कविता

एक चिता तिथे पेटत होती

एक चिता तिथे पेटत होती
महामारीच्या त्या भयाण राती
एक चिता तिथे पेटत होती
लालबुंद निखाऱ्यांची त्या
धग ना कुणा जाणवत होती
तव तोडण्या लचके चितेचे
काही गिधाडे मग जमली होती
सफेद पांढऱ्या पंखांचे अन्
बगळे तिथे अवतरले होते
सुईसारख्या चोचीने ते
रक्त चितेचे शोषित होते
श्वान-श्वापदां, तरस-लांडग्यांनी
तर जिवंत असतां
श्वास चितेचे ओढले होते
मग लाल भडक रक्ताने
रक्तरंजित तुरे ते
शिरपेचात आपुल्या रोवत होते
तव दूर अशा त्या कातळ पाषाणी
पिकलेली ती आयाळ फुलवून
मकराश्रू जणू गाळीत निश्चल
वनराज हतबल उभा होता.
-शिवसुत.
या ही कविता वाचा.
Tags :
👍👍
thanks