• Pune, Maharashtra
स. न. वि. वि
प्रिय बायकोस!

प्रिय बायकोस!

Spread the love

प्रिय,

बायकोस.

पत्रास कारण की, आज जागतिक महिला दिन आहे.

स्त्री म्हणजे शक्ति, स्त्री म्हणजे भक्ति, स्त्री म्हणजे उक्ती, स्त्री म्हणजे?.. स्त्री म्हणजे मुक्ती! आणि.. स्त्री म्हणजे व्यक्ती! स्त्री म्हणजे हे. स्त्री म्हणजे ते. स्त्री म्हणजे सर्व काही. स्त्री म्हणजे सर्वाहूनही सर्वकाही! किती उपमा असतात ना तुम्हाला? हुह्!

International women's day
International women’s day

असं हे खूप वर्षांनी पत्र लिहितोय. आणि तुला? तुला पहिल्यांदाच (?). काही चूकभूल झाली तर माफ करशील?

माफ. किती तोकडा शब्द; पण तुम्हां स्त्रीयांच्या ठायी जणू तो असा काही भरलेला असतो की- अगं, आय एम सॉरी, मी हे विसरलो. आय एम सॉरी, मी ते विसरलो. प्लीज ना या वीकएंडला नको, पुढच्या वीकएंडला जाऊ. आम्ही पुरुष मग सतत कोणत्या ना कोणत्या, या ना त्या कारणांनी आपला माफीनामा तुम्हां बायकांपुढे पेश करत असतो आणि तुम्ही जा बक्ष दिया असं एखाद्या देवीगत जणू हात करून- मुळात देवीच तर असता तुम्ही!

या वर्षीचा तुझा महिला दिन- वुमन्स डे एका अर्थाने खासच आहे. खऱ्या अर्थाने तुला स्त्रीत्व बहाल करणारा आहे. तू आई झालीस ना म्हणून! आई, आईपण तुम्हां बायकांना लाभलेली ईश्वरी देणगी म्हणायला हवी खरी. मुलगी, बहीण, मैत्रीण, प्रेयसी, बायको, सून, आई, सासू, आजी  किती भूमिका म्हणायच्या ह्या? आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही त्या किती समर्थपणे पार पडता अजून!

मुळात मातृत्व कुणासाठीही सोप्पं नसतं. तुझ्यासाठीही नव्हतं. पण त्यानंतरचा काळ देखील काही सुखकर नसतो हे तुला पाहताना नेहमी जाणवतं. बाळाची सगळी काळजी घेणं, त्याला हवं-नको ते करणं, त्याच्या गंध-पावडर पासून ते खोकल्या-शिंकण्यापासून ते पार अगदी हगण्या-मुतण्यापासूनचे सर्व काही करणं हे खरंच अगदी दाद देण्यासारखं आहे. त्याबद्दल माझा तुला सॅल्युट. शिवाय तो सॅल्युट त्या तमाम स्त्रीवर्गाला ज्या सध्या या दिव्यातून जात आहेत. शिवाय इतकं करून देखील माझ्याकडे अजिबातच दुर्लक्ष करत नाहीस. याचं मला मनोमन कौतुक वाटतं.

त्यात तुझं विशेष कौतुक मला यासाठीही करावं वाटतं की, तुझं ऑफिसचं काम सांभाळून तू हे सर्व काही मॅनेज करते आहेस. तेही आई किंवा सासू सोबत नसताना देखील! एकटीनेच! तू खऱ्या अर्थाने माझी सुपर वुमन आहेस.

सकाळी उठल्यापासून जी तुझी ड्यूटी सुरू होते ती पार रात्री झोपण्यापर्यंत ती सुरूच राहते. संपतच नाही मुळात ती, कारण पुन्हा असते ती नवी पहाट, ती फ्रेश सकाळ आणि पुन्हा तो नवा दिवस. आणि एवढं सारं करत असताना मग कधी कधी तुझी चिडचिड होते, तू कधी वैतागतेस. शेवटी तुला देखील मन आहे आणि त्या मनाला भावना देखील आहेत याची मला जाणीव आहे. त्यामुळे दिवसागणिक तुला बायकोची स्त्री, खऱ्या अर्थाने परिपूर्ण स्त्री बनताना पाहताना मी स्वत:ला भाग्यवान समजतो.  

इंग्रजीत एक म्हण आहे- प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हे वाचून म्हण किंवा ऐकून म्हण, मला नेहमी वाटायचं की, व्हॉट अबाऊट वुमन देन? पण आता जाऊन कळतंय की वुमन ईज परफेक्ट बाय ऑल इट मीन्स!

तुझ्यावर केलेली जुनीच कविता मी नव्याने इथे मांडत आहे, कारण मला ती कविता आणि त्यामागील भावना कधीच जुनी होऊ द्यायची नाहीये. वर्षानुवर्षे तळघराच्या अडगळीत पडलेल्या ओकाच्या बॅरल मधल्या त्या वाईनप्रमाणे मला ती सदैव भासते. प्रीशीयस!

तू सखी, तूच छंद

तू साथी, तूच गंध

तू मृद्गंध , तूच सुगंध

तू सुर, तूच ताल

तू टाळ, तूच मृदंग

मी धुंद, मन बेधुंद

लागला मला

तुझाच एक छंद!

एक आई म्हणून तुझ्या पहिल्या महिला दिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा! सदैव वाढत नी बहरत रहा.

तुझाच,

S.Singh.

रुपेरी रिंगण, भाग ३

रुपेरी रिंगण, भाग २

आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

माय व्हॅलेंटाईन

मॅरेज मटेरियल Marriage Material

मी मॅरेज मटेरियल mi marriage material

ती आणि ती A lady and a prostitute

न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night

न्यू इयर पार्टी नाईट भाग ५

chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, horror story in marathi, pratilipi marathi love story, marathi bodh katha, moral stories in marathi, marathi novels, small story in marathi with moral

 marathi sahitya, marathi stories, marathi pranay katha, marathi goshta, chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, साहित्य, मराठी साहित्य, मराठी कथा, story in marathi, marathi kadambari,

 


Spread the love

6 thoughts on “प्रिय बायकोस!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *