• Pune, Maharashtra
कथा
दुर्गे दुर्घट भारी: भाग.२

दुर्गे दुर्घट भारी: भाग.२

Spread the love

दुर्गे दुर्घट भारी

रात्रीच्या त्या विचाराने तिची पार झोप खराब करून टाकली होती. सकाळी उठल्यावर तिचे डोके अगदी जड झाले होते. अजूनही तिच्या कानांत एकदम हळू आवाजात तिला ती वाक्ये ऐकु येतच असल्याचा सतत भास होत होता.

ती मग मनाशीच बोलू लागली- ‘का सतावताहेत मला ही वाक्ये? त्यानंतर ही काही पहिली नवरात्र नाही माझी, मग आता याच वेळी असं का होतंय मला? नक्कीच विधात्याची काही योजना असेल यामागे. काहीतरी करवून घ्यायचं असेल त्याला माझ्याकडून. काय समे, कुठल्या युगात वावरते आहेस तू? हं, कदाचित मीच जरा जास्त विचार करतेय. नाही नाही हे थांबलं पाहिजे.’

पण काही केल्या ती वाक्ये तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हती. नवरात्रोत्सव सुरू झाला, घरात घटस्थापना झाली; पण समीक्षा?

Durge Durghat Bhari
Durge Durghat Bhari : Image is for illustration purpose only

तिचा प्रत्येक दिवस उजडत होता तो त्या वाक्यांनी आणि त्याच वाक्यांनी तो मावळतही होता. आपलं आयुष्यं जणू एका चक्रात अडकल्यासारखे पुन्हा पुन्हा तिथेच येतेय असं तिला वाटायला लागलं होतं. दोन वर्षांपूर्वीची समीक्षा आणि आत्ताची समीक्षा दोघी एकमेकींभोवती फिरत होत्या. जणू  त्यांनी नवरात्रीच्या सणात फुगड्यांचा फेरच धरला होता!

उद्या नवरात्रीचा शेवटचा दिवस होता. दसऱ्याचा दिवस. कशीबशी आवरून, आपली स्कूटी घेऊन ती घराच्या बाहेर पडली. घाईतच.

“अगं डबा तर घेऊन जा. कसली घाई म्हणायची हिला? मेली डबा पण विसरून गेली.” आई म्हणाली खरी; पण ऐकायला ती तिथे हवी तर.

“अगं, जाऊ दे. आता ती काही लहान नाही राहिली आहे.” वर्तमानपत्रात तोंड घातलेले बाबा समजावण्याच्या हेतूने म्हणाले, “आणि कदाचित ती लवकर येणार असेल ऑफिस मधून. उद्या दसरा नाही का? त्याच्या तयारीसाठी.”

“तयारी? आणि ती? कप्पाळ  माझं.”

“तू काही असं बोलतेय जणू ती तुला काही मदतच करत नाही. तुला आता नाही कळणार काही. तिला एकदा जाऊ दे सासरी, मग तुझ्या अक्कलेवर प्रकाश पडेल.”

बाबांना तर निमित्तच हवं होतं तिची अक्कल काढायला.

“काय हो सकाळी सकाळी माझी अक्कल काढता? तो चहा पिऊन घ्या आधी. नाहीतर गार व्हायचा. तुम्हा पुरुषांना तर निमित्तच हवं असतं ना? कधी एकदा बायको कात्रीत सापडतेय आणि-”

“अखंड पुरुष जातीचं मला माहीत नाही हं; पण माझ्या बाबतीत म्हणत असशील तर हो बरं का. आणि कात्री कात्री काय करतेय? मी काय कात्रीने गळा कापणारा हजाम वाटलो की काय तुला?” बाबा हाताच्या बोटांची कात्री करत म्हणाले.

“कात्रीने नाही हो, केसाने असतं ते.” कपाळाला हात लावत आई म्हणाली.

म्हणतात ना, एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत; पण इथे तर म्यान आणि तलवार दोघेही आपापसांत भिडले होते.

मनात विचारांचं काहूर उठलं असताना एखाद्याला आपण काय करतोय याचं भान कुठे राहतं? मनःसागराच्या त्या गहिऱ्या डोहात कुठे ना कुठे तो कालिया नाग स्वैर संचार करत असतो, जो कधी ना कधी आपल्यावरच फणा काढणार याची कल्पना देखील आपल्याला असते.

समीक्षेच्या मनातला तो कालिया आता जागा झाला होता आणि त्याचं कालियामर्दन करण्यावाचून तिला आता गत्यंतरही नव्हते. आपलं मन थोडं घट्ट करून तिने आपली स्कूटी आत पोलिस चौकीत घेतली. मनाची चलबिचल होत असताना ती चौकीच्या पायऱ्या सावकाशपणे चढून वर आली. थोडीशी नजर इतरत्र फिरवत काहीशा चोरट्या नजरेने ती आत दाखल झाली आणि समोर पाहताच तिचे डोळेच विस्फरले अगदी!

“अरे देवा, हा माझा भूतकाळ माझी काही पाठ सोडणारच नाही का?” असे मनातल्या मनात बोलून ती एकदम मागे वळाली आणि आल्यापावली परत निघाली.

“समीक्षा? समीक्षा?” रवी मागून हाका देत तिच्याकडे येत होता.

“थांब समीक्षा.” तो तसे म्हणताच तिची पाऊले जागेवरच थांबली. तो लगबगीने तिच्या पुढ्यात येऊन उभा राहिला आणि विचारू लागला, “तुला कसं कळलं मी या चौकीला आहे ते? मी तर चाटच पडलो तुला समोर पाहून. वाटलं नव्हतं तू मला भेटायला येशील. व्हॉट ए प्लीजंट सरप्राइज! किती वर्षातून भेटतोय आपण.!”

“एक्सक्यूज मी, मी काही भेटायला वगैरे आली नव्हती, प्लीज. आणि मला तर हे आताच कळलं की तू इन्स्पेक्टर झाला आहेस. सो प्लीज.” थोड्याशा नाखुशीनेच ती म्हणाली.

“मग इकडे पोलिस चौकीत कशी? काय मर्डर तर नाही ना केलास तू?” 

ती तिच्या विचारांत हरवून गेली होती.

“ओ हॅलो, कुठे हरवलीस?” तिच्या समोर चुटकी वाजवत त्याने तिला भानावर आणले.

“अं? कुठे काय? काहीच तर नाही. ते.. मी.. आपलं..सहजच.” ती बोलता बोलता थांबली आणि निघते मी म्हणत ती तिथून जाऊ लागली.

“समीक्षा?” त्याने हाक दिली तशी ती जागेवरच थांबली.

“कॉफी?”त्याने परत विचारले; पण ती तशीच पाठमोरी उभी राहिली. काही क्षण तशीच थांबून ती सावकाश मागे वळली आणि नुसती होकारार्थी मान हलवली. रवीच्या चेहऱ्यावर मग एकच स्मित उमटले.

एका गर्दी नसलेल्या ठिकाणी जाऊन कॉफी पिताना सावकाश का होईना पण त्यांच्यात आता बऱ्याच गप्पा रंगल्या होत्या. जुन्या गप्पा. कॉलेजला असतानाच्या! करीयरच्या!

“काय करतेस हल्ली? रवीने विचारले.

पोर्टफोलियो मॅनेजमेंट फर्ममध्ये इन्वेस्टमेंट अॅडवायजर आहे मी.” portfilio management services, investment advisor, financial planner

“सोपी भाषा नाही का थोडी?” आपला ओठ दाबत आणि कपाळावर आट्टया पाडीत त्याने विचारले. what is sap ppm, servicenow ppm

स्टॉक मार्केट, स्टॉक मार्केट इन्वेस्टींग मध्ये आमची कामे चालतात.” stock market, investing in stock market

“अच्छा म्हणजे एजंट का?”

“ नाही आणि हो पण.”

“एखादी टीप मिळेल का? स्टॉक बद्दल किंवा एखादा म्युच्युअल फंड पण सांग.” best mutual funds to buy, best mutual funds to invest

त्याने असे विचारताच तिने एक जळजळीत कटाक्ष त्याच्यावर टाकला आणि मग शांतता पसरली.

“हे इन्स्पेक्टर व्हायचं कसं आणि कुठून?” तिने बोलता बोलता प्रश्न केला.

“तो एक अपघात होता असं समज.” त्याने हसूनच उत्तर दिले आणि परत तिलाच प्रतिप्रश्न केला, “पण तू पोलिस चौकीत कशी काय? खरंच काही काम होतं का?”

त्याच्या त्या प्रश्नाने ती अचानक ओशाळली. मघापासून दिलखुलास गप्पा मारणारी समीक्षा एकदम शांतच झाली. काही क्षण दोघेही काहीच बोलले नाहीत. ना त्यांनी एकमेकांच्या नजरेस नजर मिळवली. शेवटी शांततेचा भंग करत रवी म्हणाला, “समीक्षा, खरं तर मला तुला सॉरी बोलायचं होतं. कॉलेजला असताना मी तुला प्रपोज how to propose a girl करायला नको होतं; पण मला वाटत होतं की तुझ्या मनात काही असेल म्हणून मी विचारलं तेव्हा. आणि त्यातही आपण चांगले मित्र होतो तर -” त्याला पुढे काय बोलायचं सुचेना, “म्हणून मी विचारलं. मला तेव्हा सिद्धांतबद्दल काहीच माहीत नव्हतं. शप्पथ. आणि दोन वर्षापूर्वी तर त्याच्या मृत्यू-” तो अचानक थांबला.

“आय एम सॉरी. रियली आय एम.” तो केविलवाणे तोंड करत म्हणाला.

समीक्षा खाली नजर करून त्याचं सर्व ऐकूण घेत होती, मात्र त्यावर ती काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यांच्या कडा पणावल्याचे त्याला जाणवले. आपण चूक केल्याची भावना त्याच्या मनात जागी झाली. शांत डोहाच्या पाण्याला ओंजळीत घेऊन प्यायचे असते ना की त्याला उगाच गढूळ करायचे असते. क्षणभरासाठी तिच्या नेत्रडोहातील पाणी अलगद पिऊनही टाकण्याची त्याची इच्छा झाली खरी; पण पिणार तरी कोणत्या अधिकाराने? मैत्री? ती तर प्रेम मध्ये आलं तेव्हाच उडाली. मग-

अजून काही बोलून तिला दुखवायचे नाही असा विचार मनात आणून तो उठू लागला. तेवढ्यात तिने त्याला खूप आश्वासक नजरेने विचारले, “रवी,? अजूनही प्रेम करतोस माझ्यावर?” 

तिच्या त्या एका प्रश्नाने तिच्या डोळ्यांतला तो खारट पाण्याचा दर्या त्याच्या डोळ्यांत आपसूकच उमटला. तिच्या त्या अनपेक्षित प्रश्नाने त्याला आनंदून जावे की दु:खी व्हावे हेच कळेना. नकळत त्याच्या हृदयाच्या त्या गंजत पडलेल्या तारा पुन्हा तिनेच तर छेडल्या होत्या आणि त्याचे तरंग त्याच्या सबंध शरीरभर पसरले होते.

जागेवरून उठू लागलेला तो पुन्हा खाली टेकला. त्याने तिच्या नजेरला नजर मिळवत होकारार्थी मान हलवली. तिने त्याचा हात हातात घेतला आणि बोलू लागली, “मी तुला भावनिकतेतून घेतेय असं बिलकुल समजू नकोस. पण मी जे सांगणार आहे त्यानंतर तुझे माझ्याबद्दलचे मत बादलूही शकते.”

“नेमकं काय सांगणार आहेस?” त्याने गोंधळूनच विचारले.

“सिद्धांतच्या केसबद्दल.”

“पण ती तर ओपन अँड शट केस आहे. मी आल्यावर स्टडी केला त्याचा.”

“ बरं, तुला ती राधिका आठवतेय? राधिका सावंत?” 

“हो, आपल्याला ज्युनियर होती; पण तिने तर आत्महत्या केलेली ना?” त्याने असे विचारताच समीक्षा एकदम गप्प झाली आणि रडू लागली.

“हे बघ, हे बघ समीक्षा. तू रडू नकोस. काय झालंय ते मला स्पष्ट सांगशील?” तो तिच्याजवळ येत तिला धीर देत म्हणाला.

“जगासाठी तिची आत्महत्या होती; पण तिचा मर्डर झाला होता.”

“व्हॉट? मर्डर? कुणी?” त्याने आश्चर्यचकित होऊन विचारले.

समीक्षाने आपले डोळे पुसले आणि एक जोराचा श्वास घेतला व पुढे बोलू लागली, “एके दिवशी राधिका आलेली माझ्याकडे. रडत. मी कारण विचारल्यावर तिच्या उत्तराने तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणाली सिद्धांतकडे तिचे आणि त्याचे नको त्या अवस्थेतील व्हिडिओज आणि फोटो आहेत आणि त्याचाच आधार घेत तो मला सतत ब्लॅकमेल करत आहे. माझ्याकडून शरीरसुखाची आणि ना ना तऱ्हेची मागणी तो करत आहे.”

समीक्षा हळू हळू आपल्या मनात साठवून ठेवलेल्या त्या शापित फुलाची एकेक नीच पाकळी रवीपुढे उलगडत होती.

राधिकाने समीक्षाला सांगितल्याप्रमाणे सिद्धांतने अशा बऱ्याच मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवले होते. त्यातून समीक्षाही सुटलेली नव्हती. त्याच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये त्याला बळी पडलेल्या सर्वांचे नाजुक अवस्थेतील व्हिडिओज व फोटोही होते आणि तो त्यावरून सर्वांना ते इंटेरनेटवर टाकण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत होता.

“मग त्याने ते टाकले?” मघापासून शांतपणे ऐकत असलेल्या रवीने समीक्षाला प्रश्न केला.

“आमचं नशीब की त्याने हे कुठे लिक केले नाहीत.”

“मग राधिकाचं काय झालं?”

“तिच्या बिचारीच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले होते सर्व आणि एक दिवस तिने-” असे बोलताना तिला रडूच कोसळले. तिने आपले डोके रवीच्या खांद्यावर ठेवले आणि आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

ती शांत होताच त्याने तिला विचारले, “त्याने तुलाही?”

“माझ्यावर अजून ती वेळ नव्हती आली, कारण अजून आम्ही एकत्र होतो ना.”

“मग. . .  सिद्धांत. . .  कसा. . . ?”

“आय किल्ड हिम.” एका झटक्यात ती बोलून गेली आणि रवी एकदम स्तब्धच झाला; पण समीक्षाला आपल्या काळजावरचे एक ओझे खाली केल्यासारखे वाटले. तिने मग रवीला आपण सिद्धांतला कसे मारले हे सविस्तर सांगून टाकले.

“आणि म्हणून मी आज पोलिस चौकीत आले होते. गेले आठ दिवस माझ्या मनात सतत विचार येत होते. आपण चूक आहे की बरोबर या विचाराने माझे मनच मला खायला उठायचे.” ती आता धीटपणे बोलत होती. तिने त्याचा तो लॅपटॉप best laptop to buy आणि मोबाईल best mobile to buy काढून त्याला ते सर्व दाखवले.

“माय गॉड, कॉलेजला असताना तो पुढे जाऊन असं काही करेल याची कल्पनाच करवत नाही. खूप वाईट माणूस निघाला तो? छे छे माणूस कसला? राक्षसच तो!” रवी म्हणाला.

थोड्या वेळाच्या शांततेनंतर त्याने तिला प्रश्न केला, “मग पोलिसात का नाही तक्रार केलीस तू? आय मीन तुम्ही?”

“पोलिसांत जाऊन काय राधिका परत तर येणार नव्हती. शिवाय जर ते व्हिडिओज इंटेरनेटवर लिक झाले असते तर अजून कुणी तरी-” तिने बोलता बोलता एक मोठा सुस्कारा सोडला.

“आणि म्हणून तू त्या महिषासुराचा वधच केलास.”

ती त्यावर काहीच बोलली नाही. आपली नजर दूर कुठेतरी रोखून ती ओठांवर एक स्मित आणत एकटक पाहत होती.

“काय झालं हसायला?”

“मला कधी कधी वाटतं मी हे केलंच नाही. दोन वर्षांपूर्वी मी त्याला ठार केले तेही दसऱ्याच्या दिवशी.पाठीमागे कोणताही पुरावा न ठेवता. कधीकधी ना, न राहून वाटते की जणू तेव्हा साक्षात महिषासुरमर्दिनीच माझ्या अंगात संचारली होती. जे काही केले ते तिनेच केले. मी तर एक निमित्तमात्र होती.” 

“स्ट्रेन्ज ना?” रवी म्हणताच दोघांनी एकमेकांकडे पाहत स्मित हास्य केले.

आज दसरा होता. समीक्षा आईला पुरण वाटायला how to make puran poli मदत करत होती. बाबांचं काही वेगळं नको सांगायला. अर्धं वर्तमानपत्र पाठ करून झालं होतं त्यांचं. इतक्यात दरवाज्याची बेल वाजली. बाबांनी जाऊन दरवाजा उघडला आणि बाहेरून बाबांचा आवाज कानी पडला. “इन्स्पेक्टर साहेब? तुम्ही? पत्ता चुकला की काय?”

बाहेर पोलिस आल्याचे कळताच समीक्षेच्या हातातील पुरणाचा गोळा खालीच पडला आणि तिच्या पोटात एक गोळा आला.

पोलिस आलेत म्हटल्यावर आई हातातील काम सोडून बाहेर पळाली आणि समोर रवीला पाहताच म्हणाली, “अरे रवी? तू ? चक्क इन्स्पेक्टर? काय काम काढलंस इकडे? समूला भेटायला आलास का?”

“भेटायला नाही आलो मी, तिला बेड्या ठोकायला आलो आहे.” तो धारदार आवाजात बोलला.

त्याचं बोलणं ऐकून मात्र समीक्षेच्या काळजाचं पाणी पाणी झालं. काल आपण त्याला सर्व काही मनमोकळेपणाने सांगितलं ती चूक केली की काय आपण? मधल्या काळात आपण त्याला कितीदा आठवले होते, खूप काही त्याला बोलायचे होते, काल चौकीत त्याला पाहिल्यावर माझे हृदय किती छान धडधडत होते आणि कालच तो आपल्याला म्हणालाही होता की अजून त्याचं आपल्यावरती तितकंच प्रेम आहे. मलाही त्याला विचारायचं होतं, त्याच्या प्रेमाला अजून एक संधी देऊन पाहतोस का म्हणून! पण आता? सारं सारं व्यर्थ होणार बहुतेक.

“बेड्या? काय केलंय तिने?” बाबा दचकून म्हणाले.

“ते सांगतो नंतर. आधी ती कुठे आहे ते सांगा.” तो पुन्हा चढया आवाजात म्हणाला.  

आई-बाबांनी आत किचनकडे बोट दाखवले नुसते आणि रवी आत आला. समीक्षा खूप भीतीने आणि डोळ्यांत प्रेमाश्रु आणून उभी होती. बाहेर या दोघांना काही कळायला मार्ग नव्हता. सगळे गोंधळून गेले होते. दसऱ्याच्या दिवशी हे असे अकल्पित काय घडत होते?

थोड्या वेळाने तो समीक्षेच्या हाताला पकडून तिला बाहेर घेऊन आला आणि त्याने आईबाबांना विचारले, “काय म्हणता? ठोकू का हिला बेडी?”

“आता ते आम्ही कसं सांगणार? इन्स्पेक्टर तुम्ही, की आम्ही?” बाबा कुठेही विनोद करू पाहतात.

“कसली बेडी ते तरी विचारा.” रवी म्हणाला.

“कसली बेडी?” आईने बारीक आवाजातच विचारले.

“अहो लग्नाच्या बेडीबद्दल विचारत आहे मी.” असे म्हणून रवी आणि समीक्षा हसू लागले. आई-बाबांना तर हसावे की रडावे असे झाले होते.

“बघ रवी, महिषासुरमर्दिनीशी गाठ आहे तुझी?” आई चेष्टा करत म्हणाली.

“तर, महिषासुरमर्दिनीच आहे ती. काय गं?” रवी तिच्याकडे पाहत म्हणाला आणि तिने मग लाजेने मान खाली घातली.  

[समाप्त]

दुर्गे दुर्घट भारी या कथेचा पहिला भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर जा.

दुर्गे दुर्घट भारी: भाग. १

chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, horror story in marathi, pratilipi marathi love story, marathi bodh katha, moral stories in marathi, marathi novels, small story in marathi with moral

tags:

durga pooja, durga puja 2021, mutual fund agent list, kotak mf advisor, mutual fund advisor online, म्यूचुअल फंड, brokerage firm, marathi story, marathi story pdf, small marathi story, marathi short stories, marathi story writing, blog writing in marathi, blog writing in marathi, blogging in marathi, marathi stories, marathi goshti, short story in marathi with moral, small story in marathi, moral stories for adults, moral stories in marathi, portfolio management, investment advisor, stock market, stock market investing, best stocks to buy


Spread the love

4 thoughts on “दुर्गे दुर्घट भारी: भाग.२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *