• Pune, Maharashtra
व्हायरस
व्हायरस: प्रकरण ३:त्या रात्री पाऊस होता

व्हायरस: प्रकरण ३:त्या रात्री पाऊस होता

Spread the love

३. त्या रात्री पाऊस होता.! it was raining that night

चार वर्षांनंतर, सन २०५१.

या वर्षीचा पावसाळा काही संपायचं नावच घेत नव्हता. गणेशोत्सव ganpati celebration in pune संपून आता महिना होत आला होता, तरी अजून पावसाचा जोर काही कमी झाला नव्हता. दर वर्षी नित्य नियमाने कोसळणारा तो या वर्षी असा काही बरसत होता जणू त्याची आणि या धरतीची शतकानुशतके काही गाठच पडली नव्हती.

आपल्या पतीप्रेमाने तृप्त होऊन बिछान्यावर चरमसुखाच्या लहरींत थरथरत पडलेल्या नववधूप्रमाणे  हिरवा शालू अंगावर ओढून, धरती जणू आपली तृष्णा भागवून केव्हाची शांत पडली होती. रात्र जशी गहरी होत होती, पाऊस तसा तिच्या रोमरोमांत मादकतेचे नवनवीन तरंगच निर्माण करत होता. अगदी नित्यनियमाने!

रात्रीचे दीड वाजून गेले होते. डॉ. अभिनव आपली टेस्ला tesla price in india घेऊन व्हाया चांदणी चौक सर्कल लवासाला how to go to lavasa काहीसे घाईतच निघाले होते. त्यांची टेस्ला धडाधड  कोसळणाऱ्या पावसाच्या धारा कापत  सुसाट वेगाने  निघाली होती. बाहेर धो धो कोसळणारा पाऊस आणि आतमध्ये डॉक्टरांच्या  घामाच्या धारा लागल्या होत्या तेही फुल्ल ए.सी मध्ये. 

it was raining that night
it was raining that night, pictures are for illustration purpose only.

त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहता ते खूप चिंतीत वाटत होते. ते सतत गाडीच्या मागच्या सीटवर ठेवलेल्या एका काळ्या ब्रिफकेसकडे पाहत गाडी चालवत होते आणि आपला कोणी पाठलाग तर करत नाही ना, हे ही ते अधूनमधून पाहत होते.

त्यांना लवकरात लवकर लवासाला पोहचायचे होते. विरेनने ज्या लवासाला चार वर्षांपूर्वी पुनरुज्जीवित केले होते तिथेच. त्या अपघातानंतर पुन्हा लवासावर ती जुनी अवकळा पसरली होती. मात्र फरक एवढाच होता की तिथे आता भारत सरकारची एक अंडर-वॉटर बायो-केमिकल लॅबोरेटरी bio chemical laboratory बनली होती, जिथे मानवी आजारांवरील विविध प्रकारच्या औषधोपचारांचे संशोधन केले जात होते.

डॉ.अभिनव हे त्या लॅबोरेटरीमध्ये वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून काम पाहत होते. कदाचित आज ते काम करणंच त्यांच्या जीवावर उलटलं होतं. एक प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आज आपला जीव टेस्लात घेऊन निघाला होता. त्यांची ती टेस्ला पावसाच्या धारा अंगावर घेत आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेली दाट झाली भराभर मागे टाकत आपले अंतर कापत होती.

पुण्यापासून बऱ्यापैकी दूर आल्यावर डॉक्टरांनी आपला कुणी पाठलाग तर करत नाही ना याची समोरील आरशात पाहून एकदा खात्री करून घेतली आणि आपली टेस्ला त्यांनी सेल्फ ड्राईव्हला tesla self drive mode टाकून दिली. त्यांची हृदयगती आता तीव्र झाली होती.

समोर ठेवलेल्या टिशू पेपरच्या बॉक्समधून त्यांनी चार-पाच टिशू पेपर how to use tissue paper अगदी भराभर बाहेर काढले आणि घाईतच त्या पेपरने त्यांनी आपल्या चेहऱ्यावरचा घाम how to wipe sweat using tissue paper टिपला. जेवढ्या घाईने त्यांनी तो घाम टिपला तेवढ्याच घाईने त्यांनी ते ओले टिशू पेपर चुरगाळून खाली टाकूनही दिले.

ताडकन त्यांचे  शरीर  मागच्या सीटकडे झुकले, सर्र्कन त्यांनी ती ब्रिफकेस त्या सीटवरून ओढली आणि परत सीटवर बसत ती ब्रिफकेस आपल्या मांडीवर ठेवून थरथरत्या हाताने त्यांनी ती बायोमेट्रिक पद्धतीद्वारे biometric analysis उघडली देखील!

आता पावसाचा जोर काहीसा कमी होऊन त्याची संततधार ती काही सुरू होती. त्या ओल्या रस्त्यावर टेस्लाच्या त्या चाकांचा चर्रर्र होणारा आवाज त्या संतातधारेत ठळक जाणवत होता. आत डॉ. अभिनव खूपच घाई-गडबडीने ती ब्रीफकेस उघडून काहीतरी करण्यात मग्न होते.

 गाडी आता टेमघर डॅम पासून थोडी वर आली होती. आपल्या नाकावरचा चष्मा नीट करत डॉक्टरांनी  त्या ब्रिफकेसमधील काही पेपर बाहेर काढले आणि समोर धरून ते पडताळू लागले. त्यांचे ते थरथरणारे हात त्यांची भीती दर्शवत होते.

चारदोन पेपर त्यांनी पडताळले असतील तेवढ्यात त्यांच्या टेस्लाला मागून जोराची धडक बसली. धडक बसतच क्षणी डॉक्टरांचे डोके समोर डॅशबोर्डवर जोरात आदळले आणि चेहऱ्यावरून रक्त येऊ लागले. त्यांची शंका खरी ठरली होती. कुणीतरी आता त्यांचा पाठलाग करीत होतं.

एक काळ्या रंगाची मर्सिडिस व एक मोटारसायकल स्वार मागे लागले होते त्यांच्या. चष्म्याची काच फुटून तिचे तुकडे त्यांच्या डोळ्याखाली आणि कपाळावर घुसले होते. तेवढ्यातूनही त्यांनी स्वतःला सावरून पटकन गाडी सेल्फ ड्राईव्ह वरून मॅन्युअल ड्राईव्हला घेतली आणि तातडीने आपला होलोग्राफीक इंटरफेस holographic interface सुरु करून ते पटापट त्या पेपरचे डिजिटल स्कॅनिंग digital scanning of papers करू लागले व सोबतच आपला एक व्हिडिओदेखील ते रेकॉर्ड करू लागले.

आम्ही दोघे त्या प्रोजेक्टवरती एकत्रित काम करत होतो आणि आम्हाला अशा काही अनाकलनीय आणि मानवी सभ्यतेच्या पलीकडच्या काही गोष्टींचा सुगावा लागला की-

त्याला आता हाव सुटलीय. मती गुंग झालीय त्याची; पण मी त्याला यात यशस्वी होऊ देणार नाही. बिलकुलच नाही.

मी तुला खूप गोपनीय माहिती पाठवली आहे. मला खात्री आहे की तू ती मिळवशील आणि त्यावर योग्य काम करशील. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तू अजून लहान आहेस बाळा पण तुला आता मोठं व्हावं लागेल. माझ्यासाठी नाही..तर-

आता तो मोटारगाडीस्वार त्यांच्या गाडीच्या दरवाज्याजवळ येऊन त्यावरती गोळ्या झाडून तो उघडण्याचा प्रयत्न करू लागला; पण काच बुलेटप्रुफ tesla bullteproof window glass, bulletproof glass price असल्यामुळे त्याला ते काही शक्य झालं नाही. तरीही त्याचे प्रयत्न  सुरूच होते. स्कॅनिंग पूर्ण झाल्यावर त्यांनी ते एका आभासी आयडी वरती पाठवून दिले आणि सगळी हिस्ट्री पुसून टाकण्याची कमांड त्यांनी सिस्टिमला देऊन टाकली.

तर जगासाठी. होय जगासाठी. तूच एक शेवटची अशा असशील त्यांची!

माझ्याकडे आता वेळ खूप कमी आहे. मी सांगितलेल्या गोष्टी. . . . . तू . . . . तू प्रयत्न कर. . . . ज . . ज. . जगासाठी. . . .तुला करावेच. . . लागतील. . . .!

 त्यांचे बोलणे पूर्ण व्हायच्या आतच त्यांच्या गाडीला अजून एक जोराचा धक्का बसला आणि गाडी रस्त्याच्या खाली उतरुन  थांबली. जंगलात वाघ आपल्या सावजाला कसे पळवून पळवून थकवतो आणि नंतर त्याला घोलमडत पंज्यांत पकडतो तशी डॉ. अभिनव यांची अवस्था झाली होती.

पावसाच्या रिपरीपेचा आवाज कानी येत होता. बाजूलाच टेमघर डॅमचे बॅकवॉटर असलेली दरी  होती. मागून पाठलाग करत असलेली मर्सिडिस आता जागीच थांबली, काहीशा अंतरावरच. डॉ.अभिनव यांनी आपल्या गाडीचा दरवाजा उघडला आणि ते सीटवरून अर्धेच बाहेर कोलमडले गेले. डोक्याला चांगलाच मार बसल्याने ते अर्धवट शुद्धीवर होते. 

मोटारसायकलस्वार आपली मोटरसायकल  स्टँडवर उभी करून टेस्लाकडे चालत आला. डोक्यावर काळे हेल्मेट, त्याला काळीच काच, हातात काळेच हातमोजे, अंगात काळे चामड्याचे चकचकीत जॅकेट, खाली तशीच पॅन्ट आणि काळे बूट घातलेला तो जणू यमदूतासारखाच वाटत होता.

जवळ येऊन त्याने आत पाहिले, तर त्या ब्रिफकेस मधील पेपर जळत होते. त्याने पटकन ते पेपर उचलले आणि ते विझवण्यासाठी तो आपला एक हात त्यावर मारू लागला; पण पेपर्स बऱ्यापैकी जळून  खाक झाले होते. 

तेवढ्यात आयव्हीआर कडून उत्तर आले, “ऑल डेटा डिलीटेड. नो रिकव्हरी पॉसिबल.” डॉ.अभिनव अर्धवट शुद्धीत पण हसत म्हणाले, “कालभद्र कधीही जिंकणार नाही, कधीही जिंकणार नाही. . . हा. हा. हा.

हे ऐकून त्याला भलताच राग आला. त्या रागातच त्याने त्यांच्या तोंडावर एक जोराचा मुक्का मारला आणि डॉक्टरांच्या नाकातोंडातून रक्ताच्या धारा लागल्या. त्याने डॉ.अभिनवला व्यवस्थित सीटवर बसवून दिले आणि गाडीचा दरवाजा जोरात बंद केला आणि बाजूला येऊन उभा राहिला.

काही अंतरावरच उभ्या असलेल्या त्या मर्सिडिसने मग जोरात येऊन त्यांच्या टेस्लाला अखेरची धडक दिली आणि डॉ.अभिनव त्या कोसळत्या पावसात आपल्या टेस्लासहित घिरट्या घेतच दरीतून खाली टेमघरच्या त्या बॅकवॉटर मध्ये कोसळले.   

it was raining that night
it was raining that night, pictures are for illustration purpose only.

गाडी पाण्यात पूर्णपणे बुडाल्यावर तो मोटरस्वार ते जळालेले पेपर्स घेऊन त्या मर्सिडिसकडे आला. गाडीची काच खाली झाली व काळे हातमोजे घातलेला एक हात बाहेर आला. काच वर करून त्याने पेपरवरील पाणी हाताने झाडले  आणि तो त्या  जळक्या पेपरवरून आपली नजर टाकू लागला.  

          पेपर बहुतांशी जळालेले असल्यामुळे त्यातून फारशी माहिती हाती लागणं अशक्य होतं. महत्वाची माहिती जळाली  होती, शिवाय पावसात ते भिजलेही  होते; पण मात्र पेपरवरती ठळक अक्षरात लिहिलं होतं जे शिल्लक राहिलं होतं-

LAVASA SECRETS..!

व्हायरस कथा मालिकेचे आधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकला जा.

व्हायरस: प्रकरण २.अ वीक ऑफ फ्रीडम,भाग २

व्हायरस: प्रकरण २.अ वीक ऑफ फ्रीडम,भाग १

बाकी कथा खाली वाचा:

दुर्गे दुर्घट भारी: भाग. १

दुर्गे दुर्घट भारी: भाग.२

 टिक टॉक टिक टॉक टिक

tesla model x, tesla model 3, tesla model, used tesla model 3, tesla future, what is ivr, what is artificial intelligence, what is ai, cost of tesla cars, cost of tesla in india, tesla x price in india, tesla model s price in india, tesla model 3 price in india, bmw future car, future electric cars, tesla future, future cars, g wagon price in india, mercedes c200 features, volvo xc40 recharge, xc40 recharge, electric cars 2021,

tesla model x, tesla model 3, tesla model, used tesla model 3, tesla future, what is ivr, what is artificial intelligence, what is ai, cost of tesla cars, cost of tesla in india, tesla x price in india, tesla model s price in india, tesla model 3 price in india, bmw future car, future electric cars, tesla future, future cars, g wagon price in india, mercedes c200 features, volvo xc40 recharge, xc40 recharge, electric cars 2021, future electric cars, future ev cars, upcoming audi electric cars, mercedes upcoming electric cars, kia upcoming electric cars, upcoming electric cars in india, holographic display, holographic interface


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *