कविता

हे मेघा, ऐकशील का जरा?
हे मेघा, ऐकशील का जरा?
जरा बरसवशील का धारा?
होईल ढगांचा गडगडाट
होईल वीजांचा कडकडाट
बिलगेल माझी सखी हळूच माझ्या गळ्यात.
हे मेघा, ऐकशील का जरा?
जरा बरसवशील का धारा?
होईल वर चेहरा तिचा
दिसतील तिच्या नजरेत वीजा
भिजेल ओले चिंब दोघे पावसाच्या सरींनी
हे मेघा, ऐकशील का जरा?
जरा बरसवशील का धारा?
होतील चिंब ओली बदने
होतील पूर्ण अपूर्ण वचने
टिपेन तिच्या गालावरून ओघळणाऱ्या श्रावणधारा
हे मेघा, ऐकशील का जरा?
जरा बरसवशील का धारा?
– शिवसुत.

[१८ जून २००९ साली ही कविता लिहिली. cip सुरू असताना. ४ ते ४: १५ च्यायात लिहिली. बाहेर पावसाचं वातावरण होतं. cip सुरू होतं. मोदी मॅडमनी सर्वांना काही ना काही लिहायला सांगितलं होतं तेव्हा १५ मिनिटांत लिहिली. एक प्रत त्यांच्याकडे! ]
संग्रामसिंह शिवाजी कदम
0
Tags :