• Pune, Maharashtra
कथा
कोजागिरी, पौर्णिमा आणि चंद्र ..!

कोजागिरी, पौर्णिमा आणि चंद्र ..!

Spread the love

 कोजागिरी, पौर्णिमा आणि चंद्र ..!

या वर्षीची नवरात्र माझ्या कायम स्मरणात राहील आणि स्मरणात राहील ती . . . ती! ती- माझ्या ताईची मैत्रीण, पौर्णिमा!

या ताई लोक पण अशा एक एक नमुन्या असतात ना! बघा ना आजपर्यंत तिने मला काही तिच्या या मैत्रिणीची भेट घालून दिली नव्हती. याचा अर्थ असा मुळीच नाही की तिच्या प्रत्येक मैत्रीणीची ती माझ्याशी ओळख करूनच द्यायची. आणि पौर्णिमेसारख्या सुंदर मुलीशी तर नाहीच नाही!

त्या दिवशी आमच्या इथे दांडियाला dandia in navratri तिने पौर्णिमेला कसे काय बोलावले कुणास ठाऊक? तिला तेव्हा प्रथम पाहिल्यावर मात्र मनात आले, ताईला काय मिळालं असेल या चंद्राला त्या पौर्णिमेपासून दूर ठेवून, ते तिच्या अंतर्मनालाच ठाऊक! कधी ना कधी आमची भेट ही होणारच! सागराने कितीही नाही म्हटले तरी भरतीच्या वेळी त्याला किनाऱ्याशी सलगी ही करावीच लागते आणि सूर्याने कितीही नाक मुरडले तरी त्याला मावळतीच्या क्षणी त्या क्षितिजाला चुंबावे लागतेच की नाही?

मी ना सागर होतो ना सूर्य होतो, मी पडलो चंदू. हो चंदूच! आता आई-बाबांनी कशावरून माझे नाव चंदू ठेवले होते हे मला एक न उलगडलेले कोडेच आहे जणू. या जमान्यात चंदू नावाचा क्रिकेटर, ना कुणी नट असल्याचे माझ्या ऐकिवात आहे; पण कधी कधी बाबांच्या त्या उजाड पडलेल्या डोक्याकडे पाहून मला वाटते की आपल्या चंद्रासारख्या टकलावरून प्रेरित होऊन तर त्यांनी माझं नाव-

छे छे, हे कसं शक्य आहे? बाबांच्या त्या घनदाट जंगलाचे वाळवंटात रूपांतर होतानाचा जीता जागता पुरवाच मी होतो. चांगल्या दोन वेण्या बांधता येतील असे केस होते माझ्या बाबांचे पूर्वी. फोटो आहेत ना अजून आमच्याकडे त्या ब्लॅक अँड व्हाईट जमन्यातले.

kojagiri paurnima ani chandra
kojagiri paurnima ani chandra, images are for illustration purpose only.

ते काही का असेना, सांगायचा मुद्दा एवढाच होता की ती पौर्णिमा मला आवडली होती आणि मी तिच्या अक्षरश: प्रेमात पडलो होतो. पडलो काय अखंड बुडालो होतो असं जरी कुणी म्हटला असता तरी मी त्यावर आक्षेप घेतला नसता. उन्हाळ्याच्या दिवसांत अचानक उठणाऱ्या त्या भवऱ्यांवरती अलगद लहरणाऱ्या त्या वैरणीच्या वाळलेल्या पाल्यासारखा होतो मी. भवरा नेईल तिकडे जात होतो. विनातक्रार, अगदी अलगदपणे!

पण असं पलंगावर पडून हे कसं शक्य होईल? ती काही स्वर्गातली अप्सरा नव्हती अचानक माझ्या समोर प्रकट व्हायला आणि तिला अप्सरेची उपमा देऊन मला पौर्णिमेचा अपमान नव्हता काही करायचा. हो ना, इतकी सालस आणि सुंदर होती ती!

काहीतरी करायला हवेच असा मनाशी पक्का निर्धार करून मी पलंगातून उठलो आणि ताईच्या खोलीत आलो. ती आपला मोबाईल पुढ्यात धरून कुणाशीतरी चॅटिंग करण्यात गुंतली होती.

“बघा, आमची शूर्पनखा इथे निवांत आपल्या बीएफ शी चॅट करत बसलीय. आपल्या भावाचं हिला तर काही पडलेलंच नाही.” मी म्हटलो.

“चंदया, अरे मी शूर्पनखा तर तू तिचा भाऊ रावणच झाला की रे माकडा आणि मला काही बीएफ वगैरे नाही हं.” ती मानेला लटके झटके देत बोलली.

“अगं तायडे रावण कशाला म्हणतेस.”

“का रे?”

“काल-परवाच दसऱ्याला दहन केलं त्याचं आणि नवरात्रीला तर मी तिच्यासोबत दांडिया-” मी माझ्याच विश्वात हरवत म्हणालो. हे असं व्हायला लागलंय मला तेव्हापासून. जायचं असतं जेएम रोडला आणि पोहचतो एफसी रोडला!

“चंदया, अरे कुठल्या कुठे पोहचला तू? आणि कोण रे ती जिच्याबद्दल तू बोललास?” तिने मला विचारले.

मी मग तिच्या जवळ बसत म्हणालो, “ताई, अगं. . .” पण तिचं लक्ष कुठे होतं माझ्या बोलण्याकडे? पुन्हा मोबाईलमध्ये तोंड घातले ना तिने. “जा यार, मला नाही काही सांगायचं.” रागाने मी मग तिथून उठून जाऊ लागताच तिने मोबाईल बाजूला ठेवून दिला.

“सॉरी, सॉरी. बोल बोल, तुला काय सांगायचंय ते.”

“ताई, अगं..मी प्रेमात पडलोय.”

“आणि कोण आहे ती दुर्दैवी मुलगी?”

मी मग धाडसच करून म्हणालो, “पौर्णिमा. तुझी मैत्रीण.”

ती लगेच मांडीवरील उशी मला मारत म्हणाली, “चंदया अरे तू तर बहिणीचीच मैत्रीण पटवली म्हणायची की.”

“अगं, पटवली नाही काही. मी माझं सांगतोय. तिचं मला माहीत नाही काही. म्हणजे दांडिया खेळताना मला, बरं का? मला असं वाटत होतं की तीही-”

ताई कपाळावर आट्या पाडून आणि डोळे बटाट्यागत मोठे करून माझ्याकडे पाहत होती. मला पौर्णिमेच्या नकारापेक्षा ताईच्या तशा पाहण्याचीच जास्त भीती वाटत होती. मघाशी शूर्पनखा वाटणारी माझी ताई मला अचानक चंडिकेचं रूपच वाटू लागली!

“माझी आणि तिची भेट दे  ना करवून.” मी तिला म्हटले.

“भेट देऊ शकते मी करवून; पण तिचा नकारच असेल.” ती मला खिजवण्याच्या हेतूने म्हणाली.

“तायडे, अगं कसली बहीण आहेस तू. भाऊबीज जवळच आहे विसरू नकोस म्हणजे झालं.”

“त्याआधी अभ्यंगस्नान आहे हे ही विसरू नकोस भावा.”

क्षणातच माझा चेक अन् मेट झाला होता.

मी तिला माझे हात छातीशी धरून विनंती केली, “उद्या कोजागिरी how to celebrate kojagiri आहे तर तिला बोलव ना आपल्या घरी रात्रीला. आपण सगळे साजरी करू. कशी वाटते माझी आयडिया?”

“तुझ्या आय. . ड्याची कल्पना वाईट नाही काही; पण तिचा नकारच असेल रे.”

मी मग एक जळजळीतच कटाक्ष टाकला तिच्यावर तेव्हा ती गप्प झाली आणि पुन्हा मोबाईल घेऊन त्यात मग्न झाली.

“ताई, तू पण नको जास्त थकवू त्याला. टाक हो म्हणून. एखाद्याला किती फ्रेंडझोन करायचं ते?” मी डोळा मारत तिला म्हणालो.

“चंदया आता जा ना रे तू. मी करते म्हटलंय ना रे तुला, की सांगू मी आई-बाबांना?”

“हे काय मी निघालोच आहे. मला कुठे मुक्काम करायचाय?” असे म्हणत मी तिथून बाहेर जाऊ लागलो तेवढ्यात ती म्हणलीच, “आणि मी त्याच्याशी नाही चॅट करत काही. मी तर. . .”

“डोन्ट से इट्स पौर्णिमा.” मी असं म्हणताच ती हसू लागली. मग मी बघू बघू म्हणत तिच्याकडे धावलो पण तिच्या त्या शब्दांनी माझी वाट अडवून धरली, “दाखवते; पण एका अटीवर. उद्याची तुमची कोजागिरी डेट विसरायची मग.”

“गुड नाईट, तायडे.” म्हणत मी माघारी वळलो व माझ्या खोलीत जाऊन पलंगावर पडलो आणि वर फिरणाऱ्या पंख्याकडे पाहत नवरात्रीतील तिच्या आणि माझ्या दांडियालीला आठवू लागलो.

म्युजिक सिस्टिमच्या प्रत्येक बीटवर तिचा तो ठेका धरणे, माझ्या टिपरीवर तिने तिची टिपरी तेवढ्याच सहजतेने मारणे आणि खळखळणाऱ्या हास्यासह माझ्यासोबत फेर धरणे, त्या फेरा सोबतच तिच्या त्या लाल घागऱ्याचे सर्रकन तिच्यासोबत फिरणे, तोच  तिच्या तोंडावर आडवी येणारी बट हातातील टिपरीनेच तिने मागे सारणे, नाचता नाचता मग आमची नजरानजर होणे आणि एकमेकांत हरवून गेल्यावर मात्र भानावर येत एकमेकांपासून नजरही चोरणे!

काय सुखद अनुभव होता तो! तो पुनःपुन्हा आठवत मला कधी झोप लागली समजलेच नाही. प्रेमाची चाहुलच इतकी सुखद असेल तर प्रत्यक्षात प्रेम आणि त्याचा अनुभव किती आनंददायी असेल?

दुसऱ्या दिवशी मी ताईला वरचेवर सारखे विचारत राहिलो की पौर्णिमा आज रात्री कोजागिरीला kojagiri information in marathi नक्की येणार आहे की नाही.

रात्री आमच्या गच्चीवरल्या पेटत्या चुलीवर कोजागिरीचे दूध तापत होते. कोजागिरीच्या पौर्णिमेचा चंद्र चांगलाच वर आला होता आणि इथे आई-बाबा, ताई, पौर्णिमा आणि मी गच्चीवर मस्तपैकी गाण्याच्या भेंड्या खेळत बसलो होतो. आभाळात चंद्र आणि पौर्णिमा आज एकत्र होते आणि इथे खाली मी आणि पौर्णिमा! ती माझ्या अगदी समोरच बसली होती.

चंद्राचा तो शीतल प्रकाश तिचे रूप अजूनच खुलवत होता आणि मी आई-बाबा आणि ताईची नजर चुकवत तिचे ते सुंदर रुपडे न्याहाळत होतो. चोरूनच! तसे पाहता ताईच्या नजरेतून काही सुटण्यासारखे नव्हतेच मुळी. ती आपल्या भुवयांनी मला इशारे करतच होती आणि माझी मज्जा घेत होती. कधी कधी वाटते बायकांना देवाने काय काय देऊन ठेवलंय. नाही म्हणजे त्यांना जरी बोलायला तोंड नसते ना दिले देवाने तरी त्यांची कसलीच अडचण झाली नसती. इतके त्यांचे डोळे बोलके असतात. मग ती आई असो, ताई असो किंवा समोर बसलेली पौर्णिमा असो!

“आज पौर्णिमेचा चंद्र किती छान दिसतोय ना गं पौर्णिमा?” मला चिडवायची एकही संधी सोडेल ती माझी ताई कसली? तिने तिला असे विचारताच मी तर आच वासला आणि पौर्णिमेने तर लाजत मानच खाली घातली. बरं, प्रेम मला झालं होतं आणि लाजत मात्र ती का होती हे मला कळण्याच्या पालिकडचं होतं.

काही इकडल्या काही तिकडल्या गप्पा करत चंद्र डोक्यावर आलेला कळला देखील नाही. आम्ही दुधाचे पातेले खाली उतरवले आणि ग्लासांत दूध ओतून कोजागिरीच्या चंद्राचे प्रतिबिंब त्यात पाहू लागलो. मी मात्र त्यात त्या चंद्राला आणि पौर्णिमेला देखील पाहून घेतले.

“बरं, मुलांनो. आम्ही जातो झोपायला. तुम्ही करा एन्जॉय. ठीक आहे?” असे म्हणून आई-बाबा खाली निघून गेले. आई मात्र जाताना पौर्णिमेच्या तोंडावरून हात फिरवायला विसरली नाही. आहा, काय उत्तम जोडी शोभत होती सासू-सुनेची!

मग थोडावेळ आम्ही तिघे गपा मारत बसलो; पण आपण एक मदत मागतो आणि त्यात अजूनच भरीव मदत जी करते, ती असते ताई! खाली ठेवलेला मोबाईल घेऊन येते म्हणून गेलेली ती आता अर्धा तास होत आला तरी अजून काही परत आली नव्हती. हा, मात्र जाताना तिने डोळा काय तो मारला होता तेवढंच! आता तो तिने मला मारला होता की पौर्णिमेला कुणास ठाऊक?

त्या मोकळ्या गच्चीवर मी आणि ती, दोघेच होतो. दोघांनाही थोडंसं संकोचल्यागतच होत होतं आणि त्यातच आमची नजरानजरही होत होती. कधी चोरून, कधी लाजून तर कधी मुद्दामूनच! how to propose a girl

शेवटी दहा मजनूचे बळ हृदयी एकवटत मी दुधाने भरलेल्या ग्लासासकट तिच्या अगदी जवळच गेलो. आता नाही तर काहीच नाही it’s now or never हे ब्रीदवाक्य मनात घोळत मी तो ग्लास तिच्या समोर घरला. मला माझ्या हृदयाची धडधड स्पष्टपणे ऐकू येत होती. म्हणजे तिलाही येतच असणार; पण मला असं का वाटत होतं की एक सोडून दोन-दोन हृदये धडधडत होती?

तिने माझ्या हातावर तिचा तो नाजुक हात अलगद टेकवला आणि तो ग्लास आपल्या ओठांकडे नेत तिने दुधाचा एक घोट घेतलाच! मात्र तिच्या त्या कोमल हाताच्या स्पर्शाने मी पुरता वितळून गेलो होतो. तिने तो हात तसाच ठेवत ग्लास माझ्या तोंडाकडे आणला आणि स्मितहास्य करत तिने डोळ्यांनीच मला पिण्याचा इशारा केला. मीही मग घटाघट पिऊन तो पूर्ण रिताच करून टाकला एकदाचा!

माझ्या वरच्या ओठांवर दुधामुळे उमटलेल्या त्या कृत्रिम सफेद मिशा पाहून तिला खळखळून हसू आले. मीही हसू लागलो मग. हसता हसता आमची नजर कधी एकमेकांत गुंतली हे त्या चंद्रालादेखील माहीत पडले नाही. तो तसाच वरून आपल्या शुभ्र प्रकाशाने आम्हाला न्हाऊ घालत होता. आम्ही आता एकमेकांच्या अगदी समोरासमोर खेटून उभे होतो. मी माझी ती सफेद मिशी पुसण्यासाठी माझा हात तिथे नेला तोच तिने तो अगदी सावकाशपणे बाजूला सारून दिला आणि माझ्या मानेच्या मागे हात नेत तिने माझी मान घट्ट पकडून ठेवली. तिने आपल्या टाचा उचलीत आपल्या नाजुक ओठांनी माझ्या ओठांवरची ती मिशी अलगद पुसून देखील काढली. how to kiss a girlfriend

kojagiri paurnima ani chandra
kojagiri paurnima ani chandra, images are for illustration purpose only

तिच्या त्या ओठांच्या स्निग्ध आणि रसभरीत स्पर्शाने माझ्या रोमरोमांतून जणू मदनच धुमाकूळ घालीत होता. कधी आमचे ओठ एकमेकांत विलीन झाले हे लक्षातपण नाही आले. हातातील ग्लास केव्हाचाच गळून पडला होता. त्याच्या आवाजाने मात्र थोडे विचलित झाल्यासारखे झाले मला.  

“चंदया? चंदया? अरे मूर्खा!” ताई दुरून हाका मारतेय याची जाणीव माझ्या कानांना झाली; पण तो भासच असावा म्हणून मी त्याकडे साफ दुर्लक्ष केले आणि पौर्णिमेवर माझे लक्ष केंद्रीत करायचे ठरवले.

“अरे ये चंदया, बहिरा झाला आहेस काय रे? कधीची बेल वाजतेय आणि..” पुन्हा ताईची हाक आली.

“बेल? गच्चीवर?” मी ताडकन जागा झालो तर बिछान्यावर होते माझ्या.

“अरे जा ना रे, तो दरवाजा उघड. आम्ही आत स्वयंपाक करत आहे ना.” ती पुन्हा ओरडली.

त्यात तिचा काही दोष नव्हताच मुळी! काय आहे ना आम्ही पडलो पुणेकर, दुपारी एक ते चार आमची झोपायची वेळ; पण आज रात्रीचे सात वाजले तरी मी बिछान्यावरच पडून होतो. पौर्णिमेच्या स्वप्नात!

“जात आहे, जात आहे. उगाच सांबरासारखं नको ओरडू.” असे म्हणत मी उठलो आणि स्वप्नातले ते चुंबन आठवत आनंदाने दरवाज्याकडे जात बारीक आवाजात पुटपुटू लागलो, “आय किस्ड यू , आय किस्ड यू ,आय किस्ड यू.”

एकदम मी दरवाजा उघडला आणि समोर पौर्णिमेला पाहताच माझ्या तोंडून तेच शब्द जरा मोठ्यानेच बाहेर पडले, “आय किस्ड यू!”

“सॉरी?” तिने लाजल्यागतच विचारले!

[समाप्त]

अजून कथा वाचण्यासाठी खालील लिंकला जा.

दुर्गे दुर्घट भारी: भाग. १

दुर्गे दुर्घट भारी: भाग.२

milk recipe, masala doodh, tres leches cake, milk bread, cute couple, almond milk recipe, mango milkshake, basundi recipe, banana milkshake recipe, vanilla milkshake recipe,  kojagiri paurnima, kojagiri status, how to make vanilla milkshake, how to make banana milkshake, milk recipe for kojagiri, marathi kadambari pdf, marathi novels pdf,


Spread the love

4 thoughts on “कोजागिरी, पौर्णिमा आणि चंद्र ..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *