• Pune, Maharashtra
कथा
मॅरेज मटेरियल Marriage Material

मॅरेज मटेरियल Marriage Material

Spread the love

मॅरेज मटेरियल Marriage Material

  marriage material- नुकताच ग्रामसेवक झालो होतो आणि पंढरपुरकडच्या दोन गावी रुजूही झालो होतो. आटपाडीहून रोज ये जा करणं शक्य नसल्यामुळे पंढरपुरातच सांगोला चौकात स्वेरीच्या विद्यार्थ्यांसोबत तिथे मी स्वतःला अॅडजस्ट करून घेतले होते. मॅरेज मटेरियल Marriage Material

आता स्वेरीचे विद्यार्थी म्हटले तर त्यांची डोळ्यांपुढे एक छबी राहते उभी. पायांत बूट, एकसारखा युनिफॉर्म, गळ्यात टाय आणि वेळेचे बंधन. पण मी तर त्यांच्यासोबतच राहत असल्यामुळे मला आणखी थोडं जास्तीचंच माहिती! time management skill

सतत त्या कडक शिस्तीची तक्रार करणारे, उठ की सूट कारकुनी काम करत बसलेले, रविवारच्या दिवशी कॉलेजात जाताना त्याचा उद्धार करणारे, सतत काही ना काही दंड भरणारे. विशेष म्हणजे कॉलेज गॅदरिंगला college annual function नाचताना मुला-मुलींच्या हातांचा परस्परांना स्पर्श होऊ नये म्हणून एकमेकांच्या हातात रुमाल देऊन नाचणारे. म्हणजे धन विद्युत प्रभार आणि ऋण विद्युत प्रभार यांच्या दरम्यान इलेक्ट्रॉन electron वाहायचेच नाहीत कधी! मी गेलो होतो ना एक- दोनदा पहायला. चोरूनच! पण त्यातही जे काही सुपर कंडक्टर super conductor असायचे त्यांना खरी दाद दिली पाहिजे! आणि इतकं सगळं असून पण अख्ख्या सोलापूर विद्यापीठात आपल्या शिस्तीचा नी गुणवत्तेचा डंका वाजवणारे असे तिथले विद्यार्थी!

marriage material
marriage material, pictures are for illustration purpose only

खोली मोठी असल्यामुळे त्या चौघांसोबत साधून घ्यायला मला तशी फारशी काही अडचण झाली नाही. नाही म्हटलं तर त्यांच्या त्या रायटप आणि असाईनमेंटचा assignments पसरा खूपच व्हायचा; पण चालायचं! इंजिनिअरिंगचे विद्यार्थी म्हटलं की ती बाब दुर्लक्षित केलेली केव्हाही चांगली. नाहीतर मला भीती असायचीच की इतक्या सगळ्या रद्दीत ते मला कधी भरून नेतील आणि विकून येतील हे मलाच काय पण तिकडे आटपाडीला राहणाऱ्या माझ्या घरच्यांना देखील ठाऊक होणार नाही.

एकदा तर त्यांनी कहरच केला. गावकऱ्यांचे दाखले मी माझ्या चटईवर ठेवून आंघोळीला गेलो होतो. गेले ना घेऊन हे लेकाचे आणि असाईनमेंट म्हणून जमाही करून आले. खरा कहर तो नव्हताच मुळी. तो तेव्हा झाला जेव्हा त्यांनी त्यावर शिक्षकाच्या स्वाक्षऱ्या घेऊन ते परत देखील आणले! आता गावकऱ्यांना हे असले दाखले देणार होतो का मी?

मी तर त्यांना कधी कधी फिरकी घेताना मोहब्बते पिक्चरातील त्या चार पोरांची उपमा द्यायचो. हा, आता त्यांच्या आयुष्यात तशा नट्या नव्हत्या तेव्हा कोणी! असतीलही; पण कॉलेजच्या त्या शिस्तीपुढे त्या कधी पुढे आल्याही नसतील. पण मी मात्र त्यातला शाहरुख मुळीच नव्हतो बरं. कारण आपल्या डोक्यावरील त्या काळ्याभोर जंगलाला समोरून अगदी डावीकडून नी उजवीकडून समान तोड लागली असल्याची चांगलीच कल्पना मला होतीच!

पण वाटायचं कधी कधी. इंजिनिअरिंग engineering admissions करायला हवं होतं; पण जेव्हा त्याच इंजिनिअर पोरांचे बाप आपल्याकडे दाखले मागायला अगदी नामदेव पायरीपर्यंत भेटायला यायचे तेव्हा मात्र मी माझ्या त्या विचाराला अगदी पुढेच म्हणजे चंद्रभागेतच जलसमाधी द्यायचो! कित्येकदा!

कारण, या ना त्या कारणाने सतत इंजिनिअरिंग न केल्याचे शल्य वाटत राहायचं. आपण ढ होतो असाही काही भाग नव्हता. बारावी सायन्सच्या क्लासमधील सुजाता. माझी क्रश म्हणा हवी तर. आम्ही मात्र तिला तेव्हा मॅम म्हणायचो. हुशार होती म्हणून की काय कुणास ठाऊक. बाकीच्यांचे मला माहीत नाही; पण माझ्यासाठी ती मॅरेज मटेरियल अर्थात मॅम होती. आणि म्हणून मी पण मॅम म्हणायचो.

तर तिने नंतर स्वेरीला इंजिनिअरिंगसाठी अॅडमिशन घेतले होते. तेही एक कारण असावं बहुतेक सारखं सारखं शल्य वाटण्याचे. पण आता एकंदरीत तिथले वातावरण कळाल्यावर मात्र माझ्या त्या शल्याची तीव्रता काहीशी कमी झाली होती. म्हणजे फार फार तर मी तिच्या हाती रुमाल थामवण्यापर्यंत मजल मारली असती. मी काही सुपर कंडक्टर नव्हतोच मुळी!

“चला, चला. आटपाडी आटपाडी.” एसटी कंडक्टरच्या जोरदार आरोळीने मी भानावर आलो. एसटीच्या दारातून खाली झुकत तो जोरजोरात ओरडत होता.

आज महिन्याची एकादशी असल्याने गाडीत गर्दीही जोरदार होती. अर्थातच मी मागे बसलो होतो. तसंही मी एसटीत फार तर दहा मिनिटे जागा असतो. धावत्या एसटीसोबत लगेचच माझी झोपही धावून येते आणि. . .

एसटी पंढरपूराबाहेर पडते न पडते तोच मी तिच्या हेलकाव्या सोबत झुलत झोपीही गेलो. कधी महुद आलं कळलं देखील नाही. मी जागा झालो. गर्दी कमी होऊन आता पुढे एखाददुसरे सीट रिकामे दिसत होते. आतील लोक अजून खाली उतरत होते आणि बाहेरील आत येण्याच्या तयारीत होते. आणि त्याच मधल्या त्या सुवर्ण क्षणांचा फायदा उठवत मी पुढे जाऊन बसण्यासाठी उठलो आणि. . !

समोर पाहतो तर काय! सुजाता. माझी मॅम. फिक्कट गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये सावकाश वर चढून येताना दिसली. सुरवातीला तिचं लक्ष नाही गेलं माझ्यावर. बसण्यासाठी सीट शोधत होती ना! पुढे जाण्यासाठी दोन पाऊले टाकलेला मी जणू फेविकॉलच्या टाकीत पडल्यासारखा तिथेच अडखळून उभा राहिलो.

तिचे अजून आपल्याकडे लक्ष नाही गेलं असं पाहून मी माझा अगदी चोपून पाडलेला भांग विस्कटत माझ्या डोक्याचा तो ओसाड झालेला भूभाग शक्य तितका झाकून घेण्याचा प्रयत्न केला.

अखेरीस तिला रिकामी सीट मिळाली तशी ती तिथे उभी राहून इकडेतिकडे पाहू लागली आणि बस्स. . . तिची नजर माझ्यावर पडलीच एकदाची! माझी तर आधीपासूनच होती तिच्यावर! अंगाने थोडी भरलेली वाटत होती ती. सुंदर होतीच ती पूर्वीसारखी; पण थोडी चेहऱ्याने सुकलेली वाटली. मीही कुठे तो पूर्वीचा राहिलो होतो म्हणा? लग्नाआधीच डोक्यावर उजाड होण्याची नौबत आली होती माझ्यावर. खुर्चीत बसले की पोट शर्टाच्या बाहेर पडू पाहत होते. शिवाय दोन गावचा ग्रामसेवक असूनपण-

काय बोलणार? लाच खाणं आपल्या तत्वात बसत नव्हतं ना!

आमची नजरानजर होताच तिने मला ओळखल्यागत केले; पण लगेच सावध होत तिने आपल्या मागील एका काकांना बोट दाखवीत मागे जाऊन बसण्याचा इशारा केला आणि ती माझ्याकडे पाहत काहीशी नजर चोरीतच सीटवर बसली. ते काका जसे मागे आले तसे मला माझ्या आधीच्या जागी घेऊनच शेजारी बसले. सुजाताचे वडील तर नक्कीच नव्हते ते.

marriage material
marriage material

बस सुरू झाली आणि मी सुजाताकडे पाहत मागे टेकून बसलो. मनात विचारांची गर्दी करीत!

बारावी नंतर आज जवळपास सात वर्षांनी मी तिला पाहिले होते. एवढ्या काळात तर मुलींची लग्ने होऊन त्यांना लेकरे पण होतात. मात्र तिच्याकडे पाहून असं काही जाणवलं तर नाही मला. ना कपाळावर कुंकू किंवा गळ्यात मंगळसूत्र. मी तर कशाला इतकं पाहावं? की मी संधी धुंडाळीत होतो?

“आटपाडीला चाललोय.” शेजारी बसलेले काका मला म्हणाले. हे भारी आहे. एखाद्याने प्रश्न विचारायच्या आधीच उत्तर देऊनही टाकायचे.

“मी पण.” मला सांगण्यावाचून काही गत्यंतर राहिले नाही. मनात शंका आली की नक्की हे वकील किंवा पोलीस तरी असावेत. आणि असले तरी मला काय? मी काय अपराधी थोडीच होतो?

मी मग एसटीच्या वेगासरशी मागे पडणारी झाडे पाहत राहिलो; पण नजर मधूनच सुजाताकडे आपोआप वळली जात होती. का कुणास ठाऊक?

“आटपाडीत कुठं?” त्यांनी परत विचारले?

“अं? काय?”

“नव्हे, आटपाडीत कुठं राहता?” चौकसपणाने त्यांनी मला विचारले.

“पेठ माहिती आहे का?” मी विचारले.

“पेठेत राहता?”

“नाही हो.”

“मग?”

“मी विचारलं, पेठ माहिती आहे का?”

“नाही.”

“चांडवलेचं दुकान?”

“नाही.”

“बरं कुरेशी वाडा?”

“नाही.”

“मग तिथं जवळच राहतो मी.” मी थोड्या नाखुशीनेच म्हणालो. त्यावर ते काकाही काही बोलले नाहीत आणि मीही काही विचारले नाही. पण एखाद्याला बोलल्याशिवाय राहावत नाही ना तसे त्यांना सुद्धा राहावले नसावे बहुतेक. म्हणून ते बोलले, “पोरगी सोडायला चाललोय. तिच्या घरी.”

“पुढं बसलीय.” पुढे बोट करीत ते म्हणाले. मला वाटले सासरी सोडायला चालले असतील. मान हलवत मग मीही बोटाच्या दिशेने पाहिले. सुजाताच्या पुढील सीटवर  एक मुलगी बसलेली, मी पाहिलं. मग तिकडे पाहिलंच आहे तर लागलीच सुजाताला देखील पाहून घेतलं. ती तशीच कशात तरी हरवून पुढेच पाहत होती. तसंही तिने मागे वळून माझ्याकडे पाहावं असं माझ्यात काही नव्हते आणि आमच्या दोघांत तर तसले पूर्वी कधी काही नव्हतेही. होती ती कधीकाळची(?) माझी क्रश बस्स. त्यापलीकडे काहीच नाही!

“करता काय मग?”

“ग्रामसेवक आहे.”

“मग लगीन बिगिन?” काका आता छडा लावूनच टाकणार होते एकदाचा. मी झटक्यात नकारार्थी मान हलवली आणि त्यांना विचारले, “का? कुणी आहे का नजरेत? नाही म्हटलं, एवढं विचारताय तर असेल वाटलं.” right age for marriage

मी थोडा कुत्सित भावनेनेच म्हणालो तसे काका काहीसे उद्विग्न झालेले दिसले. एक क्षण वाटले की आपण असे तडका तडकी त्यांना नको बोलायला पाहिजे होते.

एकतर आपल्याला पडू लागलंय टक्कल. त्यात वाढतं वय, वरून नखरे सलमान खाचे. त्यात बायको हवी कतरिना सारखी. आणि कदाचित याचेच फ्रस्ट्रेशन मी त्यांच्यावर काढले असावे.

“आहे नजरेत.” ते थोडे गंभीर होत बोलू लागले, “पण तुम्हाला नाही चालणार.”

“मग द्या सोडून.” मी म्हणालो.

बराच वेळ ते खिडकीतून बाहेर पाहत राहिले. मी आता कटाक्षाने सुजाताकडे पाहायचे टाळले. एसटी दिघंची सोडून पुढे आटपाडी रस्त्याला लागली होती.

“कसली पोरगी पाहिजे तुम्हाला? नाही म्हणजे तुमच्या अपेक्षा. काय आहेत?” काकांनी पुन्हा विचारले. बराच वेळ शांत राहून त्यांनी आता मला विचारलं होतं, त्यामुळे मीही तितक्याच शांततेने उत्तर द्यायचे ठरवले. मी एक क्षण सुजाताकडे पाहिले. डोळे बंद केले आणि मग काहीसा हसत त्यांना म्हणालो, “मॅम. . मॅम.”

“काय?”

“मॅ. . . मॅरेज मटेरियल. मॅरेज मटेरियल पाहिजे.”

“म्हणजे?” त्यांनी कपाळावर आट्या पाडीत मला विचारले.

मग मी त्यांना सुजाताकडे बोट दाखवीत म्हणालो, “तिच्यासारखी. तिच्यासारखी हवीय अगदी.” बोलताना मला अचानक काय झालं काय माहिती. मी त्यांना धडाधड सांगू लागलो, “तिच्यासारखी काय तीच मिळाली तरी चालेल. माझ्या क्लासला होती ती बारावीला. आवडायची मला; पण कधी विचारायचं धाडस नाही झालं. त्यानंतर आजच तिला पाहतोय. मला नाही माहीत तिचं लग्न झालंय, नाही झालंय, विधवा आहे की घटस्फोटीत आहे; पण जशी कशी असेल मला ती हवीय. द्याल तुम्ही?”

आज सुजाता पुढे बसली होती आणि मी तिच्याबद्दल त्या काकांना सर्व कही बोलून टाकले होते. आजही माझ्यात तेवढी हिंमत नव्हती की मी तिला हे बोलून टाकावे. कदाचित तीच धुमस निघाली असेल आज बाहेर!

काका काहीसे हसूनच माझ्याकडे पाहत होते. ते हसतच म्हणाले मला, “अहो तिचं लग्न झालं असेल तर कसे जमेल?”

“जाऊ द्या ना काका भावनेच्या भरात बोलून गेलो मी.” मी आपला खजील होत त्यांना म्हणालो.

“विधवा- घटस्फोटीत असेल तर तू स्वीकारशील तिला?” 

“तुम्ही चेष्टा करणार नसाल तर सांगतो.”

“नाही करणार.”

“ती कशीही असेल तरी मी स्वीकारेन आणि आता प्लीज पुढे काही नका विचारू. असं काही नाही होणार. आटपाडी येतंय. चला पुढं.” म्हणत मी जागचा उठलो.

गाडी बाजार पटांगणात येऊन उभी राहिली. मी खाली उतरलो. सुजाता आधीच उतरली होती. मी बोलू की नको करत तिच्या जवळ आलो आणि तिला म्हणालो, “सुजाता? ओळखलं का?” 

तिने फक्त होकारार्थी मान हलवली आणि तशीच उभी राहिली. तेवढ्यात मागून ते काका आले आणि म्हणाले, “जायचं?”

मला काहीच समजलं नाही. सुजाताने मात्र खाली नजर करून नुसती मान हलवली.  सर्व काही अनाकलनीय होतं माझ्यासाठी. मी तसाच त्यांच्याकडे पाहत उभा होतो.

माझा भला मोठा वासलेला आ पाहून ते काका मला म्हणाले, “सून आहे माझी.”

“तुमची. . . मुलगी. . .” मी काही बोलणार तोच ते बोलू लागले, “दोन महिन्यांपूर्वी मुलगा गेला माझा अचानक आणि ही विधवा झाली.”

पुढे बोलताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू साचले होते तर सुजाता आपली आसवे गाळीत आणि रडू दाबीत तिथेच उभी होती. मला काय बोलावे काहीच समजेना. केवढा भयंकर प्रसंग होता तो. नकळत माझे दिलासा देणारे हात काकांच्या खांद्यावर गेले. रुमालाने आसवे पुसत त्यांनी सुजाताची ती बॅग उचलली आणि ते दोघे माझ्यापासून निघून जाऊ लागले. मी मात्र तसाच उभा. निश:ब्द, हताश, उद्विग्न!

जाताना मात्र काकांनी एक आशेची नजर माझ्यावर टाकली आणि मी स्वतःशीच पुटपुटलो, “पुनर्विवाह!”

मला आता आई-बाबांची मनधरणी करायची होती. मानतील ते. मला आहे ना खात्री!

[समाप्त]  

माझ्या येणाऱ्या कथा कवितांचे अपडेट्स आपोआप मिळवण्यासाठी माझ्या वेबसाईटवर आल्यावर जे पॉप अप नोटिफिकेशन येते त्याला allow करा म्हणजे मी काही पोस्ट केल्यास आपल्याला त्याचे नोटिफिकेशन येईल. माहितीसाठी खाली फोटो देत आहे.

lekhani sangram
lekhani sangram

chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, horror story in marathi, pratilipi marathi love story, marathi bodh katha, moral stories in marathi, marathi novels, small story in marathi with moral

लेखणी संग्रामच्या अजून कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

ती आणि ती A lady and a prostitute

वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग १

कळी खुलू दे

आपली व्हायरस ही कथा पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १


Spread the love

10 thoughts on “मॅरेज मटेरियल Marriage Material

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *