• Pune, Maharashtra
व्हायरस
व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग २

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग २

१. मधुचंद्र :भाग २ – तिच्या मानेवर त्याने आपले ओठ टेकवताच एक सुखद लहर तिच्या नखशिखांत पसरली.

रात्रीचे साडेनऊ वाजले होते. श्रीशा विरेनच्या मिठीत निवांत झोपली होती. दिवसभराच्या मौज-मस्तीने दोघेही फार दमून गेले होते. दुपारी त्यांनी जेट स्की ची मजा लुटली होती आणि त्यानंतर ते दोघे जंगल सफारीला गेले होते.

त्यात त्यांनी शिकारीचीही मजा लुटली होती.  जंगल सफारी सोबतच त्यांनी डोंगराची चढाई पण केली होती. डोंगरावरून दिसणारे लवासाचे विहंगम दृश्य पाहून श्रीशा तर हरकून गेली होती. डोंगरमाथ्याला उभे राहून श्रीशा आनंदाने जोरजोरात विरेनचे नाव घेऊन ओरडली होती आणि परत उमटणाऱ्या प्रतिध्वनिंमुळे ती अजूनच आनंदून गेली होती.

मावळतीचा सूर्य डोंगराच्या आड लपताना डोंगरमाथ्यावर विरेनने घेतलेले तिचे चुंबन तिच्या चिरंतर स्मरणात राहील. आकाश आता करडी चादर ओढू पाहतंय असं वाटू लागल्यावर त्यांनी परतीचा मार्ग धरला!

जंगल सफारीवरून परत आल्यावर ते दोघेही खूप थकून गेले होते. वॉटर वीलाला पोहचताच श्रीशाला चालणे देखील जड झाले होते. तिची ती दमलेली अवस्था पाहून बिचाऱ्या विरेनकडे तिला उचलून घेण्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लक राहिला नव्हता.

त्याने तिला उचलून घेताच तीने आपले बाहू त्याच्या गळ्याशी लपेटले आणि डोळे बंद करून तीने निद्रेस आलिंगन दिले. विरेनचीही अवस्था काहीशी तशीच झाली होती. त्यामुळे बिछान्यावर पडताच क्षणी त्यांनी एकमेकांना कवेत घेत झोपेला आपलंसं केलं होतं.

“साद, बरोबर साडेनऊ वाजता मला जागं कर.” डोळ्यांवर झापड येत असताना तो त्याच्या व्ही.ए ला बोलला.

“माझ्या… मनात… एक… शंका… आहे, विरेन. रात्रीच्या… साडेनऊ… की… सकाळच्या?”

“मला खूप झोप येत आहे. तू काही विचारू नकोस, फक्त उठव.”

“त्याने…माझं… समाधान… नाही… झालं.”

“गॉडss, आत्ताच्या साडेनऊला.” तो गुंगीत असल्यागत बोलला.

“समाधान… झालं.” साद म्हणाला आणि शांत झाला.

फक्त मला उठव. श्रीशाला नको.” काही क्षण गेले असतील तोच विरेन बरळला.

“अद्यतन… यशस्वी.”

सादचा आवाज बंद झाला तसे खोलीत मंद दिवे लागले. वाऱ्याच्या मंद झुळूकांवर खिडक्यांचे पडदे मस्त झुलत होते.

साडेनऊ वाजताच विरेनच्या मनगटावरील घडयाळ कंपणं करू लागलं आणि तो जागा झाला. आपल्या मिठीत निश्चिंत झोपलेल्या श्रीशावर त्याची नजर जाताच त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य उमटले. त्याने हळूच आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवले तशी ती त्याला अजूनच घट्ट बिलगली.

तिच्या मानेखालचा आपला हात हळूच बाजूला घेत तो तिची झोपमोड न करता तिथून बाजूला झाला आणि तिच्या गालावरून हात फिरवत काही क्षण तो एकटक तिला पाहत तिथेच बसून राहिला.

नंतर अचानक काहीतरी आठवताच तो पटकन उठला आणि जाऊन तोंडावर पाणी मारू लागला. आपला आळस झटकून तो खोलीबाहेर पडणार तोच त्याने सादला विचारले, “साद, पुढचं माहीत आहे ना?”

“अर्थातच!”

“मग मी तयारीला लागतो.”

“निश्चिंतपणे.”

बाहेर पडून त्याने थेट किचनचा ताबा घेतला. मघाशी जंगलातून आणलेली शिकार आज तो डिनरसाठी बनवणार होता शिवाय आणखी काही डिशेशही तो बनवणार होता. तसा तो उत्तम कूक होता आणि त्याची ही बाब श्रीशाला खूप पसंत होती. त्याने आता आपल्याला पूर्णपणे स्वयंपाकात झोकून दिले होते. आतमध्ये श्रीशा गाढ झोपली होती आणि इकडे हा एकेक डिश तयार करण्यात मग्न होता.

पाण्यात खोलवर श्रीशा अर्धनग्नावस्थेत निपचित पडली होती. तशाच अवस्थेत ती पाण्यात अजून खोलवर जात होती. तिच्या आसपास तुटलेल्या लाकडांचे तुकडे, तुटका बिछाना, बाथटब पाण्यात बुडताना दिसत होते.

तुटलेल्या अवस्थेतल्या त्यांच्या सी प्लेनचा पंखा तिच्या जवळून जाताच अचानक तिला आपण खोलवर पाण्यात बुडत असल्याची जाणीव झाली आणि तीने आपले डोळे उघडले. श्वास घेण्याचा प्रयत्न करताच तिच्या नाकातोंडात पाणी शिरले आणि त्यांतून निघालेले बुडबुडे ऊर्ध्वगामी दिशेने मार्गस्थ झाले.

पाण्याच्या पृष्ठभागावर येण्यासाठी तिची जीवाच्या आकांताने धडपड सुरू होती. श्वास कोंडलेला असूनही ती विरेनला हाका मारण्याचा प्रयत्न करत होती पण; प्रत्येकवेळी तिच्या नाकातोंडात पाणी शिरत होते आणि अस्पष्ट आवाजासोबत बुडबुडे बाहेर पडत होते.

बरीच खटपट करून झाल्यावर तिच्या डोळ्यांना एक प्रकाश नजरेस पडला आणि ती आपले हातपाय जोरजोराने हलवत त्या प्रकाशाच्या दिशेने जाऊ लागली. मघापासून तिच्या नाकातोंडात बरेच पाणी गेले असल्यामुळे आता तिच्या हृदयाची गती हळू हळू मंदावत  चालली होती आणि तरीही बाहेर पडण्यासाठी तिचे शर्थीचे प्रयत्न चालूच होते.

ती जसजशी वर येत होती तसतसा तो प्रकाश अजून गडद होत चालला होता मात्र आता तिची हालचाल खूपच मंदावली होती आणि त्याचसोबत तिच्या तिच्या हृदयाची स्पंदनेही!

जीव गुदमरल्यानंतर शरीरातून प्राण निघून जाताना एखाद्याची हालचाल जशी बंद होते तशी श्रीशाची हालचाल शेवटचे हातपाय मारून अगदी बंदच झाली. हृदयाचे ठोके आता ऐकू येऊनासे झाले. तिचा तो अर्धनग्न देह विस्कटलेल्या केसांसह पाण्यासोबत सावकाश हेलकावे खात होता.

“श्रीशा… ss … श्रीशा? श्रीशा… ss … श्रीशा?” एक बारीक आवाज तिच्या कानी पडला, सोबतच तिच्या शरीराला कसलीतरी कंपने जाणवू लागल्याची जाणीव झाली. क्षणाक्षणाला तो आवाज मोठा आणि स्पष्ट होऊ लागला होता आणि कंपणेही तिला स्पष्ट जाणवू लागली होती.

अचानक तिच्या बंद पडलेल्या हृदयाची गती तीव्र झाली आणि हातापायांची जोरात हालचाल करत ती पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागली. पाण्यातून डोके वर निघताच तीने एक जोराचा श्वास घेतला.

डोळे उघडत ती बिछान्यावर ताडकन जागी होऊन उठून बसली. पाण्यात बुडालेला माणूस अचानक बाहेर आल्यावर जसा श्वास घेतो अगदी तसाच श्वास ती घेत होती. नाकातोंडात पाणी गेल्यागत अगदी ठसके देत!

“श्रीशा, सगळं… ठीक?” साद.

“या आय एम ऑलराईट.” घामाने डबडबलेली श्रीशा आपला चेहरा ओंजळीत घेत धापा टाकीत म्हणाली.

“मला… जाणवतंय… तुझ्या… हृदयाचे… ठोके… तीव्र… आहेत. तुझा… श्वास… फुलला…आहे.”

“हा. एक खूप भयानक स्वप्न पहिलं.”

“मला… वाटतं… मी… विरेनला… सावध… करायला… हवं.”

“कशाबद्दल? आय एम टोटली फाइन, साद. ते फक्त एक स्वप्न तर होतं.”

“तुम्ही… मनुष्य… स्वप्न… पाहू… शकता… ही… बाब… मला… अजबच…वाटते.”

“वी डू हॅव ब्रेन.”

“देन… आय… हॅव… अ… मेमरी.”

“साद, मला जागं केल्याबद्दल धन्यवाद. मला आता फ्रेश होऊ देशील?” असे म्हणत आपले केस बांधत ती बिछान्यातून बाहेर आली.

“अंss, विरेनने… तुझ्यासाठी… खुर्चीत… एक… ड्रेस… ठेवला… आहे.”

“ओह, व्हॉट अ प्लीजंट सरप्राईज?” ती त्या ड्रेसकडे पाहत म्हणाली. “आणि एक मिनिट, तू आता अंss  केलंस, केलंस ना?

“हो.”

“म्हणजे तू विचारही करू लागला आहेस?”

“टेक्निकली… येस. बट… ”

“इंट्रेस्टिंग, आवरते मी आणि हो तुझ्या निर्माणकर्त्याला सांगते मी, तुझ्यात मेंदू टाकायला.” ती मस्करीने बोलून निघून गेली.

“यावर.. मी… काय… बोलावं?” तो निरुत्तर होत म्हणाला व शांत झाला.

बाहेर विरेनने दोघांसाठी मस्तपैकी एका रोमॅंटिक डिनरची first dinner date with व्यवस्था केली होती. त्याने बनवलेल्या निरनिराळ्या डिशेशनी त्याने डायनिंग टेबल छान सजवला होता. टेबलाच्या बरोबर मध्यभागी एक महागडी वाईनची बाटली ठेवली होती. शेजारीच तेवत असलेली मेणबत्ती मात्र वाऱ्यामुळे काही केल्या राहत नव्हती. त्याने कित्येकदा ती पेटवली होती आणि तीही तितक्याचदा विझून त्याची जणू परिक्षाच घेत होती. शेवटी त्याने तिच्या भोवती काच ठेवली आणि तिची फडफड एकदाची बंद झाली. पक्ष्याला पिंजऱ्यात आणि आगीला काचेत कधी बंद करू नये!

श्रीशा तिथे केव्हाही येईल या विचाराने त्याने आपल्या उघड्या अंगावर कोट चढवला आणि दोघांसाठी दोन असे काचेचे ग्लास कपड्याने साफ करत तो ते वाईनच्या बाटलीजवळ ठेवू लागला. अंगावर चढवलेला कोट इतका घट्ट होता की त्याचे पिळदार बहू त्यातून स्पष्ट जाणवत होते. समोरून पाहिल्यास त्याचे छन्नीने घडवावे असे सिक्स पॅक कुणाचेही लक्ष वेधून घेऊ शकले असते.

अचानक मादक संगीत सुरू झाले आणि श्रीशा बाहेर येऊ लागली. ती बाहेर पडताच त्याची नजर तिच्यावरच खिळून राहिली. आपल्या नाजुक मानेला झटके देत मोकळे सोडलेले रेशमी केस उडवीतच ती येत होती. चंद्राच्या प्रकाशाने चमकत असलेला तिच्या गळ्यातील हिऱ्यांचा हार तिच्या सौंदर्यात अजून प्रकाश टाकत होता.   

pictures are for illustration purpose only

अंगावर चढवलेला लाल रंगाचा लो नेक आणि हाय कट  गाऊन आपल्या दोन्ही हातांनी पकडून ती त्याच्याकडे येत होती. गाऊन मधून नजरेस पडणाऱ्या तिच्या वक्राकार उरोजाने आणि डौलदार मांड्यांच्या तोऱ्याने बिचारा विरेन पुरता पाघळला होता. उंच टाचांच्या सँडल्सचा होणारा आवाज त्याच्या हृदयाच्या ठोकयांशी जणू एकरूपच झाला होता!

चंद्राच्या शीतल प्रकाशात जणू एखादी स्वर्गीय अप्सराच पृथ्वीवर अवतरली आहे आणि ती आपल्या कमरेला लटके झटके देत त्याच्याकडे चालत येत आहे असं त्याला वाटत होतं.

ती जवळ येताच तो तिला सामोरा झाला आणि आपला एक हात पुढे केला. तिनेही आपला हात त्याच्या हातात अलगद दिला तसं त्याने तिला आपल्या जवळ खेचून घेतलं. ती येऊन त्याच्या छातीवर आदळली. दोघांचे श्वास एकमेकांत घुटमळले.

त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर खिळली होती. तिच्या पाणीदार डोळ्यांत जणू तो चंद्राचे प्रतिबिंबच पाहत होता. तिच्या लाल रसरशीत ओठांतून जणू मधुच श्रवत आहे असाच भास त्याला होत होता.

“उद्या काही पुनवेचा चंद्र निघणार नाही.” तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला.

“आणि असं का?” मादक स्वरात ती कुजबुजली.

“कारण हा चंद्र आहे ना माझ्या मिठीत, त्याच्या सौंदर्यापुढे तो फिका पडेल.”

“बस्स, एवढंच?”

“आणि..”

“आणि?”

“आणि..हे ओठ.. कितीही मधुप्राशन केले तरी तृप्त न करणारे.” असे म्हणत त्याने तिचा खालचा ओठ आपल्या ओठांमध्ये घेतला आणि तिच्या मधुरसाचे तो कलेकलेने प्राशन करू लागला. एखाद्या पांथस्थाला वाळवंटातील पाणपोई जसं आपल्या जलाने तृप्त करते तशी ती त्याला आपल्या ओठांनी तृप्त करत होती. डोळे मिटून त्यांनी एकमेकांचे श्वास आपापसांत विलीन केले होते व पाठीमागे साजेशा संगीताची त्यांना साथ होतीच!

चुंबनात हरवून गेलेल्या श्रीशाला अचानक आपला श्वास कोंडतो आहे आणि मघाशी पडलेल्या स्वप्नाची आठवण झाली आणि तीने हिसक्याने विरेनला बाजूला केले. तिच्या अशा अचानक वागण्याने तोही जरा चकीतच झाला.

“हे.. आर यु.. ऑलराईट?” तिला सावरण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला.

आपल्या अशा अचानकच्या वागण्याने तीही जरा संकोचीत झाली होती. आपल्या चेहऱ्यावरच्या बटा कानमागे नेत ती थोडी अडखळतच हो म्हणाली.

“शुअर?”

तीने हसल्या चेहऱ्याने त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला.

“गुड…सो कॅन आय आस्क यु फॉर डान्स?” एका पायाची घडी घालत, एक हात पुढे करत व थोडंसं तिच्याकडे झुकत त्याने विचारले.

तिने त्याचं मन राखण्यासाठी एक छान स्मितहास्य केले व आपला हात त्याच्या हातात दिला आणि दोघांनी संगीतावर फेर धरला. नाचताना जेव्हा जेव्हा तो तिच्या जवळ येत होता तेव्हा तेव्हा तिचे भाव बदलत होते. शरीराने ती त्याच्यासोबत नाचत होती मात्र तिचं मन ..? कसली तरी अनामिक भीती तिला वाटत होती हे मात्र नक्की होतं.

तिची ही अस्वस्थता विरेनला समजायला वेळ लागला नाही. त्यामुळे नृत्य थांबवत त्याने तिचा हात पकडून सरळ डिनर सजवलेल्या टेबलाजवळील खुर्चीत बसवले व आपणही तिच्या समोरील खुर्चीत जाऊन बसला.

 जसं एखादं नवीन जोडपं आपल्या पहिल्या डिनर डेटवर things to do on dinner date असताना थोडंसं संकोचल्यागत जेवतं अगदी तसंच मनाला मोकळं न करता ते दोघे जेवू लागले.

श्रीशा मधला हा बदल त्याला लगेचच जाणवला पण; जेवताना तिला विचारायचे त्याने मुद्दामूनच टाळले. तो तिच्याकडे पाहत एकेक घास खात होता मात्र ती त्याची नजर चुकवत खाली मान घालून आपलं जेवण करत होती. तरीही तो मात्र तिला हे घे ते घे करत होता. तिच्या ग्लासमधील वाईन best wine in the US संपली की पुन्हा तो त्यात वाईन भरत होता कारण समोर होती ती त्याची पत्नी होती आणि आपल्या पत्नीचा तो पती होता!

बाहेर पौर्णिमेचं छान चांदणं पडलं होतं. चंद्राचं प्रतिबिंब लेकच्या पाण्यावर हळुवारपणे तराळत होतं. इकडे आतमध्ये खिडकीतून पुनवेचं शुभ्र चांदणं डोकावत होतं त्यामुळे आज विला स्वयंप्रकाशित वाटत होता. त्यात वाऱ्याच्या झुळुकेसरशी लटकलेले विंड चाईम्सही मधुर आवाज करीत नाजुक डौलत होते!

आतमध्ये भल्या मोठ्या बाथटब मध्ये श्रीशा विरेनच्या पुढ्यात त्याला बिलगून बसली होती आणि विरेन व्हर्च्युअल स्क्रीन वर वि. स. खांडेकरांची ‘ययाती’ तिला वाचून दाखवत होता- मुकुलिकेचे आणि माझे ओठ ज्या क्षणी जुळले, त्या क्षणी माझ्या मनातली मृत्यूची भीती लोप पावली. त्या रात्री मी मुकुलिकेची किती चुंबने घेतली आणि तिने मला किती चुंबने दिली-आकाशतल्या नक्षत्रांची कुणी गणती करू शकतो का?—-

 “आपला पहिला किस first kiss आठवतो तुला?” ऐकण्यात मग्न श्रीशाने मध्येच विचारले.

“आकाशतल्या नक्षत्रांची कुणी गणती करू शकतो का?” त्याने हसतच उत्तर दिले.

“सो फनी. मी पहिल्या किसबद्दल how to take first kiss विचारलं.” आपला कोपर त्याच्या पोटात रुतवत ती म्हणाली.

“आऊच ….अं.. लेट मी थिंक.”

“तुला त्यासाठी विचार करावा लागतोय? आय मीन.. कम ऑन.”

“हा.. आठवलं आठवलं.”

“व्हेअर.. व्हेअर.”

“माझ्या घरी?”

“कधी?”

“माझ्या टेक स्टार्टअपच्या पहिल्या वाहिल्या यशाच्या दिवशी?” how to start a tech startup

“माझं टेक स्टार्टअप?” tech startups in 2021

“हो तेव्हा ते माझंच होतं. मी तुला नीटसा ओळखतही नव्हतो. अँड लुक तरीही आपला पहिला किस how to have first kiss झालेला पण.. वॉव.. आय मीन जस्ट वॉव.”

“ओह प्लीज शट अप. तो काही किस नव्हता हं.” ती त्याच्याकडे वळत म्हणाली. “आय जस्ट.” म्हणत ती लाजू लागली.

“यु जस्ट?”

“मी फक्त तुझ्या ओठांवरती ओठ ठेवले होते. दॅट्स इट.”

“दॅट्स इट.”

“अरे त्याला किस नाही म्हणत.” ती लाजत म्हणाली.

“ओह, मग मला दाखव किस कशाला म्हणतात?” असे म्हणत त्याने आपले ओठ तिच्या ओठांजवळ आणले. आता तिला काय करावे काही समजेना. तिचा चेहरा अगदी गुलाबी झाला होता आणि डोळ्यांत एक चमक आली होती. त्याने तिला तसेच मागे नेले. ती पाण्यात आडवी झाली व तो तिच्या वर.

दोघेही पाण्यात बुडाल्यावर त्याने जसे तिचे ओठ आपल्या ओठांत घेतले तसे तिने आपले डोळे बंद केले आणि अचानक कालचे स्वप्न आठवल्यामुळे तिने भीतीने विरेनला जोरात मागे ढकलून दिले.

“व्हॉट द..” आपले शब्द आवरून त्याने तिला विचारले, “हेय बेबी, तू ठीक आहेस ना?”

ती जोरजोरात श्वास घेत होती. तिला काय झालं होतं हे तिलाच समजलं नव्हतं.

“श्री..? हनी, काय होतंय तुला? मला सांगशील प्लीज?” तिचा चेहरा आपल्या ओंजळीत पकडत त्याने विचारले.

“नथिंग. आय एम फाईन. आय एम फाईन.”

“नो.. यु आर नॉट फाईन. कालपासून तुझं काहीतर बिनसलंय. सांग मला काय होतंय?”

“विरू, खरंच काही नाही रे. काल मला एक स्व..” तिने पुढचे शब्द तोंडातच दाबले.

“काल काय श्री?”

“नथिंग.” म्हणत ती थोडं थांबली आणि विरेन पुढे काही बोलणार तोच ती पुन्हा म्हणाली, “विल यु प्लीज लिव मी अलोन?”

त्याने निराशेने तिच्याकडे पाहिले आणि शेजारी घडी घालून ठेवलेला पांढरा गाऊन घालून तो तिथून चलता झाला.

“शिट.. शिट.. शिट. मी हे काय केलं.” असं म्हणत तिने आपले केस दोन्ही हातांनी पकडले आणि डोके गुडघ्यात घालून ती रडू लागली. आपण कालपासून विरेनशी चुकीचं वागतोय याचा तिला पश्चाताप होत होता. काल रात्री तर किती मेहनत घेऊन त्याने आपल्यासाठी डिनर बनवले होते आणि आपण त्याचं साधं कौतुकही केलं नाही ना जेवताना साधं त्याच्याकडे पाहून एक स्मितहास्य दिलं. तो आपल्यासाठी इतकं सगळं करतोय आणि आपण त्यालाच त्रास देतोय या विचाराने ती अजून जास्तच अश्रू गाळू लागली.

“मी खूप वाईट वागले विरू. आय एम सॉरी. मी खूपच वाईट आहे. पण मला काय होतंय हे कसं सांगू तुला?” ती रडता रडता एकटीच पुटपुटली.     

“ती… झोपेतून… उठली… तेव्हा… खूप… घाबरली… होती. मला… म्हणाली… तिने… वाईट… स्वप्न… पहिलं.” साद म्हणाला.

बाहेर येऊन विरेन व्हर्च्युअल स्क्रीनवर  तिच्या अशा अचानक वागण्याच्या काही गोष्टी पडताळत होता.

“हं, याचा अर्थ मला तुझ्यावर अजून खूप काम करायचं बाकी आहे तर.”

“मला… माझ्यात… सुधारणा… झालेली… आवडेल.”

श्रीशा आपले डोळे पुसून मनाशी काहीतरी ठरवून  बाथटब मधून उठली आणि अंगावर गाऊन चढवून आरशासमोर उभी राहून थोडी तयार झाली. चेहऱ्यावर हास्य आणत ती आरशात पाहून हसली आणि बाहेर पडली.

“पण तुला कशाला मेंदू हवा आहे?” विरेनने सादला विचारले.

“मला… तुम्हा… मानवांसारखा… विचार… करायचा… आहे.”

“तुला तर जास्तच घाई आहे रे.”

“डज सम वन वॉन्ट टू ट्राय ए रोलर कोस्टर राईड ऑन मी?” ती दरवाजातूनच आपला गाऊन उघडत म्हणाली.

“क.. क.. काय?” विरेनला काय बोलावं काही काळेनासं झालेलं.

“मी… झोपी… जातो.” साद पटकन म्हणाला.

“हा.. हा .. तू .. तू झोप.” असे म्हणत त्याने व्हर्च्युअल स्क्रीनही हाताच्या एका इशाऱ्याने बंद केली.

“डज सम वन वॉन्ट टू ट्राय ए….” ती असं म्हणू लागताच त्याने आपले ओठ दाबत आपला एक हात हळूच वर केला आणि तिच्याकडे पाहून तो हसू लागला.

त्याचा प्रतिसाद मिळताच तिने आपल्या अंगावरील गाऊन खांद्यावरून खाली सोडून दिला आणि आपल्या पायांचे पंजे सावकाश पुढे टाकत ती हळू हळू त्याच्याकडे चालत आली आणि जवळ येताच त्याला घट्ट बिलगली.

तिच्या मानेवर त्याने आपले ओठ टेकवताच एक सुखद लहर तिच्या नखशिखांत पसरली. आपली मिठी सैल करत तिने त्याचा चेहरा आपल्या दोन्ही हातांत पकडला आणि सुरू झाला तो अगिनत चुंबनांचा वर्षाव!

भ्रमराच्या स्पर्शाने बागेतील कमलफुले त्यांना आपला रस वाटण्यास आपल्या पाकळ्या पसरवतात अगदी तशाच काहीशा उभयतांच्या मनाच्या बागेतील कमलफुले एकेक करत उमलू लागली होती. त्याच्या गुंजारवाने थरथरणारी ती कमलफुले भ्रमराला आता आपल्यांत सामावून घेण्यास कधीची सज्ज झाली होती.

एकमेकांत गुंतलेले ओठ सोडवत त्यांनी एकदा एकमेकांकडे पाहिले.

“टूडे, यु विल हॅव ए रोलर कोस्टर राईड roller coaster ride.” विरेन उसासे टाकत हळूच तिला म्हणाला. ती आपला खालचा ओठ दातांत दाबत नजुकशी हसली आणि आपला हात त्याच्या गाऊनला नेत तिने एका हिसक्यात त्याची गाठ सोडली व त्याला त्याच्या खांद्यावरून बाजूला केला. त्याच्या भारदस्त छातीला कुरवाळत तिने त्याला एक जोराचा धक्का दिला तसा तो मागे बिछान्यावर पडला.

त्याच्या मागोमाग तीही बिचण्यावर झेपावली व त्याच्यावर येऊन बसली. त्याच्या देहावर चुंबनांचा वर्षाव करीत तिने त्याला लालबुंद निखाराच बनवून टाकले होते तर इकडे वरून पडणाऱ्या पुनवेच्या शीतल प्रकाशाने तिच्या शुभ्र देहाला यथोचित उजळले होते पण; सहवास निखाऱ्याचा असल्यामुळे तिची गोरी काया लालबुंद नाही झाली तर नवलच!

तापलेल्या निखाऱ्याचा अग्निने ताबा घेतला होता आणि धग मात्र तो बिचारा, बिछाना सोसत होता.!

शेवटी प्रणयातूर तिने त्याला आपल्यात सामावून घेतले आणि सुरू झाली ती रोलर कोस्टर राईड एकदाची!

एकमेकांच्या आवेगाची, ऊश्वासांची, सुखावह वेदनेची नी नवनिर्मितीची!

On the island Lavasa which Viren owned privately, he and his wife Shrisha were spending their honeymoon.

literally, no one was there to disturb them. they were satisfying all their intimacy with immense pleasure and love.

he cooked food for her for the dinner and surprised her with his love and dignity.

कथा मालिकेचा आधीचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर जा.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

blog marathi, blog writing format, blog writing examples in hindi, best honeymoon destinations in october, india honeymoon destinations, maldives honeymoon package for 4 days,water villa in maldives, marathi chawat katha,marathi chavat katha, marathi pranay katha,things to do on honeymoon,

https://lekhanisangram.com/novel/virus/honeymoon-part-1/

5 thoughts on “व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग २

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *