कविता

एक होडी
अश्रू माझ्या हास्यामागील
कधी न दिसले तुला
कधी न दिसला शांत अन् खोल
सागर तो खारा गहिरा
गहिरा होता घाव मग तो
अन् जखम भळभळती हृदयाची
हसत असले दिसत जरी
खारी गंगा तव वाहत होती

एक होडी होती मग
अशीच उगाच भरकटलेली
दबलेली पिचलेली अन्
कुठे कुठे ती तुटलेली
लाटांवरती उडायची
आदळायची आपटायची
कधी तीळ तीळ तुटायची
अन् मनोमन ती रडायची
कधीतरी तो भेटेल किनारा
संपेल एकदाचा वनवास सारा
वालुकेवरती निजायची
परि इच्छा जिवंत होती!
-शिवसुत
संग्रामसिंह शिवाजी कदम
0
Tags :