• Pune, Maharashtra
कथा
भाऊबीज भाग २

भाऊबीज भाग २

Spread the love

भाऊबीज bhaubeej/ bhaidooj

काही वेळाने तो उडालेला धुरळा जागी बसला. मग पुन्हा एक एसटी st bus strike आली. पुन्हा धुरळा उडाला. एक एसटी निघून गेली. अजून धुरळा उडाला. धुरळा उडायचा. धुरळा dhurla marathi movie बसायचा. कित्येक प्रवासी आले, निघून गेले. आप्पा मात्र खांद्यावर ती पिशवी टाकून स्तब्ध उभे होते तिथे. आटपाडीच्या आगारात atpadi bus stand जणू त्यांचा पुतळाच statue of unity उभारल्यागत.

“इष्टीनं तुम्हाला काय इच्छित स्थळी पोहचवलेलं दिसत न्हाय.” मगाचा तो बसमधला प्रवासी आपल्या फटफटीचा फटफट फटफट आवाज करीत तिथे येऊन आप्पांना म्हणाला. तेव्हा कुठे आप्पांची ती स्तब्ध पुतळ्याची statue of liberty मुद्रा भंग पावली आणि आप्पा भानावर आले.

“नाय म्हटलं, डिगीजीची इष्टी तुमच्या डोळ्यादेखत निघून गेली म्हणून इचारलं.” फटफटीचं इंजिन बंद करीत तो आप्पांना म्हणाला. बोलताना मात्र त्याने मुद्दाम डिगीजीवर जरा जास्तच जोर दिला.

“चुकली.” आप्पा पलीकडे उभ्या असलेल्या एका एसटीकडे st bus samp पाहत म्हणाले. जणू ते अजून कशात तरी हरवून गेले होते.

“काय चुकली?”

“अं? इष्टी. . . इष्टी चुकली माझी.” आप्पा म्हणाले आणि त्या उभ्या असलेल्या एसटीकडे निघाले.

“ओ पावणं, आवं पावणं. मघाची इष्टी हाय ती. माघारी जाचाला तुम्ही. डिगीजी न्हवं.” त्याच्या त्या बोलण्याचा आप्पांवर काहीच परिणाम झाला नाही. ते तसेच पुढे जात राहिले. शेवटी एसटीच्या दरवाज्यात येऊन आप्पांनी वरती चढण्यासाठी एसटीच्या लोखंडी नळीला धरून एक पाय तिच्या पायरीवर टाकला, तसा तो प्रवासी आप्पांना ओरडून म्हणाला, “भाऊबीजंला बहिणीला न भेटताच जाणार व्हय?”

त्याच्या त्या एका वाक्याने आप्पांची ती नळीची पकड सैल झाली एकदम. पाय तर जागीच अडखळले मग. अंगातून थंडगार अशी एक सौम्य लहर गेली सुळ्ळकन. पोटात बारीक गोळा आल्यागत जाणवले त्यांना. माघारी फिरून आपण पाप तर नव्हतो ना करत या भीतीने? की भाऊबीजेला गेल्यावर होणाऱ्या त्या संभाव्य अपमानाच्या भीतीने? मनात विचारांचे द्वंद्व माजले असताना आप्पा मात्र अजूनही दरवाज्यातच अडखळले होते. नात्यांची ती लक्ष्मणरेषा काही केल्या त्यांना लांघता येईना. लहान बहिणीवरल्या प्रेमाची बेडी आप्पांना मागे खेचत होती जणू!

bhaubeej ani st
bhaubeej ani st, oictures are for illustration purpose only

पुढे जाऊन भलेही नात्यात कितीही दुरावा आला तरी लहानपणीची भावा-बहिणीच्या नात्यातली ती ऊब तशीच टिकून राहते. एखादी पणती हृदयाच्या कप्प्यात कुठेतरी खोल तेवत असल्यासारखी अगदी! मग बाहेर समज-गैरसमजांची, कपट-कलहांची नी शिव्या-दूषणांची कितीही मोठी वादळे आली तरी ती ऊब वेळ पडल्यास एखाद्या वनव्यालाही मागे सारायला कमी करणार नाही!

फटफटीला किक royal enfield bullet मारून त्याने ती सुरू केली आणि मूठ वाढवत तो जोराने आप्पांना म्हणाला, “डिगीजीला निघालो हुतो. म्हटलं तुम्हाला पण सोडलं असतं. काय?” 

आप्पा एसटीच्या दरवाज्यातून खाली उतरून त्याच्याकडे पाहत उभे राहिले नुसते. तो आपला समोर बघत फटफटीची मूठ कमी जास्त करीत तसाच बसून राहिला. आप्पांची मागे येऊन बसण्याची वाट पाहत.  

खांद्यावर पिशवी घेऊन आप्पा जाऊ की नको जाऊ, हा विचार करीत पुन्हा पुतळामुद्रेत शिरले. मात्र थोड्याच वेळात फटफटीच्या आवाजाने आपल्या मुद्रेतून बाहेर आले आणि खांद्यावरील ती पिशवी आपल्या काखेत खवून ते त्याच्या फटफटीच्या मागे येऊन बसले.

घासलेटमिश्रित तेलाचा निळाशार धूर फेकीतच मग फटफटी bullet royal enfield आगाराच्या बाहेर पडली. धुराच्या त्या लोटांत देखील फटफटीच्या royal enfield bullet 350 मागील हेलकावे खणारी ती रबरी टाळी कुणाचेही लक्ष वेधून घेणारी होती. लिहिलं होतं- माहेरची साडी! maherchi sadi marathi movie

फटफटी royal enfield new model 2022 आवाज करीत बाजार पटांगणात शिरली आणि पार ओढा ओलांडून देखील पुढे आली. ना आप्पा काही बोलले ना तो. त्यात आप्पा सारखे काखेत धरलेली ती पिशवी सांभाळीत होते.

शेवटी पोलीस स्टेशनाच्या पुढे फटफटी आल्यावर त्या व्यक्तीनेच बोलण्यास सुरवात केली. आप्पांना त्याने आपले नाव तुकाराम सांगितले; पण आप्पांना ते काही निटसं ऐकु आलं नसावं. फटफटीच्या फटफटण्याचा आवाजच इतका होता की पुढे तो तुकाराम त्यांना काय बोलत होता ते आप्पांच्या कानांपासून वीतभर अंतराने मागे जात होतं.

मात्र तो जे काही बोलतोय ते आपण कसे नीट ऐकतोय हे जणू नंदीबैलागत मान हलवून आप्पा त्याला दाखवत होते. नाही म्हणायला तसा एखाददूसरा शब्द कानावर पडत होता म्हणा; पण त्याचा संदर्भ घेऊन बोलणे म्हणजे थेट सुतावरून स्वर्ग गाठल्यासारखे होते. कुणाचाच कुणाला ताळमेळ नव्हता.

“मग काय शेतीवाडी काय हाय का न्हाय ?” तुकारामने सवाल केला.

“वाडीत न्हाय वं, डिगीजीत राहती माजी भन.” आप्पांनी ढगात गोली झाडून दिली.

“दोन? दोन एकर हाय? बरं.”

“दोन नाय वं, एकच भन हाय मला.”

तुकाराम काही वेळ मग काहीच बोलला नाही. त्याचीही गत आप्पांसारखीच होती. फरक एवढाच होता की आप्पांनी ढगात झाडलेल्या गोळ्या तो झेलण्याचा प्रयत्न करीत होता.

फटफटी कारखाना पाटीला येताच आप्पांची नजर उजवीकडे असलेल्या सोनारसिद्ध नगरच्या साखर कारखान्याकडे वळली. बकाबक आपल्या धुराड्यातून पांढरा धूर आभाळात सोडीत होता तो. अंगाला भस्म फासून चिलीम ओढत पडलेल्या एका साधूगत भासत होता जणू!

टायरी असलेल्या व ऊस लादलेल्या त्या हिरव्या नगरी गाड्यांवर अख्खीच्या अख्खी बिऱ्हाडे बसवून नगरी लोक बैलाला चाबकाने हाणीत कारखान्याकडे एकामागोमाग एक असे निघाले होते. त्यांच्या नशिबी कसली आलीय दिवाळी आणि कसली भाऊबीज! मघाचपासून तिकडे नजर रोखून असलेले आप्पा कदाचित मनात हाच विचार तर करीत नसतील?

फटफटीच्या त्या आवाजाने आता आप्पांच्या कानांचे पडदेही वाजू लागले होते. एकवेळ त्यांना वाटले की, विहिरीवर बसवलेलं ते रॉकेलवर चलणारं त्यांचं इंजिनबी two stroke diesel engine एवढा आवाज करीत नव्हतं कधी. फटफटी हाय का काय पीडा हाय!

दुपारनंतरची ती तिरपी उन्हे दोघांच्या गालांवर उन्हाचे चांगलेच चपकारे हाणीत होती. आप्पाला बहीणीकडे पोहचून, भाऊबीज करून पुन्हा माघारी फिरायचे होते. बहिणीच्या इथे मुक्कामी थांबायची त्यांची मुळीच इच्छा नव्हती. आणि असती तरी बहिणीची पण तशी इच्छा-

“जनावरं बिनावरं काय हायती का घरी?” तुकारामने प्रश्न केला खरा; पण आप्पांना नेमकं तेच ऐकु आलं तर नशीब! आप्पांचं उत्तर आलं, “होय, शनवार आसतू की घरात.

“मग दुभती किती?”

“मी एकटाच, मी एकटाच धरतू.” आप्पांच्या या उत्तरावर तुकारामने आपली मान हलवून टाकली. जणू काही त्याच्या सर्व प्रश्नांची आप्पांनी योग्यच उत्तरे दिली होती. दोघांचे संवाद भिन्न असले तरी एकमेकांच्या भावना एकमेकांना नेमक्या पोहचल्या होत्या. तुकारामला प्रश्न विचारल्याचे समाधान आणि आप्पांना उत्तरे दिल्याचे समाधान!

बोलता बोलता फटफटी कधी दिघंचीला येऊन पोहचली कळले सुद्धा नाही. आप्पांना पंढरपूर चौकात सोडून तुकाराम फटफटीचा आवाज करीत पंढरपूर रस्त्याने पुढे निघून गेला. फटफटीच्या मागे झुलत असणाऱ्या त्या रबरी टाळीवर आप्पांची नजर खिळून राहिली. लिहिले होते- पंढरीची वारी! pandharichi wari marathi movie

आप्पा पार माणगंगेचा पूल ओलांडेस्तोवर त्या फटफटीला पाहत उभे राहिले होते. धुराच्या त्या लोटात जेव्हा फटफटी दिशेनाशी झाली तेव्हा आप्पांनी आपली पिशवी खांद्यावर टाकली आणि थोड्या धाकधूकीनेच आपल्या बहिणीच्या घरचा रस्ता धरला त्यांनी.

“आरं आप्पा, तू तिच्यापेक्षा मोठा हाय न्हवं? मग कशाला एवढा रागंराग करतूया?” म्हातारी आप्पाला समजावत होती.

“आगं पण आये, जी लोकं केलेल्या मदतीला जागत नाहीत त्यांच्याशी कसं वागायला पाहिजे?” आप्पांनी विचारले.

“पोरा आज त्या गोष्टीला धा वरसं झाली.” 

“दहा वरसं आणि दहा दिवस आये.” 

“मग का म्हणून एवढं तानावं?”

“मला लै मज्जा वाटती तानाया. तूच सांग आये, मी काय तिला जमीन देत न्हाय म्हणालू नव्हतो. बापाच्या जमिनीवर तिचा बी हक्क हुताच; पण असुदे म्हटलो, मी कसतो अन् तुझा हिस्सा ठरवून तुला जेवढं पिकंल ती तुला देतू म्हणालू हुतो. तर त्या बाजिंदया सासूचं ऐकून चांगली जमीन तेवढी बळकावली तिनं. काय अन् किती पिकतं माझ्या वाटणीच्या जमिनीत तुला बी म्हायती हाय आये.”

“म्हणून काय रक्ताची नाती तोंडायची का आप्पा?”

“म्या न्हाय तोडली काही. तीच तोडून गेली हुती. चांगलं रान बी पडीक पाडलं आणि माहेर बी तोडलं”

“आप्पा हे बघ, झालं गेलं विसरून जा. मी आता थकलीय. अजून किती दिवस असणार माझ्या जिवाचं? या डोळ्यांना एकदा माझी लेकरं सुखी झालेली बघायची हायती बघ मला. तिच्या पोरीला बी लै बघू वाटतंय रं मला. लै वरीस झाली पाहिली न्हाय.” म्हातारी डोळ्यांत पाणी आणून बोलता बोलता थांबली आणि कसला तरी विचार मनात आणून म्हणाली, “तू भाऊबीजेला जा तिच्याकडं.”

“आगं पण आये.”

“मी कुणाकरवी तरी सांगावा धाडती. जाशील ना?”म्हातारीने खूप कारुण्यापूर्वक विचारले.

“आत्या एवढा आग्रह करत्यात तर या की जाऊन आवं.” उंबऱ्यातूनच आप्पांची मालकीण म्हणाली.

“आयला, माझं हितं कुणालाच पडलं न्हाय.”

“जाशील न मग?” म्हातारीने पुन्हा विचारले.

आप्पांनी दोन क्षण विचार केला आणि मग होकारार्थी मान हलवली. म्हातारीने लुगड्याच्या पदराने डोळ्यांच्या कडांतील पाणी टिपले मग.

“आप्पा, अहो आप्पा? कुठं हरवून गेलात?” रावसाहेबांच्या त्या हाकेने आप्पा एकदम भानावर आले. बहिणीने समोर पेढ्याचा घास भरवण्यासाठी हात पुढे केला होता. शेजारीच पालथी मांडी घालून तिची बारा वर्षांची पोरगी देखील बसली होती. आप्पांनी डोळ्यांत अश्रू आणीत आपले तोंड उघडले आणि आप्पांचे तोंड गोड झाले. गोड झाल्या मागच्या त्या कटू आठवणी, गोड झाली ती नाती पुन्हा नव्याने, गोड झाला तो एक क्षण!

bhaubeej
bhaubeej : pictures are for illustration purpose only

ओवाळून झाल्यावर आप्पांनी ओवाळणीसाठी आणलेली ती मोरपंखी रंगाची साडी हळूच पिशवीतून बाहेर काढली. तिच्या हातात देत ते म्हणाले, “तुझ्या वाहिनीची पसंत आहे.”

“चांगलीच आहे पसंती.” साडीवरून हात फिरवीत ती म्हणाली आणि वर पाहत आप्पांना तिने विचारले, “कशी आहे वाहिनी? आणि आई कशी आहे?”

“त्यासाठी माहेरी यावं माणसानं.”आप्पा मनातल्या मनात म्हणाले आणि तिला उत्तर द्यायचं म्हणून म्हणाले, “तुझाच जोसरा काढलेला असतो कायम.”

“आणि तुम्ही आप्पा?” तुटक्या स्वरात तिने विचारले. त्या स्वरात तिने आपल्या भावाकडे मागितलेली माफी होती, भावाची विचारलेली खुशाली होती, आपली सांगितलेली तगमग होती नी खूप सारी माया होती.

बहिणीच्या त्या एका प्रश्नाने बहीण-भावांमधला  तो दहा वर्षांचा दुरावा कुठल्या कुठे नाहीसा झाला होता. दोघांच्या नयनांतून आता गंगा-यमुना वाहू लागल्या होत्या. रावसाहेब पापण्या न लवता ते सारे टिपून घेत उभे होते नुसते आणि त्यांची ती मुलगी तर एकदा इकडे तर एकदा तिकडे पाहत नुसती मान हलवत राहिली होती!

“मामा, आईच्या ना डोळ्यांत अगदी अस्सच पाणी येतं राखी पौर्णिमेला नी दिवाळीला. नेहमी!” पोरगी मामाला सांगत म्हणाली.

“चल गं चोंबडे.” ती लेकीला गप्प करीत म्हणाली.

“मामांनी भाऊबीजेला येताना आपल्या बहिणीला साडी आणली मात्र इतक्या वर्षांनी येतोय तर आपल्या भाचीसाठी काहीच नाही आणलं मामांनी.” ती परत तोंडाचा चंबू करीत मामाकडे तक्रार करताना म्हणाली.

“असं कसं होईल? मामांनी आणलंय ना तुझ्यासाठी काहीतरी.” असे म्हणत आप्पांनी परत पिशवीत हात घातला आणि तिच्यासाठी आणलेला एक पंजाबी ड्रेस बाहेर काढून तिच्या स्वाधीन केला. ती आनंदाच्या उड्या घेतच तो ड्रेस घेऊन आत पळाली.

“तुम्ही गप्पा मारत बसा. मी ताटं लावते.” असे म्हणून ती आत निघून गेली. मग थोड्या संकोचाने का होईना दाजी-मेहुण्यात हळू हळू गप्पांची मैफिल रंगलीच!

जेवण आटोपून आप्पा आपल्या बहिणीचा निरोप घेऊ लागले तेव्हा तो पंजाबी ड्रेस घालून धावतच त्यांची भाची तिथे आली आणि विचारले, “कशी दिसतेय मी?”

नाक मुरडीत आईने तिच्याकडे पाहिले व मानेला हिसके देतच ती म्हणाली, “लैच हलका ड्रेस घेतलाय मामानं. भलताच फिका दिसतोय तुझ्यावर.” आणि आप्पांकडे तोंड करीत नाकपुड्या तनवीत रागाने ती त्यांना पाहू लागली.

रावसाहेब तर ताडकन आतमध्ये निघून गेले. आप्पांना वाटले ज्याची भीती होती तेच झाले. ते मनोमन विचार करू लागले- आपण पडलो गरीब. बहीण आता श्रीमंत झाली. तरी आईला नको म्हणत होतो मी; पण ऐकतो कोण माझं. सर्वांसाठी इथे पदोपदी आपमानीत मात्र व्हावं लागतं मला! झक मारली आणि आलो!

आप्पांच्या पोटात गोळाच आला की. आप्पा आपल्याच विचारांत होते अजून. ही असली कसली श्रीमंती म्हणायची जी आपलीच नाती विसरून जाते? ऊंची कपड्यांपेक्षा त्यामागची उदात्त भावना कशी या श्रीमंतांना दिसत नाही? का पदोपदी गरीबाला कायम अपमानीतच करण्यासाठी यांच्याकडे श्रीमंती आली आहे? डोळ्यांना सोन्याची झापड लावली म्हणून जग काही सोन्याचं होणार नाही काही . एकवेळ ते श्रीमंतांना पिवळे दिसेलही; पण त्यातही ते म्हणतील- जगाला कावीळ झालीय म्हणून! त्यांना कुणीतरी सांगा रे कावीळ झालीय ती तुमच्या त्या मनाला, तुमच्या विचारांना, आचारांना, शरीराला नी घराघराला. सांगा त्यांना, सांगा!

आप्पांना आता तिच्या नजरेला नजर देणं देखील कमी पणाचं वाटत होतं. माहेरचा माणूस होता ना तो! ती मात्र अजूनही त्याला तशीच पाहत होती. तिच्या त्या वागण्याने तिची ती पोर देखील अवाक् झाली होती.

नजरेत अजुन जास्तच अंगार भरीत ती जोरातच आप्पांवर ओरडली, “मामा म्हणून भाचीला असला हलका कपडा मी खपवून घेईनही आप्पा; पण उद्या सासरा म्हणून जर तुम्ही हलका शालू तुमच्या या सुनेला काढाल तर तुम्ही आहे आणि तुमची ही बहीण आहे. लक्षात ठेवा.” 

“आणि मग मी पण आहे, आप्पा.” तोच आतून हातात कसलेतरी कागद घेऊन रावसाहेब त्यांच्याकडे हसत येत म्हणाले.

दोघेही असे म्हणताच खांबाला बिलगून असलेली त्यांची ती पोर लाजेने खांबाआड झाली.  

हातातील कागद आप्पांच्या समोर धरीत ते म्हणाले, “तुमची जमीन तुम्हाला परत घ्या आप्पा. आम्ही लै अन्याय केला तुमच्यावर. चुकलं आमचंच. अहो तुम्ही कधीकाळी आपली गुरं विकून मला दूध डेरी टाकायला पैसा नसता दिला तर आज कुठला मी चेअरमन आणि काय.”

“अहो पण..”

“पण बिन काय न्हाय आप्पा, ते पेपर घ्या तुम्ही.” बहीण आप्पांना आग्रह करीत म्हणाली.

“अगं पण..”

“हाय का अजून तुमचा पण. घ्या आप्पा. या भाऊबीजेला आपल्या बहिणीकडून भावासाठी भाऊबीज म्हणून समजा.” ती म्हणाली. आप्पांनी पाणावलेल्या डोळ्यांनी पेपर हातात घेतले.

“लेकीला माझी सून केलीस, अजून कसली भाऊबीज पाहिजेय आक्के मला.” म्हणत ढसाढसा रडत त्यांनी आपल्या बहिणीला मिठीत घेतले.

“माझी पण चुकी हायच की. या दहा वर्षांत मी एकदा पण न्हाय फिरकलो तुझ्याकडं. काय झालं तर मीच मोठा हुतो. पण न्हाय मी पण माझ्या बहिणीची खुशाली कध्धी कध्धी न्हाय विचारली, ना कधी तिच्या दारात येऊन तिला पाहिलं.” अश्रूंच्या प्रत्येक थेंबासरशी आप्पांनी आपल्या मनातल्या भावना मोकळ्या करून दिल्या.

“रातच्या रात राहिला असता आणि मग सकाळी गेला असता की आप्पा.” बहिणीने निरोप घ्यायला निघालेल्या आप्पांना राहण्याचा आग्रह केला. आप्पांनी पुढच्या वेळी सहकुटुंब राहण्यास येऊ असे आश्वासन देऊन तिथून तिचा निरोप घेतला आणि पंढरपूर चौकात येऊन एसटीची वाट पाहत उभे राहिले. आता रातच्या वेळेला त्यांना एसटी भेटली तर त्यांचे नशीबच!

काही घटका तिथे ताटकळत उभा राहिल्यावर आप्पांना वाटले की आत्ता काही एसटी यायची दिसत नाही. आता परत बहीणीकडे जाण्यावाचून पर्याय नाही म्हणून आप्पांनी जाण्यासाठी पाऊल उचलेले तोच पुन्हा त्या फटफटीचा आवाज आला मागून!

आप्पा मागे वळून पाहणार तोच फटफटी भुर्रदिशी निघून गेली पुढे.

“ओ तुकाराम, आवं तुकाराम.” म्हणून आप्पांनी जोराची हाक दिली आणि फटफटी पुढे जाऊन उभी राहिली. पाय टेकत बसलेल्या व्यक्तीने मागे वळून पाहिले. दिसायला तस्साच. तुकारामगत.

“बोला की पावणं, मला हाक दिली का?” त्या व्यक्तीने विचारले.

“होय, तुम्हालाच दिलती हाक.” आप्पा त्याच्याजवळ येत म्हणाले.

“पण मी तुकाराम न्हाय. पांडुरंग हाय.”

“कसं काय? दिस मावळायला मला हितं सोडून गेलता की तुमी. तवा तर तुकाराम नाव सांगितलं तुमी.” आप्पा गोंधळून म्हणाले.

त्यावर तो हसत म्हणाला, “नावात काय हाय? कधी मी ज्ञाना हाय तर कधी तुका. कधी नामा तर कधी चोखा हाय मी.”

“आता म्हणू नका तुम्ही विठ्ठल बी हाय म्हणून.” आप्पा त्याला हसतच म्हणाले.

“तुम्ही म्हटल्यावर झालं की, मग अजून आम्ही काय म्हणणार!” तोही एक स्मित करीत म्हणाला.

हास्यविनोद करीत आप्पा फटफटीमागे बसले आणि धूर सोडीत ती पळती झाली. मागे फडफडणाऱ्या त्या रबरी टाळीवर आता शब्द लिहिलेले होते- विठ्ठल. . . . विठ्ठल!! vitthal vitthal song

[समाप्त]

आधीचा भाग वाचण्यासाठी खाली क्लिक करा.

भाऊबीज भाग १

व्हायरस कथा मालिका वाचण्यासाठी खाली क्लिक करा:

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १


Spread the love

3 thoughts on “भाऊबीज भाग २

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *