• Pune, Maharashtra
व्हायरस
व्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण

व्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण

Spread the love

सब-वे : एक वळण Marathi Katha, Marathi story, marathi fiction

  धावत धावतच अश्वथ दगडूशेठ गणपती मंदिरासमोर आला व गुडघ्यावर हात टेकवून धापा टाकत आत गणपतीच्या मूर्तीकडे पाहू लागला. मूर्ती प्रसन्न आणि सोज्वळ वाटत होती. पण मंदिरासमोर कुणीच नव्हतं. मागून आर्या आणि सुब्बू दोघेपण धापा टाकतच तिथे आले.

अश्वथला काय झालंय हे त्यांना कळायला काही मार्ग नव्हता. तो धावत आला आणि त्याच्या मागे ते धावत आले. का? कशासाठी? कुठे? कशाला? काहीएक अंदाज नाही त्यांना!

virus marathi katha marathi story
virus marathi katha marathi story ;Photo by Sonam

  “अश्वथ, अरे काय झालंय काही सांगशील का?” आर्याने दम खात आणि धापा टाकत त्याला विचारले. त्यावर तो काहीच बोलला नाही. त्याने आपले गुडघ्यावरचे हात कमरेवर ठेवले आणि तो इकडे तिकडे पाहू लागला. आर्या आणि सुब्बूने आता  एकमेकांकडे पाहिले आणि आपापले खांदे उडवले व पुन्हा त्यांनी समोर पाहिले, तर अश्वथ मंदिरात शिरलेला. एक भलंमोठं प्रश्नचिन्ह त्या दोघांच्या कपाळावर पडलेलं.  

<script async=”” src=”https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-8698938623911569″ crossorigin=”anonymous”></script> <ins class=”adsbygoogle” style=”display:block” data-ad-format=”autorelaxed” data-ad-client=”ca-pub-8698938623911569″ data-ad-slot=”9578278710″></ins> <script> (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); </script>

आता मंदिराला पूर्वीसारखी बाहेरील बाजूस संरक्षक भिंत नव्हती ना सुरक्षारक्षक होते. सरळ समोरून आत जाता येत होते. आत येऊन अश्वथ मंदिराच्या बरोबर गाभाऱ्यात उभा राहिला. गणपतीच्या मूर्तीकडे पाहत. मूर्तीसमोर दिवा लागला होता. शिवाय आज गणेश आगमन असल्यामुळे भाविकही येऊन फुले-फळे व मोदकांचा नैवद्य देखील ठेवून गेले होते.

देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही.” सुब्बू पुटपुटला तोच आर्याने त्याला कोपर मारत गप्प बसण्यास सांगितले. आता ते दोघेही आत गाभाऱ्यात आले. पूर्वीसारखं वैभव दिसत नसलं तरी आत आल्यावर प्रसन्नता खूप होती.

“देवा लई रात्रीची आठवण काढलीस.” मूर्तीला नमस्कार करत सुब्बू म्हणाला.

          आर्या अश्वथजवळ आली. त्याच्या खांद्यावर हात ठेवत तिने त्याला विचारले, “तू ठीक आहेस ना, अश्वथ? काय झालंय ते सांगशील का? आणि असा धावत इकडे का आळस? एनिथिंग सीरियस?”

          अश्वथने तिच्याकडे पाहिले आणि सुब्बूकडे पाहत तो म्हणाला, “त्यादिवशी तू ते क्रिप्टोमनी उपकरण माझ्याकडे फेकून देऊन निघून गेलास…”

“पण ते तर फुटले म्हणालास ना तू?” सुब्बूने त्याला विचारले.

“हं… फुटून त्याचे तीन तुकडे झाले होते.” तो म्हणाला.

“अरे हो; पण मग आपण इथे का आलो आहोत धावत? त्या तुकड्यांचा आणि दगडूशेठचा काय संबंध?” आर्याने गोंधळून जाऊन विचारले.

“ते तुकडे जोडत असताना माझ्याकडून त्याची काही बटणे दाबली गेली होती.” तो म्हणाला.

“अरे म्हणून काय मग असं पळत सुटायचं?” सुब्बू पटकन बोलून गेला.

“पुढे काय अश्वथ?” आर्याने विचारले.  

“त्यातील एका तुकड्यातुन –शेवटी, श्रीमंतांच्या आशिर्वादावर जगणारे दगडच आपण…!! असा आवाज आला होता.” अश्वथ शांतपणे श्वास घेत त्यांना सांगू लागला.

“आणि तू इकडे धावत आलास. काय लॉजिक तरी काय आहे त्यात?” सुब्बूने त्याला विचारले. आर्याने पण मान हलवून त्याला सहमती दिली.

“लॉजिक…?” असं म्हणून तो जरावेळ थांबला आणि त्याने सुब्बूकडे पाहत त्याला विचारले, “त्या दिवशी त्या इमारतीत आपण क्रिप्टोमनीसाठी गेलो होतो, आठवतंय?”

“नको आठवायला. खूप मार मिळाला होता.” तो आर्याकडे पाहत म्हणाला. तिने स्मितहास्य केले.

“बस्स एवढंच? अजून काही आठवत नाही?” अश्वथने विचारले.

“अजून काय आठवण्यासारखं होतं.” असे म्हणत तो विचार करू लागला आणि काहीतरी आठवल्याच्या भावनेने परत म्हणाला, “त्या वास मारणाऱ्या खोलीतला तो माणूस आठवतोय मला.”

“एक्जॅक्टली!” अश्वथ आनंदाने म्हणाला व बोलू लागला, “तो व्यक्ती मला वरती येताना एक वाक्य बोलला होता.”

“कोणतं वाक्य?” आर्याने विचारले.

श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे– असं काहीतरी तो मला म्हणाला होता.” अश्वथ म्हणाला.

“मला तर काहीच समजत नाही तू काय म्हणतोय ते.” सुब्बू म्हणाला.

“श्रीमंतांच्या आशिर्वादावर जगणारे दगड आणि श्रीमंत दगडूशेठ पाठीशी आहे या दोन्ही वाक्यांत काहीतरी कनेक्शन आहे; पण काय कनेक्शन असावं बरं?” असं म्हणत डोक्याला सतत एक बोट मारत तो जागेवरच फिरू लागला.

त्याला गोल फिरताना पाहून आर्याचे डोळे अचानक चमकले. तिच्या डोक्यात अचानक ट्यूब पेटली व लगेचच ती त्याच्या पुढ्यात उभी राहिली आणि त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेत म्हणाली, “अरे खरंच श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.” अश्वथ आता गणपतीच्या मूर्तीला पाठमोरा होऊन उभा होता आणि आर्या  त्याच्या समोर त्याचे दोन्ही हात हातात पकडून उभी होती. सुब्बू जणू एखादं न सुटणारं कोडं एका चुटकीसरशी सुटल्यागत डोळे विस्फारून, आ वासून त्यांच्याकडे पाहतच राहिला.

अश्वथने आता आपली नजर अगदी समोर रोखली. आर्याही मान वळवून पाहू लागली. रात्र असल्यामुळे दूरवरचं अस्पष्ट दिसत होतं; पण अश्वथ नजर बारीक करून पाहत होता. त्याला दिसले, समोर एक जुना धूळखात उभा असलेला एक फलक होता आणि त्यावर मोठ्या अक्षरांत लिहिले होते – ‘WAY TO SUBWAY’. 

आता बाहेर येऊन ते त्या फलकाकडे पाहत उभे होते. एकेकाळी पुणे मेट्रोचा भुयारीमार्ग तिथून गेला होता व मेट्रो पकडण्यासाठी खाली जायचा मार्ग तिथून होता. मेट्रोचं बुधवार पेठ स्थानक तिथं होतं; पण आता बरीच वर्षे त्या मार्गावर मेट्रो बंद झाल्यामुळे तो मार्गही फळ्या-पत्रे लावून झाकून दिला होता.

अश्वथ तिथे आला. तिथे जाऊन तो फळ्या-पत्रे बाजूला काढू लागला. आर्या व सुब्बूपण आता त्याच्या मदतीला आले. त्याच्या आड काय असेल याची पुसटशी देखील कल्पना नसलेले ते तिघे त्या रात्री तो बंद मार्ग पुन्हा उघडू पाहत होते.

मार्ग एकदाचा मोकळा झाल्यावर त्यांनी पुढे जाऊन पाहिले तर खाली खूप अंधार होता, सर्वत्र जाळी जाळी होती. एक कुबटता होती. उंदरे-घुशी होत्या आणि त्यात ते तिघे होते. अश्वथने ताराला आपल्या मनगटावरील ड्रोन पुढे सोडण्यास सांगितले. ड्रोन फुर्रर्र करत उडाला व आपला उजेड दाखवत त्यांना रास्ता दाखवू लागला. तिघेही सब-वेच्या पायऱ्या उतरून खाली आले. मोकळ्या भुयारात त्यांचे आवाज घुमत होते.

खाली उतरून पटरीवर येताच त्यांना उजवीकडे एक भली मोठी भिंत दिसली. अख्खा मेट्रोमार्ग त्या भिंतीने बंद केला होता तर डावीकडे जाण्यासाठी एक मोकळा मार्ग दिसत होता.

“हा मार्ग तर बंद आहे तर आपल्याला आता डावीकडे जावं लागेल.” आर्या  म्हणाली.

“नाही. जर त्या बाजूला जायचं असतं तर अजून काहीतरी क्लू आधीच आपल्याला मिळाला असता. सुब्बू तू एक काम कर. बाहेर जा आणि गणपतीकडे पाठ करून तिथून खाली पहा आणि काय काय दिसतंय ते सांग.” अश्वथ म्हणाला तसा सुब्बू लगेचच वरती गेला आणि म्हणाला, “अरे इथून तर काहीच दिसत नाही मला. तुम्ही लोक खूप खाली आहात.”

“अश्वथ ने त्याला परत येण्यास सांगितले. सुब्बू परत येऊ लागला आणि आता त्याला ते दोघेही दिसू लागल्यावर म्हणाला, “अश्व्या मला काही ते क्लू वगैरे वाटत नाहीत. आज आपण खूप नाचलोय त्यामुळे कदाचित….. ” बोलता बोलता तो कशाकडे तरी पाहत थांबला.

“कदाचित काय.” अश्वथने विचारले.

“मला तिथे काहीतरी दिसतंय.” तो म्हणाला.

“कुठे?” अश्वथने विचारले.

“तुझ्या पलीकडे भिंतीवर, एक स्विच आहे.” तो म्हणाला. अश्वथने तो स्विच पाहिला व लगेचच  खाली ओढला.

“अरे असा कसा काय विचार न करता खेचतोस रे?” आर्या काळजीच्या स्वरात म्हणाली.

त्याने स्विच खेचला होता खरं; पण त्याने काहीच घडले नाही. मात्र साधारण तीसेक सेकंदांचा अवधी गेला असेल तोच एक चमत्कारच झाला. उजव्या बाजूच्या भिंतीचा भिंतीसारखाच दिसणारा स्टीलचा दरवाजा उघडला गेला. सुब्बू मग पळतच त्यांच्याजवळ आला. आता मात्र तिघेही आश्चर्यचकित झाले होते. त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि ते आत जाण्यासाठी निघाले. अश्वथचा ड्रोन त्यांना वाट दाखवत पुढे निघाला. चालता चालता ते पुन्हा एका स्टीलच्या दरवाज्यासमोर येऊन ठेपले.

“अजून किती दरवाजे …हुह.!” आर्या निराश होऊन म्हणाली. अश्वथ तो दरवाजा नीट पाहू लागला. आसपास बरीच धूळ होती. बहुतेक बरीच वर्षे तिकडे कुणी फिरकले नव्हते. पाहता पाहता त्याला दरवाजाच्या बाजूला एक छोट्या पेटीगत दिसणारी गोष्ट दिसली. जवळ जाऊन  त्याने त्यावर जमलेली धूळ पुसली. त्याने पाहिले की तो एक टच-स्क्रीन की-बोर्ड Touch Screen Keyboard होता. त्यावर असलेले पॉवर ऑन Power On चे बटन त्याने दाबले व चक्क तो की-बोर्ड प्रकाशमान झाला. आता आर्या आणि सुब्बू दोघेही येऊन त्याच्यासोबत त्या की-बोर्ड कडे पाहत उभे राहिले.

“पासवर्ड प्लिज.” की-बोर्ड मधून आवाज आला. Password Please

“पासवर्ड? पासवर्ड ….कुणाला माहिती आहे आता?” सुब्बू  हताशपणे म्हणतो न म्हणतो तोच आर्या म्हणाली, “फाऊंड इट. फाऊंड इट.”

“अगं मग टेल इट, टेल इट .” सुब्बू तिला म्हणाला.

“अरे टेलिंग इट. पासवर्ड इज फाऊंड इट….. FOUND#IT.” ती असे म्हणत त्या दोघांच्या मधून पुढे आली आणि तिने तो पासवर्ड टाकला. थोडावेळ काहीच प्रतिसाद आला नाही.

“पण हाच पासवर्ड असेल कशावरून?” अश्वथने आर्याला विचारले.

“की-बोर्ड बघ अल्फानुमेरिक आहे म्हणजे पासवर्ड फक्त नंबर्सचा नसणार आणि मी जे  क्रिप्टोरुपीचे उपकरण तुमच्याकडून लांबवले होते; जे की त्या व्यक्तीचं होतं, त्याचा पासवर्ड मी तोडला होता. सो मी ट्राय मारला.” ती म्हणाली. सुब्बू मात्र भुवया उंचावून मान हलवत अश्वथकडे पाहू लागला व हळूच त्याच्या कानात कुजबुजला, “मज्जा आहे तुझी. स्मार्ट गर्ल विथ स्मार्ट ब्रेन.”

तिघेही आता उत्सुकतेने दरवाजा उघडण्याची वाट पाहत होते. पण दरवाजा काही उघडत नव्हता. ते तसेच दरवाजाकडे पाहत उभे होते, तेवढ्यात आवाज आला, “प्रवेश मान्य.” तिघांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं आता.

आणि दरवाजा अडखत अडखत उघडला. बरीच वर्षे बंद असल्यामुळे कदाचित तो जाम झाला असावा. तिघेही आता आत जाण्यासाठी उत्सुक होते; पण आत काय वाढून ठेवलंय याची कुणालाच काहीएक कल्पना नव्हती ना कसला अंदाज होता.

[पुढे सुरू राहील ]

याआधीच भाग वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या

आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *