• Pune, Maharashtra
व्हायरस
व्हायरस: प्रकरण ५:क्रिप्टोरूपी crypto

व्हायरस: प्रकरण ५:क्रिप्टोरूपी crypto

५. क्रिप्टोरूपी crypto

कोण होती ती व्यक्ती? will india ban cryptocurrency? crypto

मनात एक प्रश्न घेऊन अश्वथ पाषाणची ती टेकडी चढला. अंधाऱ्या राती एक शुभ्र उजेड पाडीत, नागमोडी वळणे घेत त्याची मोटारसायकल त्याच्या घराजवळ येताच बंद झाली. अश्वथ ती वरून उतरून आत जाताच मोटारसायकल electric vehical स्वतः जाऊन एका ठिकाणी उभी राहिली. तिची घुरघुर बंद होताच तिची लाईटही बंद झाली व ती स्लिप मोडला गेली. sleep mode, crypto

आतमध्ये मात्र बिछान्यावर पडून देखील अश्वथला झोप लागत नव्हती. त्याच्या मनात त्या अनोळखी व्यक्तीने जणू घरच केले होते. तो एकसारखा संध्याकाळचा तो प्रसंग आठवत होता; पण काही केल्या त्याला त्या व्यक्तीची ओळख मात्र लागत नव्हती. आपण त्या व्यक्तीला या आधी कधी व कुठे पहिले आहे का, हे ही तो डोक्याला ताण देऊन आठवू पाहत होता; पण प्रत्येक वेळी निराशाच पदरी पडत होती. cryptocurrency bill,

Crypto Rupi
Crypto Rupi, Image Courtesy-Sonam, Pictures are for illustration purposes only.

दुसऱ्याच दिवशी अश्वथ कालच्या ठिकाणी पोहचला. त्या व्यक्तीच्या शोधात नव्हे तर काल तो ज्या कामासाठी आला होता त्यासाठी. इमारतीखाली पोहचताच आपली मोटारसायकल थांबवून तो खाली उतरला. मोटारसायकल काही अंतर पुढे जाऊन एका बाजूला उभी राहिली आणि बंद झाली. सुब्बूचा अजून काही पत्ता नव्हता. इमारतीच्या आत शिरताना अश्वथने ताराला सुब्बूशी संपर्क जोडण्याची आज्ञा दिली.

“अश्वथ, सुब्बूशी कॉल जोडण्यात अपयश येत आहे.” तारा म्हणाली.

“निष्काळजी मनुष्य,” असं स्वतःशी पुटपुटत त्याने ताराला विचारले, “ड्रोन कुठे आहे?” drone technology

“अजून पाच मजले खाली, अश्वथ.” तारा उत्तरली. त्याने खिश्यातुन एक छोटा टॉर्च बाहेर काढला आणि तो सावकाश जिना उतरू लागला.

पाच मजले खाली उतरून मग तो त्याचा ड्रोन असलेल्या ठिकाणी आला. अंधारच अंधार होता खाली; मात्र मनगटावर अगदी आरामात बसू शकणाऱ्या ड्रोनचा हलकासा असा प्रकाश होता तिथे. त्या हलक्याशा प्रकाशात तो इकडेतिकडे पाहू लागला पण त्याला जे  हवे होते ते काही तिथे दिसेना.

“तुला खात्री आहे की त्या क्रिप्टोरूपीचा(virtual currency ) cryptocurrency, binance us ट्रेस इथेच मिळाला होता, तारा?” त्याने ताराला विचारले.

“माझ्याकडे आलेल्या माहितीनुसार आणि त्या माहितीच्या विश्लेषणानुसार तर तो इथेच असायला हवा.” ती म्हणाली.

“आर यु शुअर तारा?” त्याने विचारले.

“जशी की माझी मेमरी एक झेटाबाईट आणि  …….” memory one zetabyte, memory capacity

“प्रोसेसर बारा टेराहर्टझचा processor speed आहे तर तुझ्या चुकण्याची शक्यता शून्य पूर्णांक पाच वेळा शून्य आणि एक टक्के आहे.” ताराचे बोलणे काटत तो म्हणाला. “राईट?”

 “तू  मला नाराज केलंस, अश्वथ.” ताराचा आवाज निराशादायी झाला.

“ओके, आय एम सॉरी तारा.” टॉर्च फिरवत तो म्हणाला.

तारा क्षणभर काहीच बोलली नाही. अश्वथही त्या कोंदट व कुबट अशा ठिकाणी आपल्या उपकरणांद्वारे क्रिप्टोरूपीचा शोध घेतच होता. तसल्या वातावरणात त्याला श्वास घेणे मुश्किलीचे होत होतं हे त्याच्या तोंडावरून स्पष्ट दिसत जाणवत होतं.

“मानव किती पटकन सॉरी बोलतात.” थोडं थांबूनच तारा म्हणाली.

“ओके तारा. आय विल गिव्ह यु अ किस देन, फाईन?” त्याने मिश्किलीने विचारले.

“ते माझ्यासाठी ताजेतवाने करणारे असेल.” तारा उत्तरली.

“आणि माझ्यासाठी?” असे म्हणत सुब्बू अश्वथच्या समोर प्रकटला तसा अश्वथ दचकून मागे पडला आणि शिव्या देत, अंग झाडीतच उठला. “साल्या, आयुष्यात कधीतरी वेळ पळत जा रे. अचानक असा पाताळातून प्रकटला की काय?”

“जानी, हम वक्त के मोहताज नहीं, वक्त हमारे हिसाब से चलता हैं.” सुब्बू राजकुमाराची नक्कल करून म्हणू लागला. तेवढ्यात त्याला मध्ये थांबवत अश्वथ म्हणाला, “औलाद-ए-राजकुमार, तुमच्यावर व्हर्चुअल बेब virtual babe (शारीरसुखाचे नवे तंत्रज्ञान) future sex toys ने जाम भुरळ पडलीय की. जरा रिअॅ लिटीत  या आणि क्रिप्टोरूपीचा crypto rupi, cryptocurrency in india शोध घ्या.”

अचानक कुणी चोर किंवा पोलीस आले तर सावध करण्यासाठी अश्वथने ड्रोन वर पाठवून दिला आणि तसे झाले तर सावध करण्याची आज्ञा पण त्याने ताराला दिली. आता मनगटावरील यंत्राने होलोग्राम सुरु करून ते दोघे क्रिप्टोरूपी india bans crypto शोधू लागले. how to buy cryptocurrency, how to buy safemoon crypto, how to buy kishu inu coin

“च्यायला पूर्वी लोक फिजिकल मनी साठी चोऱ्या करायचे आता व्हर्च्युअल मनी साठी korvio coin price in india पण चोऱ्या कराव्या लागत आहेत. किती बरं झालं असतं क्रिप्टोरूपी हॅक crypto hack, trust wallet hacking करता आला असता तर.” सुब्बू उद्विग्नतेने म्हणाला.

“प्रत्यक्षात जाऊन चोरी करण्यात जी मजा आहे ती घरात बसून चोरी करण्यात नाही.” अश्वथ म्हणाला.

तेवढ्यात एक मोठा आवाज झाला, जमिनीला एक भगदाड पडले आणि ते दोघेही त्यातून खाली पडले. अंगावरची धूळ झाडीत ते उभे राहिले. समोर पाहतात तर एक रोगाने जीर्ण असा व्यक्ती, तेवढ्याच जीर्ण झालेल्या सोफ्यावर टेकून बसला होता. त्याच्या स्थितीवरून त्याच्या वयाचा अंदाज लावणे कठीण होते. बाजूला टेबलावर एक डिस्प्ले होता, त्यावर तो  बाहेरील  गोष्टी पाहू शकत होता.

आसपास छोट्या छोट्या फुटक्या कुप्या पडलेल्या होत्या आणि हवाबंद पण खराब झालेल्या खाण्याच्या गोष्टी, शिवाय एक मोबाईलसारखी दिसणारी आयताकर गोष्टही त्या टेबलावर होती. त्या खोलीला कुठे दरवाजा दिसत नव्हता. दुर्गंधी तर इतकी होती की तिच्या वासाने सुब्बूला उलटीच झाली.

“ये अंकल. अरे, हागण्या-मुतण्याला तर बाहेर पडत जा. वासाने इथेच जीव जाईल माझा. हा कसा राहतो इथे काय माहीत.” सुब्बू उलटी करत म्हणाला.

“तुला एक सायन्स फॅक्ट सांगतो.” अश्वथ म्हणाला. science facts, cool science facts, science facts for students

“काय ते?”

“माणसाला स्वतःच्या संडासचा वास येत नसतो आणि पादण्याचा पण.”

“हे भगवान, मला तर सगळेच वास येतात.” असे म्हणत सुब्बूने परत उलटी केली. “चल रे, मला इथे सहन नाही होत. हा माणूस कसं काय इथं राहतो काय माहीत. आपण पाहिलं बाहेर पडू आधी अशव्या. चल.”

“बाहेर पडायला दरवाजा पण नाही इथे आणि क्रिप्टोरूपी. . . ” अश्वथ बोलता बोलता त्या व्यक्तीला पाहत आपल्याच विचारांत हरवला.

“चल चल, क्रिप्टोरूपी शोधू आणि निघू.” सुब्बू अश्वथकडे आला आणि म्हणाला. अश्वथ अजून त्या व्यक्तीकडेच पाहत होता. त्या व्यक्तीने त्याला हात न उचलता बोटानेच त्याच्याकडे येण्याचा इशारा केला. तो त्याच्याकडे  गेला. इकडे सुब्बूची शोधाशोध सुरुच होती.

“वय काय तुझं ?” त्याने विचारले. त्याचा आवाज खोल होता.

“छत्तीस.” अश्वथ म्हणाला.

“मरणार तू.” तो म्हणाला. सुब्बू अश्वथच्या शेजारी येऊन उभा राहिला. त्यालाही तो म्हणाला, “आणि तू पण.” दोघे एकमेकांकडे पाहू लागले, काहीसे गंभीरच होऊन.

“आमचं  माहीत नाही अंकल; पण तू नक्कीच जाशील. मुळात तू इथे अशा परिस्थितीत जगला तेच पुष्कळ आहे. बऱ्याबोलाने क्रिप्टोरूपी दे नाहीतर. . . ” सुब्बू पुढे काही बोलणार तोच अश्वथने त्याचे बोलणे काटले.

“क्रिप्टोरूपीचे उपकरण आणि त्याचा पासवर्ड, प्लिज?” अश्वथने विचारले व तो पुढे म्हणाला, “फालतू गोष्टींसाठी आमच्याकडे वेळ  नाही अजिबात.”

तो त्यांच्याकडे पाहत हसला. थोडावेळ तसाच त्यांच्यावर हसत राहिला आणि नंतर टेबलावरील ती मोबाईल सारखी गोष्ट  हातात घेत म्हणाला, “भुरटे चोर दिसता तुम्ही. साध्या पल्स गन्स पण नाहीत तुमच्याकडे घाबरवण्यासाठी.”

नंतर ती गोष्ट अश्वथकडे देत तो म्हणाला, “क्रिप्टोरूपी. पासवर्ड …….FOUND#IT…… ऑल कॅपिटल .” how to break password, how to hack password.

अश्वथने ती गोष्ट हाती घ्यायच्या आधी सुब्बूने त्या व्यक्तीच्या हातातून ती हिसकावून घेतली आणि उघडून पाहू लागला.

“नाव?” त्याने अश्वथला विचारले.

“अश्वथ.” त्याने सांगून टाकले. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले.

“अंकल, यात तर फक्त दीड लाखच क्रिप्टो आहेत. यात मुश्किलीने दोघांचा एक डोस तरी घेता येईल का?” सुब्बूने निराशेने विचारले.

“त्यात एका कंपनीचे शेअर्स amc stock, gme stock आहेतत्यापैकी निम्मे मी विकले आहेत आणि त्यातून ह्या सगळ्या डोसच्या कुप्या घेऊन मी गेली पंधरा वर्षे इथे आहे, त्यावरच तर मी अजून जिवंत आहे; पण आता इच्छा नाही जगायची. असं जगण्यापेक्षा मरण परवडेल मला आता .” तो म्हणाला.

“पण इथे तर यायला जायला काही दरवाजा आहे ना खिडकी. मग इतकी वर्षे इथे कसे काय?” अश्वथने शंकास्पद नजरेने विचारले. त्याच्या त्या प्रश्नावर त्याने काहीच उत्तर दिले नाही. दिले ते एक स्मित हास्य. ते ही निर्विकार!

“बाय दी वे अंकल, वय काय तुझं ?” सुब्बूने विचारले.

“बेटा, आयुष्याच्या मावळतीला वय काय विचारतोस मला? समज की जर माझा मुलगा किंवा मुलगी असती तर ते तुझ्यापेक्षा थोडे लहानच असले असते ते.”

“घुसखोर चेतावणी. घुसखोर चेतावणी.” ताराने सूचना दिली आणि त्यांना सावध केले. त्यांना आता निघावे लागणार होते. कदाचित पोलीस असतील आणि त्यांच्या तावडीत सापडायचे नाही म्हणून त्यांची निघण्याची गडबड सुरु झाली.

अश्वथने मदत करून सुब्बूला वर चढवले आणि सुब्बूने त्याला पालथे पडून खाली हात दिला. अश्वथ आता त्या व्यक्तीकडे पाहत होता. त्याने आपल्या जीर्ण झालेल्या कोटातून एक जुने रुपयाचे नाणे काढले आणि त्याकडे पाहू लागला. सुब्बू अश्वथला निघण्यासाठी हाक मारत होता. काही क्षण त्या नाण्याकडे पाहून ते नाणे त्याने अश्वथकडे दिले आणि तो त्याला म्हणाला, “शोधलं म्हणजे देवही सापडतो, खिडक्या- दारं काय घेऊन बसला आहेस. इथून पुढचा रस्ता खडतर असेल. तुला याची गरज पडेल. श्रीमंत दगडूशेठ shrimant dagadusheth ganpati तुझ्या पाठीशी आहे.” त्याने ते नाणे घेतले आणि तो सुब्बूला हात द्यायला निघाला.

“अश्वथ?” तो व्यक्ती म्हणाला आणि अश्वथ थांबला. “एज चेंजेस एव्हरीवन बट नॉट एव्हरीवन चेंजेस एज (Age Changes Everyone But Not Everyone Changes Age.) आणि तुझ्यात ती बात आहे.”

सुब्बूने त्याला वर खेचून घेतले; पण त्या व्यक्तीची ती वाक्ये मात्र त्याच्या कानी घुमत राहिली.

व्हायरस ही कथा मालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग २

भाऊबीज भाग १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *