• Pune, Maharashtra
कथा
चिमणी गेली उडून

चिमणी गेली उडून

Spread the love

शहरे बदललीत. गावे तर कुठे पूर्वीची राहिलीत? तीही बदललीत.

माणसे, रस्ते, झाडे, तीच आहेत; पण तीही वरचेवर बदलताहेत! बदल हा सृष्टीचा नियम आहे वगैरे ठीक आहे; पण इतका बदल? आता ह्या बदलाच्या नादानं प्रत्येकजण इतका बदललाय, की मला आता त्यांच्यात झालेल्या बदला बद्दल उगाच बडबड करायची देखील इच्छा नाही!

chimni geli udun
chimni geli udun

इच्छा. इच्छा तेथे मार्ग! पण प्रत्येकाचा मार्ग हा फुलांनी सजलेला नसतो बरं का. कुणाच्या मार्गात काट्यांच्या फांजरीच्या फांजरी पसरलेल्या असतात. हा, आता एखाद्याच्या मार्गात नसतील तर तो नशीबवान! किंवा तुम्ही कुणाच्या नजरेत आला नाहीत अजून. हल्ली माणसेच कुठूनतरी असल्या बोटभर लांब काट्यांच्या फांजरी आणून टाकतात मार्गात. का मजा वाटत असावी त्यांना कुणास ठाऊक?

ठाऊक आहे का? आता महानगर पालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्यात. इच्छुकांचे हे भलेमोठे बॅनरच्या बॅनर लागतात चौकाचौकात. थोडे उकरलेले रस्ते मग अजून उकरले जातात. चार-दोन दिवस मग त्याच उकरलेल्या रस्त्यातून धडाक-धुडुक धडाक-धुडुक करत आपली गाडी जाणार. मग एके दिवशी ते रस्ते चकाचक. ब्रॅंड न्यू!

न्यू जनरेशनचा हाच नेमका प्रॉब्लेम आहे, असं कितीदा म्हणायचं? की ओल्ड जनरेशनवाल्यांचं ते कामच असतं? आणि हाच प्रॉब्लेम आहे, हे दरवेळी नव्याच प्रॉब्लेमला का म्हणून उगीच म्हणत राहायचं? पुढच्या वेळी, किंवा पुढच्या वेळेपासून न्यू जनरेशनचा हा ही एक प्रॉब्लेम आहे असं म्हणा! कारण लक्षात ठेवा, आमचं देखील जनरेशन कधीतरी ओल्ड होईलच की!

ओल्ड मंक पिणाऱ्याला काय कळणार देशीची मजा? असा माझा एक मित्र म्हणतो. अरे पण घंट्या, सदानकदा देशी ढोसणाऱ्या, देशी सोडून कधी दुसरी ढोसली का बे तू? बरं देशी तर देशी. तीही एक ग्लास रिता केल्यावर तुझी लोटांगणे सुरू होतात. नक्की मजा तुला येते की पाहणाऱ्याला? ते असूदे काहीपण, मात्र लक्षात ठेव- दारू पीने से लिवर खराब होता है. काळीज काळीज!

मागे एकदा मटनवाल्याला थोडंसं काळीज टाक म्हणालो होतो. सविस्तर सांगायचं म्हणजे, पाषाणच्या बालाजीचौकात एक मटनशॉप आहे. चार-पाच बोकडे(?) लटकावलेली होती. म्हटलं काळीज टाक थोडंसं. सपशेल नाहीच म्हणाला, संपलंय काळीज. आता मी बायोलॉजी जाणणारा. सरळसरळ लटकावलेले दिसत असताना मला नाही म्हणाला. हे काय दिसतंय म्हणालो. तेव्हा टाकतो म्हणून शाहण्याने हृदय दिले कापून!

हल्ली सहजासहजी ह्रदय कुणी देत नाही कुणाला. आणि याला तर काळीज मागितले होते मी. चक्क त्याने हृदय कापून दिले होते. बोकडाचे तेही. काही असो, तेही द्यायला मोठं काळीज असावं लागतं! पण पुन्हा तिथे मटन घेणे नाही!

घ्यावं म्हणता म्हणता खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या राहून जातात. उदाहरणार्थ, मोबाईल, कपडे, बूट, गाडी वगैरे वगैरे.

हीरो होंडाची गाडी आलेली तेव्हा बाजारात. लहान असताना. करीज्मा. खूप आवडलेली मला. जीवच जडला होता म्हणा हवं तर. पण लैच महाग ओ. म्हटलं कॉलेजात जाताना ही गाडी घेऊ. कॉलेज संपून गेलं कधीचं. गाडी काही घेतली नाही.

नाही म्हणायला आता तिच्याबद्दलचं आकर्षण हल्ली कमीच झालंय माझं. रस्त्यातून जाताना देखील दिसली ती की वाटतं कधीकधी आपला किती जीव होता हिच्यावर; पण त्यानंतर गाड्यांचे खूपच नवनवे मॉडेल बाजारात आले आणि करीज्मा मनाच्या कुठल्यातरी एका कोपऱ्यात कायमची एका स्टँडवर पार्क झाली(?).  

पार्कमध्ये एकटा माणूस, तेही पाठीवर सॅक घेऊन, एकटक कशाततरी चित्त हरवून बसलेला. खूप विदारक वाटलं चित्र तेव्हा. हजारो समस्या, लाखों प्रश्न जणू त्या पाठीवरल्या सॅकमध्ये बंदिस्त असल्यागत. तरीही तो समोरच्या त्या गवतात बागडणाऱ्या त्या चिमुकल्यांना एकटक पाहणारा.

चिमुकलंच राहता आलं असतं कायमचं तर किती बरं झालं असतं ना? पण हे देखील मोठं झाल्यावरच कळतं. चिमुकलं असताना तर मोठं होण्याची ओढच लागलेली असते ना.

म्हातारपणाची ओढ कधी कुणाला लागलीय का ओ? का कुणी अगदी आतुरतेनं म्हातारपणाकडे डोळे लावून बसलंय? म्हातारपण कुणाला हवं असतं? पण सर्वांच्या नशिबी तर कुठं ते असतं? म्हातारपणी कुठे कोण नव्याने सुरवात करतो; म्हणून प्रत्येकाला इथं लहान व्हायचंय!

लहान गोष्टींत देखील खुष होता आलं पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसांत सायकलला टमरेल लावून टर्र आवाज करीत गावोगावी फिरणाऱ्या त्या गरेगारवाल्याकडून आठ आण्याला गरेगार घेवून खाण्यात जी मजा वाटायची ती आज मॉलमधून महागडी आईसक्रीम खाण्यात उरली नाही. ना उरलेत ते उन्हाळ्याचे ते कडक दिवस, ना उरल्यात त्या फुफाट्याच्या सडका! गरेगारवलाही आता भुर्रकन येऊन निघून जातो.

निघून जाण्यासाठी तर इथे प्रत्येकजण आलेला आहे. बाहेरचा तो फेरीवाला, तो कचरावाला क्षणभर थांबतील, ओरडतील, जातील. पुढे जात राहिलं पाहिजे मात्र. त्यासाठी आधीच्या गोष्टींतून पुढे निघून जाता आलं पाहिजे.

पाहिजे त्या गोष्टी आयुष्यात कष्टाविणा मिळाल्यास त्याचं महत्व राहत नाही आणि पाहिजे त्या गोष्टी कष्ट करूनही न मिळाल्यास त्याला इज्जत राहत नाही.

हल्ली ती जुन्या ठिकाणी राहत नाही. नवा पत्ता मला ठाऊक नाही. तशी आमची बातचीत झालीच नाही कधी; पण तिची चिवचिव काय ती मी लहानपणी नेहमी ऐकायचो. सकाळची कोवळी उन्हे पडायच्या आतच ती जागी होऊन चिवचिवाट करायची. झोपमोड व्हायची माझी; पण डोळे उघडताच घराच्या खांडाच्या फटीतून चिमुकल्या चोची बाहेर आलेल्या दिसायच्या. ती मग त्या चोचींत चारा ठेवायची आणि पुन्हा भुर्रकन उडून जायची. आता नसते ती. उडून गेली दूर कुठेतरी!

marathi sahitya, marathi stories, marathi pranay katha, marathi goshta, chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, साहित्य, मराठी साहित्य, मराठी कथा, story in marathi, marathi kadambari,

रुपेरी रिंगण, भाग ४

रुपेरी रिंगण, भाग ३

रुपेरी रिंगण, भाग २

रुपेरी रिंगण

आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

माय व्हॅलेंटाईन

मॅरेज मटेरियल Marriage Material

मी मॅरेज मटेरियल mi marriage material

ती आणि ती A lady and a prostitute

न्यू इयर पार्टी नाईट New Year Party Night

न्यू इयर पार्टी नाईट भाग ५

chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, horror story in marathi, pratilipi marathi love story, marathi bodh katha, moral stories in marathi, marathi novels, small story in marathi with moral

 marathi sahitya, marathi stories, marathi pranay katha, marathi goshta, chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, साहित्य, मराठी साहित्य, मराठी कथा, story in marathi, marathi kadambari,

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *