• Pune, Maharashtra
कविता
ध्रुवतारा: Marathi Kavita मराठी कविता

ध्रुवतारा: Marathi Kavita मराठी कविता

Spread the love

ध्रुवतारा मराठी कविता marathi kavita
ध्रुवतारा मराठी कविता marathi kavita

ध्रुवतारा

आई म्हणाली बाबा बनले

उत्तरेचा एक तारा

ध्रुवतारा दिसतो का बघ

त्याच्या शेजारी लुकलुकणारा

मी म्हणालो ध्रुवतारा तर

नावडता ना गं आई?

बाबा तर प्रिय मजला तुजला

का मग केली त्याने घाई?

आई म्हणाली देवाचे घरी

असते थोडी रीतच न्यारी

जे की आवडे तुजला मजला

देवलाही मग तेचि प्यारी

मी म्हणालो लहान मुले

तर असती देवासही प्यारी

जाऊ का मग मी देवाघरी

अन् आणू परत बाबांची स्वारी?

आई म्हणाली अरे बाळराजा!

नकोस देऊ सजा मजला

कुठेच जायचे तु न आता

आई अन् बाबा मीच तुजला.!

– शिवसुत

हे पण वाचा:

रेडकू

तिची वटपौर्णिमा

पावसात भिजलेली एक परीराणी

डू यू लव मी ?

हल्ली हल्ली सुचतच नाही

चिमणी गेली उडून

रुपेरी रिंगण, भाग ४

रुपेरी रिंगण, भाग ३

रुपेरी रिंगण, भाग २

रुपेरी रिंगण

आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

माय व्हॅलेंटाईन

न्यू इयर पार्टी नाईट भाग ५

मराठी कविता, marathi poems, marathi kavita ,


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *