• Pune, Maharashtra
कथा
डू यू लव मी ?

डू यू लव मी ?

Spread the love

do you love me ?

बागेतील त्या अरुंद पायवाटेने चालताना तिच्या उघड्या दंडांचा होणारा तो मुलायम स्पर्श मला अगदी स्पष्टच जाणवत होता.

तिने स्लीवलेस टॉप sleeveless) तोही गडद जांभळ्या रंगाचा आणि खाली काहीशी टाईट जीन्स (skinny jeans) घातली होती, जिच्यातून तिचे कर्व्हस् (body curves) अगदी स्पष्ट नाही म्हटले तरी त्यातल्या त्यात दिसत मात्र होतेच!

do you love me
do you love me

तशी ती बुटकीच होती; पण माझीही हाईट सहा फूट असल्यामुळं ती माझ्यापुढे आणखीनच बुटकी दिसायची. जेमतेम तिचं डोकं माझ्या खांद्यांना लागत होतं. कधी कधी वाटायचं हिला पुढे मागे प्रपोज केलं आणि कधीबिधी किसबिस करण्याचा प्रसंग आला तर आपण वाकू की तिलाच असं वर उचलून घेऊ?

कथा वाचत आहात तर तीच कथा ऐका की..

मग माझे मलाच हसू येई. कसाबसा मी मग किसच्या पुढे जाणाऱ्या माझ्या त्या विचारांना सावकाश लगाम घाली. काहीही म्हणा, प्रेमात आपण तसलं काही करणार नाही म्हणणारे बरेच सच्चे प्रेमवीर बीमवीर मनातल्या मनात नॉटी अमेरिकेतल्या (naughty america) हरएक पोजिशन्स (positions) ट्राय (try) करून मोक्ळे झालेले असतात.

<script async=”” src=”https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-8698938623911569″ crossorigin=”anonymous”></script> <ins class=”adsbygoogle” style=”display:block” data-ad-format=”autorelaxed” data-ad-client=”ca-pub-8698938623911569″ data-ad-slot=”9578278710″></ins> <script> (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); </script>

सूर्य अस्ताला जाऊन काहीच क्षण झाले होते आणि मंदगार वाऱ्याच्या झुळुका अंगाला झोंबू लागल्या होत्या. का कुणास ठाऊक; पण मला आता तिच्या उघड्या दंडावर एक काट्यांची बोचरी उभारी जाणवली. दोन परस्पर विरुद्ध देह म्हणा नाहीतर तो संथ वारा म्हणा कुणीतरी आपलं काम चोख बजावत होतं हे मला जाणवलं. पण आता जेव्हा जेव्हा आमची शरीरे एकमेकांना घासत होती तेव्हा तेव्हा एक लाजेची हलकीशी किनार तिच्या हास्यात मला जाणवत होती.

मग ती मला आणखीनच खेटून चालू लागली. आपण मुद्दामून खेटून चालतोय हे ती जाणवू देत नव्हती, मात्र प्रत्येक घर्षणासरशी ती आपल्या डोळ्यांच्या समोर लोंबणारी आपली बट सावरत डोळ्यांच्या कोपऱ्यातून एकेक तीर माझ्या नजरेत फेकीत होती आणि घायाळ मात्र माझं हृदय होत होतं!

धरावा का तिचा हात? की घालावा तिच्या कमरेत हात नि खेचावे तिला आपल्याकडे? असले एक ना धड सतराशे साठ विचार माझ्या मनाला शिवून गेले. एकक्षण वाटलं की डायरेक्ट (direct) कमरेलाच हात घालण्यापेक्षा आपण तिचा हातच हातात घ्यावा.

मग मी माझा हात तिच्या हाताजवळ नेला. करंगळीने तिच्या हाताला हळूच टच केलं. तिने काहीच रिस्पॉन्स (response) दिला नाही. मी पुन्हा टच (types of touches) केला. तिचा पुन्हा काहीच रिस्पॉन्स नाही. मग मी पुन्हा टच नाही केला. तसाच चालत राहिलो. आता तिच्या करंगळीचा हळूच पण फील होणारा टच मला जाणवला. मी तिच्याकडे पाहिलं. ती काहीशी शाय (shy) होऊन खाली पाहत होती. मी एकट्यानेच स्वतःशी स्माईल (smile) केले आणि पुन्हा चालू लागलो. तिने माझा हात हातात घेऊन आपल्या हाताची बोटे माझ्या बोटांत एकदम टाईट (tight) आवळली. धमन्यांमध्ये रक्त सळासळा पळू लागले. हृदयाची धडधड खूप फास्ट (fast) झाली. शरीराचा प्रत्येक भाग तिच्या त्या कोमल स्पर्शानं नाचू लागला होता.

वर्ष झालं असेल त्या गोष्टीला. माझं बायोलॉजीचं (biology) पहिलंच लेक्चर (lecture) सुरू असताना ती दरात उभी राहून म्हणाली- मे आय कम इन सर (may I come in sir). बाहेर पावसाची संततधार सुरू होती. मी फळ्यावर ह्युमन रीप्रोडक्टिव सिस्टमची डायग्राम (human reproductive system diagram) काढून ती अख्ख्या क्लासला एक्सप्लेन (explain) करत होतो आणि तेवढ्यात ती भिजलेल्या अवस्थेत तिथे दरात येऊन उभी राहिली होती. मी क्षणभर हरवलो. तिचं भिजलेलं रूप न्याहाळलं. भिजल्यामुळे तिचा ड्रेस अंगाशी चांगलाच चिकटला होता, तिची अख्खी बायोलॉजी माझ्या नजरेस पडत होती. स्वतःला सावरत मी तिला आत घेऊन उरलेली रीप्रोडक्टिव सिस्टम एक्सप्लेन करून टाकली. न अडवताही नजर तिच्यावरच जात होती तेव्हा. खूपच ऑकवर्ड सिचुएशन (awkward situation)झालेली. कारण तीही एका वेगळ्याच गहिऱ्या नजरेने मला पाहत होती. आणि पावसात भिजल्याने एक वेगळीच मादकता तिच्या डोळ्यांत भरली होती. तो, तोच आमचा पहिला आय कॉन्टॅक्ट! (eye contact)

अंधाराचं जाळं जास्त विणलं जाताच बागेतील गर्दी हळूहळू पांगू लागली. एखाददुसरं म्हातारं जोडपं, चारदोन टवाळ पोरं, काही सीनियर सिटिजन्स (senior citizens) आणि आडोसा पकडून कुठे कुठे बसलेली मोजकीच कपल्स (couples) तेवढी आता शिल्लक राहिली होती.

तिचा हात हातात पकडूनच मी तिला अशाच एका आडोशाला असलेल्या बेंचवर बसवलं. ना तिथे उजेड होता ना तो बेंच दुरून कुणाच्या सहज नजरेस पडत होता. मला वाटलं कुणी एका थोर समाज सेवकाने अशी अडल्यानडल्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ही चोख सोय तर केली नसेल? अशा थोर समाजसेवकाला मला तेव्हा नमन करण्याची इच्छा झाली. तितक्यात तिने आपला हात माझ्या हातातून अलगद सोडवून घेतला आणि थोडी पलीकडे सरकून कुठेतरी शून्यात नजर लावल्यागत तिने दुसरीकडे मान फिरवली.

किती बरं वाटलेलं तिचा हात हातात असताना. का बरं तिने हात सोडवून घेतला असेल? मी विचारात पडलो. वाटलं झटक्यात तिचा हातच काय तिलाच आपल्याकडे खेचून घ्यावी आणि तिच्या त्या रसरशीत ओठांतून वाहणाऱ्या त्या मधाची ती अवीट गोडी तासनतास चाखावी. अगदी लालेलाल करून टाकावेत तिचे ओठ!

इतक्यात कानावर बाग बंद करू लागल्याच्या शिट्ट्या कानावर पडू लागल्या. लोक जागचे उठून सावकाश पांगू लागले आणि मला जाणीव झाली की असला चान्स पुन्हा येणे नाही. मिला है मौका तो मार ना चौका असे म्हणत मी तिचा हात माझ्या हातात घेतला. ती बेसावध होती. तिने, का कुणास ठाऊक पण माझा हात झटकूनच टाकला! मला थोडंसं ह्युमीलीयेटेड फील (humiliated feel) झालं. पण तरीही मी पुन्हा तिचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला. पुन्हा तसंच. तिने झिडकारला. पहिले दोन ट्राय (try) देवाला म्हणून मी तिसरा ट्राय केला. तेव्हाही तसंच. मला वाटलं मघाशी तिने स्वतः आपला हात हातात घेतला म्हणून आपण तिला असं ग्रँटेड (taking granted) घ्यायला नको होतं, म्हणून मी हाताची घडी घालून समोर पाहत नुसता बसून राहिलो.

ती आपले दोन्ही हात आपल्या बाजूला बेंचवर पसरून काहीशी रीलॅक्स (relax) झाली. मी नकळत एक ग्लान्स् (a glance) टाकला तिच्यावर. थोडा रागानेच! तिने मग आपला हात दोन बोटे चाळवत माझ्याकडे आणला. मी तोंड फिरवले. तिने ओठ दाबत आपले हसू लपवले आणि अजून दोन बोटे हात माझ्याकडे चाळवला. मी तिला काहीच रिस्पॉन्स द्यायचा नाही असे ठरवले. ती मात्र खट्याळपणे हसत माझ्याकडे सरकली. हळूच. मी तसाच. ती अजून जवळ. मी पुन्हा तसाच. ती मात्र आणखीनच जवळ.

आता तिचा हात माझ्या मांडीवर आणि मी पुरता खल्लास! मनाचे कारंजे उभारू पाहताच मी तिला तिथेच माझ्या मांडीवर खेचली आणि आडवी करून क्षणार्धातच माझे ओठ तिच्या ओठांवर ठेवले. तहानलेल्या पामराला पाण्याची चिंता नव्हती, त्याला फक्त आपली तहान भागवायची होती. तृप्त व्हायचं होतं. तिच्या मुखातल्या रसाच्या अगदी शेवटच्या थेंबापर्यंत मला तिचे ते ओठ सोडायचे नव्हते. पिऊन पिऊन टाकायचे होते.

आधाशागत मी तिच्या ओठांवर तुटून पडलो होतो. मला आज काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा होता. आपल्यावर तिचं प्रेम आहे की नाही हे तिला आज विचारूनच टाकायचं होतं.

तिच्या ओठांत एक नशा होती, एक जादू होती. जी मी याही आधी अनुभवली असल्याची एक पुसटशी कल्पना माझ्या मनात कुठूनतरी उमटली. मी दुर्लक्ष केलं, कारण आता तीही मला प्रतिसाद देत होती. एकमेकांचे श्वास एकमेकांत गुंतले होते, हृदयाची स्पंदने लयीत लागली होती. अग्निकुंडात पेटलेल्या ज्वाला जशा एकमेकांशी लगट करत आकाशी झेपावतात तशी आमची शरीरे एकमेकांशी लगट करू लागली होती.

कानशिले तप्त झाली होती, श्वास फुलले होते आणि त्याच फुललेल्या श्वासाने मी तिला विचारलं, “ डू यू लव मी?” (do you love me)

“येस, ऑफ कोर्स!” तीही अगदी मादक नि गहिऱ्या आवाजात म्हणाली; पण हा आवाज तिचा नव्हताच! तिच्या ओठंतले माझे ओठ सोडवत मी माझे डोळे उघडले. ती हसऱ्या चेहऱ्याने आणि लालेलाल ओठांनी माझ्याकडे हसून पाहत होती. आज कितीतरी दिवसांनी ती इतकी खुश वाटत होती. माझी बायको!!

हे पण वाचा:

हल्ली हल्ली सुचतच नाही

चिमणी गेली उडून

रुपेरी रिंगण, भाग ४

रुपेरी रिंगण, भाग ३

रुपेरी रिंगण, भाग २

रुपेरी रिंगण

आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

माय व्हॅलेंटाईन

sl marathi sahitya, marathi stories, marathi pranay katha, marathi goshta, chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, साहित्य, मराठी साहित्य, मराठी कथा, story in marathi, marathi kadambari,

eeveless shirt, human reproductive system, human male reproductive system, human female reproductive system, prolonged eye contact, eye contact in communication, avoiding eye contact

best stories to read,best novels to read,best romance novels of all time,content writing,story writing, copy writing,storytelling,art of storytelling, fiction writing styles, non fiction writing, creative fiction writinf, fictin writing is real, types of fiction writing, what is fiction,story writing topics, story writing examples, story writing in english, short story writing, story writing for kids,


Spread the love