही ना काही कुट्टाने करीतच होतो. कुट्टाने यासाठी की, बिना फळाचे काही उद्योग केले तर लोकच म्हणायचे की काहीतरी कुट्टाने करीत असतो म्हणून. आणि मग एक वेळ येते की आपल्याला लोकांच्या म्हणण्याचा, न म्हणण्याचा झाटा फरक पडत नाही. मी तर मग फरक न पडण्याच्याही पुढे आलो होतो. त्यांच्या आयला त्यांच्या!
“तु म्हणतोय ते म्हणायला सोप्पं आहे; पण प्रयोगानं ते शक्य नाही होईल. निदान मला तर असंच वाटतं.” विजय सर आपल्या आराम खुर्चीतूनच म्हणाले. रिटायर होऊन बरीच वर्षे झाली ना. आता तेही थकले होते. “तरी तुला सांगत होतो, बारावी नंतर पुढे किमान डिग्री तरी घे म्हणून. फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्ही पण चांगलं होतं तुझं. काहीतरी करू शकला असता रे.”
चला म्हणजे यांच्या लेखी देखील आपण काहीच न करणारे होतो! आपण एवढे उपद्व्याप करून ना ना प्रयोग करतो आणि कुणालाच त्याचं काहीच वाटत नाही याचं मला थोडं वाईट वाटलं. नाही असं नाही; पण मग शेवटी तोच विचार की, रिझल्ट.. रिझल्ट मॅटर करतो ना! असो! result matters!
“तु वाईट वाटून नकोस घेऊ पण तूच सांग, की मूलद्रव्याच्या अणूच्या कक्षेत इलेक्ट्रॉन त्याच्या केंद्राकाभोवती फिरत असतात तसं नेमकं तु काय फिरवणार तुझ्या गाडीच्या चाकाच्या केंद्राभोवती?” सर बोलले. मी मात्र माझ्याच विचारात असल्यामुळे काहीच न बोलता गप्प राहिलो. मला माझाच विचार खूप पुळचट वाटला. असं कसं बाह्य बळाशिवाय चाक फिरणार होतं?
मी म्हटलं, “मग ग्रहांच्या गतीचा नियम वापरुन तर..?”
“गुरुत्वीय बल? चाक करणार का या नियमावर काम?” gravitational force
“का नाही, काहीतरी मार्ग असेलच की?” मी त्यांच्या संयमाची जणू परिक्षाच घेत असल्यासारखा प्रश्न केला.
“पहा मग सापडतोय का ते.” ते म्हणाले.
असं नव्हतं की मी शाळेत असताना खूप हुशार वगैरे होतो; पण विज्ञानाच्या बाबतीत कमालीची उत्सुकता होती माझ्या मनात; पण नुसती उत्सुकता काय कामाची? त्यातून काही फाजील शोध लावायचे विचार मनात येत असतील तर ठीक. पण त्या विचारांचे फलीतही व्हायला हवं. नाहीतर मूळ संकल्पना बाजूला राहून माणूस मनाच्या कल्पना सत्यात आणण्याचा प्रयत्न करू लागतो आणि मग ती कल्पना जरी बिनबुडाची असेल तरीही ती त्याला अस्सल आणि एकमेव वाटू लागते. कधी कधी माझाही प्रवास तसाच सुरू असल्यासारखं वाटायचं, नाही असं नाही!
एके रात्री आईच्या पोटात पुन्हा जोराचं दुखू लागलं आणि ती वाकळेवरच हातपाय झाडू लागली. मी अंगावरची चादर बाजूला करून तिच्याजवळ जाऊन बसलो. अशावेळी सुचायचं बंद होतं. कुणीतरी जिवाच्या आकांताने विव्हळत असतं आणि आपण काय करू काय करू या विचाराने नुसते हतबल होऊन जातो. मला मग डॉक्टरचे ते शब्द आठवले- थोडेच दिवस शिल्लक आहेत त्यांच्याकडे!
मी झटकन तिथून उठलो आणि जाऊन दिवळीत ठेवलेल्या तिच्या गोळ्यांच्या पिशव्या चाळू लागलो. वेदनेने ती मात्र अजून तशीच या अंगावरून त्या अंगावर होत होती. मी घाबरून थरथरत्या हाताने गोळ्यांचे एकेक पाकीट पिशव्यांतून काढत होतो नी परत आत टाकत होतो.
“आरं त्या गोळ्या पेटू देत तिकडं. अन् त्या लिंब्या म्हाताऱ्यानं दिलेला अंगारा आन हिकडं.” ती अंथरूनावरूनच मान उचलून हातवारे करत म्हणाली. मी मग हातातल्या गोळ्यांच्या पिशव्या तशाच आत दिवळीत सारून दिल्या आणि ती अंगाऱ्याची पुडी शोधू लागलो.
आईपासून गर्दीत हरवलेल्या एखाद्या लहानशा पाटराप्रमाणे मी पुडीच्या शोधात नुसता इकडे तिकडे करत होतो. तिला असं काय व्हायला लागलं की माझ्या हातापायातून तर वारंच जायचं. गडबडूनच जायचो मी.
“आरं त्या पिठाच्या डब्याआड सारली हुती पुडी. बघ आसंल तिथं.” ती वेदनेनेच बोलली. मी पटकन तो पिठाचा डब्बा बाजूला सारून त्याआडची ती पुडी काढून घेतली आणि तीन ढेंगातच आईजवळ पोहचलो.
ती म्हणाली, “तूच लाव.”
तिची वेदना मला सहन होत नव्हती. ती कसं काय सहन करत होती देवालाच ठाऊक. मी पुडीतला सगळा अंगारा हातात घेऊन तिच्या बेंबीत सोडला आणि तिचं पोट चोळू लागलो. तिच्या पोटात मला काहीतरी टणक असं जाणवलं. आयघाला कॅन्सरच आसंल तो! त्याच्यायला त्याच्या!
“हं.. आता जरा बरं वाटतंय. अजून, अजून अंगारा लाव.” वेदना थोडी कमी होऊ लागताच ती म्हणाली.
“सगळी पुडी संपली अगं.” मी तिचे पोट चोळत म्हणालो.
“काय बी म्हण संज्या, तुझ्या त्या लिंब्या म्हाताऱ्यानं दिलेल्या अंगाऱ्यानं बरं वाटतंया बघ.” ती म्हणाली. तिचं दुखणं कमी होतंय हे पाहून मला थोडं हायसं वाटलं; पण लिंबू अण्णांनी दिलेली पुडी संपली होती. मागच्या आठवड्यात मला तिकडे काही फिरकणे झाले नाही ना या आठवड्यात. मात्र निदान तो अंगारा आणायला तर आता मला त्यांच्याकडे जावे लागणारच होते. नाही असं नाही.
“न्हवं, ती अंगाऱ्याची राख मढयाची असती ते खरं हाय वी?” आईनं विचारलं.
“काय आये, लोकं म्हणत्याती अन् तू विश्वास ठेवती. राख नाय कायतर दुसरंच हाय.” मी म्हणालो.
“काय हाय?” तिनं बारीक आवाजात कुतुहलाने विचारले.
“काय माहीत.”
“तू ईचारलं न्हाईस का?”
“लिंबू अण्णा नाय लै बोलत.”
“माणूस हाय का पीडा हाय.”
“ये जा बघून.”
“त्येला बघायला आता मसनात जावं लागंल.”
“काय बी काय बोलती गं आये? दुखायचं राहिलं असंल तर झोप आता.” मी मग रागावल्यासारखं बोललो तिला. ती म्हणाली, “बेंबीजवळ हलक्या हातानं जरा चोळ अन् झोप मग. आता बरं वाटतंय मला.”
त्या टंगस्टनच्या धुरकटलेल्या बल्बच्या उजेडात मी तिचं पोट चोळत असताना पाहिलं. तिच्या बेंबीच्या खळग्यात अंधार होता. मी मनाशीच बोलू लागलो- या खळग्याच्या पल्याड नऊ महीने मी सुप्त पडून होतो. इथं, पृथ्वीवर यायच्या पण आधी मी तिथं आलो होतो. तिथलं माझं आयुष्य मात्र नऊ महिन्यांचंच पण. मग इथलं. आता इथलं किती वर्षांचं असेल काय माहिती. तिथून मग एक अदृश्य नाळ पुन्हा एका दुसऱ्याच जगात नेईल मला. हे असं निरंतर चालू राहील. निरंतर. शून्यात अडकल्यागत? की कुठल्या तरी एका दिशेने? की विश्वाच्या केंद्रकाकडे? सर्व ऊर्जा अखेरीस तिथे तर नसेल एकवटत?
तिच्या बेंबीचं ते खळगं आता मला एखाद्या विवराप्रमाणे भासू लागलं. कृष्णविवर जणू! वाटलं ते विवर आता पोटावर फिरणारा माझा हात आतमध्ये ओढून घेईल की काय. जिथून या जगात प्रवेश झाला तिथेच घेऊन जाईल परत. आतलं विश्व मी ओळखू शकेल का आता? की असेल तिथे तो गोळा कॅन्सरचा, आतल्या आत माझ्या आईला मारणारा?
“चल मला घेऊन आत, चल विवरा. बघू कसा मग सोडत नाय माझ्या आईला. तुझ्या आयला तुझ्या कॅन्सरच्या. चल चल घे मला आत. आयघाल्या कॅन्सरला…” मी झोपल्या जागी चावळत होतो आणि लिंबू अण्णा मला हलवून हलवून जागं करत होते. “झालास का जागा पोरा? जागा हो. आरं पोरा. अय?” ते बोलत होते. cancer
“आरं चल घेऊन मला आत. घाबरतूय का काय कुणाला? चल!” मी ओरडून ओरडून म्हणत होतो आणि लिंबू अण्णा माझ्या गालावर बारीकपणे मारत मला जागं करीत होते.
“लिंब्या म्हाताऱ्या? तुझ्या आयला तुझ्या कुठं गेलतास रं?” मी एखाद्या भयावह स्वप्नातून थोडा जागा होत त्याला म्हणालो. म्हणालो कसला? मी त्यालाच जिवाच्या आकांताने गदागदा हलवून म्हणू लागलो. रडू लागलो. थोड्याच वेळापूर्वी मी घरात आईच्या बाजूला होतो आता इथे होतो. मी भेदरलो होतो. काहीच सुचत नव्हतं. मी लिंबू अण्णाला आरेतुरे केलं होतं आणि त्यात त्यांना एक शिवी पण देऊन टाकली होती!
“आरं पुरता जागा हो पोरा.” लिंबू अण्णा मात्र शांत आणि मऊ शब्दांत मला पूर्णतः जागं करत होते. मी त्यांच्या झोपडीत होतो. अंगारा न्यायला आलेलो. पण लिंबू अण्णा नसल्यामुळे त्यांची वाट पाहत आत बसल्याजागीच मला डुलकी लागली होती.
मला दरारून घाम फुटला होता. तोंडाला कोरड पडली होती आणि पोटात भुकेनं नुसता हैदोस घातला होता. डोकं ठणठणत होतं आणि मी अजून लिंबू अण्णाला ‘तू कुठे गेलतास, कुठे होतास तू?’ हेच विचारत होतो.
“पहिला तू थाऱ्यावर ये बघू पोरा. वायसा शांत हो.पाणी देऊ का तुला? थांब पाणी देतो.” ते म्हणाले.
“पाणी कसला देतोय म्हाताऱ्या? मला तो अंगारा दे लगा. आय मरंल लगा माझी” मी त्या पेटीकडे पाहत तिकडे हातवारे करत म्हणालो.
“तिला मरून तीन महिनं झालं पोरा!” ते कोरड्या स्वरात म्हणाले. वाळलेली भाकरी पाय पडताच तुकड्यांत तडतड तुटावी तसं माझं काळीज तुटलं. मी तुटलो. विखुरलो!
“आई गेली. हं. गेली.” मी भुईवर सपशेल लोळून रडू लागलो.
[पुढे सुरू राहील..]
हे पण वाचा:
आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.
व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १
लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
मराठी कविता, marathi poems, marathi kavita ,
People also search for-